कोण म्हणे देव
भक्ताचा भुकेला
वारकरी मेला
वारीतच
विश्वात्मक ऐसे
इथे काही नाही
तुच तुला पाही
आत मध्ये
तुझ्या अस्तित्वाचा
एकच पुरावा
मी पणा पहावा
अंतर्यामी
अंतर्यामी घ्यावा
शोध ज्याचा त्याने
विचार स्पंदने
निरिक्षावी
सांडे अहंकार
वासना विकार
जेव्हा निर्विकार
पाहसी तू...!!
प्रतिक्रिया
25 Sep 2010 - 1:54 pm | sneharani
अंतर्यामी घ्यावा
शोध ज्याचा त्याने
विचार स्पंदने
निरिक्षावी
हे मस्तच !
25 Sep 2010 - 2:12 pm | बोक्या भौ
छान आहे
26 Sep 2010 - 7:20 am | राघव
छान लिहिलंय!
26 Sep 2010 - 7:58 am | प्राजु
वाह!!
विश्वात्मक ऐसे
इथे काही नाही
तुच तुला पाही
आत मध्ये
मस्तच!!
26 Sep 2010 - 4:35 pm | पंचम
ईश्वर शोधण्या निघालो...
मी पण पायात जखडलो
अंतर्यामी निरखलो
भाबडा मी....!!!!
पाहण्या रूप ईश्वराचे...
कण-कणात मातीचे....
येथे हवेत जातीचे....
आम्ही नाही.....!!!!
आम्ही बोलावे काही
आमची ऐपतच नाही
अशीच सेवा व्हावी....
मराठीची.....!!!
अप्रतिम .....!!!!!
26 Sep 2010 - 8:39 pm | पैसा
आवडला. पंचमची प्रतिक्रिया पण आव्डली.
26 Sep 2010 - 9:32 pm | चन्द्रशेखर गोखले
पंचमदा, आपण ग्रेट आहात ....!
27 Sep 2010 - 1:52 am | अथांग
दोन्ही काव्यरुपे आवडली !