विरंगुळा

सहज's picture
सहज in जनातलं, मनातलं
4 Oct 2007 - 4:19 pm

सध्याच्या हॉट टॉपिक "स्त्री वादा"वर एका चर्चेत तिकडे पलीकडे रामायणातील एका प्रसंगात सीता, बिचार्‍या लक्ष्मणाला काहीतरी वाईट बोलली ("लंपट माणसा! राम मेला तर मी तुला मिळेन अशी अभिलाषा बाळगतोस"?) असा उल्लेख आला आहे. आता नेमके आठवत नाही पण एका लेखात (बहुदा 'अंतू बर्वा' मध्ये असावे ) पु.लं नी पण प्रतिकूल परिस्थितीत विनोदाचे कवच वापरून तोंड कसे द्यायचे हे दाखवले आहे.. इतके अपमानास्पद बोलणे ऐकायला लागले तर आपण विनोदाने ते माईल्ड कसे करू शकू ?माझ्या डोक्यात उठलेले हे विचार आणि त्यावर सूचलेले हे स्फूट..जरा दोन घटका करमणूक. ह.घ्या.

हे सर्व काल्पनिक आहे, कशाशी साम्य असल्यास निव्वळ योगायोग समजावा. खूपच कट्टर भक्त, धार्मिक (तसेच अती शुद्धलेखनप्रेमी) मंडळी असाल तर यापुढे स्वतःच्या जबाबदारीवर वाचा. भावना दुखावल्यास स्वतःशिवाय इतर कोणालाही जबाबदार धरू नका ही विनंती.

------------------------------

सीता (मनात):- आमचे हे (श्री.राम) काही शिकार करत नाहीत की काही करत नाहीत. नेहमी कुठले घरकाम असेल, अवघड, अवजड हमालकाम असेल तर मी लक्ष्मण भावजींनाच सांगते. बघा, नेमके मेलं ते सुवर्णमृग, भावजी आंघोळीला गेले असताना आलं अन हे म्हणाले ,"तुला सोनं पाहीजे? त्यात काय मी लगेच आणतो".
जाताना बाथरूम समोर उभा राहून भाऊजींना म्हणाले ** की मी येईपर्यंत जाऊ नको.
ह्यांच्या चपलेचा अंगठा तुटला होता. मी म्हणाले, "अहो पडाल, लागेल. भावजी जातील नंतर".
पण ऐकतील तर ना. आता पडल्यावर बोंबलायला लागले. जिथे तिथे भाऊ लागतो. किती वेळ त्यांच ओरडणे ऐकले मी. तरी भावजी अजून हलले नाहीत. भावजींच सगळे इतके हळूहळू चालले असते ना!

**(राम खरे तर हे म्हणाला :- लक्ष्मणा तुझ्या वहीनीच्या खरेदीच्या हव्यासापासून माझे रक्षण कर. तुझी वहिनी कूठेतरी सेल लागलाय तिकडे जाईल, तिला एकटी सोडू नको, क्रेडिट कार्ड मॅक्स ऑउट झालाय. कळल तर ती तणतणेल. रेपोवाले माझ्या मागे लागतील. मला माळ्यावरून अजून तिच्यापण जुन्या चपला काढायच्या आहेत, ते काढ मग दोघे ए़कदम बाजारात जाऊ. )

(लक्ष्मण मनात म्हणतो: एक काम संपलं की लगेच हे दोघं दुसरं सांगतात. आजची सगळी कामं संपवली . जरा डोक्यावरून न्हाऊन केस सेट करीन म्हणलो तर तिकडे धडपडले. परवा मी सगळे सामान आणाताना पडलो, दोघांच लक्ष पण नव्हते. लेप लावणे सोडाच, वर मलाच म्हणाले की उद्या साठी आधी हळद, मग चंदनाची उटी करून ठेव आणि मगच झोप . )

लक्ष्मण (उघडपणे): - अहो वहिनी, दादा येतील हो. ते मला म्हणालेत काही झाले तरी तिचे रक्षण कर. तेव्हा मला थांबले पाहीजे. (स्वगतः अर्धेच सेट झाले आहेत केस. असाच गेलो तर एका बाजूचे बसलेले तर दुसर्‍या बाजूचे उभे रहातील. माझी इतकी का 'काढत' असतात दोघे? काय दया माया आहे की नाही?)

