मी नुकताच पुण्यात आलो.
पुण्यात रहाण्याची सोय म्हणुन एका चांगल्या ठिकाणी एका एजन्टाकरवी घर शोधायला लागलो
काही ठिकाणे भादे अधीक होते तर काही ठीकाणी थोड्या गैरसोयी होत्या.
सरतेशेवटी एक घर्/फ्लॅट मनाजोगता वाटला. हवेशीर खिशाला परवडेलसा आणि बर्यापैकी सोयीसुवीधा असणारा. फ्लॅटला स्वतन्त्र गच्ची होती.गच्चीतून आजूबाजूचा परीसर छान दिसतो. खीडक्या उघडल्या की फ्लॅट ताज्या स्वच्छ हवेने न्हाऊन निघतो .
एजन्टाला साम्गितले की घर पसंद आहे. मालकाशी बोलणी करून ठरवून टाक. भाडे / डिपॉझीट वगैरे फारशी खळखळ न करता अॅडजस्ट झाले. घरमालकानी सांगितले की फ्लॅट विद्यार्थ्याना किंवा एकट्यादुकट्या रहाणाराला द्यायचे नाही केवळ फॅमिलीला द्यायचे असा सोसायटीचा नियम आहे.
मी त्या घर मालकाना माझी पत्नी पुण्याला येवू शकणार नाही असे सागितले. पण ते काही ऐकायला तयार नव्हते.
म्हणाले की फ्लॅट्चे अॅग्रीमेन्ट करताना तरी तुम्ही दोघे असायलाच पाहिजे. मी हा फ्लॅट फॅमिलीलाच देणार.
माझी आता खरोखर पंचाईत झाली. फ्लॅट तर खूप सुरेख होता. आणि मी फॅमिली इथे आणु शकत नव्हतो.
शेवटी माझा हा प्रॉब्लेम माझ्या एका मैत्रीणीने सोडवायला मदत केली. अॅग्रीमेन्ट साईन करायच्या वेळेस ती माझ्याबरोबर घरमालकांकडे आली. घर मालकानी त्यांच्या घरातल्या लोकांशी आमची दोघांची ओळख करून दिली.
मनाजोगता फ्लॅट मिळाल्याच्य आनन्दात त्या दिवशी मी त्या मैत्रीणीला तिच्या नवर्यासकट झकास पार्टी दिली.
एक दीड महिना झाल असेल. त्या मैत्रीणीच्या नवर्याला त्याच घरमालकांच्या घराचे इन्टीरीयरडेकोरेशनचे काम मिळाले. हे घरमालक त्या मैत्रीणीच्या नवर्याच्या ऑफिसमध्ये गेले असताना ती मैत्रीणही त्याना दिसली.
मैत्रीणीच्या नवर्याला आमचा किस्सा माहीत होता पण व्यक्ती नव्हती. त्याने त्याच्या बायकोची घरमालकांशी ओळख करून दिली.
त्या घरमालकानी मैत्रीणीला ओळखले. पण त्यांचा संभ्रम झाला. ते तेथे काही बोलले नाहीत पण त्यानी मला सहज विचारले की माझ्या पत्नीला जुळी बहीण वगैरे आहेका? मला घडलेल्या घटनेची काहीच कल्पना नव्हती . त्यामुळे मी अर्थातच तसे काही नाही म्हणून साम्गितले. त्यावर ते म्हणाले की माझ्या पत्नीसारखीच हुबेहूब्न दिसणारी एक व्यक्ती त्यांच्या पहाण्यात आली. मी ही अर्थात उत्सुकतेने त्याना त्याबद्दल विचारले. त्यावर ते म्हणाले त्या दोघिंची गाठच घालून देतो ना.
घर मालक भला मनुष्य आहे. त्यानी आम्हा चौघाना म्हणजे मला आणि आलेल्या माझ्या पत्नीला (म्हणजे त्यादिवशी अॅग्रीमेन्ट करताना माझ्या बरोबर आलेल्या माझ्या पत्नीला अर्थात माझ्या मैत्रीणीला) तसेच त्यांच्या इन्टेरीयर डेकोरेटरला आणि त्याच्या पत्नीला ( अर्थात माझ्या त्याच मैत्रीणीला) त्यांच्या कडे पुढच्या आठवड्यात एका कार्यक्रमाला बोलावले आहे.
मला सल्ला हवा आहे की हा पेच प्रसंग मी कसा निभावून नेवू?
सल्ल हवा आहे
गाभा:
प्रतिक्रिया
20 Sep 2010 - 4:01 pm | विंजिनेर
'गांधीगिरी' ने कदाचित प्रसंग निभावून जाऊ शकेल.
20 Sep 2010 - 6:58 pm | गांधीवादी
not necessary. कदाचित चिघळला/चीघळवला हि जाऊ शकतो.
20 Sep 2010 - 4:04 pm | सुनील
हॅ हॅ हॅ!!!!
भोगा कर्माची फळं!!
कुणाला एकाला आजारी पडावे लागणार बहुतेक!
20 Sep 2010 - 7:00 pm | गांधीवादी
स्वाइन फ्लु झाला आहे असे सांगा, तो मालक पुढील दहा वर्षे बोलविणार नाही.
20 Sep 2010 - 7:02 pm | धमाल मुलगा
आणि बोलावलंच तर तोंडाला मास्क लाऊनच भेटीला घेऊन जायचं...ओळखणारच नाही तो घ.मा.
20 Sep 2010 - 7:05 pm | अनामिक
आणि निलगीरीचं तेल अंगावर शिंपडून जा म्हणजे जवळही नाही येणार.
20 Sep 2010 - 4:05 pm | चतुरंग
काय विजुभौ खरोखर वेळ जात नाहीये का? का शीरियसली विचारताय?
गोलमाल है भै सब गोलमाल है ची लेडीज स्पेशल आवृत्ती करुन टाका मस्त चान्स आहे! ;)
चतुरंग दत्त
20 Sep 2010 - 4:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
लेडीज नव्हे, 'पाशवी' म्हणा! ;-)
(पळा आता ... दोन दणके मिळताहेत नाहीतर!)
20 Sep 2010 - 4:12 pm | विजुभाऊ
गोलमाल है भै सब गोलमाल है ची लेडीज स्पेशल आवृत्ती करुन टाका मस्त चान्स आहे
रंग्या जी अहो त्या पिक्चर मध्ये अमोल पालेकर मिशी लावून आणि काढून दोन वेगवेगले रोल प्ले करतो.
मैत्रीणीला हे कसे जमेल . आणि समजा तिने तसे काही केले आणि त्यातून अजून काही अचाट नाटक उपटले तर माझेच विडंबन होईल
20 Sep 2010 - 7:43 pm | चतुरंग
काय विजुभौ झाले का समाधान? ;)
(आता धागा वाचनमात्र करावा का? ;) )
20 Sep 2010 - 7:44 pm | यशोधरा
हो, लवकर करा. :)
20 Sep 2010 - 7:51 pm | अवलिया
>>>(आता धागा वाचनमात्र करावा का? Wink )
का? चालु द्या की थोडी मस्ती... ! अडचण असेल तर करा वाचन मात्र.
