निसर्गाची भाषा

शुचि's picture
शुचि in जे न देखे रवी...
25 Sep 2010 - 2:33 am

आई फक्त माणूसच बोलू शकतो का?
नाही बाळा, सारी सृष्टी बोलते आपल्याशी ऐक जरा. फक्त भाषा भिन्न असते.
____

चंद्राची भाषा चांदणे, सूर्याची भाषा रवीकिरणे
वार्‍याची भाषा झुळकेची, समुद्राची अलवार गाजेची ||१||
पिंपळवृक्षाची सळसळ, नदीनाल्यांची खळखळ
सार्‍यांचे मन उमगेल तुला, स्तब्ध शांत करशील मना||२||
कमळ बोलतसे उमलण्यामधुनी, मधमाशी ती कष्टांमधुनी
पहाड बोले अचलपणांतुनी, नभ ते त्याच्या पोकळीतुनी||३||
मौन होउनी संवाद साध बघ, आकळेल निसर्ग तुला
सार्‍यांचे मन उमगेल तुला, स्तब्ध शांत करशील मना||४||

शांतरसकविता

प्रतिक्रिया

अथांग's picture

25 Sep 2010 - 4:16 am | अथांग

सुरेख कल्पना! आपल्य रोजच्या धबडग्यात हे निसर्गाचे शब्दं/भाषा निसटतच जातात नाही का, आपल्या जाणीवेतुन?

स्पंदना's picture

25 Sep 2010 - 6:55 am | स्पंदना

सुं सुं बोले वारा , भरे आसमंत सारा,
आहे ॐ काराचा नारा, सार्‍या विश्वामध्ये ...!!

सुन्दर शुची, कुणाला मुलीला सांगते आहेस?

>> सुं सुं बोले वारा , भरे आसमंत सारा,
आहे ॐ काराचा नारा, सार्‍या विश्वामध्ये ...!! >>
सुंदर!!!!

हो ग मुलीला सांगतेय :)

विसोबा खेचर's picture

27 Sep 2010 - 9:12 pm | विसोबा खेचर

छानच..

व्वा ! छानंय कविता :)

आपल्या मुलांना निसर्ग वाचायला शिकवलाच पाहिजे नै !