दुबई ला जाताय..जरा जपून

अशक्त's picture
अशक्त in जनातलं, मनातलं
3 Sep 2010 - 9:28 am

काल एक ढकलपत्रातून अस कळल की कोणाच्या तरि मित्राला खसखस बाळगल्या बद्दल दुबई मध्ये २० वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली.
लहानपणी आम्ही चार आण्याची खसखस...................फसफस...अस काहितरी गाण म्हणायचो. खसखस अनारश्यात खाल्ल्याचे आठवते. म्हणजे आता दिवाळी ला फराळ करुन प्रवास केला तर तुरुंगाची हवा खावी लागेल. ही बातमी बघा http://www.boddunan.com/forums/11-general-discussions/70531-a-very-very-...
थोड गुगल करुन पाहील, बातमी मध्ये तथ्य आहे असे वाटते. http://news.bbc.co.uk/2/hi/uk_news/7234786.stm . बहुतेक ढकलपत्र जुनं असाव. आत्ता पुन्हा फिरू लागल आहे.

खसखस ने जेट लॉग जातो हे नवीनच कळल. त्यापासून अफीम कशी बनवतात तेही पाहिल पाहिजे.

खरतर परदेशात प्रवास करताना कोणताही खाद्यपदार्थ बाळगु नये. देशी लोक कधी सुधारणार माहीत नाही. खसखस नाही खाल्ली तर काय फरक पडणार आहे काय माहित. हेच कडिपत्ता, ओवा, ई. ना लागु होत.

प्रवाससल्ला

प्रतिक्रिया

बातमीबद्दल धन्यवाद.
तसेही आम्ही हल्ली दुबईला जाणे टाळतो. कारण यायची वेळ झाली की आमचा एक मित्र माझे काम कर तुला दहा टक्के देईन असे म्हणुन सारखा मागे लागतो. त्याला नाही म्हणता येत नाही आणि त्याचे काम होत पण नाही. मग भारतात आल्यावर जीमेलला इन्व्हिजीबल रहावे लागते.

कुंदन's picture

3 Sep 2010 - 1:38 pm | कुंदन

रेसेशन मुळे व्याज दर कमी झालेत नान्या.....
दहा टक्के नाही , तीन टक्के आहे रेट हल्ली.

दहा टक्के वसुलीचा दर आहे.
चुकीचा प्रतिसाद दिलास तु !
आता २० टक्के दिलेस तरच वसुली करुन देऊ शकेल अन्यथा नाही.
धन्यवाद.

नितिन थत्ते's picture

3 Sep 2010 - 11:02 am | नितिन थत्ते

>>त्यापासून अफीम कशी बनवतात तेही पाहिल पाहिजे.

खसखस पेरल्यावर जे झाड उगवते तेच अफूचे झाड असे ऐकले होते.

परिकथेतील राजकुमार's picture

3 Sep 2010 - 1:43 pm | परिकथेतील राजकुमार

क्या बोल रै ले थत्ते चाचा ?

साला आजच खसखस पेरुन बघायला पाहिजे. पुढच्या हुक्कापार्टी पर्यंत पाने लागली की झाले ;)

वेताळ's picture

3 Sep 2010 - 7:11 pm | वेताळ

ही मादक द्रव्याचे काम करतात.ज्या बोंडात खसखस असते त्याचा चीक बहुधा अफिम साठी वापरतात.
लहान मुलांना झोप येत नसेल तर खसखसची बोंडे दुधात घालुन उकळतात व ते दुध बाळाला पाजतात.छान झोप लागते.

अशक्त's picture

3 Sep 2010 - 7:54 pm | अशक्त

मग तर एकदा ट्राय करुन पहायला पाहिजे

वाटाड्या...'s picture

4 Sep 2010 - 12:30 am | वाटाड्या...

आयला मला वाटलं की खसखस ही बारीक रव्यासारखी दिसते. आजच जरा जमीन शोधुन खसखस लावुन ठेवतो...जरा कोणीतरी खसखस झाडाचा फटु लावा रे..म्हंजे कळेल तरी कसं दिसतं ते....

(हुक्कासम्राट) - वा

वेताळ's picture

4 Sep 2010 - 10:52 am | वेताळ

लावण्या आधी माहिती घे. मला वाटते खसखस लावण्यासाठी सरकारी परवानगी आवश्यक आहे. कारण त्याच्या बोंडापासुन जो चीक निघतो तो जसा औषधी आहे तसा तो मॉरफिन बनवण्यासाठी वापरला जातो.दुबईत पकडल्या गेलेल्या व्यक्ती कडे बहुधा बोंडे सापडली असावीत.मॉर्फिन हे बंदी असलेले मादक द्रव्य असावे.
मी लहानपणी आमच्या शेजारच्या शेतात ह्याची रोपे बघितली होती.साधारण ५ फुट उंच झाड येते. खेड्यात खसखस काडुन त्याची बोंडे औषधी म्हणुन ठेवतात. अलीकडच्या काळात मी त्याची कुठे शेती बघितली नाही.तसेच त्या बोंडातील चिकापासुनच पुढे प्रोसेस करुन अफु बनवले जाते.