एक लहान मुल्गा आम्बा खाउन कोय रस्त्या वर फेकतो , तोच एक नास्तिक माणुस रस्त्या वरुन चालत येतो , त्या कोई वर सरपट्तो आणि डोके फुटुन मरण पावतो | दुस्र्या दिवशी पुन्हा तो मुलगा तसेच कोय रस्त्या वर फेकतो (असतात काही डाम्बिस पोरं, असो ) , मग एक
पुजारी तेथून निघतो , तोही रपट्तो आणी डोके आपट्तो , पण त्याला काहीच होत नाही ... का ?
- कारण जाको राखे सांईया मार सके ना कोय !
प्रतिक्रिया
9 May 2008 - 5:40 pm | आनंदयात्री
मुंगी चावलीच की आल्याआल्या !
(लाल आहे का काळी .. :/ )
:)
9 May 2008 - 5:53 pm | आनंदयात्री
आल्याआल्याच असा प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व ! तुमचा हिरमोड करण्याचा उद्देश नव्हता.
मिसळपाववर स्वागत तुमचे :)
9 May 2008 - 6:02 pm | मुन्गी
अरे हिरमोड कसले ?
ही (एक्चुअलि हा ) मुंगी रंगाने गौर पण स्वाभावाने काळी मुंगी आहे !
9 May 2008 - 6:08 pm | आनंदयात्री
आमची मुंगी देवाची म्हणायची तर !
9 May 2008 - 5:48 pm | ऋचा
: ) :(
9 May 2008 - 5:51 pm | मन
पुजारी आस्तिक आहे,
असं बेसिक ऍझम्पशन पकडायचं का?
:-)
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
9 May 2008 - 6:10 pm | मनस्वी
नाही.. पुजारीपण नास्तिकच असतो, पण त्याने स्पाईक्स घातलेले असतात म्हणून तो घसरत नाही.. असा त्याचा अर्थ होतो.
9 May 2008 - 6:14 pm | आनंदयात्री
=)) =)) =))
9 May 2008 - 6:15 pm | इनोबा म्हणे
हेल्मेटपण घातलेले असेलच की मनुताई :D म्हणून तर तो मेला नाही.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
9 May 2008 - 6:19 pm | मनस्वी
बरोब्बर!
9 May 2008 - 6:16 pm | अरुण मनोहर
म्हणून शहाणे लोक सांगतात "रस्त्यावर कचरा फेकू नका". केव्हा आपल्या लोकांना सद् बुद्धी येणार आहे कोण जाणे!
9 May 2008 - 6:21 pm | स्वयंभू (not verified)
कदाचीत देवापुढे डोके ठेउन ठेउन त्यचं डोकं कडक झालं असेल नी ते आपटल्यावर रस्ताच फुटला असेल.
कदाचीत ह्या वेळचा रस्ता मातीचा असेल. (तोच रस्ता असे कोड्यात लिहीलेले नाहिये)
कदाचीत तो पुजारी लग्न झालेला असेल नी त्याला रोज बायको पुढे डोके आपटायची सवय असेल.
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
9 May 2008 - 6:24 pm | मनस्वी
कदाचित् ते पडले तेव्हा शेजारच्या पाण्याच्या टँकात पडले.
कदाचित् ते पडले तेव्हा दसरा होता आणि ते झेंडूच्या ढीगावर पडले.
9 May 2008 - 6:31 pm | स्वयंभू (not verified)
कदाचीत त्यांना निवडणूकीत उभं रहून पडायची सवय असेल.
कदाचीत त्यांनी पडायचं नाटक केलं असेल.
कदाचीत डोक्यावर पडल्याने त्यांची स्म्रुती जाऊन ते मरायचं विसरले असतील.
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
9 May 2008 - 6:47 pm | मुन्गी
#o :))
9 May 2008 - 11:12 pm | देवदत्त
कदाचीत डोक्यावर पडल्याने त्यांची स्म्रुती जाऊन ते मरायचं विसरले असतील.
=)) =)) =))
9 May 2008 - 6:25 pm | इनोबा म्हणे
कदाचीत तो पुजारी लग्न झालेला असेल नी त्याला रोज बायको पुढे डोके आपटायची सवय असेल.
=))
भलताच डोके'बाज दिसतोय हा पुजारी ...
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
9 May 2008 - 8:54 pm | प्रभाकर पेठकर
अहो उत्तर दिले आहे की....
जाको राखे सांईया मार सके ना कोय
9 May 2008 - 9:09 pm | भ्रमर
तो पुजारी खरोखर देवाचा भक्त असेल व देव त्याला प्रसन्न असेल (पुजारी कसा होता हे लिहिलेले नाहीय. अपवाद असू शकतो.)
देव तारी त्याला कोण मारी.
(देवाभोवती भुणभुणणारा) भ्रमर
9 May 2008 - 9:14 pm | स्वयंभू (not verified)
रमेश देव तारी त्याला ब्रिटानीया मारी
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
10 May 2008 - 11:36 am | सत्या
जो खुप हसेल त्याला " मुन्गी" मारील.
10 May 2008 - 6:36 pm | विजुभाऊ
पहीली कोय रायवळ आम्ब्याची असेल. दुसरी कोय युपीच्या दशेरी अथवा लंगड्या चे असेल्.अबु आझमी ने आतला भाग ही खावुन त्याला पोकळ केले असेल