जे धागे करायला हवे तिकडे मात्र दुर्लक्ष.. पण निखळ कुणालाही न दुखावणार्या मनोरंजक धाग्यांवर संक्रांत !!
वा ! अजबच कारभार आहे !! हाच धागा मिभो वगैरेंचा असता तर असा प्रश्न पडला असता का ? नसताच.. चालु ठेवलाच असता धागा !!
आणि समजा धागा भरकटेल असं वाटत असेल तर तसे प्रतिसाद उडवता येतातच ना? मग मनोरंजनाला का कात्री?
20 Sep 2010 - 7:56 pm | चतुरंग
का तुम्हालाही गंमत समजेना झालीये?
20 Sep 2010 - 7:57 pm | अवलिया
संपादकांना मी चांगला ओळखुन आहे.
20 Sep 2010 - 7:59 pm | चतुरंग
चतुरंग
20 Sep 2010 - 8:17 pm | रेवती
संपादकांना मी चांगला ओळखुन आहे
सदस्यांना संपादक ओळखून नाहित कि काय?
इकडे धागा मजेत चाललेला दिसत असताना मंडळाला तिकडे खरडी आणि व्य. नि. मात्र तक्रारींचे असतात त्याचे काय?
21 Sep 2010 - 11:22 am | अवलिया
एखादा धागा मजेत किंवा भांडणात किंवा इंचाइंचाने चालु असतांना एखाद्या सदस्याला त्यातील काही प्रतिक्रिया गैर वाटल्या म्हणुन त्याने तशा अर्थाने संपादक मंडळाला खरड व्यनी करणे हे चुकीचे आहे असे मला वाटत नाही. संपादक मंडळाचे तसे आकलन असल्यास तशा पद्धतीचे धोरण जाहिर केल्यास सदस्य अशा प्रकारे संपादक मंडळास खरड व्यनी करणार नाहीत असे मला वाटते. सबब योग्य तो खुलासा संपादक मंडळाने करावा.
21 Sep 2010 - 6:34 pm | रेवती
कोणाला कश्यात मजा वाटेल ते सांगता येत नाही.
नापसंतीचे निरोप येत राहणार. त्यावेळेस सगळ्यांनाच तारतम्याने निर्णय घ्यावे लागतात.
संपादकांनी आपल्याला काही त्रास दिला असल्यास तसे सविस्तरपणे कळवावे.
उगीच येताजाता टोमणे मारून काहीही साध्य होणार नाही.
21 Sep 2010 - 6:37 pm | अवलिया
सहमत आहे. कुणाला कशात मजा वाटेल ते सांगता येत नाही...
संपादकांनी आपल्याला काही त्रास दिला असल्यास तसे सविस्तरपणे कळवावे.
संपादकांनी त्रास दिलेला संपादकांनाच कळवायचे मग कसा निर्णय होणार?
तुम्ही पण गंमतच करता ब्वा ! असो.
टोमणे मारायला सुरवात मी केली नव्हती. पण तरीही माझ्या बाजुने या धाग्यापुरते थांबतो.
धन्यवाद.
परमेश्वर आपल्याला दिर्घायुष्य देवो !
20 Sep 2010 - 7:56 pm | गांधीवादी
बराबरे
20 Sep 2010 - 4:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आपण वयाने लहान दिसतो हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न!
स्मरणशक्ती कमी असणार्याने थापा मारू नयेत.
एकतर स्वतः खुळं असल्याचं आता नाटक करा नाहीतर मालकाला खुळं बनवा. स्वतःच्या पत्नीलाच घेऊन तिकडे जा आणि ठासून सांगा हीच तुमची बायको आणि हिच्याशीच तुम्ही ओळख करून दिली होतीत वगैरे वगैरे.
अदिती (गोबेल्स)
20 Sep 2010 - 4:33 pm | मृत्युन्जय
घ्या. घरमालकाला वाट्टेल ते ठासुन सांगतील हो. बायकोला काय सांगणार.
20 Sep 2010 - 4:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अच्छा, असं 'लफडं' आहे तर!
22 Sep 2010 - 3:54 pm | बिपिन कार्यकर्ते
बायकोच ठासुन मारेल...
22 Sep 2010 - 3:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अनुभव हीच खात्री असं आत्ताच कुठेतरी वाचनात आलं माझ्या!
20 Sep 2010 - 4:06 pm | ब्रिटिश टिंग्या
नवीन घर शोधायला सुरुवात करा!
तसेही तुमच्या एका मित्राचा पुण्यात १ बीएचके आहे म्हणे......तिथे मस्तपैकी रहा अन् प्यार्टी करा!
20 Sep 2010 - 4:14 pm | कुंदन
त्या मित्रालाच बुरखा घालुन घेउन जा.
20 Sep 2010 - 4:17 pm | गणपा
आता मैत्रिणीलाच विचारा की तिला जुळी बहिण आहे का?
अन्यथा त्या (नसलेल्या) जुळ्या बहिणीचा अंत (खुन्/अॅक्षीडंट्/अपहरण) करा.
हाय काय अन नाय काय?
इजुभौ जरा स्वप्नातुन बाहेर या आणि थोडे बॉलीवुड्पट/हिंदी मालिका पाहात जा ;)
20 Sep 2010 - 4:15 pm | विजुभाऊ
मैत्रीणीला जुळी बहीण वगैरे नाहिय्ये.
अन्यथा द्या (नसलेल्या) जुळ्या बहिणीचा अंत (खुन्/अॅक्षीडंट्/कुंभका मेला) करा.
हाय काय अन नाय काय?
आणि त्यानन्तर मी किम्वा त्या मैत्रीणीच्या नवर्याने कायम विधुराची भुमीका करायची का?
नाटक सिनेमात ते ठीक आहे. पण खर्रखुर्रे?
20 Sep 2010 - 4:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
नाही, तुम्ही दुसरं लग्न करायचं! सोप्पय.
20 Sep 2010 - 5:00 pm | विजुभाऊ
तुम्ही दुसरं लग्न करायचं! सोप्पय.
सोप्पय...........
हम्म....
आत्ताच आमची गॉन केस झाली आहे. तसे काही केले तर पुरती वाट लागायची.
20 Sep 2010 - 5:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो विजुभाऊ, पहिली बायको आक्सिडेंटात मारायची आणि मग दुसरं लग्नं करून (खर्या) पहिल्या बायकोला घरमालकासमोर हजर करायचं! सिंपल हाय!!
20 Sep 2010 - 5:28 pm | पुष्करिणी
दीड महिन्याच्या कालावधीत नविन फ्लॅट भाड्यानं घेउन, पहिल्या बायकोला मारून , दुसरं लग्न करून वर तुमची वास्तु कित्ती लकी आहे असं म्हणायच :) भोवळ येइल मालकाला ...
20 Sep 2010 - 5:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आणि ही वास्तु पुण्यात आहे म्हणे! ;-)
(रेवतीताई, वाचते आहेस ना??)