राम(स्वगत) :- च्यायला, हे मृग मायावी हाये की ! पण जाऊ दे, खर्‍या सोन्याचं आहे हे नशीब. हे विकून जरा तरी बिल भरता येईल. बाकी माझ्या आवाजात मिमिक्री मस्त केली. असा आवाज आहे होय माझा! असो. मी ठीक आहे हे नको सांगायला. बघू पत्नीचे किती प्रेम आहे, येतीय का धावत? काय माहीत! लक्ष्मणालाच धाडेल बहूतेक. जाऊ दे,तो आला तर बरंच आहे म्हणा. हे मृग ऊचलून नेईल. मी टेकतो जरा इथे झाडाखाली.

सीता (मनात):- च्यायला जातंच नाहीये. आज शेवटचा दिवस आहे सेलचा. लवकर जाऊन येईन म्हणते. कसं बर घालवावं ह्याला? )
सीता(उघडपणे):- लंपट माणसा! राम मेला तर मी तुला मिळेन अशी अभिलाषा बाळगतोस? तूझा धिक्कार असो!

लक्ष्मण (मनात) :- बोंबला! खरंच की! दादाला जर का खरंच काही झालं तर ही आपल्या गळ्यात! मेलो ,मेलो. एकतर माझा टाईम खराब आहे अस परवाच माझ हस्ताक्षर पाहून तो फटकळ ऋषी म्हणाला होता. हे राम मै आ रहा हू. तुझ काही बरवाईट नको व्हायला.

तिकडे रावण भावाचे प्रेम दाखवायला निघाला होता. रथातून पत्ता शोधत शोधत हैराण झाला होत. नशीब ! नवीन स्पोर्ट-रथ चांगला होता. पण सारखं प्रत्येक झोपडी पूढे जाऊन "ओम भवती भिक्षां देही काय"???
त्या खाणाखूणा , झोपडी, ती बाई काही सापडत नाही. अजून एक प्लॅस्टीक सर्जरी बाकी आहे म्हणून शूर्पणखा काही आली नाही बरोबर. इथे एक दिसतीय झोपडी बघू , खरच की ! तीच ती बाई.

सीता (मनात) :- बघा ! देवाला देखील वाटतं, मी सेल मिस करू नये. ह्या याचकाकडे गाडी आहे लिफ्ट मागता येईल.

सीता(उघडपणे):- अहो महाराज !या !या! थांबा हं! जरा शिधा आणते. पण कृपया मला जरा इथेच पूढे सोडाल का तुमच्या रथातून?

रावण (मनात): - धीस इज सो इझी.

------------------------------------------------------------------
एकदम काल्पनीक कथा. काहीही / कशाशीही सार्धम्य वाटले तर निव्वळ योगायोग समजावा.

प्रमोदकाकांचे मन:पूर्वक आभार

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

विकास's picture

4 Oct 2007 - 4:31 pm | विकास

सहजराव विरंगुळा आवडला. यावरून (साधर्म्य नाही) "राम तुझी सीता माऊली" हा (मला आठवते त्या प्रमाणे) मच्छींद्र कांबळींचाच वग आठवला. मस्त होता तो. त्याचे शिर्षक गीत राम तेरी गंगा मैलीच्या चालीवर होते: "राम तुझी सीता माऊली चोरली, पापी रावणाने गोची केली..."!

त्याची कथा पण "इनोव्हेटीव्ह" होती!

