मला खूप आवडलं म्हणुन येथे दिलं आहे.
धोरणात बसत नसेल तर खुशाल उडवा.
जरा वाचा आणि विचार करा ..........
राज्य करावं तर शिवाजी महाराजां सारखं .
शूर असावं तर राणा प्रतापसारखं.
स्वामिनिष्ठ असावं तर खंडो बल्लाळासारखं.
देशभक्त असावं तर भगतसिंगसारखं.
कारस्थानी असावं तर आनंदीबाईसारखं .
हुशार असावं तर बिरबलासारखं .
धाडसी असावं तर डॉ.आनंदी जोशीसारखं.
करिअर करावी तर लता मंगेशकरसारखी.
सगळ्यांच्या गळ्यातील ताईत ह्वाव तर सचिन तेंडूलकरसारखं.
सत्तेला चिकटून रहाव तर शरद पवारांसारख.
राजकीय पक्ष बदलावेत तर सुब्रमन्यम स्वामीसारखं.
बेसूर गाव तर अलिशा चिनॉयसारखं.
समस्त लोकांना उल्लू बनवावं तर ललित मोदीसारखं.
अष्टपैलू लेखक असावं तर जयवंत दळवीसारखं.
देशाला ललामभूत ह्वाव तर बिल गेट्ससारखं.
निरलस सेवार्थी ह्वाव तर डॉ.तात्यासाहेब लहानेसारखं.
शब्दांचे बुडबुडे फोडावेत तर कॉंग्रेससारखं.
राष्ट्रभाषेचे धिंडवडे काढावेत तर ममता बनेर्जीसारखे.
लग्न न करता नुसतच बिनधास्त बरोबर रहाव तर बिपाशा बसूसारखं .
लग्नाशिवाय झालेली मुलगी खुल्लम खुल्ला वाढवावी तर नीना गुप्तासारखी.
खमक्या असावं तर लालू प्रसादसारखं.
लफडेबाज असावं तर टायगर वूड्ससारखं.
लग्न करावीत तर एलिझाबेथ टेलरसारखी.
उद्योगपती ह्वाव तर टाटासारखं.
सहकुटुंब यशस्वी ह्वाव तर अमिताभ बच्चनसारखं.
अनाकलनीय लिहाव तर ते ग्रेससारखं.
व्यंगचित्रे काढावीत तर ती आर.के.लक्ष्मणसारखी.
बाराच्या भावात जाव तर राजेश खन्नासारखं .
गझल गावी तर मेहंदी हसनसारखी.
घर असावं तर मुकेश अंबानीसारखं.
बायको असावी तर अभिषेक बच्चनसारखी.
चालीचा चोर असावं तर अन्नू मलिकसारखं.
भ्रष्टाचारी असावं तर इंडियन मेडिकल कौन्सिलचा अध्यक्ष केतन देसाईसारखं.
बोलबच्चन असावं तर अरुण जेटलीसारखं.
प्रेमवीर असावं तर शोऐब मलिकसारखं.
निर्ल्लज कामांध असावं तर किचकासारखं किंवा शायनी आहुजासारखं.
प्रेक्षक नाहीत हे कळून सुद्धा सिनेमे काढावेत तर देव आनंदसारखं.
बाईने रूपवान व 'ग्रेसफुल' असावं तर गायत्री देवीसारखं.
बाईन कस नसाव तर राखी सावंतसारखं .
निर्विष विनोद करावा तर पु.ल.देशपांडेसारखा.
लग्न करून सुखी ह्वाव तर माधुरी दीक्षितसारखं.
लग्न करून दुखी ह्वाव तर अदनान सामीसारखं.
दुसरी बायको करायची तर हेमा मालीनिसारखी.
त्रेचाळीस वय झाल तरी देवाच्या नावावर सोडलेल्या बोकडासारखं बकऱ्यांच्या
मागे उंडरत फिरायचं तर सलमान खानसारखं.