20 Sep 2010 - 5:58 pm | धमाल मुलगा
छे:!
काय हे?
पोरींनो जरा हिंदी सिनेमे कमी पहा गो. =)) =))
20 Sep 2010 - 7:09 pm | रेवती
वाचतिये हो!;)
विजुभाईंचा धागा आहे हा!
वाचायलाच हवा!
उद्या मला कोणी 'पाशवी' म्हटलंच नाही तर वाईट वाटेल ना!;)
20 Sep 2010 - 6:17 pm | नगरीनिरंजन
मी ही हेच सुचवणार होतो पण कार्यक्रम आहे पुढच्या आठवड्यात. मेलेल्या बायकोचा तेरावा घालण्याएवढे पण दिवस नाहीत त्यांच्याकडे.
20 Sep 2010 - 6:18 pm | मेघवेडा
अहो विजुभाऊ, पहिली बायको आक्सिडेंटात मारायची आणि मग दुसरं लग्नं करून (खर्या) पहिल्या बायकोला घरमालकासमोर हजर करायचं!
आणि मग पहिल्या बायकोची ओळख "ही माझी दुसरी बायको" अशी करून द्यायची? त्यापेक्षा घरमालकाची पापी घेतलेली परवडेल त्यांना, काय विजुभौ? ;)
20 Sep 2010 - 4:19 pm | विनायक प्रभू
ह्या वयात असली थेर?
शोभा नाही देत.
20 Sep 2010 - 5:04 pm | धमाल मुलगा
ही कोण आता?
20 Sep 2010 - 10:24 pm | पैसा
शोभा!!!!!!!!!!!!
20 Sep 2010 - 4:20 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
स्पष्ट सांगा न...वेळ नाहिये म्हणून्....तुम्ही बांधिल थोडेही आहात तुमच्या बायकोला कोणाला पण भेटवायला?
तुमच्या त्या मैत्रीणीला आणि तिच्या नवर्याला देखिल सांगा कि तुम्हिही थोडी attitude दाखवा...!
... कारण प्रसंग आहे खरा बाका....आणि घ्.मा. पुणेरी दिसतो आहे....प्रसंग अंगावर बेतला ना तर पोलिस कंप्लेण्ण करायलाही मागे पुढे पाहणार नाही!
All the best....!
20 Sep 2010 - 4:22 pm | केशवसुमार
सोमवारी दुपारीच 'कार्यक्रम' सुरु केलात का?
बाकी चालू दे..
१०० नक्कि.. झाड बुक करतो लगेच..
20 Sep 2010 - 4:24 pm | विजुभाऊ
घर मालक तसा भला माणूस आहे. पण काही सांगता येत नाही.
अॅटीट्यूड दाखवून उपयोग नाही. प्रेमळ निमन्त्रण आहे
20 Sep 2010 - 4:41 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
....मग त्याची एक गोड पापी घ्या आणि सांगा कि अहो काका.....XYZ......XYZ....XYZ>...!
मग त्याचा भलेपणा कसा रुद्रावतार धारण करतो ते पहा!
jokes apart....
खरच जर असेल ना समजुतदार मनुष्य तर खरच त्याला एखाद्या योग्य वेळी सत्य सांगुन टाका. हवे तर तुमच्या (खर्या) बायकोला बोलावून घ्या.आणि त्यांना त्यांच्या बायको करवी समजावयाचा प्रयत्न करा... हवे तर असेही सांगा ही हा फ्लॅट convinient होता.अजुन एक चान्गले कारण म्हणजे मी वास्तु मानतो...तुमची ही वास्तू अतिशय शुभ आणि प्रसन्न वाटली ...तुम्हीही मला माझ्या वडिलांसारखे आहात...and so on....!
हवे तर त्यांना सांगा कि मी फ्लॅट चेंज करायलाही तयार आहे..!
कारण चुक झाली तर आहे..
सरवा सारव किति दिवस करणार?
you have to confess and face it...!
Face it!
काय होइल्? थोडे दिवस अवघड्ल्यासारखे होइल...आणि घर बदलावे लागेल ना...ठिक आहे...
accept it the way it comes!
पण रोजची भिती तरी कायमची जाईल ना!
20 Sep 2010 - 4:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
घराबाहेर काढेल हे ऐकून तो मालक ... अगदी कायदा आणि अॅग्रीमेंट धाब्यावर बसवून!
20 Sep 2010 - 5:19 pm | पुष्करिणी
घरमालकाची आधी एक गोड पापी घेतली असेल आणि 'तुम्ही मला वडलांसारखे आहात' हे म्हटल नाही तर जास्त प्रॉब्लेम्स येतील बहुतेक ...:)
20 Sep 2010 - 5:59 pm | धमाल मुलगा
सध्या विजुभाऊंचा चेहरा कसा झाला असेल हे आठवुन हसुन हसुन मेलोय!
21 Sep 2010 - 9:59 am | विजुभाऊ
घरमालकाची आधी एक गोड पापी
अवघड आहे. घ मा एक विशाल मिशाळ रीटायर्ड फारेष्ट हापिसर आहेत. त्यांच्या घरी दुनळी बंदूक आहे.
मी ठ्यॉ करायला जायचो ते ठो ..ठो... करायचे.
21 Sep 2010 - 6:00 pm | धमाल मुलगा
ते घरमालक मिशाळ नसते, फॉरेश्ट हापिसर नसते, त्यांच्याकडे दुनळी बंदूक नसती तर..............तुम्ही त्यांची गोड पापी घेतली असती??????????????????
21 Sep 2010 - 7:17 pm | अनामिक
त्यांना कदाचित घरमालक नको घरमालकीन हवी असं म्हणायचं असेल!
21 Sep 2010 - 7:22 pm | धमाल मुलगा
>>If you don't learn from your mistakes, there is no sense in making them.
=)) =)) =)) =))
काय संदर्भ आलाय ह्या वाक्याला. ;)
>>त्यांना कदाचित घरमालक नको घरमालकीन हवी असं म्हणायचं असेल!
ह्म्म्म....भौ, भौतेक तुम अबी गयाच कामसे. आता आम्ही तुम्हाला 'ब्लॅकमेल' करणार.
20 Sep 2010 - 7:17 pm | मृत्युन्जय
तुम्हीही मला माझ्या वडिलांसारखे आहात...and so on
त्यापेक्षा ही पण मला बायकोसारखीच आहे असे म्हणुन ओरिजिनल बायकोला समोर करणे जास्त सोपे जाइल त्याला.
20 Sep 2010 - 8:38 pm | प्रीत-मोहर
ओरिजिनल बाय्को मस्त ओरिजिनल खावडपट्टी काढेल ती पण ऐकावी लागेल त्याच काय?
