Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विजुभाऊ on Mon, 09/20/2010 - 15:58
मी नुकताच पुण्यात आलो. पुण्यात रहाण्याची सोय म्हणुन एका चांगल्या ठिकाणी एका एजन्टाकरवी घर शोधायला लागलो काही ठिकाणे भादे अधीक होते तर काही ठीकाणी थोड्या गैरसोयी होत्या. सरतेशेवटी एक घर्/फ्लॅट मनाजोगता वाटला. हवेशीर खिशाला परवडेलसा आणि बर्‍यापैकी सोयीसुवीधा असणारा. फ्लॅटला स्वतन्त्र गच्ची होती.गच्चीतून आजूबाजूचा परीसर छान दिसतो. खीडक्या उघडल्या की फ्लॅट ताज्या स्वच्छ हवेने न्हाऊन निघतो . एजन्टाला साम्गितले की घर पसंद आहे. मालकाशी बोलणी करून ठरवून टाक. भाडे / डिपॉझीट वगैरे फारशी खळखळ न करता अ‍ॅडजस्ट झाले. घरमालकानी सांगितले की फ्लॅट विद्यार्थ्याना किंवा एकट्यादुकट्या रहाणाराला द्यायचे नाही केवळ फॅमिलीला द्यायचे असा सोसायटीचा नियम आहे. मी त्या घर मालकाना माझी पत्नी पुण्याला येवू शकणार नाही असे सागितले. पण ते काही ऐकायला तयार नव्हते. म्हणाले की फ्लॅट्चे अ‍ॅग्रीमेन्ट करताना तरी तुम्ही दोघे असायलाच पाहिजे. मी हा फ्लॅट फॅमिलीलाच देणार. माझी आता खरोखर पंचाईत झाली. फ्लॅट तर खूप सुरेख होता. आणि मी फॅमिली इथे आणु शकत नव्हतो. शेवटी माझा हा प्रॉब्लेम माझ्या एका मैत्रीणीने सोडवायला मदत केली. अ‍ॅग्रीमेन्ट साईन करायच्या वेळेस ती माझ्याबरोबर घरमालकांकडे आली. घर मालकानी त्यांच्या घरातल्या लोकांशी आमची दोघांची ओळख करून दिली. मनाजोगता फ्लॅट मिळाल्याच्य आनन्दात त्या दिवशी मी त्या मैत्रीणीला तिच्या नवर्‍यासकट झकास पार्टी दिली. एक दीड महिना झाल असेल. त्या मैत्रीणीच्या नवर्‍याला त्याच घरमालकांच्या घराचे इन्टीरीयरडेकोरेशनचे काम मिळाले. हे घरमालक त्या मैत्रीणीच्या नवर्‍याच्या ऑफिसमध्ये गेले असताना ती मैत्रीणही त्याना दिसली. मैत्रीणीच्या नवर्‍याला आमचा किस्सा माहीत होता पण व्यक्ती नव्हती. त्याने त्याच्या बायकोची घरमालकांशी ओळख करून दिली. त्या घरमालकानी मैत्रीणीला ओळखले. पण त्यांचा संभ्रम झाला. ते तेथे काही बोलले नाहीत पण त्यानी मला सहज विचारले की माझ्या पत्नीला जुळी बहीण वगैरे आहेका? मला घडलेल्या घटनेची काहीच कल्पना नव्हती . त्यामुळे मी अर्थातच तसे काही नाही म्हणून साम्गितले. त्यावर ते म्हणाले की माझ्या पत्नीसारखीच हुबेहूब्न दिसणारी एक व्यक्ती त्यांच्या पहाण्यात आली. मी ही अर्थात उत्सुकतेने त्याना त्याबद्दल विचारले. त्यावर ते म्हणाले त्या दोघिंची गाठच घालून देतो ना. घर मालक भला मनुष्य आहे. त्यानी आम्हा चौघाना म्हणजे मला आणि आलेल्या माझ्या पत्नीला (म्हणजे त्यादिवशी अ‍ॅग्रीमेन्ट करताना माझ्या बरोबर आलेल्या माझ्या पत्नीला अर्थात माझ्या मैत्रीणीला) तसेच त्यांच्या इन्टेरीयर डेकोरेटरला आणि त्याच्या पत्नीला ( अर्थात माझ्या त्याच मैत्रीणीला) त्यांच्या कडे पुढच्या आठवड्यात एका कार्यक्रमाला बोलावले आहे. मला सल्ला हवा आहे की हा पेच प्रसंग मी कसा निभावून नेवू?
  • Log in or register to post comments
  • 47576 views

