(फुटकळ गळक्या कौलांसंगे युद्ध आमुचे सुरू)

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जे न देखे रवी...
1 Oct 2010 - 2:06 pm

प्रेरणा - काही धागे व एक कौल यांना फुटकळ जाहीर करून त्यांच्यावर हल्ला-बोल करणारी विडंबनं व तथाकथित फुटकळ कौल आल्यावर फुटकळतेविरुद्ध युद्ध चांगलंच पेटलेलं आहे हे दिसलं. असं युद्ध करणाऱ्यांना स्फुरण चढावं यासाठी हे विरश्रीपूर्ण गीत लिहावंसं वाटलं.

फुटकळ गळक्या कौलांसंगे युद्ध आमुचे सुरू
अम्हिही कौलारू, अम्हिही कौलारू

युद्ध आवश्यक शांतीसाठी
बलात्कार कौमार्यासाठी
अम्हि बिन्धास करू, अम्हिही कौलारू

अमुच्या गळक्या कौलांखालुन
देवाघरि जी गेलो घेउन,
तीच चाळणी भरू, अम्हिही कौलारू

एक हतोडा अम्हास ठावे
जरी खिळा ना अम्हास गावे
ठोकाठोक करू, अम्हिही कौलारू

साप म्हणोनी भुई धोपटू
काठी तुटली मूठ आपटू
हातही फ्रॅक्चरू, अम्हिही कौलारू

मारूती-शेपूट पेटवा
जळो लंका, दाढि-केश वा
अम्हि मागे न सरू, अम्हिही कौलारू

हास्यवीररसविडंबन

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

1 Oct 2010 - 2:15 pm | श्रावण मोडक

चालू द्या... ;)

इन फॅक्ट, आता एकुणातच पुरे. कंटाळा आला.
कालचा गोंधळ बरा होता, असं म्हणायची वेळ आलेली आहे.
परवाच कोणत्या तरी धाग्यावर सुशिक्षितपणा, सुसंस्कृतपणा वगैरे वाचलं होतं, त्याची ही विडंबनं आणि कौल पाहून आठवण येतेय. तुमच्या इगोजपायी घडणारी ही फुटकळ युद्धं तुमच्या खव मधून लढा. अख्खं मिपा कशाला वेठीला धरताय? आणि हे वैयक्तिक तुम्हांलाच असं नाहीच पण संपादकमहोदयांनाही विसर पडावा म्हणजे कहरच आहे!

जमत असल्यास थांबवा.

अवांतरः काय ते मात्रा, वृत्त त्यातही थोडंफार गंडलय का?

यशोशी शंभर टक्के सहमत.
कुठे थांबावे हे सर्वानाच कळत नाही. दहा टक्के लोकाना ते कळते आणि पुलंसारख्या जेमतेम १ टक्के लोकाना जमते.

शेखर's picture

2 Oct 2010 - 1:49 am | शेखर

भाकरी का करपली? घोडा का अडला? पाने का सडली? हे प्रश्न मनात येऊन गेले.

मारूती-शेपूट पेटवा
जळो लंका, दाढि-केश वा
अम्हि मागे न सरू, अम्हिही कौलारू

हा हा हा! मस्त. विडंबन आवडले.

दत्ता काळे's picture

1 Oct 2010 - 2:56 pm | दत्ता काळे

वा.. वा..! युध्द चालू ठेवा

चिंतामणी's picture

1 Oct 2010 - 3:03 pm | चिंतामणी

बाकी मिपावर सध्या विडंबन काव्य प्रतिभेचा आणि कौलांचा पुर वहात आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Oct 2010 - 3:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

गुर्जींची नवनवोन्मेषशालिनी (का काय असते ती भानगड) प्रतिभा खालावण्याची चिंता सोडून एकदम पेटून रणांगणातच उतरलेली दिसते.

अशी इंटलेक्च्युअल भांडणं बघायला आपल्याला तर ब्वॉ मजा येते! आता ही मारामारी न होता फक्त friendly banter करण्याची जबाबदारी संबंधित समजूतदार लोकं घेतील याची मला पूर्ण खात्री आहे.

अम्हिही कौलारू

आम्हिही लिहीण्यात काही धोका नाही कारण जोडाक्षराच्या आधीचं अक्षर दीर्घ गणलं जातं(?), तेवढीच शुद्धलेखनाची दाणादाण कमी होईल! ;-)

बेसनलाडू's picture

2 Oct 2010 - 1:43 am | बेसनलाडू

व्हावीतच. फक्त ती 'भांडणे' म्हणून नव्हे तर इन्टलेक्च्युअली व्हावीत इतकेच :)
(इन्टलेक्च्युअल)बेसनलाडू
विडंबन चांगले आहे. मात्रा वगैरेची ठाकठोक करून अधिक बांधेसूद करता येईल. असो.
(बांधेसूद)बेसनलाडू

आंबोळी's picture

1 Oct 2010 - 4:52 pm | आंबोळी

चालू द्या!

बास्स की आता
लै कट्टाळा !