सल्ल्यासाठी विजूभाऊनी, इथ फोडिला टाहो,
प्रतिसादातून पडती लाथा, श्रोते ऐका हो !
त्याच्या धाग्याचीच वाट आज लावली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!
गंगेवानी निर्मळ होतं, असं पुण्य गाव
सुखी समाधानी होतं, रंक आणि राव
त्याची गुणगौरवानं किर्ती वाढली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!
अशा गावि आला एक चालू जालवंत
महाचालू म्हणती त्याला, कुणी म्हणे चंट
त्याला पुण्यामंन्दी नोकरी हि लागली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!
स्वस्त घरासाठी त्यांन शोधाशोध केली
हवेशीर कोठी एक पाहण्यात आली
पण अट मालकानं, अशी घातली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!
फॅमिलीस आणा अधी असा हट्ट केला
घरासाठी विजूभाऊ त्या पार येडा झाला
त्यांनी लाज भीड निती सारी सोडली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!
करारस गेला तेव्हा, त्याने केला डाव
मैत्रिणीस करूनी पत्नी सांगितले नाव
त्यानं लबाडीने वेळ होती मारली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!
खुळ्यास त्या कळला नाही, नियतिचा खेळ
मैत्रिणीच्या नवर्यानेच पुढे केला घोळ
त्याने घरमालकाची कामं घेतली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!
योगायोग पाहा तरी कसा अता झाला
कामासाठी मालक त्याच्या ऑफिसात गेला
तिथे मैत्रीण त्याला ह्याची भेटली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!
क्षणामध्ये ओळखले त्याने फसगत झाली
सत्य शोधणास त्यांने खेळी एक केली
त्याने दोघींना त्या अवतान धाडली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!
सुटण्यास लफड्यातून ह्या, ह्याने केला डाव
सल्ल्या साठी मिपावरती घेतली ही धाव
त्याच्या लेंग्याची अयती नाडी घावली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!
मार बायकोला खोट्या, खरीस तू आण
किंवा त्याचा पापा घे तू गालावरी छाण
अश्या सल्ल्याची ही रांग बघा लागली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!
याची देही याची डोळा पाहिले मरण
वाचकांनी देउन सल्ले रचिले सरण
त्यांचा कर्मसोहळ्याची यात्रा चालली
कशी वाचकांनी त्याची लाज काढली!
प्रतिक्रिया
22 Sep 2010 - 3:19 pm | यशोधरा
अग्गग्ग!! =))
22 Sep 2010 - 10:46 pm | संदीप चित्रे
असेच म्हणतो... अग्गग्ग ! :)
केसु एकदम फॉर्मात !
3 Nov 2010 - 8:23 pm | प्रियाली
+१.
22 Sep 2010 - 3:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
जालावरच तुमच्या पायांचा फोटो आहे तो शोधून दर्शनासाठी (सशुल्क) उपलब्ध करून देतेच.
22 Sep 2010 - 9:24 pm | पैसा
(सौजन्यः सुनील पाटकरांचे चप्पल पुराण आणि दीपक यांची त्यावरील प्रतिक्रिया.)
इथे बघा.
22 Sep 2010 - 3:20 pm | श्रावण मोडक
अगायायायायाया.
हिशेब चुकता झाला का? ;)
आता इथंही शतक!
22 Sep 2010 - 3:23 pm | गणपा
=)) =)) =))
अटके पार.
22 Sep 2010 - 3:38 pm | चेतन
गुरुजी साष्टांग __/\__
चेतन
अवांतरः मिभो विजुभाउ या धाग्यानंतर कुठल्या पानावर :)
23 Sep 2010 - 1:45 am | बेसनलाडू
_/\_ साष्टांग दंडवत!!!!!
(नतमस्तक) बेसनलाडू
22 Sep 2010 - 3:26 pm | नितिन थत्ते
बाजार उठवला.
=))
22 Sep 2010 - 3:29 pm | धमाल मुलगा
म्हणुनच केसुगुर्जींना कुठं न्यायची सोय नाही. दिसलं धोतर की ओढ..दिसलं धोतर की ओढ... ;)
22 Sep 2010 - 11:01 pm | श्रावण मोडक
भापो. ;) मालबरो लाईट्स, इंडिया!
22 Sep 2010 - 3:32 pm | मेघवेडा
एकदम
झकास्स!
22 Sep 2010 - 3:32 pm | ब्रिटिश टिंग्या
=))
22 Sep 2010 - 3:32 pm | स्मिता_१३
__/\__
22 Sep 2010 - 3:39 pm | बिपिन कार्यकर्ते
टेंपोत बसवला!!!
... आणि आता मूळ धागाही वाचावा लागणार....
22 Sep 2010 - 3:47 pm | धमाल मुलगा
>>आणि आता मूळ धागाही वाचावा लागणार....
हाय कंबख्त, तुने पी ही नहीं.
22 Sep 2010 - 4:39 pm | बिपिन कार्यकर्ते
सर, सध्या काही अगदीच जरूरी वैयक्तिक कामं करायलाही वेळ मुश्किलीने मिळतो आहे... कोणती ते विचारू नका लगेच... त्यामुळे सगळीच गंमत जंमत मारामार्या वगैरेपासून लांब आहे. असो.
22 Sep 2010 - 6:51 pm | पर्नल नेने मराठे
उप्मा करुन ठेवलाय...
