लहानपण देगा देवा

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
14 May 2008 - 1:43 am

जे नसत त्याचा हव्यास हा तर खास मानवी स्वभाव!

आज मी 'लहानपण' हा शब्द शब्दशः बालपण या अर्थाने वापरतो आहे. लहान असताना कधी एकदा मोठे होऊ, कधी कर्ते होऊ, आपण आपले निर्णय घेऊ असे वाटत असते. एकदा मोठे झालो की राहुन राहुन वाटते की लहान होतो तेच बरे होतो. पण तसे होणे शक्य नसते. मात्र मोठेपणाच्या शापाला उ:शाप असतो तो घरातल्या वडीलधार्‍यांचा. जो पर्यंत घरात मोठी माणसे आहेत तोपर्यंत आपण लहानच की!

आपले दप्तर शाळेतुन आल्यावर भिरकावायचो तसेच कधीतरी मोठेपणीही आपले कामाचे कागद 'बाबा, जरा हे उचलुन ठेवा, लागले की घेईन' असे म्हणत तिर्थरुपांकडे सोपवुन मोकळे होण्यात एक वेगळाच आनंद असतो. कधी लहर आली तर रात्री आईच्या हातात तेलाची बाटली कोंबुन मान खाली घालुन पुढे उभे राहुन आणि फर्माइशीनुसार डोक्याला आईच्या हाताने तेल लावुन घेण्यात जे सुख आहे ते केवळ अवर्णनियच! तसा कुठलाच पदार्थ खाण्यात अपूर्वाई राहिली नाही, पण अशाच एखाद्या रविवारी सकाळची फेरी मारून आल्यावर बाबा पिशवीतुन मस्त कुरकुरीत पालकाची भजी काढुन पुडा हाती देत म्हणतात 'तुला आवडतात ना?' बस्स्! त्या भज्यांची लज्जत काही आगळीच. कचेरीत कधी कुणी चुक काढली वा विरोध केला तर अहंकाराने फणकारणारे आपण घरी आई एखाददा ओरडते आणि म्हणते 'अरे वाजले किती? रात्र झाल्ये, पहाट नाही; तु जागत राहतोस उगाच संगणकापुढे अपरात्री मग मुलाला काय बोलणार तुझ्या? मोठा झालास तरी अजुन समजत नाही?' तेव्हा मात्र विलक्षण सुखावतो. कुणीतरी ओरडाणार तरी हक्काच असायला हव ना?

आपल्या कामाच्या बाबतीत कुणी आठवण करुन दिलेली आपल्याला आवडत नाही, 'मला माझे काम सांगायची गरज नाही मला ते समजते' हे उत्तर मनात असते. मात्र 'अरे पतपत्राची देयके येउन पडली आहेत, वेळीच चुकती कर नाही तर उगाच दंड भरावा लागेल' या बाबांच्या नित्याच्या बोलण्याचा राग येणे दूरच राहो, पण इतकी सवय होते की आपण खुशाल काही विसारले तरी चालते, करतील बाबा आठवण या बेफिकीरीत राहतो. 'सकाळी बाहेर पडताना कण्हेरी घेत जा, उन्हाळा सुरू झालाय' हे शब्द ऐकल्याशिवाय उन्हाळा सुरू झाला आहे हे समजतच नाही.

आता कुणी याला 'बाळुगिरी' म्हणेल. म्हणे ना! मला तर अशी बाळुगिरी भयंकर आवडते. आणि अशी बाळुगीरी करायला मिळणे हे मी तर महद्भाग्य समजतो! टोणगा कामानिमित्त बाहेर जायला निघाला तर पंचाहत्तरीची आई बेसनाचे लाडु करून देते आणि ऐंशी वर्षाचे बाबा 'अरे नुसते घरी फालतु कार्यक्रम बघत बसायचे ते तुला सोडायला विमानतळावर येतो' असे म्हणत उत्साहाने निघतात याहुन वेगळे भाग्याचे लक्षण ते कोणते? आपण अजूनही लहान आहोत कारण मुले कितीही मोठी झाली तरी आई वडीलांना ती लहानच असतात या भावनेने मी मनोमन सुखावतो.

मंडळी, आज हे सगळे सांगायचे कारण म्हणजे आज माझ्या आई वडिलांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस आहे! ज्यांनी आपल्याला सर्वस्व दिले त्यांना आपण काय देणार? मात्र मोठ्यांचा वाढदिवस म्हणजे लहानांची चंगळ; ते आपल्याला काय देणार याची उत्सुकता अर्थातच मनात आहे. आणि म्हणुनच आज देवापुढे हात जोडुन मागणे मागतो आहे, 'लहानपण देगा देवा'

आई-बाबा १९५८

आई-बाबा २००८

संस्कृतीसद्भावना

प्रतिक्रिया

ईश्वरी's picture

14 May 2008 - 1:51 am | ईश्वरी

सर्वसाक्षी , तुमच्या आईवडीलांना लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
लेख छान झालाय. फोटो टाकून लेखाची रंगत वाढवलीत. दोन्ही फोटो मस्त.