20 Sep 2010 - 4:32 pm | विकास
तुमचा हा प्रश्न लवकरच सुटूंदेत अशा शुभेच्छा! :-)
बाकी ही चर्चा/लेख " मदत" शिवाय "नृत्य" या सदरात का वर्गिकृत केली आहे ते कळले नाही. पण चर्चेचा मूळ मुद्दा त्यात नृत्य, मदत वगैरे वाचून अंमळ अजूनच गोंधळ झाला आहे. ;)
20 Sep 2010 - 4:56 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
कारण त्यांची जी तारांबळ चालु आहे ति दिसते आहे ना!
''त्रे धा ति र पि ट..... त्रे धा ति र पि ट" या तालावर! ;)
आणि घरमालकांना सत्य कळल्यावर ते तांडव करतील ते वेगळेच..
एकुण काय..
चम्मतग आहे सगळी!
20 Sep 2010 - 4:48 pm | इरसाल
कोणालातरी आजारी 'पाडो'च !!!!!!!!!
आणखी एक मोलाचा सल्ला जाईचे ऐकू नका नाहीतर तुमचे दुसरे लग्न नक्की.
20 Sep 2010 - 4:56 pm | धमाल मुलगा
आधी नसती झक मारावीच कशाला भाऊ?
च्यायला, वहिनींना फोन करुन बोलावुन घेता येत नव्हतं काय?
आता हे लफडं तिकडं कळालं तर येतात सगळे संस्थानिक मेव्हणे तलवारी घेऊन......
ओ भौ, आपुन तुमाला वळकत नाय हां...आधीच सांगुन ठिवतोय. ;)
20 Sep 2010 - 5:05 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
... हा आहे..... तो आहे......झालच तर आपले धमाल राव...!
असे निधड्या छाती चे मित्र अस्ताना तुम्हास भिती कशास वाटते?
.. हो की नाही ओ धमालराव..?
बघा कस्से धाऊन येतिल मदतीला!
20 Sep 2010 - 6:00 pm | धमाल मुलगा
मी? म्...म्म्म्म्म.....म्म्मी......
मै कौन हूं? मै कहां हूं?
27 Dec 2013 - 11:37 am | विजुभाऊ
अरे रे धम्या....... :(
20 Sep 2010 - 5:15 pm | भडकमकर मास्तर
तुमच्या मालकांना या धाग्याची लिन्क द्या
20 Sep 2010 - 7:06 pm | गांधीवादी
अगोदरच्या १०-१५ धाग्यांची पण लिंक द्या, इंच इंचाची, आरक्षणाची लिंक पण द्या, मालक काय इथून हलणारच नाय मग.
20 Sep 2010 - 5:34 pm | विजुभाऊ
आबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ.
माताय काय पण सल्ला दिलाय. हे म्हणजे पेटलेलं शेपूट कसे विझवायचे याचा सल्ला "रॉकेल टाकून "असा देण्यासारखे आहे
20 Sep 2010 - 5:40 pm | अनुराग
ज्याचा जीव जातो त्याला कळ्ते!!
थाबा आणि वाट पहा.
20 Sep 2010 - 5:47 pm | नगरीनिरंजन
'अशी ही बनवाबनवी'?
सल्ला देण्यापुर्वी काही प्रश्नः
१. कार्यक्रम किती मोठा आहे? बरेच लोक येणार असतील तर बरं.
२. कार्यक्रम जिथे आहे त्या जागेला दोन प्रवेशद्वारं आहेत का? असलेली बरी.
३. तुमची मैत्रीण तुमच्यासाठी एका संध्याकाळी कितीही वेळा कपडे बदलू शकते का?
४. तुमच्याकडे किंवा मैत्रीणीकडे कार आहे का?
५. तुमची मैत्रीण कारमध्ये कपडे बदलू शकते का?
वरीलपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर नकारार्थी असेल तर आणखी काही प्रश्नः
१. तुमचा कोणी डॉक्टर किंवा फार्मसी वाला मित्र आहे का?
२. तुम्हाला हातचलाखी येते का? (की नुसतंच खोटं बोलता येतं?)
याही प्रश्नांपैकी एकाचे जरी उत्तर नकारार्थी असेल तर क्षमस्व.
22 Sep 2010 - 8:44 am | विजुभाऊ
सल्ला देण्यापुर्वी काही प्रश्नः
३. तुमची मैत्रीण तुमच्यासाठी एका संध्याकाळी कितीही वेळा कपडे बदलू शकते का?
हे मी तिला डायरेक्ट विचारून शकत नाही. उगाच दोन दणके खावे लागतील
( इमॅजीन करतोय की मी तिला विचारतोय " तू माझ्यासाठी संध्याकाळी कितीवेळा कपडे बदलू शकतेस?"
४. तुमच्याकडे किंवा मैत्रीणीकडे कार आहे का?
हो आहे
५. तुमची मैत्रीण कारमध्ये कपडे बदलू शकते का?
माहीत नाही.
सल्ला नको पण तुमचे प्रश्न आवरा . ( "जुदाई" मधला प्रचिन्हाची केसांची बट असलेला परेष रावळ आठवा)
आमचे उत्तर "आब्बा जब्बा डब्बा "
वरीलपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर नकारार्थी असेल तर आणखी काही प्रश्नः
१. तुमचा कोणी डॉक्टर किंवा फार्मसी वाला मित्र आहे का?
हो आहेत. डॉ दाढे ऑर्थोडेन्टीस्ट आहेत. त्यांचा उपयोग घरमालकाने किंवा माझ्या मैत्रीणीने माझे दात पाडल्यावर होऊ शकेल.
२. तुम्हाला हातचलाखी येते का? (की नुसतंच खोटं बोलता येतं?)
खोटं अगोदरच बोलून झालय. हातचलाखी कशी करायची ते शिकवा.
20 Sep 2010 - 5:48 pm | अनामिक
त्यात काय सल्ला मागायचा? तुम्ही, तुमची मैत्रीण, आणि तिचा नवरा तिघेही जा घरमालकाकडे आणि सांगा आमच्या दोघांचीही हिच्च बायको आहे म्हणून. त्याने काही वाद घातलाच तर द्या ना द्रौपदीचे उदाहरण! आपलीच संस्कृती आहे म्हणून सांगा, शिवाय तुमची मैत्रीण आयटीतील एक आधुनीक, मुक्त, पाशवी, पुणेरी स्त्री आहे असेही सांगा. त्यानंतर घरमालकाचा एक फोटू काढून इथेच टाका.
20 Sep 2010 - 6:11 pm | धमाल मुलगा
त्यापेक्षा त्या मैत्रिणाचा नवरा आणि विजुभाऊ दोघांनी त्या घरमालकासमोरच 'ही माझी बायको आहे' असं भांडण केलं तर?
>>त्यानंतर घरमालकाचा एक फोटू काढून इथेच टाका.
=)) =)) =)) =)) =))
का कोण जाणॅ, माझ्या डोळ्यापुढं बनवाबनवीमधले सुधीर जोशी उभे राहिले. =))
20 Sep 2010 - 6:18 pm | अनामिक
आणि वर त्या घरमालकाने ह्यांच्या मैत्रीणीला विचारलं कि तूच सांग तुझा नवरा कोण तर हिनेही म्हणावं "दोघेही" म्हणून!
