दूर देशातली जन्माष्टमी

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
5 Sep 2010 - 2:02 pm


चित्र क्र. १- दही हंडी कशी फोडायची याचा विचार-विनिमय सुरू आहे

चित्र क्र. २-पाया उभारणी

चित्र क्र.३-जवळ-जवळ मिळालीच हातात!

चित्र क्र. ४-फत्ते झाली!
आमच्या कॉलनीशेजारी जी कॉलनी आहे तिथे जवळ-जवळ १२० भारतीय कुटुंबे रहातात (आमच्या कॉलनीत ४०)! त्यातल्या तरुण आणि उत्साही मंडळींनी गेल्या वर्षीपासून दही-हंडीचा कार्यक्रम करण्याचा प्रघात पाडला आहे. शेजारच्या सर्व भारतीयांना निमंत्रण असते. त्यावेळची कांहीं क्षणचित्रे!

संस्कृतीविरंगुळा

प्रतिक्रिया

सहज's picture

5 Sep 2010 - 2:11 pm | सहज

त्या संकुलच्या व्यवस्थापन समितीने चक्क परवानगी दिली ही तर श्रीकृष्णाचीच कृपा म्हणली पाहीजे :-)

मस्त!

आमचीच majority असल्यावर न द्यायची काय बिशाद!
पण आमच्या संकुलात होळीसुद्धा अगदी रंगांसह खेळली जाते. दिवाळीत आतषबाजीही होते, गाणे बजावणेही होते. या संकुलात पाऊल टाकले कीं आपण परदेशी आहोत हे कळतसुद्धा नाहीं! जेवणा-खाण्याचा सुगंध भारतीय, घराघरातून ऐकू येणारे संगीतही भारतीय, कांहीं विचारू नका!

मिसळभोक्ता's picture

5 Sep 2010 - 11:35 pm | मिसळभोक्ता

सनीव्हेल कॅलिफोर्नियामधल्या फेअर ओक्स वेस्ट विशयी हा किस्सा सांगण्यात येतो. खरा की खोटा ते माहिती नाही.

एक अमेरिकन माणूस एक घर शोधूनशोधून थकलाय.
तेवढ्यात त्याला एक देशी आजी आजोबा पार्किंग लॉट मध्ये फिरताना दिसतात.
तो म्हणतो: "आय अ‍ॅम लूकिंग फॉर जॉन स्मिथ .."
देशी आजोबा: नो, नो फॉरिनर लिव्ह्ज हियर.

(हाच किस्सा मी लंडनमधल्या सॉथॉलविषयी ऐकलाय.)

चतुरंग's picture

6 Sep 2010 - 1:13 am | चतुरंग

हा मीही ऐकलाय आणि सनीव्हेल बद्दलच ऐकलाय! ;)

(स्वदेशी)चतुरंग

अरेच्या ! हा धिंगाणा* तिकडे पण चालु झाला का?

*धिंगाणा - वाचा

अगदी बरोबर! आजकाल "दुसर्‍याचा तो 'बाब्या' आणि आपले ते 'कार्टे'" असे म्हणून आपला निधर्मीपणा (कीं pseudo-secularism?) सिद्ध करण्याची चढाओढच लागली आहे!

विसोबा खेचर's picture

5 Sep 2010 - 2:47 pm | विसोबा खेचर

काळेसाहेब,

सर्व फोटो सुरेख..

तात्या.

नितिन थत्ते's picture

5 Sep 2010 - 4:38 pm | नितिन थत्ते

छान फोटो.

इंचा इंचाने इंडोनेशियात इस्लाम माघार घेत आहे. ;) (ह घ्या)

प्रदीप's picture

5 Sep 2010 - 7:23 pm | प्रदीप

ह. ह. पु. वा.

चतुरंग's picture

5 Sep 2010 - 4:45 pm | चतुरंग

काळे काका तुमच्या मंडळाचा उत्साह कौतुकास्पद आहे! :)

-रंगा

सुनील's picture

5 Sep 2010 - 4:50 pm | सुनील

फोटो सुरेख!

या संकुलात पाऊल टाकले कीं आपण परदेशी आहोत हे कळतसुद्धा नाहीं! जेवणा-खाण्याचा सुगंध भारतीय, घराघरातून ऐकू येणारे संगीतही भारतीय, कांहीं विचारू नका!
सिलिकॉन वॅली परिसरातदेखिल अशी अनेक संकुले आहेत जिथे पाऊल टाकताच फोडणीचा वास नाकात शिरलाच पाहिजे!