प्रतिक्रिया

Submitted by विंजिनेर on Mon, 09/20/2010 - 16:01

Permalink

'गांधीगिरी' ने कदाचित प्रसंग

'गांधीगिरी' ने कदाचित प्रसंग निभावून जाऊ शकेल.
  • Log in or register to post comments

Submitted by गांधीवादी on Mon, 09/20/2010 - 18:58

In reply to 'गांधीगिरी' ने कदाचित प्रसंग by विंजिनेर

Permalink

not necessary. कदाचित

not necessary. कदाचित चिघळला/चीघळवला हि जाऊ शकतो.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Mon, 09/20/2010 - 16:04

Permalink

हॅ हॅ हॅ

हॅ हॅ हॅ!!!! भोगा कर्माची फळं!! कुणाला एकाला आजारी पडावे लागणार बहुतेक!
  • Log in or register to post comments

Submitted by गांधीवादी on Mon, 09/20/2010 - 19:00

In reply to हॅ हॅ हॅ by सुनील

Permalink

स्वाइन फ्लु झाला आहे असे

स्वाइन फ्लु झाला आहे असे सांगा, तो मालक पुढील दहा वर्षे बोलविणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Mon, 09/20/2010 - 19:02

In reply to स्वाइन फ्लु झाला आहे असे by गांधीवादी

Permalink

ठ्या:!

आणि बोलावलंच तर तोंडाला मास्क लाऊनच भेटीला घेऊन जायचं...ओळखणारच नाही तो घ.मा.
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on Mon, 09/20/2010 - 19:05

In reply to ठ्या:! by धमाल मुलगा

Permalink

आणि निलगीरीचं तेल अंगावर

आणि निलगीरीचं तेल अंगावर शिंपडून जा म्हणजे जवळही नाही येणार.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 09/20/2010 - 16:05

Permalink

वा वा काय प्रश्न आहे?

काय विजुभौ खरोखर वेळ जात नाहीये का? का शीरियसली विचारताय? गोलमाल है भै सब गोलमाल है ची लेडीज स्पेशल आवृत्ती करुन टाका मस्त चान्स आहे! ;) चतुरंग दत्त
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 09/20/2010 - 16:08

In reply to वा वा काय प्रश्न आहे? by चतुरंग

Permalink

लेडीज नव्हे, 'पाशवी' म्हणा!

लेडीज नव्हे, 'पाशवी' म्हणा! ;-) (पळा आता ... दोन दणके मिळताहेत नाहीतर!)
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 09/20/2010 - 16:12

In reply to वा वा काय प्रश्न आहे? by चतुरंग

Permalink

गोलमाल है भै सब गोलमाल है ची

गोलमाल है भै सब गोलमाल है ची लेडीज स्पेशल आवृत्ती करुन टाका मस्त चान्स आहे रंग्या जी अहो त्या पिक्चर मध्ये अमोल पालेकर मिशी लावून आणि काढून दोन वेगवेगले रोल प्ले करतो. मैत्रीणीला हे कसे जमेल . आणि समजा तिने तसे काही केले आणि त्यातून अजून काही अचाट नाटक उपटले तर माझेच विडंबन होईल
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 09/20/2010 - 19:43

In reply to गोलमाल है भै सब गोलमाल है ची by विजुभाऊ

Permalink

चला खलास, झाले एकदाचे १०० प्रतिसाद!!

काय विजुभौ झाले का समाधान? ;) (आता धागा वाचनमात्र करावा का? ;) )
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Mon, 09/20/2010 - 19:44

In reply to चला खलास, झाले एकदाचे १०० प्रतिसाद!! by चतुरंग

Permalink

हो, लवकर करा.