मलाही हेच म्हणावेसे वाटते...'लहानपण देगा देवा'
ईश्वरी

गणपा's picture

14 May 2008 - 2:12 am | गणपा

सर्वसाक्षी , सुंदर लेख.
आईबाबांना लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मात्र मोठेपणाच्या शापाला उ:शाप असतो तो घरातल्या वडीलधार्‍यांचा.
लाख मोलाचं बोललात.

-- गणापा

स्वाती राजेश's picture

14 May 2008 - 2:22 am | स्वाती राजेश

सर्वसाक्षी ,
आईवडीलांना लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

मन's picture

14 May 2008 - 2:49 am | मन

आपणा सर्व कुटुंबियांना या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.

बाकी "कुणीतरी मोठं आहे पाठिशी " ही भावना खरच बळ देते.

आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)

सन्जोप राव's picture

14 May 2008 - 6:39 am | सन्जोप राव

साक्षीजी,
तुमच्या आई -वडिलांना उदंड आयुष्य लाभो, या सदिच्छा!
अनावश्यक अवांतरः तुमचे वडील बोलताना खरेच 'पतपत्रकाची देयके' हेशब्द वापरतात का हो?
सन्जोप राव

विसोबा खेचर's picture

14 May 2008 - 8:23 am | विसोबा खेचर

कधी लहर आली तर रात्री आईच्या हातात तेलाची बाटली कोंबुन मान खाली घालुन पुढे उभे राहुन आणि फर्माइशीनुसार डोक्याला आईच्या हाताने तेल लावुन घेण्यात जे सुख आहे ते केवळ अवर्णनियच!

अगदी मनातलं बोललास साक्षिदेवा! माझ्या मते याहून मोठं सुख असूच शकत नाही! आजही माझी ७३ वर्षाची म्हातारी कधी प्रेमाने माझ्या माथ्यावर तेल घालते तेव्हा खूप तृप्ती वाटते!

टोणगा कामानिमित्त बाहेर जायला निघाला तर पंचाहत्तरीची आई बेसनाचे लाडु करून देते आणि ऐंशी वर्षाचे बाबा 'अरे नुसते घरी फालतु कार्यक्रम बघत बसायचे ते तुला सोडायला विमानतळावर येतो' असे म्हणत उत्साहाने निघतात याहुन वेगळे भाग्याचे लक्षण ते कोणते?

क्या बात है! हे वाचून डोळे पाणावले!

साक्षिदेवा, तुझ्या आईवडिलांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाकरता समस्त मिपा परिवाराच्या मन:पूर्वक शुभेच्छा! फोटू टाकल्यामुळे लेखाची शोभा वाढली आहे... :)

तात्या.

चतुरंग's picture

14 May 2008 - 8:46 am | चतुरंग

कृतज्ञता म्हणतात ती हीच!
आपल्या माणसांकडून, हक्कानं लाड पुरवून, हट्ट करुन घेण्यातलं सुख मिळायला नशीबवानच असावं लागतं ही सुखं पैशात तोलता येत नाहीत! तुम्ही भाग्यवान आहात. :)
दोन्ही प्रकाशचित्रे सुरेख आहेत. पहिल्यात संसाराच्या खेळाला सुरुवात करतानाचे नवथर भाव आणि दुसर्‍यात सार्थकतेने आशीर्वाद देणारी समाधानाची छटा!
तुमच्या माता-पित्यांना अनेक शुभेच्छा!

चतुरंग

मनस्वी's picture

14 May 2008 - 10:06 am | मनस्वी

सर्वसाक्षी.. खूपच छान वाटलं वाचून.
तुमच्या आई-वडिलांना लग्नाच्या ५०व्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!

मोठेपणाच्या शापाला उ:शाप असतो तो घरातल्या वडीलधार्‍यांचा. जो पर्यंत घरात मोठी माणसे आहेत तोपर्यंत आपण लहानच की!

मस्त...

आनंदयात्री's picture

14 May 2008 - 11:03 am | आनंदयात्री

सर्वसाक्षींचे लेख म्हणजे मेजवानी. लेख वाचुन संपल्यावर समजते की आपण वाचतांना किती गुंगलो होतो.
तुमच्या आईवडिलांना शुभेच्छा, अशाच आम्ही ७५व्या वाढदिवसाच्या सुद्धा मिपावरच शुभेच्छा देउ अशी कामना करतो.
बाकी पहिला फोटो पाहुन जुन्या मराठी पिक्चरातल्या हिरो हिरॉईन पाहिल्यासारखे वाटले :) .. हा अभिप्राय नक्की कळवा तुमच्या आईवडिलांना :)

कलंत्री's picture

14 May 2008 - 12:52 pm | कलंत्री

माणसाचे आदर्श वयोमर्यादा म्हणजे १०० वर्ष आयुष्य असणे. त्यात एकमेकाच्या सानिध्याचे ५० वर्ष म्हणजे मणिकांचन योग.