प्रमोद देव's picture

4 Oct 2007 - 4:53 pm | प्रमोद देव

पुन्हा एकदा लेखाचे संपादन करणे जरुरीचे आहे असे वाटते. त्याच्यावर योग्य संस्कार झाले तर ह्या लेखातला आशय नेमकेपणाने पोचण्यात 'सहजता' येईल.
राम-सीता-लक्ष्मण-रावण ह्यांचे हे आधुनिक रुप आवडले.

जुना अभिजित's picture

4 Oct 2007 - 5:44 pm | जुना अभिजित

काही संवाद सही आहेत. मजा येते पण एकसंध वाटत नाही.

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Oct 2007 - 6:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विनोदी अभिनयातून ब-याचदा रामायण आणि महाभारतातील असे विविध प्रसंग पाहावयास मिळतात तरिही आज आपण एक चांगला प्रयत्न केला आहे. अशा लेखनातून काहीतरी विचार श्रोत्यांपर्यंत पोहचवता आला पाहिजे असे वाटते. आपल्याला आधूनिक काळातील एक विषय प्रसंग घेऊन रामायणाचा आधार घेत हाच प्रसंग अधिक रंगवताही आला असता, मात्र जो प्रसंग आणि संवाद रंगवला आहे तोही उत्तम रंगला आहे यात काही शंका नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
( विनोदी संवादलेखनाचे कडक मास्तर )

राजे's picture

4 Oct 2007 - 7:37 pm | राजे (not verified)

हा हा....

"बोंबला! खरंच की! दादाला जर का खरंच काही झालं तर ही आपल्या गळ्यात! "
हे मात्र जबरदस्तच वाक्य वरील सीन मधील.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

अण्णा हजारे's picture

4 Oct 2007 - 10:58 pm | अण्णा हजारे

सहजराव,
आधुनिक रामायण लिहूनच टाका..पूढील भागाच्या प्रतीक्षेत!!!

आपला,

राळेगणचा अण्णा.

गुंडोपंत's picture

5 Oct 2007 - 2:53 am | गुंडोपंत

जियो!!!

वा सहज राव! काय मस्त लिहिलेत! मजा आ गया!
पण आता फक्त सुरुवातच झाली आहे. आम्हाला संपुर्ण रामायण हवे!

आपले वेगळे रामायण भावले...
असेही त्या संशोधन, इतिहास आणी संस्कृतवाल्यांनी मिसळपावाची पार वाट लावली आहे! प्रतिसाद द्यायचाही कंटाळा यायला लागला हो!
अगदी अपचनच म्हणाना.... नुस्ता वास सुटलाय इकडे तिकडॅ!

त्यापेक्षा तुमचा हा लेख म्हणजे एक सुखद झुळूक आहे!

"लिखाणाला मिसळीचा सुवास आहे
रामायणाचा हा कट्टा खास आहे."

तेंव्हा, येवू द्या....

आपला
गुंडोपंत

नंदन's picture

5 Oct 2007 - 3:25 am | नंदन

गुंडोपंतांशी सहमत. अजून असेच लेख येऊदेत.

बाय द वे - एकतर माझा टाईम खराब आहे अस परवाच माझ हस्ताक्षर पाहून तो फटकळ ऋषी म्हणाला होता., हे कोण बुवा? :)

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

आजानुकर्ण's picture

26 Dec 2008 - 7:56 am | आजानुकर्ण

सहमत आहे.

'आम्ही पाचपुते' (गडकरी रंगायतनमधील स्फोट) किंवा 'यदाकदाचित' प्रमाणे आता अशा खेळकर लेखनावरही सनातनवाल्यांची वक्रदृष्टी गेली नाही म्हणजे मिळवली. नाहीतर भावना दुखावल्या म्हणून बोंबाबोंब करतील.

