रम्य ते बालपण

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
5 Oct 2010 - 10:58 pm

त्यावेळी मी तीसरी चौथीत असेन.तेव्हा मी बोरीवलीला रहायचो.पाच पैसे,वीस पैश्याचे नाणे हातात घेउन पेपरमीटच्या गोळ्या,बोरकुट्,पोंगा(त्या पिवळ्या नारंगी नळ्या),जांबुलवडी(हे असत चिंचेच पण आम्ही त्याला जांबुलवडीच म्हणायचो),गुलाबजाम(कशाने बनवतात माहीती नाही,पण गुलाबी असत म्हणुन हे नाव्),रसना पावडर - ही हातात तळव्यावर घेउन त्यावर जीभ फीरवायची(मला कुणी हे खाताना पाहुन माझ्याबद्दल काय मत बनवेल ह्याची तमा मी बाळगत नसे,मंदीराच्या पाय-यावर बसुन माझे चालु असायचे,खाउन झाले की त्यावर ईतर काही न खाता थंड पाणी पियायच्,पोटात जाउन 'रसना सरबत' तयार होत,एवढी अक्कल तेव्हा नसेल पण अस करायला मजा यायची) आणि जलजीरा पावडर ही जेवताना नेहमी खिशात असायची,भाजी आवडली नाही ही त्यात टाकायचो,भाजी घशाखाली उतरायला मदत व्हायची.चांगला दीवस असला की २५ कींवा ५० पैसे मिळायचे,मग त्याने 'राजाबाबु लॉटरी' विकत घ्यायची,ते चॉकलेटच्या पाकीटात स्टीकर असतात्,त्यावर नंबर बघुन तो आपल्याकडे असलेल्या पुस्तकाच्या त्याच नंबरच्या चौकटीत चिकटवायचा,दहा बारा नंबर मिळाले की मग काचेच ग्लास्,एखाद छोटं खेळणे वगैरे बक्षीस मिळायच.एकदा मला ह्यावर घड्याळ लागल,ते माझ्या हातात आल तस मी जो पळालो की कधी एकदा घरी जातोय अस झाल.मी आयुष्यात मोठं काहीतरी मिळवलय अस वाटत होत.घरात गेलो,बापाला हातातल घड्याळ दाखवल,"मला घड्याळ लागल!!" ह्या माझ्या वाक्याला "मी युपीएससीच्या परीक्षेत भारतात पहीला आलो!" असा सुर होता.आशा हीच की बापाने माझ्याशी प्रेमाचे दोन शब्द बोलावेत्,मला शबासकी द्यावी,माझे लाड करावेत्,पण कीलो कीलोच्या रायफल २४ तास अंगावर लादुन आर्मीत बटालियनला शिकवलेल्या त्या माणसाला माझे कौतुक वाटल नाही.पिताश्री काही बोलले नाहीत्,पण "कार्टा माझे मेहनीतीचे पैसे वाया घालवतोय" हे त्यांचे न बोललेले वाक्य मला तेव्हाही ऐकु आल........"व्वा रे बाबनु,पाच,दहा,वीस पैसे,देव पावला की १ रुपया द्यायचा आणि वर हे ऐकायच का??तो सुहास रोज रुपया आणतो,मला तुम्ही रुपया नाही देत कधी शाळेत जाताना!!"....................................हे कधीतरी तेव्हा मी बोललो असेन पण आज त्यातली चुक दीसते.कधी भुक लागली व एक रुपया खिशात असला की वडापावच्या गाडीजवळ मी ऐटीत जायचो,वडापाव दोन कींवा अडीच रुपयाला होता,एवढे महाग खाणे माझ्या अवाक्याबाहेर होत्,म्हणुन "एक चटणीपाव द्या" असे बोलुन मी तो पाव हातात येईपर्यंत त्यात कायकाय जिन्नस पडतायत हे लक्ष देउन बघायचो.चटणीपाव एक रुपयाला मिळायचा,म्हणुना आवडीने खायचो.घरी गेलो की आईला "मी आज चटणीपाव खाल्ला,मस्त होता!" अस सांगायचो.आई "उद्यापण खा,नाहीतर उद्या वडापाव खा" अस कधी बोलली नाही."आईला माझी काळजीच नाही,ती माझे लाडच नाही करत" अस मत बनवायला मला वेळ लागत नसे.
तर ह्या सर्व पौष्टीक खाद्यांमुळे मी कावीळ नावाच्या रोगाला माझ्या शरीरात घुसायला मदत केली.दहा बारा दीवस शाळेत जाउ शकलो नाही,मग त्यानंतर ५ दीवस सुट्टी घेउन मी गावाला जायला निघालो.सुहास खेळायला बोलवायला आला "आज संध्याकाळी जाणार आहेस ना? मग चल खेळायला जाउया"
मी मान नकरार्थी हलवली.
"काल तु बोलवलस तर मी आलो ना?"
"हा चल"

