दिलेल्या ओळीची विडंबन परिपूर्ती त्याच मीटरमध्ये करा. तुमची ओळ हसू येणारी हवी, पण अश्लील नको.
परिपूर्तीसाठी ओळ आहे
राजसा जवळी जरा बसा
आता तुम्हाला त्यापुढे गेयता टिकेल असे दोन-तीन शब्दच टाकायचे आहेत. उदाहरणार्थ
राजसा जवळी जरा बसा, लाळ ती पुसा
किंवा
राजसा जवळी जरा बसा, रडा ढसढसा
(पुन्हा एकदा विनंती : अश्लील सूचक शब्द टाकू नयेत)
प्रतिक्रिया
23 Sep 2010 - 2:50 pm | विनायक प्रभू
कठीण आहे.
23 Sep 2010 - 2:50 pm | सुत्रधार
राजसा जवळी जरा बसा, विदुषक बाई जसा
राजसा जवळी जरा बसा, उडवा कीहो मासा
राजसा जवळी जरा बसा, तोन्डाला पाने पुसा
23 Sep 2010 - 3:28 pm | योगप्रभू
सूत्रधार,
जमलं तुम्हाला. आणखी येऊ द्या.
विनायक,
फार अवघड नाहीय. हे बघा
राजसा जवळी जरा बसा, त्रास हा कसा
राजसा जवळी जरा बसा, जरासे हसा
राजसा जवळी जरा बसा, घाबरट ससा
23 Sep 2010 - 3:32 pm | Nile
अवघड नाहीए तर तुम्हीच करा की राव, आम्हाला कशाला सांगता? ;)
23 Sep 2010 - 3:31 pm | विनायक प्रभू
विनंती करायची आणि आपणच मोडाय्ची.?
23 Sep 2010 - 3:33 pm | Nile
हॅ हॅ हॅ, तुम्हाल वळकत नाहीत ते अजुन, मास्तर.
23 Sep 2010 - 3:47 pm | यशोधरा
नायल्या, नायल्या लेका बलिष्टर का नाही झालास!
23 Sep 2010 - 3:46 pm | विजुभाऊ
राजसा जवळी जरा बसा, लाळ ती पुसा
राजसा जवळी जरा बसा थोडी आण्खी ढोसा
दारू ती.... राजसा
राजसा जवळी जरा पत्ते की पिसा
लावून एक्का.... राजसा
राजसा जवळी जरा बसा कोपर्यात घुसा
ढेकूण ठेचा..... राजसा
23 Sep 2010 - 3:49 pm | मेघवेडा
अश्लील अश्लील
23 Sep 2010 - 3:48 pm | विनायक प्रभू
ते घाबरट सशाचे पण जरा बघा की.
23 Sep 2010 - 3:49 pm | सुत्रधार
राजसा जवळी जरा बसा, जाच हा कसा
राजसा जवळी जरा बसा, डाग जरा घासा
राजसा जवळी जरा बसा, कवळीत हळु हसा
राजसा जवळी जरा बसा, कोपर्यात वाकुन बसा
राजसा जवळी जरा बसा,मारीला तळ्यात मासा
राजसा जवळी जरा बसा,सगळीच भान्डी घासा
राजसा जवळी जरा बसा,दु़खतो का घसा
राजसा जवळी जरा बसा,का मारीला ससा
राजसा जवळी जरा बसा,चिरमुरे म्हन्जे नुसता भुसा
राजसा जवळी जरा बसा,मिळेल काहो पैसा
23 Sep 2010 - 3:52 pm | विनायक प्रभू
कमीत कमी ५ ओळीत विनंतीचा मान ठेवला गेला नाही.
ब्रिटीश प्रुंग्या.
23 Sep 2010 - 4:11 pm | योगप्रभू
विजुभाऊ आणि सूत्रधार,
धन्यवाद.
हे आणखी बघा
राजसा जवळी जरा बसा, सुकलाय घसा
राजसा जवळी जरा बसा, पसरला पसा
राजसा जवळी जरा बसा, देऊ का ठोसा?
राजसा जवळी जरा बसा, फाटलाय खिसा
राजसा जवळी जरा बसा, उगा का रुसा?
23 Sep 2010 - 4:22 pm | पर्नल नेने मराठे
राजसा जवळी जरा बसा, मालकांचे जरा ऐका
घाला शेअर मधे पैसा, मग रडा ढसा ढसा
23 Sep 2010 - 4:25 pm | विनायक प्रभू
एकदम मस्त
23 Sep 2010 - 4:47 pm | सूड
एवढ्या शृंगारिक लावणीचं विडंबन पाहून दोले पानव्ले.
23 Sep 2010 - 4:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो देवरूखकर, चांगल्या काव्याचंच विडंबन होऊ शकतं (अपवादः शरदिन्या); फालतू कवितांच्या नशीबात विडंबन आल्याचं माझ्या तरी माहितीत नाही.
अवांतरः http://atre-uvach.blogspot.com/2010/04/blog-post_05.html
23 Sep 2010 - 6:10 pm | पर्नल नेने मराठे
राजसा किचनमधे घुसा, कामाला लागा
भाजी जरा धुवा, आता ति चिरा
फोडणीला टाका, तोवर कणिक जरा मळा
भाजी जरा परता, गॅस बन्द् करा
कुकरची तयारी करा, तवा गॅसवर ठेवा
पोळ्या छानस्या लाटा, त्या निट जरा भाजा
टिफिन आता भरा, भान्डी जरा घासा
किचन जरा आवरा, आता तोन्द काळे करा ;)
23 Sep 2010 - 6:55 pm | यशोधरा
चुचे, भारी! =))
23 Sep 2010 - 6:57 pm | सूड
काकूंनी तर सरळ राजसांना कामाची लिस्ट दिलंनीत.
24 Sep 2010 - 11:40 am | विजुभाऊ
काकूंनी तर सरळ राजसांना कामाची लिस्ट दिलंनीत.
अरे बाबा हाच तर फरक आहे स्त्री आणि पुरुष यांच्यात.
स्त्रीच पुरुषाला कामाला लावते
24 Sep 2010 - 11:38 am | विजुभाऊ
आता तोन्द काळे करा
=))
चुचू बाइ तोन्द याचा अर्थ ढेरी.....
मराठीत तरी ढेरी काळी करणे असा काही वाक्प्रचार आस्तित्वात नाहिय्ये
23 Sep 2010 - 6:17 pm | विनायक प्रभू
आहे काकु.
एवढे सगळे केल्यावर काहीतरी बक्षीस नको?
23 Sep 2010 - 6:17 pm | विनायक प्रभू
आहे काकु.
एवढे सगळे केल्यावर काहीतरी बक्षीस नको?