>>का कोण जाणॅ, माझ्या डोळ्यापुढं बनवाबनवीमधले सुधीर जोशी उभे राहिले. =))
अगदी अगदी... आणि ही चौकडी सुधीर जोशींच्या घरातून गेल्यावर्/जाताना त्यांनी केलेला "आनंदी आनंद गडे..." वरचा नाचही अप्रतीम!
20 Sep 2010 - 6:36 pm | धमाल मुलगा
>>आणि वर त्या घरमालकाने ह्यांच्या मैत्रीणीला विचारलं कि तूच सांग तुझा नवरा कोण तर हिनेही म्हणावं "दोघेही" म्हणून!
घोळच घालायचे आणि त्या घ.मा.ला येडाच करायचाय तर तिनं उत्तर द्यायचं, 'जो जिंकेल तो!' =))
घ.मा. डोईला तेल थापून एरंडेलाचा पानच बांधून बसेल.
>>चौकडी सुधीर जोशींच्या घरातून गेल्यावर्/जाताना त्यांनी केलेला "आनंदी आनंद गडे..." वरचा नाच
अग्ग्ग्ग्ग्ग...नको यार आठवण करुन देऊ. मग मला डायबिटिसवरचं औषध इस्त्राईलहुन आणणारा लक्षा आठवतो. =))
20 Sep 2010 - 7:10 pm | स्वप्निल..
ठ्ठोsssssssssssssss!!
वरील सल्ले मस्त! विजुभाऊ, विचार करा ;)
20 Sep 2010 - 7:20 pm | मृत्युन्जय
वा वा. आणि तिने दोघेही असे उत्तर दिल्यानंतर समोर विजुभौची बायको (खरीखुरी) समोर येउन ठाकली तर शोल्लिड धमाल. मला नो एण्ट्री आठवला.
20 Sep 2010 - 7:23 pm | धमाल मुलगा
अगंआयेऽऽ...
अरे गपा रे!
नो एंट्री म्हणाल्यावर विजुभाऊ फरदीनखानसारखं डोंगराच्या कड्यावर उभं राहून 'चंपाऽऽऽ...चंपाऽऽऽ' करुन बोंबलताना डोळ्यापुढं दिसले.
21 Sep 2010 - 1:56 pm | मृत्युन्जय
हॅ हॅ हॅ. आणि यावरुन मला झूठ से मुझे सख्त नफरत है असे म्हणणारी सेलेना आठवली. विजुबौ वहिनींना झूठ से नफरत नाही आहे ना? नाहीतर तुमची मूळ घरातली एण्ट्री बंद व्हायची. कायमस्वरूपी पुणेकर व्हायला लागेल (आणि मग तिसरीच बाई बायको म्हणुन घरमालकाला दाखवावी लागेल)
21 Sep 2010 - 1:38 pm | मी ऋचा
>>"आनंदी आनंद गडे..." वरचा नाचही अप्रतीम!
त्याला नाच नाही ड्यँन्स असे म्हणतात.
20 Sep 2010 - 5:49 pm | वेताळ
त्या कार्यक्रमाला कल्टी मारता येते का बघा.
20 Sep 2010 - 5:53 pm | धमाल मुलगा
एक आयड्या!
त्या घरमालकाला सांगा, "मला चार बायका आहेत त्यापैकी जी अव्हेलेबल असेल तिला घेऊन येईन." =))
20 Sep 2010 - 6:00 pm | विजुभाऊ
त्या घरमालकाला सांगा, "मला चार बायका आहेत त्यापैकी जी अव्हेलेबल असेल तिला घेऊन येईन." =))
देशमुखबाबा .......स्वधर्मे निधनण श्रेयः.परधर्मो भयावहः
( हे वाक्य बहुतेक चार लग्ने करण्याच्या सौजन्य भयास्तव म्हंटले गेले असावे )
ते तसे काही केले तर मला गॅलरीतून कचरा खाली फेकावा लागेल , चौथ्या मजल्यावर बोकड पाळावा लागेल आणि तुम्हीच आम्हाला सोसायटीत जागा देणार नाही.
20 Sep 2010 - 6:13 pm | धमाल मुलगा
=)) =)) =))
छे छे! उलट आम्ही तर घाबरुन जागा देऊ तुम्हाला..नायतर तुम्ही ब्यारिश्टर शिंदेंमार्फत आमच्यावर खटला भराल की.
20 Sep 2010 - 7:12 pm | llपुण्याचे पेशवेll
श्री धमाल यांच्यासारख्यांच्या भावना भडकावणे सोपे आहे हे मला आता पटू लागले आहे.
-अमोल पेशवे
20 Sep 2010 - 7:16 pm | धमाल मुलगा
=)) =)) =))
असु शकते.
आमच्यावर सुदैवानं हळद+लोणी+मुसळ असा प्रयोग कधी झालेला नाही त्यामुळे असे नक्की असु शकते.
20 Sep 2010 - 7:11 pm | गांधीवादी
ऐकतोय,
जिथून जे काही चांगलं कामाचं भेटतं ते उचलाव माणसानी.
बाकी तुम्हाला बोकड पाळायला, कचरा फेकायला, जिन्यात गर्दी करायला कोणी अडवले आहे काय ? मला सांगा, बघतो एकेकाकडे.
20 Sep 2010 - 7:21 pm | मृत्युन्जय
मला चार बायका आहेत त्यापैकी जी अव्हेलेबल असेल तिला घेऊन येईन."
तुम्ही थत्ते काकांना विचारा हो ते समान नागरी कायद्यातुन काहीतरी पळवाट काढुन देतील. मग तुम्हीही ४-४ लग्ने करु शकाल. It will be convenient u see.
20 Sep 2010 - 7:31 pm | गांधीवादी
आजकाल रस्त्यांवर खड्डे खूप झालेत नायी ?
20 Sep 2010 - 6:10 pm | कानडाऊ योगेशु
अहो विजुभौ,
तुम्ही ते जपानी गादीचे सेमिनार अटेण्ड केले होते ना!
त्यातल्याचा काही कॢप्त्या ( आयचा घो कॢ च्या) वापरा ना!
टारुस्टैल सही
(भाडेकरु) फ्लॅटोबा ओनर!
20 Sep 2010 - 6:27 pm | अनामिक
खरंतर तुमचं "सल्ल हवा आहे" शिर्षक वाचून,
१) तुम्ही दबंग पाहिला आणि तुम्हाला सल्लू हवा आहे असं वाटलं.
२) मंद हवा, धुंद हवाप्रमाणे ही 'सल्ल' हवा काय आहे हे बघण्यासाठी धागा उघडला.
20 Sep 2010 - 6:36 pm | अवलिया
किती पैसे देणार? सल्ला देतो.
20 Sep 2010 - 6:46 pm | अनुप्रिया
नानाच्या ५०% रेट्मध्ये मी सल्ला देते.
20 Sep 2010 - 6:48 pm | अनामिक
इथं मिपावर फुकट सल्ला देणारे शेकडो असताना उगं पैसे पैसे करत पुढं पुढं करताय राव!