आपला
(हसरा) आजानुकर्ण

कोलबेर's picture

5 Oct 2007 - 7:36 am | कोलबेर

सहजराव ते सुवर्ण मॄग वगैरे काही नव्हते.. सितेला नेटवर 'विन ५०० डॉलर मेसिज कार्ड' अशी ऑफर दिसली होती.. संगणक आणि नेटचे फारसे ज्ञान नसल्यामुळे तिने सरळ मिसळपावरील राज साहेबांच्या मोफत दुकानात न जाता बिचार्‍या रामाला ह्या कामाला लावले आणि शेवटी पन्नास एक सर्व्हे भरल्यावर रामाच्या लक्षात आले," च्यायला, ही मृगरूपी ऑफर मायावी हाये की ! !!"

काय म्हणता?? :-)

- कोलबेर

लिखाळ's picture

5 Oct 2007 - 3:20 pm | लिखाळ

वा ! सहजराव,
आपण मस्तच विडंबन केलेत. लक्षमणाचे संवाद तर फार मजेदार. अजून लिहा मजा येईल :)
--लिखाळ.
तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

विसोबा खेचर's picture

7 Oct 2007 - 3:21 pm | विसोबा खेचर

सहजराव,

तुमचं रामायण आवडलं. छान आहे, हलकंफुलकं आहे. संवाद आणि स्वगतंही मस्तच...

औरभी लिख्खो..

आता तुम्हाला राम, लक्ष्मण, सीता वनवासाला निघण्यापूर्वीची एक कथा सांगतो..

राम आणि सीता, या दोघांनाच वनवासात जाताना पाहून लक्ष्मणही वनवासात येण्याकरता रामाकडे हट्ट धरतो. राम मनातल्या मनात म्हणतो, 'आला तिच्यायला कबाब मे हड्डी! आता जरा निवांतपणे सीतेसोबत वनवासातला एकांत एन्जॉय करीन तर ते नाही!' :)

पण वर वर मात्र लक्ष्मणाला म्हणतो, "अरे तू कशाला उगाच येतो आहेस आमच्यासोबत त्या वनवासात? तुला उगाच का त्रास?"

तेवढ्यात सीतामाई हळूच रामाला जरा बाजूला बोलावते आणि त्याच्या कानात कुजबुजते. "अहो एवढा येतो म्हणतो आहे तर येऊ दे की त्याला पण! तेवढाच जरा सोडाबिडा आणायला, चाखना आणायला आणि मला मच्छी साफ करून द्यायला उपयोगी पडेल!' :))

तात्या.

बापु देवकर's picture

25 Dec 2008 - 8:39 pm | बापु देवकर

सहजराव,
तुमचे रामायण मस्तच आहे...

तात्या,
तुमच्याही " मालवणी रामायणाची " झलक आवडली...

अजून येवू देत...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Dec 2008 - 7:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हाहाहा ... सहजराव, हे भारीच! यापुढचे आणि/किंवा आधीचे भाग लिहिलेत का नाहीत?

मदनबाण's picture

25 Dec 2008 - 7:57 pm | मदनबाण

अजून एक प्लॅस्टीक सर्जरी बाकी आहे म्हणून शूर्पणखा काही आली नाही बरोबर. इथे एक दिसतीय झोपडी बघू , खरच की ! तीच ती बाई.
=))
( कॉलिंग जटायु ऑन हेल्प लाईन) :D
मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

विनायक पाचलग's picture

25 Dec 2008 - 8:10 pm | विनायक पाचलग

छान लिहिलाय
अगदी योग्य
असेच लिखाण पुढे येत जावु दे
आणि हो मर्यादेतले लिखाण आहे असावे ते एकदम भारी ठरेल

टारझन's picture

15 May 2010 - 9:10 pm | टारझन

>>आणि हो मर्यादेतले लिखाण आहे असावे ते एकदम भारी ठरेल
"आणि हो" काळजाला भिडलेच .. पण प्रतिसादातली विरामचिन्हे अफलातुन आहेत.

