सल्ल हवा आहे
मी नुकताच पुण्यात आलो.
पुण्यात रहाण्याची सोय म्हणुन एका चांगल्या ठिकाणी एका एजन्टाकरवी घर शोधायला लागलो
काही ठिकाणे भादे अधीक होते तर काही ठीकाणी थोड्या गैरसोयी होत्या.
सरतेशेवटी एक घर्/फ्लॅट मनाजोगता वाटला. हवेशीर खिशाला परवडेलसा आणि बर्यापैकी सोयीसुवीधा असणारा. फ्लॅटला स्वतन्त्र गच्ची होती.गच्चीतून आजूबाजूचा परीसर छान दिसतो. खीडक्या उघडल्या की फ्लॅट ताज्या स्वच्छ हवेने न्हाऊन निघतो .
एजन्टाला साम्गितले की घर पसंद आहे. मालकाशी बोलणी करून ठरवून टाक. भाडे / डिपॉझीट वगैरे फारशी खळखळ न करता अॅडजस्ट झाले. घरमालकानी सांगितले की फ्लॅट विद्यार्थ्याना किंवा एकट्यादुकट्या रहाणाराला द्यायचे नाही केवळ फॅमिलीला द्यायचे असा सोसायटीचा नियम आहे.
मी त्या घर मालकाना माझी पत्नी पुण्याला येवू शकणार नाही असे सागितले. पण ते काही ऐकायला तयार नव्हते.
म्हणाले की फ्लॅट्चे अॅग्रीमेन्ट करताना तरी तुम्ही दोघे असायलाच पाहिजे. मी हा फ्लॅट फॅमिलीलाच देणार.
माझी आता खरोखर पंचाईत झाली. फ्लॅट तर खूप सुरेख होता. आणि मी फॅमिली इथे आणु शकत नव्हतो.
शेवटी माझा हा प्रॉब्लेम माझ्या एका मैत्रीणीने सोडवायला मदत केली. अॅग्रीमेन्ट साईन करायच्या वेळेस ती माझ्याबरोबर घरमालकांकडे आली. घर मालकानी त्यांच्या घरातल्या लोकांशी आमची दोघांची ओळख करून दिली.
मनाजोगता फ्लॅट मिळाल्याच्य आनन्दात त्या दिवशी मी त्या मैत्रीणीला तिच्या नवर्यासकट झकास पार्टी दिली.
एक दीड महिना झाल असेल. त्या मैत्रीणीच्या नवर्याला त्याच घरमालकांच्या घराचे इन्टीरीयरडेकोरेशनचे काम मिळाले. हे घरमालक त्या मैत्रीणीच्या नवर्याच्या ऑफिसमध्ये गेले असताना ती मैत्रीणही त्याना दिसली.
मैत्रीणीच्या नवर्याला आमचा किस्सा माहीत होता पण व्यक्ती नव्हती. त्याने त्याच्या बायकोची घरमालकांशी ओळख करून दिली.
त्या घरमालकानी मैत्रीणीला ओळखले. पण त्यांचा संभ्रम झाला. ते तेथे काही बोलले नाहीत पण त्यानी मला सहज विचारले की माझ्या पत्नीला जुळी बहीण वगैरे आहेका? मला घडलेल्या घटनेची काहीच कल्पना नव्हती . त्यामुळे मी अर्थातच तसे काही नाही म्हणून साम्गितले. त्यावर ते म्हणाले की माझ्या पत्नीसारखीच हुबेहूब्न दिसणारी एक व्यक्ती त्यांच्या पहाण्यात आली. मी ही अर्थात उत्सुकतेने त्याना त्याबद्दल विचारले. त्यावर ते म्हणाले त्या दोघिंची गाठच घालून देतो ना.
घर मालक भला मनुष्य आहे. त्यानी आम्हा चौघाना म्हणजे मला आणि आलेल्या माझ्या पत्नीला (म्हणजे त्यादिवशी अॅग्रीमेन्ट करताना माझ्या बरोबर आलेल्या माझ्या पत्नीला अर्थात माझ्या मैत्रीणीला) तसेच त्यांच्या इन्टेरीयर डेकोरेटरला आणि त्याच्या पत्नीला ( अर्थात माझ्या त्याच मैत्रीणीला) त्यांच्या कडे पुढच्या आठवड्यात एका कार्यक्रमाला बोलावले आहे.
मला सल्ला हवा आहे की हा पेच प्रसंग मी कसा निभावून नेवू?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आपले विजुभाऊ हे पुण्याला नावं
ते भले वागतील स्प्लिट
कशाला म्हणजे काय?
दुसरं म्हणजे ते पुण्यातल्या
फ्लॅट हवेशीर आहे. छानच
मालकाच्या राहत्या जागेचा पत्ता द्या
त्यापेक्षा मालकांचा नाव,
तुम्ही किती टक्के घेणार?
छे छे काहीतरीच काय?
तरीही मिपावरच्या लोकांना बाय
तोंडी वा कागदोपत्री...
बहुतेक "धुपाटणे"!
चांगलं कोपच्यात घेऊन 'नीट समजवा' हो पेशवे
तो सध्या आयटीमय व्हायचा
रंगाकाकांशी सहमत आहे. तसेही
ए हॅलो... ते वडिलांसारखे आहेत
खोटे का असेना पण एक सल्ला ..
तुमचा घर माल भला माणुस आहे
बुडाशी गेलेला धागा
हे एकेक प्रतिसाद वाचुन
म्हणजे?
फोटोत दिसत होते.. फोटो किती
चाव्ट!
पुरे!
फोटो काढताना हातात नावाची
कृपया वैयक्तीक प्रश्न खवतून
वोक्के.
हा पहा फटु
हा हा हा हा हा हा
चेहर्याचा होता सांगून
+१
अग्गाअयायाअयायायाय!!
CASIO चा original पिआनो
चॅक, हा चेहेरा तर
मिपावरचा लेख वाचून बुलबुलपण
अहो सोप्पंय, तिसरीच घेउन जा
बघा ! १०० झाले ट्यार्पीवाला
घाबरायचे काय त्यात?
तो काही वाकडे करु शकणार
अवांतर
प्रश्नकुंडली
सल्ला फुकट
विजुभाऊ एवढे अशुद्ध टंकन
अशी हि बनवा बनवी पिच्कर
सरळ सांगा, एकदा पहिली ना माझी
मी
तुम्ही धर्म बदलून घ्या..
अर्रर्रर्र्र्र.....अजुन चालुच आहे का?...एक लई भारी मात्रा आठवली
ती प्रेगनंट आहे.....
डीलिव्हरी नंतर चे बाळंतपणाचे