सर्वसाक्षींचा वावर सर्वच ठिकाणी असतो. त्यातही त्यांनी मिपावर असे हितगुज टाकले म्हणून मलाच धन्य धन्य असे वाटले.

७५ व्या वाढदिवसाला आमचेही अनुमोदन.

सर्वसाक्षी माझा मात्र एक ठपका : आपण हा सार्वजनिक / कौटुंबिक कार्यक्रम साजरा करायला हवा होता. हे असे गुळमिळीत लिहायला मात्र आवडले नाही. आमची एक संधी हुकली. असो.

मदनबाण's picture

14 May 2008 - 11:12 am | मदनबाण

सर्वसाक्षीजी तुमच्या आईवडीलांना लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....

मदनबाण.....

स्वाती दिनेश's picture

14 May 2008 - 11:33 am | स्वाती दिनेश

वा,साक्षीजी...
मोठेपणाच्या शापाला उ:शाप असतो तो घरातल्या वडीलधार्‍यांचा
किती खरं आहे!
तुमच्या आईवडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि उत्तम आयुरारोग्य लाभो ही देवाजवळ प्रार्थना.
दोन्ही प्रकाशचित्रे सुरेख आहेत. पहिल्यात संसाराच्या खेळाला सुरुवात करतानाचे नवथर भाव आणि दुसर्‍यात सार्थकतेने आशीर्वाद देणारी समाधानाची छटा!
फोटोंबाबत चतुरंगंचे म्हणणे अगदी पटले.
स्वाती

प्रशांतकवळे's picture

14 May 2008 - 11:39 am | प्रशांतकवळे

सर्वसाक्षी , तुमच्या आईवडीलांना लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

त्यांना उदंड आयुष्य लाभो..

प्रशांत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2008 - 12:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वसाक्षी,
आई-वडिलांना लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा !!!!

आजानुकर्ण's picture

14 May 2008 - 1:10 pm | आजानुकर्ण

हेच म्हणतो.

(शुभेच्छुक) आजानुकर्ण

ऋचा's picture

14 May 2008 - 12:39 pm | ऋचा

तुमच्या आई -वडिलांना उदंड आयुष्य लाभो, या सदिच्छा!

मोठेपणाच्या शापाला उ:शाप असतो तो घरातल्या वडीलधार्‍यांचा
अगदी बरोब्बर आहे!

खरच जुन्या काळातले हीरो-हीरोइन पाहील्या सारख वाटलं. :)

अन्जलि's picture

14 May 2008 - 12:59 pm | अन्जलि

साक्शिजि पर्मेश्वर त्याना उदन्द आयुश्य देवो अनि त्याचे सहजिवन आनदाने व्यतित होवो ह्या शुभेछा.

प्रभाकर पेठकर's picture

14 May 2008 - 1:16 pm | प्रभाकर पेठकर

आईबाबांना लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

योगायोग असा, आज आमच्याही लग्नाचा (२४ वा) वाढदिवस आहे.

शरुबाबा's picture

14 May 2008 - 3:34 pm | शरुबाबा

तुमच्या आई -वडिलांना उदंड आयुष्य लाभो, या सदिच्छा!

शरुबाबा

धमाल मुलगा's picture

14 May 2008 - 4:17 pm | धमाल मुलगा

साक्षीदेवा,

आईबाबांना लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बाकी आनंदयात्री म्हणाल्याप्रमाणे पहिला फोटो पाहुन जुन्या मराठी पिक्चरातल्या हिरो हिरॉईन पाहिल्यासारखे वाटले
:)

-ध मा ल.

इनोबा म्हणे's picture

14 May 2008 - 8:08 pm | इनोबा म्हणे

आईबाबांना लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

बाकी आनंदयात्री म्हणाल्याप्रमाणे पहिला फोटो पाहुन जुन्या मराठी पिक्चरातल्या हिरो हिरॉईन पाहिल्यासारखे वाटले
हेच म्हणतो....

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

राजे's picture

14 May 2008 - 5:00 pm | राजे (not verified)

तुमच्या आईबाबांना लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

शितल's picture

14 May 2008 - 6:18 pm | शितल

साक्षीजी,
तुमच्या आई वडिला॑ना त्या॑च्या लग्नाच्या ५० व्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा !
त्याची साथ अशीच एकमेका॑ना लाभु दे.

वरदा's picture

14 May 2008 - 7:16 pm | वरदा

आई वडिलांना माझ्याकडूनही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
कीती सुंदर लिहिलय्... शब्द आणि शब्द मोलाचा आहे..
मोठेपणाच्या शापाला उ:शाप असतो तो घरातल्या वडीलधार्‍यांचा. जो पर्यंत घरात मोठी माणसे आहेत तोपर्यंत आपण लहानच की!


फारच छान..
(अशीच सगळ्यात छोटी असणारी, आई, वडिल, बहिणीच्या आठवणीने हळवी झालेली)
वरदा

जयवी's picture

15 May 2008 - 12:32 pm | जयवी

सर्वसाक्षी, तुमच्या आईबाबांना लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
फोटो फार सुरेख आले आहेत :)