अवांतर : च्यायला हा लेख आधी वाचला असता तर आम्ही आमच्या लेखात अजुन हात मोकळे सोडुन लिहीलं असतं ..

- भयानक पादलग

अवलिया's picture

25 Dec 2008 - 8:56 pm | अवलिया

राम राम राम

अरे काय चाल्लेय काय?
अधर्म हो अधर्म
कलियुगी राम राहिला नाही

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Dec 2008 - 9:43 pm | बिपिन कार्यकर्ते

हे राम!!!!

मस्तच लिहिलं आहे!!!

बिपिन कार्यकर्ते

प्राजु's picture

26 Dec 2008 - 3:54 am | प्राजु

वेगळा प्रयोग आवडला.
त्या यदाकदाचित नाटकातल्या आधुनिक महाभारताची आठवण झाली.
नाय नो नेव्हर... :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनिल हटेला's picture

26 Dec 2008 - 7:49 am | अनिल हटेला

आधुनीक रामायण आवडले..
अजुनही बरेच लिहीता येइल....

रावण (मनात): - धीस इज सो इझी.
:-D

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

विनायक प्रभू's picture

26 Dec 2008 - 5:26 pm | विनायक प्रभू

वंडरफूल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 May 2010 - 9:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान. आवडले लेखन. पूर्वी प्रतिसाद लिहिलाच होता. आज पुन्हा आपले लेखन वाचून आनंद झाला. तेवढे अजून लेखनाचे मनावर घ्या....!

धागा वर आणल्याबद्दल धन्यू.....! :)

-दिलीप बिरुटे
[सहजचा मित्र]

शुचि's picture

16 May 2010 - 12:58 am | शुचि

आई शप्पत!!!! ह ह पु वा

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

दत्ता काळे's picture

16 May 2010 - 4:44 pm | दत्ता काळे

रामायण प्रसंग आवडला.

अस्मी's picture

17 May 2010 - 12:29 pm | अस्मी

मस्त लिहिलंय...:) मज्जा आली

अजून एक प्लॅस्टीक सर्जरी बाकी आहे म्हणून शूर्पणखा काही आली नाही बरोबर

=)) =))

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

- अस्मिता

गणपा's picture

17 May 2010 - 3:59 pm | गणपा

=)) =)) =))
सहजराव धन्स.
जबरा कल्पना विलास आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

17 May 2010 - 4:13 pm | परिकथेतील राजकुमार

=)) =))

हा हा हा मस्त हो सहजराव.

हे वाचुन एक जुना पुराणा जोक आठवला :=

भिक्षा वाढायला आलेल्या स्त्रीचा हात धरुन रावण म्हणतो "हा हा हा मी याचक नाही रावण आहे !"

स्त्री :- ही ही ही मी पण सीता नाही कामवाली आहे !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

नाना चेंगट's picture

20 Jun 2012 - 1:13 pm | नाना चेंगट

हा लेख आमच्या अनेक आवडत्या लेखांपैकी एक आहे. :)

हे जुने जाणते हल्ली ईतके महाग का झालेत तेच कळत नाही. ;)

नाना चेंगट's picture

20 Jun 2012 - 1:26 pm | नाना चेंगट

त्यांचे जुने जाणते सोबती नसल्याने ते मुके मुके झाले असावेत.

काही जाणकारांच्या मते जुन्यांपैकी काही जणांनी वर्तमानपत्रात आणि मासिकात रतीब सुरु केला आहे त्यामुळे तिकडच्या
पावलीची सवय लागली आहे ;)

नान्या तुझं काँट्रॅक्ट रिन्यु नाही झालं का रे? ;)

नाना चेंगट's picture

20 Jun 2012 - 1:30 pm | नाना चेंगट

हा हा हा

आप्ल्याला कोण विचारणार बाबा तिथे? इथे कुणी विचारत नाही तर तिथे काय पत्रास?

चेंगट या आभासी व्यक्तिमत्वाचे खरेच आभार उत्खननाबद्दल.