बाबा आदमच्या जमान्यात लिहलेल्या एका कादंबरीच्या जीवावर मिशीला तूप लावून फिरायचं तर भालचंद्रनेमाडेसारखं.
बाबा आदमच्या जमान्यात काढलेल्या एका चित्रपटाच्या जीवावर आजही टेचात फिरायचं तर रामदासफुटाणेसारखं.
आनंदात व उत्साहात जगायचं तर यशवंत देवांसारखं.
रडत आणि कटकट करीत जगायचं तर माझ्यासारखं.
प्रतिक्रिया
27 Sep 2010 - 10:13 am | NIKESH
क्ल्प ना आव् डली..
गणप त वाण्याची कविता असल्यास दाखवा..
( गणप त वाणी बिडी पितांना गायचा नुसतीच गाणी...)
27 Sep 2010 - 10:59 am | सदाची पहुणी
एकद जगायच कस " रडत रडत कि हसत हसत " हे कळाल कि आयुष्य खुप सोप्प होत. कुणासारखे ते आपल्या मगदुरप्रमाणे
27 Sep 2010 - 12:03 pm | विनायक प्रभू
माझाही सहभाग
संपादकांना छळावे अवलियासारखे
भाग अर्धवट सोडावेत रामदासासारखे
27 Sep 2010 - 12:11 pm | गांधीवादी
पिना माराव्यात तर ** सारख्या
(जाऊदे, नाव नको लिहियाला )
27 Sep 2010 - 12:12 pm | नगरीनिरंजन
छ्या, ऐनवेळी कच खावी तर ही अशी ;-)
27 Sep 2010 - 12:41 pm | योगी९००
बायको असावी तर अभिषेक बच्चनसारखी.
???
27 Sep 2010 - 3:09 pm | आंसमा शख्स
जग बदलते आहे. कोर्टानेही त्यांचा निर्णय दिला आहे.
अभिषेकला 'हे' मान्य असेल तर आक्षेप कशाला?
भारतात भावनां दडपल्या जातात असे एक प्राध्यापक मिपावर म्हणाल्याचे वाचल्याचे आठवले.
तेंव्हा दडपू नका...
अभिषेक तर अभिषेक...
27 Sep 2010 - 3:23 pm | अमोल केळकर
बाराच्या भावात जाव तर राजेश खन्नासारखं . -- हाहाहा हे खासच :)
अमोल
27 Sep 2010 - 3:43 pm | ज्ञानेश...
"हे एवढं बोअर बोअर लिहायला कसं जमतं हो तुम्हाला वर्षानुवर्षे ?" असा प्रश्न विचारणार आहे मी एकदा काणेकरांना.
27 Sep 2010 - 4:45 pm | गणेशा
शब्दा बळेच जुळवुन नावे लिहिलेली आहेत असे वाटले ..
असो ..
27 Sep 2010 - 5:41 pm | मुक्तसुनीत
क्लिशेज चा कीस पाडावा कणेकरांसारखा.
27 Sep 2010 - 6:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
शिवाजी महाराज, ममता बॅनर्जी, नीना गुप्ता, बिल गेट्स, शायनी आहुजा, शोएब अख्तर आणि मी (शिरीष कणेकर) ही सगळी नावं एकाच वेळी एकाच सोऱ्यातनं पाडावीत तर कणेकरांनीच!
27 Sep 2010 - 6:15 pm | सुहास..
कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!कॉलींग डॉन्या ! मेढे !! मेढे !!
27 Sep 2010 - 7:41 pm | तिमा
सर्वांना आधीच माहिती असलेली व चावून चोथा झालेली 'गाजरहलव्याची' गोष्ट सांगावी ती शिरीष कणेकरांनीच.
घटं भिंद्यात पटं छिंद्यात कुर्यात रासभरोहणम
येन केन प्रकारेण प्रसिध्दः पुरषौ भवेत ||
27 Sep 2010 - 9:15 pm | विसोबा खेचर
छान रे..