हो, लवकर करा. :)
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 09/20/2010 - 19:51

In reply to चला खलास, झाले एकदाचे १०० प्रतिसाद!! by चतुरंग

Permalink

>>>(आता धागा वाचनमात्र करावा

>>>(आता धागा वाचनमात्र करावा का? Wink ) का? चालु द्या की थोडी मस्ती... ! अडचण असेल तर करा वाचन मात्र. जे धागे करायला हवे तिकडे मात्र दुर्लक्ष.. पण निखळ कुणालाही न दुखावणार्‍या मनोरंजक धाग्यांवर संक्रांत !! वा ! अजबच कारभार आहे !! हाच धागा मिभो वगैरेंचा असता तर असा प्रश्न पडला असता का ? नसताच.. चालु ठेवलाच असता धागा !! आणि समजा धागा भरकटेल असं वाटत असेल तर तसे प्रतिसाद उडवता येतातच ना? मग मनोरंजनाला का कात्री?
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 09/20/2010 - 19:56

In reply to >>>(आता धागा वाचनमात्र करावा by अवलिया

Permalink

का उगा शिमगा लावलाय अवलिया?

का तुम्हालाही गंमत समजेना झालीये?
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 09/20/2010 - 19:57

In reply to का उगा शिमगा लावलाय अवलिया? by चतुरंग

Permalink

संपादकांना मी चांगला ओळखुन

संपादकांना मी चांगला ओळखुन आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 09/20/2010 - 19:59

In reply to संपादकांना मी चांगला ओळखुन by अवलिया

Permalink

आहात ना? मग उत्तम!!

चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 09/20/2010 - 20:17

In reply to संपादकांना मी चांगला ओळखुन by अवलिया

Permalink

संपादकांना मी चांगला ओळखुन

संपादकांना मी चांगला ओळखुन आहे सदस्यांना संपादक ओळखून नाहित कि काय? इकडे धागा मजेत चाललेला दिसत असताना मंडळाला तिकडे खरडी आणि व्य. नि. मात्र तक्रारींचे असतात त्याचे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Tue, 09/21/2010 - 11:22

In reply to संपादकांना मी चांगला ओळखुन by रेवती

Permalink

एखादा धागा मजेत किंवा भांडणात

एखादा धागा मजेत किंवा भांडणात किंवा इंचाइंचाने चालु असतांना एखाद्या सदस्याला त्यातील काही प्रतिक्रिया गैर वाटल्या म्हणुन त्याने तशा अर्थाने संपादक मंडळाला खरड व्यनी करणे हे चुकीचे आहे असे मला वाटत नाही. संपादक मंडळाचे तसे आकलन असल्यास तशा पद्धतीचे धोरण जाहिर केल्यास सदस्य अशा प्रकारे संपादक मंडळास खरड व्यनी करणार नाहीत असे मला वाटते. सबब योग्य तो खुलासा संपादक मंडळाने करावा.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 09/21/2010 - 18:34

In reply to एखादा धागा मजेत किंवा भांडणात by अवलिया

Permalink

कोणाला कश्यात मजा वाटेल ते

कोणाला कश्यात मजा वाटेल ते सांगता येत नाही. नापसंतीचे निरोप येत राहणार. त्यावेळेस सगळ्यांनाच तारतम्याने निर्णय घ्यावे लागतात. संपादकांनी आपल्याला काही त्रास दिला असल्यास तसे सविस्तरपणे कळवावे. उगीच येताजाता टोमणे मारून काहीही साध्य होणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Tue, 09/21/2010 - 18:37

In reply to कोणाला कश्यात मजा वाटेल ते by रेवती

Permalink

सहमत आहे. कुणाला कशात मजा

सहमत आहे. कुणाला कशात मजा वाटेल ते सांगता येत नाही... संपादकांनी आपल्याला काही त्रास दिला असल्यास तसे सविस्तरपणे कळवावे. संपादकांनी त्रास दिलेला संपादकांनाच कळवायचे मग कसा निर्णय होणार? तुम्ही पण गंमतच करता ब्वा ! असो. टोमणे मारायला सुरवात मी केली नव्हती. पण तरीही माझ्या बाजुने या धाग्यापुरते थांबतो. धन्यवाद. परमेश्वर आपल्याला दिर्घायुष्य देवो !
  • Log in or register to post comments

Submitted by गांधीवादी on Mon, 09/20/2010 - 19:56

In reply to >>>(आता धागा वाचनमात्र करावा by अवलिया

Permalink

बराबरे

बराबरे
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 09/20/2010 - 16:07

Permalink

थापा मारू नयेत.