20 Sep 2010 - 6:53 pm | अनुप्रिया
>>इथं मिपावर फुकट सल्ला देणारे शेकडो असताना उगं पैसे पैसे करत पुढं पुढं करताय राव!
-अनामिक
स्वतःची किती जाहिरात करावी ;)
20 Sep 2010 - 6:54 pm | धमाल मुलगा
प्रोफेशनल कन्सल्टंट असल्याची झाईरात करत असतील =))
20 Sep 2010 - 6:56 pm | अनुप्रिया
>>प्रोफेशनल कन्सल्टंट
=))
=))
धम्या.....सिक्सर रे
20 Sep 2010 - 6:59 pm | अनामिक
हा हा हा...
अवांतरः म्या प्रोफेशनल कंसल्टंट न्हाई!
20 Sep 2010 - 6:57 pm | अवलिया
हल्कत आच्रत
20 Sep 2010 - 7:07 pm | रेवती
थांबा, थांबा, थांबा!!!
हे असं काही असूच शकत नाही.
पहिली गोष्ट म्हणजे विजूभाई पुण्यात येतीलच कश्याला? (जी ठिकाणे आवडत नाहीत तिथे ते कशाला जातील?)
दुसरं म्हणजे ते पुण्यातल्या घराला 'सुरेख', 'हवेशीर' कश्याला म्हणतील?
तिसरी गोष्टं, वेळ मारून नेण्यासाठी कोणताही भला माणूस दुसर्याच्या बायकोला आपली बायको का म्हणून नेईल?
(ते सिनेमात असतं म्हणूनच जनता एन्जॉय करते.)
क्रमांक चार, मैत्रिणीचा नवरा पार्टी घेताना 'प्रसंग नक्की काय घडला' हे विचारणार?
क्रमांक पाच, 'नाटक' म्हणून एखादी 'भली' महिला दुसर्याच्या बायकोचा रोल करत असेल तर ती तिच्या नवर्याला नक्की सांगेल. प्रसंग घडून गेल्यावर दिडमहिन्यात एकदाही नवर्याला सांगण्यास वेळ मिळाला नाही असे शक्य नाही.
आपले विजुभाऊ हे पुण्याला नावं ठेवत असले तरी एक सद््गृहस्थ आहेत. घरदार, फ्यामिलीवाले सज्जन आहेत(बासरी वाजवतात हा आणखी एक गुण!). त्यांची मित्र मंडळीही तशीच सज्जन असणार. त्यामुळे हे असं काही घडणार नाही.
कृपया कबूल करा विजुभाऊ!;)
20 Sep 2010 - 7:09 pm | अवलिया
छ्या ! निदान १०० तरी प्रतिसाद होऊ द्यायचे होते ना !
एक तर नुकताच विजुभाउंना ५०+ प्रतिसादांचा फारमुला मिळाला आहे आणि तुम्ही बिंग फोडता !
छे ! पापक्षालनार्थ दोन दिवसांत फक्कडशी पाकृ टाका ब्वा !
20 Sep 2010 - 7:17 pm | llपुण्याचे पेशवेll
पहिली गोष्ट म्हणजे विजूभाई पुण्यात येतीलच कश्याला? (जी ठिकाणे आवडत नाहीत तिथे ते कशाला जातील?)
अगं नाही काकू. खरंच पुण्यात आहेत ते.. शप्पथ, मी भेटलोय त्यांना.. चालायचंच लोकांना पोटासाठी काय काय कराव लागतं. ;)
20 Sep 2010 - 7:24 pm | मृत्युन्जय
चालायचंच लोकांना पोटासाठी काय काय कराव लागतं.
कोणाला काय काय करावे लागते? ;)
20 Sep 2010 - 7:22 pm | अनामिक
पहिली गोष्ट म्हणजे विजूभाई पुण्यात येतीलच कश्याला? (जी ठिकाणे आवडत नाहीत तिथे ते कशाला जातील?)
अडला हरी... दुसरं काय
दुसरं म्हणजे ते पुण्यातल्या घराला 'सुरेख', 'हवेशीर' कश्याला म्हणतील?
तो "आतले आणि बाहेरचे" सारखा प्रकार असावा. पुण्याच्या बाहेरचे लोक पुण्यात यायच्या आधी पुणेरी लोकांना शिव्या घालणारच.
तिसरी गोष्टं, वेळ मारून नेण्यासाठी कोणताही भला माणूस दुसर्याच्या बायकोला आपली बायको का म्हणून नेईल?
(ते सिनेमात असतं म्हणूनच जनता एन्जॉय करते.)
आता ती बाई बायको म्हणून यायला तयार आहेत तर तूला काय प्रॉब्लेम्म रेवती तै? आणि सिनेमात नसूनही विजुभाऊनी एन्जॉय नाही केलं कशाबरून??
क्रमांक चार, मैत्रिणीचा नवरा पार्टी घेताना 'प्रसंग नक्की काय घडला' हे विचारणार? क्रमांक पाच, 'नाटक' म्हणून एखादी 'भली' महिला दुसर्याच्या बायकोचा रोल करत असेल तर ती तिच्या नवर्याला नक्की सांगेल.
त्या बाईने नवर्याला सांगीतलं नाही हे कुठेही लिहिलेलं नाही.
20 Sep 2010 - 7:30 pm | यशोधरा
आपले विजुभाऊ हे पुण्याला नावं ठेवत असले तरी एक सद््गृहस्थ आहेत. घरदार, फ्यामिलीवाले सज्जन आहेत
पुणेरी नसले तरीही? ऐकावं ते नवलच की! :D
ओ विजूभाऊ तुम्ही ते स्प्लिट पर्सनॅलिटी टाईप वागा त्या दिवशी मालकासमोर! मामला खल्लास होऊन जाईल!
20 Sep 2010 - 7:30 pm | अनामिक
ते भले वागतील स्प्लिट पर्सनॅलिटी टाईप, पण त्या मैत्रीणीने आणि तिच्या नवर्याने कसे वागावे बरे?
कि त्या मैत्रीणीने पार्ट टाईम जॉब करते म्हणून सांगावे? ;)
20 Sep 2010 - 8:02 pm | संदीप चित्रे
>> पहिली गोष्ट म्हणजे विजूभाई पुण्यात येतीलच कश्याला?
आयुष्यात काहीही चांगलं घडायचं असेल तर त्याचा मार्ग पुण्यातून(च) जातो हे ठाऊक नाही काय ?
(और इसे कहते है... लगाव बत्ती !)
21 Sep 2010 - 11:54 am | विजुभाऊ
दुसरं म्हणजे ते पुण्यातल्या घराला 'सुरेख', 'हवेशीर' कश्याला म्हणतील?
फ्लॅट हवेशीर आहे. छानच आहे.
तिसरी गोष्टं, वेळ मारून नेण्यासाठी कोणताही भला माणूस दुसर्याच्या बायकोला आपली बायको का म्हणून नेईल?
