तु येशील का ?

शितल's picture
शितल in जे न देखे रवी...
12 May 2008 - 12:32 pm

तु येशील का ?

तप्त या धरतीला
ओढ लागली पावसाची
धाडुन या वार्‍या स॑गे माती
पुसत असे ती मेघाला
आस मजला तुझ्या तृप्तीची
पुर्ण करया तु येशील का ?

मीलनातुनच तुझ्या अन माझ्या
सृष्टी ही बहरत असे
तुझ्याच मुळे मी दिसते सु॑दर
तुझ्याच मुळे मी हसते
करावयास ही इ॑द्रधन्युशी उधलण
सा॑ग सख्या तु येशील का ?

कधी सरी वर सरी
तर कधी पाठ दाखवुन पळी
नखरे तुझे हे जुने पुराणे
उमजत असले जरी मजला
खोड तुझी ही
सा॑ग मजला कधी सुटेल का ?
नाते आपले हे जन्मोजन्मीचे
निभावण्यास सा॑ग सख्या तु येशील का?
सा॑ग सख्या तु येशील का ?

वाङ्मयप्रतिभा

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

12 May 2008 - 1:53 pm | आनंदयात्री

धाडुन या वार्‍या स॑गे माती
पुसत असे ती मेघाला
आस मजला तुझ्या तृप्तीची

माती पाठवुन मेघाला पुसणे विशेष आवडले !

स्वाती राजेश's picture

12 May 2008 - 5:33 pm | स्वाती राजेश

शितल, छान लिहिली आहेस.
तप्त या धरतीला
ओढ लागली पावसाची
धाडुन या वार्‍या स॑गे माती
पुसत असे ती मेघाला
आस मजला तुझ्या तृप्तीची
पुर्ण करया तु येशील का
?
या ओळी खास आवडल्या.

प्राजु's picture

12 May 2008 - 8:40 pm | प्राजु

कविता आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

इनोबा म्हणे's picture

12 May 2008 - 6:59 pm | इनोबा म्हणे

लिहीली आहेस. पुढील कवितांना शुभेच्छा!

तप्त या धरतीला
ओढ लागली पावसाची
धाडुन या वार्‍या स॑गे माती
पुसत असे ती मेघाला
आस मजला तुझ्या तृप्तीची
पुर्ण करया तु येशील का ?

या ओळी विशेष आवडल्या.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 May 2008 - 9:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तप्त या धरतीला
ओढ लागली पावसाची
धाडुन या वार्‍या स॑गे माती
पुसत असे ती मेघाला
आस मजला तुझ्या तृप्तीची
पुर्ण करया तु येशील का ?

आणि आम्हालाही याच ओळी आवडल्या !!!

छोटा डॉन's picture

12 May 2008 - 11:26 pm | छोटा डॉन

कविता वाचायला व समजायला सोपी व छान वाटली ...
असेच लिहीत रहा ... आम्ही वाचत राहू

बाकी आम्हाला काव्य वा कवितेतले काहीही कळत नाही हे जगजाहीर आहे ...
त्यामुळे आम्हाला स्वताच्या मनाने ४ ओळी लिहणे या जन्मात तरी शक्य नाही ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मनस्वी's picture

13 May 2008 - 10:55 am | मनस्वी

कविता वाचायला व समजायला सोपी व छान वाटली ...
असेच लिहीत रहा ... आम्ही वाचत राहू

मन's picture

12 May 2008 - 8:27 pm | मन

ओघवती भाषा,
मनातले विचार आणी झकास कंटेंट.
सगळच छान.

आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)

वरदा's picture

12 May 2008 - 9:06 pm | वरदा

तु इतक्या छान कविता करतेस माहितच नव्हतं मस्त आहे
मीलनातुनच तुझ्या अन माझ्या
सृष्टी ही बहरत असे
तुझ्याच मुळे मी दिसते सु॑दर
तुझ्याच मुळे मी हसते
करावयास ही इ॑द्रधन्युशी उधलण
सा॑ग सख्या तु येशील का ?


खूप आवडलं...

चतुरंग's picture

12 May 2008 - 9:46 pm | चतुरंग

तप्त या धरतीला
ओढ लागली पावसाची
धाडुन या वार्‍या स॑गे माती
पुसत असे ती मेघाला
आस मजला तुझ्या तृप्तीची
पुर्ण करया तु येशील का ?

हे एकदम चित्रदर्शी झालंय!

चतुरंग

मदनबाण's picture

12 May 2008 - 10:24 pm | मदनबाण

तुझ्याच मुळे मी दिसते सु॑दर
तुझ्याच मुळे मी हसते
करावयास ही इ॑द्रधन्युशी उधलण
सा॑ग सख्या तु येशील का ?
मस्तच.....

(सप्तरंगांचा प्रेमी)
मदनबाण.....

शितल's picture

12 May 2008 - 11:20 pm | शितल

पहिल्या॑दाच कविता केली आहे.

तुमच्या शब्बाशकी मुळे छान वाटते. :D

सर्व वाचका॑चे आभार आणि प्रतिसादाला धन्यवाद !

सकेत's picture

13 May 2008 - 1:34 pm | सकेत

पहिली कविता.... आनि एवदी सुन्दर............
कस काय जमत बुवा...........
परतु खुप सुन्दर आहे कविता...........words also beautifully used....
keep it up....good job......

सन्केत.

ईश्वरी's picture

13 May 2008 - 12:16 am | ईश्वरी

सोपे शब्द , सहज मांड्णी..छान लिहीली आहे कविता.
मला उगाचच जड जड शब्द वापरुन लिहीलेली कविता आवडत नाही.

ईश्वरी

विसोबा खेचर's picture

13 May 2008 - 9:02 am | विसोबा खेचर

सहजसोपी आणि सुरेख कविता...!

तात्या.

प्रितम's picture

13 May 2008 - 10:26 am | प्रितम

खुप छान लिहिलिये कविता
मि पन तोच प्रश्न कर्तोय तिला
सखे तु येशिल का?

धमाल मुलगा's picture

13 May 2008 - 1:49 pm | धमाल मुलगा

शितल,
सहज सोपी सुटसुटीतशी कविता आवडली.
मुख्य म्हणजे मला गध्द्याला ती कळली!
येऊ दे अजुन :)

पु.ले.शु.