भेट तुझी......मंतरलेली!

जाई अस्सल कोल्हापुरी's picture
जाई अस्सल कोल्हापुरी in जनातलं, मनातलं
20 Sep 2010 - 2:12 pm

.. क्षण मंतरलेले ..
. तू येण्या आधीची ती हुरहूर ...अजून जाणवते मला.
अस्वस्थ मन.....हृदयाची ती किंचित थरथर ....एखादा चुकलेला ठोका...आताही जाणवतो मला..

तूला पाहताक्षणी..मनभर आणि तनभर पसरत गेलेली गुलाबी सरसर ..
....माझ्याच गालांचा बदललेला वर्ण..ओठांवर अकारण उमलेले स्मित ...त्याही पेक्षा..
हे सारं जाणवलेली तुझी नजर,
आणि तुझ्या त्या नजरेने पुन्हा सैरभैर आणि अस्वस्थ मी... अजून आठवते मला ..

तू जवळ असतानाचा हवेचा गंध.... तुला स्पर्शून येणारी मंद रेशीम झुळूक..
सैलावलेलं मन..एखादा नकळत ... ओझरता ,सहज स्पर्श...गुंफलेली बोट
...आणि तो मनभर पसरलेला शहारा...आत्ताही मोहरून टाकतो मला...

...मलाच माझ्यापासून चोरणारी तुझी नजर..... ..
..नजरेतलं आणि स्पर्शातलंही .... ओळखीचं स्वामित्व
..... गुंफलेला श्वास अन श्वास.....
गुरफटून टाकणारं तुझं माझ्याभोवतीच अस्तित्व...
अजून तितकंच वेड लावतं मला

...पुढे सरकणारी वेळ...तू दुरावणार काही क्षणांत .....
या विचाराने काहुरलेलं मन...
एक बारीक छळत जाणारी वेदना...
आणि क्षणभर धूसरलेली नजर...
.....ती वेदना...तितकीच दुखावते मला..

...परतीचे क्षण..
..तिथेच रेंगाळू पाहणारं..जड जड झालेलं मन ....
...सैलावत जाणारी बोटांची वीण...
.....आठवते मला ..

...तू गेल्यानंतर..आलेली निशब्दता ..
...सगळंच कसं अचानक सुन्न झालेलं....कोणीतरी mute केल्यासारखं..
... यंत्रवत झालेल्या माझ्या हालचाली....
..माझ अस्तित्वच जणू तुझ्याकडे विसरून आलेली मी ...
अजून आठवते मला..
अजूनही आठवते मला...

मुक्तकआस्वाद

प्रतिक्रिया

गणपा's picture

20 Sep 2010 - 2:42 pm | गणपा

....
(हरवलेला) गणा.

मनि२७'s picture

20 Sep 2010 - 2:44 pm | मनि२७

मस्त !!!!
:-)

मस्तच.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

20 Sep 2010 - 4:21 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

??
नाही हो! मी कोल्हापुरीच! :)

एवढ सगळ एका वेळेस कस काय अनुभवतात लोक काय माहित....

शुचि's picture

20 Sep 2010 - 9:19 pm | शुचि

मनापासून आलेलं लिखाण. आवडलं.

>> नजरेतलं आणि स्पर्शातलंही .... ओळखीचं स्वामित्व>>
मस्त!!

ह्ह्ह्म्म्म्म्म्म.........

कुठेतरी "रिलेट" झाले.......

धमाल मुलगा's picture

20 Sep 2010 - 9:37 pm | धमाल मुलगा

अगाबाबो!

एव्हढं अवघड?
खरंय...संदीप-सलीलनं सांगुन ठेवलंय ना.. 'हे भलते अवघड असते...' :)

क्या बात है!

हेमा's picture

21 Sep 2010 - 10:49 am | हेमा

खुप सुन्दर