ती आयडिया अशीच एकदम डोक्यात आली. माझ्या मैत्रीणीला विचारले .तिला गम्मत वाटली आणि ती त्यावेळेस सोबत आली. तिच्या नवर्याला सुद्धा गम्मत वाटली पण पुढे असे काही होईल असे काही वाटले नव्हते
क्रमांक चार, मैत्रिणीचा नवरा पार्टी घेताना 'प्रसंग नक्की काय घडला' हे विचारणार?
क्रमांक पाच, 'नाटक' म्हणून एखादी 'भली' महिला दुसर्याच्या बायकोचा रोल करत असेल तर ती तिच्या नवर्याला नक्की सांगेल. प्रसंग घडून गेल्यावर दिडमहिन्यात एकदाही नवर्याला सांगण्यास वेळ मिळाला नाही असे शक्य नाही.
मैत्रीणीच्या नवर्याला या प्रकाराची कल्पना आहे. पार्टी ही घरमालकानी आम्हा दोन्ही कुटुंबियाना भेटवण्यासाठी बोलावली आहे. मी त्यांचा भाडेकरु आणि मैत्रीणीचा नवरा त्यांचा इन्टेरीयर डेकोरटर.
21 Sep 2010 - 6:44 pm | रेवती
फ्लॅट हवेशीर आहे. छानच आहे.
अर्रर्र! फ्लॅट छान आहे असं म्हणावं लागतय तुम्हाला.
तुमचे दु:ख समजू शकते.;)
ती आयडिया अशीच एकदम डोक्यात आली.
मग आता तुमच्या सौंना खरा गोंधळ सांगा, त्यांच्या डोक्यात जी आयडीया त्यावेळी येइल तीला तोंड द्या.
मैत्रीणीच्या नवर्याला या प्रकाराची कल्पना
कल्पना आहेच मैत्रिणीच्या नवर्याला, पण व्यक्ती कोण? हे माहित नाहीये ना (म्हणजे ती व्यक्ती तुम्ही आहात हे माहित नाही हा अर्थ मी तरी घेतला होता)!
20 Sep 2010 - 7:15 pm | चतुरंग
आणि तुमच्या कार्यक्रमाचा दिवस आणि वेळ कळवा बाकी तुमच्या टेंपररी बायकोचं मिपाकरांवर सोडा! ;)
(खुद के साथ बातां : रंग्या, एकाचवेळी चारचार जण विजुभौंच्या टेंपररी बायका घेऊन तिथे हजर झाले तर काय धमाल येईल ना? ;) )
(टेंपररी )चतुभाऊ
20 Sep 2010 - 7:19 pm | llपुण्याचे पेशवेll
त्यापेक्षा मालकांचा नाव, पत्ता, फोन नं द्या. आम्ही समजावतो त्यांना. :)
20 Sep 2010 - 7:22 pm | धमाल मुलगा
तुम्ही किती टक्के घेणार?
20 Sep 2010 - 7:25 pm | चतुरंग
विजुभौ मित्र आहेत पुपेंचे, मित्रात कसली टक्केवारी? हो की नै पुपे? ;)
||टक्क्यांचे पेशवे||
20 Sep 2010 - 7:28 pm | अनामिक
तरीही मिपावरच्या लोकांना बाय डिफॉल्ट ३ टक्के मिळतात असे ऐकून आहे.
20 Sep 2010 - 7:29 pm | अवलिया
तोंडी वा कागदोपत्री... प्रत्यक्षात काय?
20 Sep 2010 - 7:31 pm | अनामिक
बहुतेक "धुपाटणे"!
20 Sep 2010 - 7:22 pm | चतुरंग
पाहिजे तर परालाही बरोबर घेऊन जा, एकाला दोन बरे! ;)
(अपरा)रंगा
20 Sep 2010 - 7:25 pm | मृत्युन्जय
तो सध्या आयटीमय व्हायचा मनापासुन प्रयत्न करतो आहे. उगाच त्याला डिस्टर्ब करु नका.
20 Sep 2010 - 7:36 pm | llपुण्याचे पेशवेll
रंगाकाकांशी सहमत आहे. तसेही बरेच दिवसात मैत्री निभावण्याची संधी नाही मिळाली. ;)
20 Sep 2010 - 7:50 pm | धमाल मुलगा
ए हॅलो...
ते वडिलांसारखे आहेत असं म्हणुन गोड पापी घेणारेत!
एकाला दोन काय म्हणतांव? =))
20 Sep 2010 - 7:25 pm | गणेशा
तुमचा घर माल भला माणुस आहे म्हंटला आहे तुम्ही.
आणि तुम्ही अग्रीमेंट करत्या वेळेसची तुमची मैत्रीण त्याने पुनह पाहुनही जुली बहिन आहे का असे विचारले.
म्हणजे आजचय जमान्यातील खरेच भला माणुस दिसत आहे. कारण कोणी तरी सगळीकडे दवंडी पिटवली असते बायकोने २ जणांना फसवले आहे.
आणि ज्या बायकोला अग्रीमेंट ला ही बोलवता आले नव्हते.. तुम्ही रीक्वेस्ट केली होती तशी तीला येता येणार नाही ते पण त्यांनी ऐकले नव्हते .. सोसायटीच्या नावाखाली.
आता तसेच सांगा बायकोला येता येणार नाही. का आता ही सोसायटी साठी बायको बघायची आहे त्या भल्या मालकाला ?
खरेच येवु शकत नाही म्हनाय्चे .. आणि मैत्रीणीला सारखे बायको बद्दल बोलायला लावय्चे .. तुमचे खुप घरचे संबध आहेत, कश्या सारख्या दिसण्यावरुन बहिनी दिसायचो ते .
नाही तरी भाल माणुस म्हंटल्यावर अग्रीमेंट च्या वेळेस असे कीतीवेळ तो तुमच्या बायको कडे बघत असणार म्हणा .. त्याल हे जाणवेल थोडा फरक असतो ..
असो बस्स येव्हडे करा .. तरी डाव फिसकटला तर .. येथे बोलण्यापेक्षा अग्रीमेंट च्या वेळेस बायकोची संमती असल्या नआटकाचय वेळेस का नाही घेतली य्६आवरुन स्वताला २ शिव्या द्याच .
आणि ते ही नाही जमले .. तर मैत्रीणीला म्हणा बाई तु मागच्या वेळेस धावुन आली .. आता पाय दुखत आहे म्हणुन घरीच रहा .. माजेहे बायको पण नाही येणार ..
बायका कश्या आळशी असतात .. ऐकत नाहीत .. हे पुणेरी भल्या माणसाला सांगा .. बघा तो सगळे विसरुन त्याच्या बायकोचे पुराण ऐकवेल
.
काहीच जमले नाही तर मला बोलवा ..
सॉल्व करुन देतो
-
22 Sep 2010 - 3:50 pm | बिपिन कार्यकर्ते
आँ!!! विजुभाऊ, हे हो काय? एकदम दोस्ताना?
22 Sep 2010 - 3:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बुडाशी गेलेला धागा उकरण्याच्या प्रयत्नाबद्दल बिपिनचा निषेध!