आपण वयाने लहान दिसतो हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न! स्मरणशक्ती कमी असणार्‍याने थापा मारू नयेत. एकतर स्वतः खुळं असल्याचं आता नाटक करा नाहीतर मालकाला खुळं बनवा. स्वतःच्या पत्नीलाच घेऊन तिकडे जा आणि ठासून सांगा हीच तुमची बायको आणि हिच्याशीच तुम्ही ओळख करून दिली होतीत वगैरे वगैरे. अदिती (गोबेल्स)
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Mon, 09/20/2010 - 16:33

In reply to थापा मारू नयेत. by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

घ्या. घरमालकाला वाट्टेल ते

घ्या. घरमालकाला वाट्टेल ते ठासुन सांगतील हो. बायकोला काय सांगणार.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 09/20/2010 - 16:45

In reply to घ्या. घरमालकाला वाट्टेल ते by मृत्युन्जय

Permalink

अच्छा, असं 'लफडं' आहे तर!

अच्छा, असं 'लफडं' आहे तर!
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 09/22/2010 - 15:54

In reply to घ्या. घरमालकाला वाट्टेल ते by मृत्युन्जय

Permalink

घरमालकाला वाट्टेल ते ठासुन

घरमालकाला वाट्टेल ते ठासुन सांगतील हो. बायकोला काय सांगणार.
बायकोच ठासुन मारेल...
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 09/22/2010 - 15:55

In reply to घरमालकाला वाट्टेल ते ठासुन by बिपिन कार्यकर्ते

Permalink

अनुभव हीच खात्री असं आत्ताच

अनुभव हीच खात्री असं आत्ताच कुठेतरी वाचनात आलं माझ्या!
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Mon, 09/20/2010 - 16:06

Permalink

:)

नवीन घर शोधायला सुरुवात करा! तसेही तुमच्या एका मित्राचा पुण्यात १ बीएचके आहे म्हणे......तिथे मस्तपैकी रहा अन् प्यार्टी करा!
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on Mon, 09/20/2010 - 16:14

In reply to :) by ब्रिटिश टिंग्या

Permalink

तुमच्या एका मित्राचा

त्या मित्रालाच बुरखा घालुन घेउन जा.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Mon, 09/20/2010 - 16:17

Permalink

आता मैत्रिणीलाच विचारा की तिला

आता मैत्रिणीलाच विचारा की तिला जुळी बहिण आहे का? अन्यथा त्या (नसलेल्या) जुळ्या बहिणीचा अंत (खुन्/अ‍ॅक्षीडंट्/अपहरण) करा. हाय काय अन नाय काय? इजुभौ जरा स्वप्नातुन बाहेर या आणि थोडे बॉलीवुड्पट/हिंदी मालिका पाहात जा ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 09/20/2010 - 16:15

Permalink

मैत्रीणीला जुळी बहीण वगैरे

मैत्रीणीला जुळी बहीण वगैरे नाहिय्ये. अन्यथा द्या (नसलेल्या) जुळ्या बहिणीचा अंत (खुन्/अ‍ॅक्षीडंट्/कुंभका मेला) करा. हाय काय अन नाय काय? आणि त्यानन्तर मी किम्वा त्या मैत्रीणीच्या नवर्‍याने कायम विधुराची भुमीका करायची का? नाटक सिनेमात ते ठीक आहे. पण खर्रखुर्रे?
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 09/20/2010 - 16:44

In reply to मैत्रीणीला जुळी बहीण वगैरे by विजुभाऊ

Permalink

आणि त्यानन्तर मी किम्वा त्या

आणि त्यानन्तर मी किम्वा त्या मैत्रीणीच्या नवर्‍याने कायम विधुराची भुमीका करायची का?
नाही, तुम्ही दुसरं लग्न करायचं! सोप्पय.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 09/20/2010 - 17:00

In reply to आणि त्यानन्तर मी किम्वा त्या by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

तुम्ही दुसरं लग्न करायचं!

