वाचलेली पुस्तकं आणि त्यावरची माझी मतं....कोसला!...

सविता's picture
सविता in जनातलं, मनातलं
12 Sep 2010 - 2:20 pm

डिस्क्लेमरः कोणे एके काळी मी डायरी लिहायचे, सुमारे १० वर्षांपुर्वी..म्हणजे मी कॉलेजला असतानाच्या काळात, आणि मग ती अधून मधून चाळायचे पण!

हा उतारा त्यातून घेतालाय्...अगदी तारखेसकट.

ही माझी तेव्हाचीमते आहेत, आत्ता वाचले तर कदाचित वेगळे पण मत बनू शकेल. माहीत नाही.

मी पहिल्यांदा जेव्हा ही एन्ट्री ब्लॉगवर टाकली, तेव्हा मला ब-याच लोकांनी "नेमाडे हे फार मोठे लेखक आहेत..तुला त्यांचे लेखन झेपत नाहीये म्हणजे तुझा प्रॉब्लेम आहे", "तुझी बौद्धिक पातळी कशी टिपिकल मध्यमवर्गीय आहे, मग तुला व्.पु., अवचट असे टिपिकल लोकांचे लेखनच आवडत असेल" इ. इ. प्रतिक्रिया दिल्या.

मी म्हणते..असतील नेमाडे कुणी लय भारी लेखक... म्हणून त्यांचे सगळे लेखन भारी असेल असा नियम आहे का? मी वाचक आहे..आणि मला जे लिखाण भिकार वाटले त्याला भिकार म्हणायचे मला पूर्ण स्वातंत्र्य आहे मग कुणी का लिहीना!

राहता राहीले, व.पु. आणि अवचट्...वेल मला आवडते त्यांचे लिखाण...आणि मला त्याचा अभिमान आहे.. तुम्हाला ते मध्यमवर्गीय वाटतेय याच्याशी मला काही देणे घेणे नाही.

------------------------------------------------------------
१३-oct-२००१

आज भालचंद्र नेमाडे नावाच्या कोणातरी लेखकाचे ’कोसला’ वाचून पूर्ण केले. तशी सुरवात कालच केली होती, काल बरं वाटलं पण आज पूर्ण केल्यावर ’अतिशय फुटकळ’ या सदरात मी त्याची गणना केली. कथेला काहीतरी चांगला शेवट किंवा काय म्हणतात ते..’कथाबीज’ असावं. आयुष्यभर काही न करता बापाच्या पैश्यावर मजा करणारा माणूस...ज्याच्या आयुष्यात फारसं महत्वाचं किंवा वेगळं काही घडत नाही अशा माणसाची..दररोजचे फालतु तपशील असलेली डायरी..काय वाचायची गोष्ट आहे?

खरंच ही असली पुस्तकं लोक का लिहीतात? आणि छापणारे का छापतात? त्यातलं मुख्य पात्र जसं भंकस विचार करून वेळ घालवतं तसंच आपणपण ब-याच वेळेला करतो असं मात्र माझ्या लक्षात आलं. म्हणजे पुस्तक वाचल्यावर मला तो माणूस...म्हणजे कथानायक भंकस आणि थोडा सायकिक वाटला. उद्या माझी डायरी वाचून पण कोणी असाच निष्कर्ष काढेल का?

खरंच मला असं ब-याच वेळेला असं वाटतं की मी वेडेपणा आणि शहाणपणा यांच्या फार बारीक सीमारेषेवर आहे. जरा धक्का द्या..एका साईडला मी नक्कीच पडेन..आणि ते ही वेडेपणाच्या..असं मला नेहमी वाटतं. मी एकटी असताना कित्येक वेळेला असंबद्ध आणि वेडगळ, विकृत वाटतील असे काहीतरी विचार करत राह्ते.खरंच मला हे टाळण्यासाठी माणसांच्या संगतीत जास्त राहीलं पाहिजे..पण घडतं नेमकं उलटं!..मला पुस्तकं, टी.व्ही, कॉम्प्युटर यांचीच संगत जास्त आवडते. चार माणसं जमली की ती या खोलीत तर मी माझ्या पुस्तकासकट दुस-या खोलीत..हे कायम घडतं.