20 Sep 2010 - 7:27 pm | अवलिया
हे एकेक प्रतिसाद वाचुन विजुभाउचे उरले सुरले केस जायचे...
20 Sep 2010 - 7:29 pm | चतुरंग
अजून आहेत काय?
केसुभौ
20 Sep 2010 - 7:31 pm | अवलिया
फोटोत दिसत होते.. फोटो किती जुना ते माहित नाही आणि फोटो चेहर्याचा होता
20 Sep 2010 - 7:32 pm | अनामिक
चाव्ट!
20 Sep 2010 - 7:33 pm | चतुरंग
पुरे! (हे बनवाबनवी मधल्या सुधीर जोशी स्टाईल वाचावे! ;) )
चतुर जोशी
20 Sep 2010 - 7:35 pm | गांधीवादी
फोटो काढताना हातात नावाची पाटी धरलेली आहे काय ?
फोटो कुठून व्हता, डावीकडून, उजवीकडून, का समोरून ?
20 Sep 2010 - 7:37 pm | अनामिक
कृपया वैयक्तीक प्रश्न खवतून किंवा व्यनीतून विचारावे अशी गांधीवादी यांना समज देण्यात येत आहे.
(नसलेला संपादक)
20 Sep 2010 - 7:51 pm | गांधीवादी
वोक्के.
20 Sep 2010 - 7:38 pm | अवलिया
" alt="" />
20 Sep 2010 - 7:39 pm | llपुण्याचे पेशवेll
मेलो मेलो, खपलो वारलो चचलो.
20 Sep 2010 - 7:40 pm | अनामिक
चेहर्याचा होता सांगून संपुर्ण फोटू टाकून नाना मिपाकरांची दिशाभूल तर करत नाही आहे ना?
20 Sep 2010 - 10:43 pm | अनुप्रिया
+१
20 Sep 2010 - 7:41 pm | चतुरंग
बाजार उठला!!! ;)
--बजालिया
20 Sep 2010 - 7:53 pm | गांधीवादी
CASIO चा original पिआनो ५००० ला मिळतो. मी एकदा बिग बाजारात बघितला व्हता.
20 Sep 2010 - 10:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
चॅक, हा चेहेरा तर रामदासकाकांचा वाटतोय.
20 Sep 2010 - 11:59 pm | पुष्करिणी
मिपावरचा लेख वाचून बुलबुलपण घेतलेलं दिसतय..
20 Sep 2010 - 7:40 pm | Nile
अहो सोप्पंय, तिसरीच घेउन जा यावेळी.
20 Sep 2010 - 7:42 pm | अनुप्रिया
बघा !
१०० झाले ट्यार्पीवाला धागा जमला विजुभौना
;)
=))
20 Sep 2010 - 7:45 pm | कवितानागेश
त्या मैत्रिणीचा नवरा त्यांचा इंटेरिअर डेकोरेटर आहे ना?
म्हणजे त्या घरमालकाच्या सगळ्या शेंड्या मैत्रिणीच्या नवर्याच्या हातात आहेत.
तुम्हाला हवे तसे वागा. तो काही वाकडे करु शकणार नाही!
20 Sep 2010 - 7:46 pm | अनामिक
तो काही वाकडे करु शकणार नाही!
केस तर अज्जीबात नाही! :)
20 Sep 2010 - 7:56 pm | पैसा
यातलं "खर्या" वहिनींना किती माहिती आहे?
20 Sep 2010 - 8:23 pm | प्रकाश घाटपांडे
विजुभाउ आमच्या घरी या! प्रश्नकुंडली मांडुन उत्तर देउ.नाडीग्रंथवाला जवळच आहे
अवांतर- एजंटला कमी कमिशन दिले काय?
20 Sep 2010 - 8:53 pm | संजयशिवाजीरावगडगे
मी सल्ला फुकट देतो सल्ला !! ?!! पटलं तर .... नाही तर... ! तुम्हचे तुम्हीच
१ .> प्रथम शुध्द लेखन करा !!!
२.> नवीन घर शोधायला सुरुवात करा!
नियम म्हणजे नियमच बरं का !!
पुणेकर म्हणुन आम्हां वरती राग नसावा !
मी काही मदत करु शकतो का ?
20 Sep 2010 - 11:20 pm | नितिन थत्ते
विजुभाऊ एवढे अशुद्ध टंकन करतात? की धागा कुणाकडून टंकून घेतला आहे?
20 Sep 2010 - 11:46 pm | कुक
अशी हि बनवा बनवी पिच्कर मधल्या सचिन पिळगावकर सारखी स्टोरी दिसते तुमची
21 Sep 2010 - 12:01 am | शिल्पा ब
सरळ सांगा, एकदा पहिली ना माझी बायको, पुन्हा पुन्हा काय पहायचंय तिला?
21 Sep 2010 - 4:12 pm | लॉरी टांगटूंगकर
मी येउ का स्त्रि वेशात??घर मालकान्चा चेहरा बघायचा आहे
21 Sep 2010 - 7:11 pm | JAGOMOHANPYARE
तुम्ही धर्म बदलून घ्या.. दोन्ही बायका तुमच्याच म्हणून सांगा. ... :)
22 Sep 2010 - 10:51 am | जाई अस्सल कोल्हापुरी
..मला वाट्लं कि झाला असेल शहानिशा!
इतके सल्लामसलत झाली आहे!
मी पण आधिच सांगितले आहे. आणि शिल्पा पण तेच म्हणते आहे.
सारखी सारखी काय पहायची आहे बायको ?
एकदा पाहिली ना...
नाही जमत आहे हो तिला असे म्हणा ना!
नाहीतर बेश्ट पैकी सांगुन द्या.
ती प्रेगनंट आहे..... डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितली आहे.माहेरीच राहणार आहे.येउ शकत नाही.
नऊ -दहा महिन्यांची सोय होईल. तोपर्यंत तुमचे अग्रीमेंट पण संपेल कदाचित. मग पुनः दुसरे घमा!
पहा लागु पडते का.....
तेही नाही पडले तर घमा ना पाटण्कर काढा द्या.
:)
इच्छाभेदी रस नावाची एक नामी गोळी मिळते....पहा देता का!
22 Sep 2010 - 11:21 am | मृत्युन्जय
ती प्रेगनंट आहे..... डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितली आहे.माहेरीच राहणार आहे.येउ शकत नाही.
नऊ -दहा महिन्यांची सोय होईल
अहो ताइ विजुभौ "मानवी" गटात मोडतात हो. बायको प्रेग्नंट आहे हे कळाल्यानंतर १० महिने (हे डोक्टरांना कळुन त्यांनी बेडरेस्टची शिफारस केल्यानंतर) म्हणजे विजुभौ ना (आणि डोक्टरांना सुद्धा) प्रोसेस सुरु करण्याआधीच आउटपुट बद्दल माहिती हवी
22 Sep 2010 - 12:10 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
डीलिव्हरी नंतर चे बाळंतपणाचे महिने अॅड केलेत ओ त्यात. त्यांचीच सोय पहात होते!