22 Sep 2010 - 3:43 pm | मितान
दं ड व त !!!!
22 Sep 2010 - 3:50 pm | मस्त कलंदर
अगदी झक्कास झालंय.. माझ्या डोळ्यांसमोर केसु हे गाणं हातात तुणतुणं घेऊन म्हणताहेत आणि मधून मधून विजुभाऊ त्यांच्यामागे "नाही.. नाही.. नाही..." म्हणत स्टेजवर इकडून तिकडे.. तिकडून इकडे करत आहेत असेही आले!!!
22 Sep 2010 - 3:52 pm | श्रावण मोडक
काय? केसु आणि तुणतुणं? ;) केसु, काय ऐकतोय हे? ;)
22 Sep 2010 - 3:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
शी बै, अच्रत!
23 Sep 2010 - 12:38 am | नंदन
कडक विडंबन, केसुगुर्जी!
काय विजुअल आपलं विज्युअल आहे! अगागागा, म्येलो!
23 Sep 2010 - 11:05 am | केशवसुमार
मला विजुभाउचं खर कलंत्र तुनतुणे वाजवताना आणि मागे विजुभाउ नाही नाही .. म्हणताना दिसत होते..
(विजुअल)केशवसुमार
23 Sep 2010 - 11:42 am | परिकथेतील राजकुमार
च्यायला एकदा लुटलेला सुरतेचा बाजार पुन्हा लुटल्यागत वाटला.
22 Sep 2010 - 4:20 pm | नावातकायआहे
--/\--
22 Sep 2010 - 4:27 pm | निखिल देशपांडे
पुरता बाजार उठवला!!!
22 Sep 2010 - 4:45 pm | पुष्करिणी
अप्रतिम , महान
23 Sep 2010 - 11:31 am | अस्मी
महान!!
22 Sep 2010 - 6:01 pm | चिंतामणी
थोडक्यातच सांगतो.
ह. ह. पु.वा.
22 Sep 2010 - 6:28 pm | प्रियाली
ह. ह. पु. वा.
सा. नमस्कार!!
फक्त एक कळले नाही.
विषयः नृत्य??? या विडंबनावर कोण कोण नृत्य करणार आहेत त्याची यादी द्यावी आणि सोबत रेकॉर्डिंग करून मिपावर लावलेत तर अधिकच बहार येईल. ;)
23 Sep 2010 - 11:09 am | केशवसुमार
लेख नृत्य ह्या सदरात वर्गीत केला आहे त्यामुळे आम्ही लावणीचा आधार घेतला आणि विडंबन हे पणा नृत्य ह्या सदरात वर्ग केले..
22 Sep 2010 - 6:45 pm | अनामिक
ज ह ब ह र्या!!!
_/\_
22 Sep 2010 - 7:00 pm | सुहास..
_/\__/\__/\__/\__/\__/\_
_/\__/\__/\__/\__/\_
_/\__/\__/\__/\_
_/\__/\__/\_
_/\__/\_
_/\_
_/\__/\_
_/\__/\__/\_
_/\__/\__/\__/\_
_/\__/\__/\__/\__/\_
_/\__/\__/\__/\__/\__/\_
22 Sep 2010 - 7:02 pm | चतुरंग
सक्काळी सक्काळी गुर्जींनी बाजार उठवला!!!
विजुभौंची पतंग कन्नीसकट कापली राव!!!!! =)) =)) =)) =)) =))
(विडंबननृत्यदिग्दर्शक)रंगुल सरकार
22 Sep 2010 - 8:59 pm | प्रीत-मोहर
हॅहॅहॅ,,,,,,,तुम्च्यापायी आज बॉस्ची बोलणी खाल्ली.....हहपुवा.....गेली.१० मिन्ट हसतच ए ......
22 Sep 2010 - 9:49 pm | स्वप्निल..
हाहहहाअहहहाआहहहहाआ =))
_/\_
22 Sep 2010 - 11:04 pm | प्राजु
अर्र!!! भलतंच घडलं जणू!! :)
22 Sep 2010 - 11:45 pm | शुचि
मस्त!!!
23 Sep 2010 - 12:03 am | विजुभाऊ
हॅ हॅ हॅ
( या खेरीज दुसरी काही प्रतिक्रीया आहे का याचा सल्ला कोण देईल का )
23 Sep 2010 - 12:07 am | सुनील
मस्त!!!
23 Sep 2010 - 1:54 am | भडकमकर मास्तर
सल्ला मागितला त्यांनी आणि हे काय दिलंत हो केसुगुर्जी...
:) :) :)
23 Sep 2010 - 3:55 am | शहराजाद
-^-
हहपुवा
23 Sep 2010 - 4:28 am | पारुबाई
टांगा पलटी घोडे फरार
23 Sep 2010 - 7:15 am | रेवती
कोपरापासून हात जोडून नमस्कार!
कधीतरीच येउन असे षटकार मारून पुन्हा गायब!
23 Sep 2010 - 11:48 am | अवलिया
संपादकीय टवाळकी.
टाळ्या वाजवल्याच पाहिजेत.
23 Sep 2010 - 9:11 pm | केशवसुमार
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार
23 Sep 2010 - 10:41 pm | टिउ
दोन बायका आणि फजिती ऐका!
3 Nov 2010 - 7:44 pm | आजानुकर्ण
उत्कृष्ट विडंबन.