आम्ही गोट्या खेळुन झाल्यावर मंदीरात लपाछुपी खेळायला गेलो.सुहास माझ्याआधी धावत मंदीरात गेला व मांडी घालुन्,मान खाली टाकुन बसला.मला वाटल त्याला दम लागला आहे,पण तो खुप वेळ तसाच बसुन राहीली.
"हे सुहास्,चल खेळुया ना?"
सुहासने मान वर करुन माझ्याकडे बघितल.सुहासच्या डोळ्यात पाणी होत व गालावर डोळ्यातल पाणी पसरल होत.
"काय झाल्,लागल काय?"
"तु उद्या जाणार ना?"
मला आता सर्व कळल्,सुहासला माझ्याशिवाय व मला त्याच्याशिवाय मित्रच नव्हता,आमच कुणाशी पटतच नव्हत.मी ह्या आधीही गावाला गेलो होतो,पण आजारी असल्याने मी खुप दीवस त्याच्याबरोबर खेळलो नव्हतो.आणि आज आलो तेपण संध्याकाळी जाणार होतो.
"अरे मी येईन थोड्या दीवसांनी " मी अस काहीस म्हणालो.त्यावर सुहास जे बोलला,ते वाक्य आज मला आठवाव लागत नाही ,खुप मनाला लागल होत ते.
"साल्या तु उद्या जाणार ना?मग मी एकटाच खेळु?" ह्या वाक्यात खोटा राग होता व ईतक प्रेम होत की मला भरुन आल.माझ्या डोळ्यात पाणी आल,मी त्याला कसतरी गप्प केल.
संध्याकाळी निघताना मला एस्टीबाहेर उभा राहुन 'टाटा,टाटा" अस बोलायला सुहास माझ्याबरोबर होता.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
ह्या गोष्टीला आता जवळजवळ १५ वर्षे झाली.एकदा मी बारावीत असताना सुहास मला भेटायला आला होता.त्यानंतर आम्ही कधीच भेटलो नाही.का नाही भेटलो माहीती नाही.
पण आज जेव्हा देवाच्या कृपेने आरामात जगायला लागत ते सर्व मिळाले,तेव्हा मला ते मिळालय ह्याच जास्त अपृप(?) वाटत नाही.एसटी जाउन गाडी आली पण आज कुठे जाताना,मला सोडायला सुहास माझ्याबरोबर नसतो.तेव्हा 'राजाबाबु लॉटरी'च बक्षीस लागल्यावर जो उत्साह असायचा तो आज गेम्सच्या डीव्हीडी,युएमडी आणताना नसतो.पगारातले ५०% पैसे घरी जातात,पण बाप कधी ओरडत नाही,पैसे खर्चायला मिळाले म्हणुन मीही खुश होत नाही."साल्या,तु आज जाणार ना?" अस मी महाराष्ट्राबाहेर गेलो तरी कुणी मला बर वाटाव म्हणुन साधं खोटही बोलत नाही.
कीती महीने बापाच्या मागे लागुन बापाने घेउन दीलेली सायकल चोरीला गेली तेव्हा मी कुणी जवळचा माणुस मेल्यासरखा रडत होतो.आज मला काही वेळी जे नुकसान होत्,त्याने मी निराशही होत नाही.बापाकडे गडगंज पैसा नाही पण ज्या परीस्थीतीतुन मी वाढलो,तेव्हा बापाने मला तस का वागवल हे कळल.आई मला एखादा खाउ घेउन दीला की " त्या दोघांना सांगु नकोस,लपवुन ठेव" अस बोलायची,मला वाटायच "आई त्या दोघांचे लाड करत नाही".पण ह्यालाच 'काटकसर करणे' म्हणतात हे मला समजत नव्हत.

असो,'गेले ते दीवस राहील्या त्या आठवणी,रम्य ते बालपण' बस एवढच म्हणु शकतो.

बाय.

बालकथाविचार

प्रतिक्रिया

कौशी's picture

5 Oct 2010 - 11:55 pm | कौशी

बालपणीच्या आठवणी ....तेव्हाची विचार करण्याची पद्धत .....
आवडले

जिप्सी's picture

6 Oct 2010 - 9:23 pm | जिप्सी

मस्त लिहिलयं हो शानबा ! तेंव्हाची मजा आज कुठतरी हरवूनचं गेलीयं.

हा शानबा फार नालायक माणूस आहे,असं काही तरी लिहून जातो,आपण वाचतो आणि मग नंतर डोळे भरून येतात !

इंटरनेटस्नेही's picture

6 Oct 2010 - 1:23 am | इंटरनेटस्नेही

गुड वन.

यशवंतकुलकर्णी's picture

6 Oct 2010 - 2:02 am | यशवंतकुलकर्णी

प्रमोद्_पुणे's picture

6 Oct 2010 - 12:09 pm | प्रमोद्_पुणे

छान लिहिलय..

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Oct 2010 - 3:15 pm | बिपिन कार्यकर्ते

छान.

यशोधरा's picture

6 Oct 2010 - 3:19 pm | यशोधरा

आवडलं.

मेघवेडा's picture

6 Oct 2010 - 3:21 pm | मेघवेडा

छान लिहिलंय शानबा. :)