इंडोनेशिया हा खरा-खरा secular देश आहे, pseudo-secular नाहीं!
५-१० वर्षांपूर्वी मला वाटत असे की आपल्या देशातल्या सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना इथे आणून secularism या विषयावरचे एक वर्षाचे सक्तीचे प्रशिक्षण द्यायला हवं! पण हळू-हळू आपण त्यांचे अनुकरण करून सुधारण्याऐवजी आपल्याच नेत्यांचे अनुकरण इथले नेते करायला लागले आहेत हे आमच्यासारख्या २६ वर्षे इथे राहिल्याचा अनुभव असलेल्यांना चांगलेच जाणवते. येत्या कांहीं वर्षानंतर "secularism की ऐसी-तैसी"चा प्रयोग इथे लावावा लागला तर आश्चर्य वाटायला नको. पण सध्या इथली परिस्थिती फारच निधर्मी आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

6 Sep 2010 - 4:02 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त फोटु हो सुका :)

बाकी डॉल्बी वगैरे नाही म्हणजे काय मजा नाही बॉ.

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Sep 2010 - 4:06 pm | llपुण्याचे पेशवेll

मस्तंच हो सुका. छान वाटले.

काळे काका हे फोटो पाहुन छान वाटले... :)

विकास's picture

6 Sep 2010 - 8:49 pm | विकास

फोटो एकदम मस्तच! हंडी मधे काय ठेवले जाते?

वरील नितीन थत्त्यांचा मिष्कील प्रतिसाद पण एकदम चपखल आणि आवडला! :-)

आणि त्यावर काळेसाहेबांनी जे इंडोनेशियावर थोडक्यात भाष्य केले ते अधिक विस्ताराने ऐकायला आवडेल. (इंडोनेशिया - क्या से क्या हो गया! ह्या संदर्भात, भारताशी तुलना नको, कारण तसे आपण या संदर्भात न भुतो न भविष्यतीच आहोत!)

सुधीर काळे's picture

6 Sep 2010 - 9:42 pm | सुधीर काळे

इथला दही-हंडी हा कार्यक्रम एक सांस्कृतिक असल्यामुळे (non-commercial) त्या हंडीत कांहीं नाणीच असतात!
नितिनच्या प्रश्नाला मी जे उत्तर दिले ते स्वानुभवावरून दिले आहे. कदाचित् पुनरुल्लेख होत असेल पण नवरा मुस्लिम तर बायको हिंदू असे एक जोडपे व नवरा ख्रिश्चन तर बायको मुस्लिम असे दुसरे जोडपे माझ्या खूप चांगल्या माहितीची आहेत. त्यांच्या घरी ईद, ख्रिसमस व बैसाखीसारखे सण साजरे झालेले व त्यावेळी त्यांच्याकडे अल्पोपहाराला गेल्याचेही आठवते. त्या हिंदू बाईच्या घरी तर तिचे छोटेखानी देवघरही पाहिले आहे. असे कुठे पहायला मिळेल?
पण आज परिस्थिती बदलत आहे. माझ्या अनेक मुस्लिमेतर सहकार्‍यांकडून त्यांना होणार्‍या त्रासाची वर्णने ऐकायला मिळतात. जुन्या चर्चेसवर हल्ले होत आहेत तर नव्या बांधायला सरकार परवानगी देत नाहीं असेही चालले आहे. अहमदियांच्या धर्मस्थळांवर होणार्‍या हल्ल्यांच्या बातम्या राजरोसपणे वृत्तपत्रांत वाचायला मिळतात. FPI (Defender of Islam) नावाची संस्था तर थेट हल्ले करू लागली आहे व या सार्‍या प्रकारात या देशाचे राष्ट्राध्यक्ष गप्प बसून "अनुमतीच देत नाहीं आहेत ना?" असे इथल्याच लोकांना वाटते.
पण ही झाली रोजची observations. पण लेख लिहायचा तर त्याला अभ्यास पाहिजे. बघू कधी अशा अभ्यासाचा योग येतो का!
पण आम माणूस कडवा नाहीं. सध्या रमजानच्या महिन्यातही त्यांच्यासमोर कॉफी वगैरे प्याल्यास अजीबात भुवईसुद्धा वर जात नाहीं. एकाच खात्यात आजही उपास करणारे व जेवणारे एकत्र बसलेले दिसतात. ही मोठीच जमेची बाजू!
हा देश म्हणजे खरंच एक विस्मयजनक देश आहे. असाच राहू दे हीच इश्वराकडे प्रार्थना!

वेताळ's picture

6 Sep 2010 - 9:54 pm | वेताळ

हिंदू बाईच्या घरी तर तिचे छोटेखानी देवघरही पाहिले आहे
जोधा अकबर पिक्चर मध्ये अकबराच्या घरी देव्हारा बघितला आहे.

वेताळ-जी,
इतिहास नेहमी जेता लिहितो असे म्हटले जाते! त्यामुळे अकबर-जोधाबद्दल मी काय सांगणार?
पण मी जे लिहिले आहे ते वर्तमानकाळातील असून माझ्या आसपास घडणारे, मी पाहिलेले-अनुभवलेले, इंग्रजी वृत्तपत्रांत आलेले आणि माझ्या सहकार्‍यांकडून ऐकलेले आहे. ते जास्त सत्य असावे असे मला वाटते.