बर्‍याच दिवसांनी तिचा फोन आला

स्वप्निल मन's picture
स्वप्निल मन in जे न देखे रवी...
13 Sep 2010 - 12:49 am

बर्‍याच दिवसांनी तिचा फोन आला
उचलताना माझा काळजाचा ठोकाच चुकला

"काय रे आजकाल फोन येत नाही तुझा
कुणी दुसरं भेटलं म्हणून विसरलास का मला?"

"तू असं म्हणावं याचं मला नवल वाटतं
तुझ्या मनात नेमकं काय आहे हेच कळत नाही.

फोन केला तर कधी स्पष्ट बोलत नाही
नाही केला तर म्हणते मी का तुला आवडत नाही?

ते सोड......
आज कसा फोन केला ते तर सांग."

"काही नाही रे......
जरा मन मोकळं करावसं वाटलं.
तुझ्याशिवाय दुसरं कोणी जवळचं नाही वाटलं

एक प्रश्न पडलाय.....
ज्याच्यावर प्रेम करते; त्याला कसं सांगू?
तू माझा खास मित्र ना?
मग तूच काहीतरी उपाय सुचव पाहू."

"मी काय सांगू?
माझीच व्यथा मी तुझ्या तोंडून ऐकतोय
तुझं आणि माझं घोडं एकाच ठिकाणी अडलंय."

"अरे तु काय बोलतोय मला काहीच कळत नाही आहे."

"हेच तर मी तुला पहील्यापासून सांगतोय
माझ्या बोलण्याचा अर्थ तुला कधीच नाही कळला
कळला असता तर मग असा प्रश्नच नसता पडला!!!!"

करुणप्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

मनि२७'s picture

13 Sep 2010 - 3:44 pm | मनि२७

आवडलि... :-)

जानम's picture

15 Sep 2010 - 1:17 am | जानम

छान ... आजुन येउ द्या.