मी पुरुष बिच्चारा

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
6 Sep 2010 - 7:22 pm

समान संधी मध्ये आजच्या
मी पुरुष बिच्चारा
बस मध्ये चढलो, अन
रीकामी लेडिज सीट दिसली तरी
लोंबकळत तेथेच मी रहातो
वाटल्यास कंडक्टरला विच्चारा

ताटकळत लाईन मध्ये उभा रहातो
धक्का तीचा लागतो, पण
विनाकारण ' लाईनमन' होऊन
मार मला खावा लागतो
काय करणार मी पुरुष बिच्चारा

वाटत अस्स उठाव अन
निवडून याव आपण
नियम समान करावेत
स्त्री पुरुषांसाठीचे, पण
नेमके तेंव्हा तिथले सीट
स्त्री साठी राखीव असते
काय करणार मी पुरुष बिच्चारा

नियम समजावून घ्यावेत सगळे म्हणून
लॉ ला ऍडमीशन घ्यावी म्हंटले
फ़ॉर्म ही भरला, पण
नियमानेच गळा कापला
३० % लेडिज reserved म्हणून
आमचा नंबर waiting list ला गेला
काय करणार मी पुरुष बिच्चारा

तरी एकदा बघा सभेत
मी मलाच बिच्चारा म्हंटलो
तर पहातो काय
स्त्रीयांचा हंडा मोर्चा
अंगावर धावून आला
कारण काय म्हणे तर
अबले पणावर त्यांच्या
आम्ही घाला घातला

आता कसले काय
घरातला हंडा ही
सावधानतेने घेतो
नळाखाली हळूच लावून
लोकमत ची सखी
अन सकाळ ची मैत्रीण वाचत बसतो
काय करणार मी पुरुष बिच्चारा

-------- गणेशा

हास्यकविता

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

6 Sep 2010 - 8:39 pm | शिल्पा ब

तुम्ही युयुत्सुंचे चेले का हो? ;)

युयुत्सुं म्हणजे कोण ?