तुम्ही दुसरं लग्न करायचं! सोप्पय. सोप्पय........... हम्म.... आत्ताच आमची गॉन केस झाली आहे. तसे काही केले तर पुरती वाट लागायची.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 09/20/2010 - 17:24

In reply to तुम्ही दुसरं लग्न करायचं! by विजुभाऊ

Permalink

अहो विजुभाऊ, पहिली बायको

अहो विजुभाऊ, पहिली बायको आक्सिडेंटात मारायची आणि मग दुसरं लग्नं करून (खर्‍या) पहिल्या बायकोला घरमालकासमोर हजर करायचं! सिंपल हाय!!
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्करिणी on Mon, 09/20/2010 - 17:28

In reply to अहो विजुभाऊ, पहिली बायको by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

दीड महिन्याच्या कालावधीत नविन

दीड महिन्याच्या कालावधीत नविन फ्लॅट भाड्यानं घेउन, पहिल्या बायकोला मारून , दुसरं लग्न करून वर तुमची वास्तु कित्ती लकी आहे असं म्हणायच :) भोवळ येइल मालकाला ...
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 09/20/2010 - 17:41

In reply to दीड महिन्याच्या कालावधीत नविन by पुष्करिणी

Permalink

आणि ही वास्तु पुण्यात आहे

आणि ही वास्तु पुण्यात आहे म्हणे! ;-) (रेवतीताई, वाचते आहेस ना??)
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Mon, 09/20/2010 - 17:58

In reply to आणि ही वास्तु पुण्यात आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

छे:! काय हे? पोरींनो जरा

छे:! काय हे? पोरींनो जरा हिंदी सिनेमे कमी पहा गो. =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 09/20/2010 - 19:09

In reply to आणि ही वास्तु पुण्यात आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

वाचतिये हो! विजुभाईंचा धागा

वाचतिये हो!;) विजुभाईंचा धागा आहे हा! वाचायलाच हवा! उद्या मला कोणी 'पाशवी' म्हटलंच नाही तर वाईट वाटेल ना!;)
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Mon, 09/20/2010 - 18:17

In reply to अहो विजुभाऊ, पहिली बायको by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

मी ही हेच सुचवणार होतो पण

मी ही हेच सुचवणार होतो पण कार्यक्रम आहे पुढच्या आठवड्यात. मेलेल्या बायकोचा तेरावा घालण्याएवढे पण दिवस नाहीत त्यांच्याकडे.
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Mon, 09/20/2010 - 18:18

In reply to अहो विजुभाऊ, पहिली बायको by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

परत तेच!

अहो विजुभाऊ, पहिली बायको आक्सिडेंटात मारायची आणि मग दुसरं लग्नं करून (खर्‍या) पहिल्या बायकोला घरमालकासमोर हजर करायचं! आणि मग पहिल्या बायकोची ओळख "ही माझी दुसरी बायको" अशी करून द्यायची? त्यापेक्षा घरमालकाची पापी घेतलेली परवडेल त्यांना, काय विजुभौ? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 09/20/2010 - 16:19

Permalink

द्राविडी प्राणायम

ह्या वयात असली थेर? शोभा नाही देत.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Mon, 09/20/2010 - 17:04

In reply to द्राविडी प्राणायम by विनायक प्रभू

Permalink

अगाबाबो....

ही कोण आता?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 09/20/2010 - 22:24

In reply to अगाबाबो.... by धमाल मुलगा

Permalink

ही कोण आता?

शोभा!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by जाई अस्सल कोल्हापुरी on Mon, 09/20/2010 - 16:20

Permalink

...कायतरी..तुम्ही पण ना!