सगळी अतिबुद्धीमान माणसं थोडीशी वेडसर असतात असं म्हणतात.मी अभ्यासात नंबर वन नसले तरी चांगली आहे, ज्याला चौफेर/चौकस म्हणतात तशी पण आहे मग माझे काही वेळेसचे असंबद्ध विचार हे असेच अतिबुद्धीमान लोकांचा वेडसरपणा या सदराखाली मोडत असतील का? बघा....मी जी पुस्तकं वाचते..तसे माझे विचार असतात आणि असं काहीतरी फालतू वाचलं आहे ना...मग आज माझे विचार पण तसेच असणार...ते सगळं खरडत बसण्यापेक्षा झोपावं हे बरं!!!

वाङ्मयविचार

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

17 Sep 2010 - 7:02 pm | धमाल मुलगा

पिवळा चालेल?
नाय, कालांतरानं पानं पिवळी पडतात ना म्हणुन .... =-))

अडगळ's picture

17 Sep 2010 - 7:07 pm | अडगळ

म्हणजे लाल करणे वगैरे वगैरे ..

अवलिया's picture

17 Sep 2010 - 7:10 pm | अवलिया

काळानिळा मिक्स जास्त चांगला...

समोरच्याला ठोसा मारला की असा कलर होतो म्हणतात
मी कुणालाही अजुन मारला नाही..
पण काही जण मधुन मधुन मला मारत असतात तेव्हा आमचे मित्र खरडीतुन "विचारतात कित्ती काळानिळा पडला आहेस..फार लागलं का? "

धमाल मुलगा's picture

17 Sep 2010 - 7:10 pm | धमाल मुलगा

नको बुवा!
मग लाल रंगाला विरोध म्हणुन कोणी हिरव्याच्या छटा सुचवल्या तर उगाच विचारजंतांच्या सेक्युलर भावना दुखावतील ना. =))

समंजस's picture

17 Sep 2010 - 7:10 pm | समंजस

लाल नाही चालणार... तो आधीच घेतला गेलेला आहे.
अधिक माहिती ग्रुहमंत्रालयाकडे मिळेल :)

समंजस's picture

17 Sep 2010 - 7:08 pm | समंजस

या पुढे साहित्यिक अतिरेकींना पिवळे अतिरेकी असे म्हणता येईल.. :)

यशोधरा's picture

17 Sep 2010 - 7:15 pm | यशोधरा

=)) =))

मस्त कलंदर's picture

17 Sep 2010 - 7:19 pm | मस्त कलंदर

माझ्या कडचं बाकी शून्य असंच पानं पिवळी पडलेलंच मिळालं मला. मग वाचताना राहून राहून यालाच पिवळं पुस्तक म्हणतात का अशी शंका मनात आली होती..
पळते आता नाहीतर डॉन्या येईलच धावत खरडखेचर मारायला.... :P

सविता's picture

17 Sep 2010 - 7:16 pm | सविता

९५... अजुन फक्त ५......... मग शंभर......

पण खरं सांगु...मज्जा नाय आला..........

या १०० पेक्षा... माझ्या आधीच्या धाग्याने मला समाधान दिले...... फक्त वीस प्रतिसाद होते...पण प्रतिसाद देणा-या प्रत्येकाने माझा लेख ब-यापैकी वाचला होता...आणि मला काय म्हणायचे आहे..हे त्यांना थोडेफार समजले होते असे वाटले...

इथे एक तर खफ झालाय्..नाहीतर्..दोन तीन वाक्ये वाचून लोक त्यावर भाष्य करताहेत......

अवलिया's picture

17 Sep 2010 - 7:35 pm | अवलिया

१००

अवलिया's picture

17 Sep 2010 - 7:36 pm | अवलिया

१००