स्पष्ट सांगा न...वेळ नाहिये म्हणून्....तुम्ही बांधिल थोडेही आहात तुमच्या बायकोला कोणाला पण भेटवायला? तुमच्या त्या मैत्रीणीला आणि तिच्या नवर्‍याला देखिल सांगा कि तुम्हिही थोडी attitude दाखवा...! ... कारण प्रसंग आहे खरा बाका....आणि घ्.मा. पुणेरी दिसतो आहे....प्रसंग अंगावर बेतला ना तर पोलिस कंप्लेण्ण करायलाही मागे पुढे पाहणार नाही! All the best....!
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on Mon, 09/20/2010 - 16:22

Permalink

काय विजुभो

सोमवारी दुपारीच 'कार्यक्रम' सुरु केलात का? बाकी चालू दे.. १०० नक्कि.. झाड बुक करतो लगेच..
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 09/20/2010 - 16:24

Permalink

घर मालक तसा भला माणूस आहे. पण

घर मालक तसा भला माणूस आहे. पण काही सांगता येत नाही. अ‍ॅटीट्यूड दाखवून उपयोग नाही. प्रेमळ निमन्त्रण आहे
  • Log in or register to post comments

Submitted by जाई अस्सल कोल्हापुरी on Mon, 09/20/2010 - 16:41

In reply to घर मालक तसा भला माणूस आहे. पण by विजुभाऊ

Permalink

.... मग लाडीगोडी!

....मग त्याची एक गोड पापी घ्या आणि सांगा कि अहो काका.....XYZ......XYZ....XYZ>...! मग त्याचा भलेपणा कसा रुद्रावतार धारण करतो ते पहा! jokes apart.... खरच जर असेल ना समजुतदार मनुष्य तर खरच त्याला एखाद्या योग्य वेळी सत्य सांगुन टाका. हवे तर तुमच्या (खर्‍या) बायकोला बोलावून घ्या.आणि त्यांना त्यांच्या बायको करवी समजावयाचा प्रयत्न करा... हवे तर असेही सांगा ही हा फ्लॅट convinient होता.अजुन एक चान्गले कारण म्हणजे मी वास्तु मानतो...तुमची ही वास्तू अतिशय शुभ आणि प्रसन्न वाटली ...तुम्हीही मला माझ्या वडिलांसारखे आहात...and so on....! हवे तर त्यांना सांगा कि मी फ्लॅट चेंज करायलाही तयार आहे..! कारण चुक झाली तर आहे.. सरवा सारव किति दिवस करणार? you have to confess and face it...! Face it! काय होइल्? थोडे दिवस अवघड्ल्यासारखे होइल...आणि घर बदलावे लागेल ना...ठिक आहे... accept it the way it comes! पण रोजची भिती तरी कायमची जाईल ना!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 09/20/2010 - 16:57

In reply to .... मग लाडीगोडी! by जाई अस्सल कोल्हापुरी

Permalink

तुम्हीही मला माझ्या

तुम्हीही मला माझ्या वडिलांसारखे आहात.
घराबाहेर काढेल हे ऐकून तो मालक ... अगदी कायदा आणि अ‍ॅग्रीमेंट धाब्यावर बसवून!
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्करिणी on Mon, 09/20/2010 - 17:19

In reply to तुम्हीही मला माझ्या by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

घरमालकाची आधी एक गोड पापी

घरमालकाची आधी एक गोड पापी घेतली असेल आणि 'तुम्ही मला वडलांसारखे आहात' हे म्हटल नाही तर जास्त प्रॉब्लेम्स येतील बहुतेक ...:)
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Mon, 09/20/2010 - 17:59

In reply to घरमालकाची आधी एक गोड पापी by पुष्करिणी

Permalink

ठ्ठ्ठो!

सध्या विजुभाऊंचा चेहरा कसा झाला असेल हे आठवुन हसुन हसुन मेलोय!
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 09/21/2010 - 09:59

In reply to घरमालकाची आधी एक गोड पापी by पुष्करिणी

Permalink

घरमालकाची आधी एक गोड पापी

घरमालकाची आधी एक गोड पापी अवघड आहे. घ मा एक विशाल मिशाळ रीटायर्ड फारेष्ट हापिसर आहेत. त्यांच्या घरी दुनळी बंदूक आहे. मी ठ्यॉ करायला जायचो ते ठो ..ठो... करायचे.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Tue, 09/21/2010 - 18:00

In reply to घरमालकाची आधी एक गोड पापी by विजुभाऊ

Permalink

म्हणजेऽऽऽ????

ते घरमालक मिशाळ नसते, फॉरेश्ट हापिसर नसते, त्यांच्याकडे दुनळी बंदूक नसती तर..............तुम्ही त्यांची गोड पापी घेतली असती??????????????????
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com