पण या अजूनही उभ्या असलेल्या अन नसलेल्याही झाडांच्या, बागांच्या आठवणी मात्र अगदी आवर्जून मी मनाशी जपल्या आहेत, जपणार आहे. त्यादिवशी अचानक सगळं प्रकर्षानं आठवलं, लिहावसं वाटलं म्हणून लिहिलं.
वा! अतिशय सुरेख लेखन. वाचून मनाने एकदम कोकणातच गेलो!
यशोधराजी, अजूनही असेच उत्तमोत्तम लेखन, आठवणी येऊ द्या...
सुरेख लेख यशोधरा..
तुमच्या 'वृक्षवेलींच्या आठवणी' फार आवडल्या.बकुळफुलं तर मला नॉस्टेल्जिक करून गेली. बकुळीचा मोठ्ठा वृक्ष आमच्या अंगणात होता.त्या फुलांचा मंद दरवळ पसरत असे.भरपूर फुलं वेचून सरांवर सर गुंफून माळायचे ते आठवून तो सुगंध आत्ता इथे दरवळला असं वाटलं,
स्वाती
खोल विहिरीत डोकावून आपल्याच आवाजाचा प्रतिध्वनी ऐकणं, झाडांखालून फिरणं, फुलं गोळा करणं हे सगळे लहानपणचे उद्योग, मनातल्या मनातच करते!! नुसत्या आठवणींनी देखील मनाला उभारी मिळते.
किती सहज लिहिल्यासारखं वाटतंय...कोणाच्या तरी मनात उतरुन त्याच्या आठवणींचे पडदे बाजूला सारुन मनात जिवापाड सांभळलेलं एखादं नाजुकसं चित्र पाहिल्यासारखं वाटलं
पाऊस संपल्यावर धुतली गेलेली झाडं किती सुंदर दिसायची!!
खरंय...
मलाही आवडतो...ऐन दुपारी पडलेल्या पावसात मनसोक्त भिजलेला गुलमोहोर,पावसानंतरच्या कोवळ्या उन्हात न्हाऊन निघालेला...छान चमकत, झळाळत असतो...
काय नातं आहे त्याचं आणि माझं कोण जाणे...पण कितीही मूड खराब असेल आणि पावसात भिजलेला गुलमोहोर उन्हात चमकताना दिसला की एकदम प्रसन्न वाटतं :)
आत्तापर्यंत अनेक वेळा असा हळहळलो आहे मी.
फर्गसन रस्त्यावरील वटवृक्षांची कत्तल झाल्यावर बोडका झालेला फर्गसन रस्ता बघून अजूनही कसनुसे होते.
आपल्या लेखाने सुंदर हिरवाईच्या स्मृती जाग्या केल्या..
पुण्याचे पेशवे
कसल्याशा हतबलतेचे बळी होऊन तोडल्या गेलेल्या त्या अनाम वृक्षांबद्दल खूप आत कुठेतरी काहीतरी तुटलं.
आणि त्याच वेळी बकुळ, प्राजक्त आणि चाफ्याच्या फुलांसारखाच झडझडून पडलेला हा आठवणींचा शिडकावा मन अंतर्बाह्य प्रसन्नही करुन गेला!
चतुरंग
सुंदर लेखन 6 May 2008 - 9:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कसल्याशा हतबलतेचे बळी होऊन तोडल्या गेलेल्या त्या अनाम वृक्षांबद्दल खूप आत कुठेतरी काहीतरी तुटलं.
आणि त्याच वेळी बकुळ, प्राजक्त आणि चाफ्याच्या फुलांसारखाच झडझडून पडलेला हा आठवणींचा शिडकावा मन अंतर्बाह्य प्रसन्नही करुन गेला!
धमु, गुलमोहराबाबत अगदी डिट्टो!! :) आमच्या घरासमोरच आणि अवती भवतीच्या परिसरातही आहेत गुलमोहर नशिबाने आमच्या :) तसच नवी पालवी फुटलेला पिंपळ पाहिलाय का संध्याकाळच्या किंवा सकाळच्या कोवळ्या उन्हांत? निव्वळ सोनेरी दिसतो!
>>> फर्गसन रस्त्यावरील वटवृक्षांची कत्तल झाल्यावर बोडका झालेला फर्गसन रस्ता बघून अजूनही कसनुसे होते.
अगदी, अगदी :( तसेच ते संचेती हॉस्पिटलच्या तिथले, ठुबे पार्कच्या जवळचे वडाचे वृक्ष तोडून टाकले, कसा भकास रस्ता वाटतो आता......
असो. मंडळी, ही साईट तशी उशीराच पाहिली, खूप आवडली म्हणून सदस्यत्व घेतलं, आणि लिहिलेल्या पहिल्याच लेखाचं अस कौतिक केलत त्याबद्दल खरच खूप छान वाटल!! धन्यवाद परत एकदा. :)
धमु (धमाल मुलगा एवढं लांबलचक नाव लिहायचा कंटाळा, म्हणून)
हरकत इल्ले....धमु हे नाव आमचे गुरुदेव श्री प्रमोद्रोणाचार्य ह्यांनी दिलं...तो हक्क खरं तर त्यांचा :)
त्याशिवाय आमची इतर नावं (आणि आवडतीही) धमाल्या, धम्या, (आनंदयात्रीच्या भाषेत - करकोच्या! ) आपल्याला प्रेमाने कोणत्याही नावानं हाक मारलेलं आवडतं...भगवान विष्णूंनंतर बहुधा आमचाच नंबर...एक मित्र डायरेक्ट 'कन्हय्या' अशी हाक मारतो..आणि आम्हीही गोपींच्या मदतीला धावल्यासारखे ओ देऊन जातो :)
नवी पालवी फुटलेला पिंपळ पाहिलाय का संध्याकाळच्या किंवा सकाळच्या कोवळ्या उन्हांत? निव्वळ सोनेरी दिसतो!
कर्वेरोडवरपण.
वाड्यांमध्येही भरपूर असायची. बिल्डिंग बांधताना सगळी पाडतात.
रस्ता रुंदीकरणात तर हमखास पाडली जातात आणि रस्ता आहे त्याच्या दुप्पट वाढवतात. मग मला एक प्रश्ण पडतो की आहे ती झाडे डिव्हाडर म्हणून येतील असे पाहून ती न पाडताच का नाही रुंदीकरण करत.
खूपच मस्त झालाय लेख! आमच्या कॉलनीतली झाडं आठवली.. गुलमोहोर्,कॅशिया तर माझी खूप आवडती झाडं!!
इथे सुद्धा आसपास इतकी सुंदर झाडं असतात, फुलं तर एक से बढकर एक.. पण नावंच माहीत नाहीत.. :| फोटो काढणार आहे १-२ दिवसात.. इथे टाकीन मग.. सुंदर फुलं पाहून काय छान वाटतं नं !
अजून लिही! तू छान लिहीतेस...
यशोधराजी,
एकदम बकुळीच्या फुलांसारखं नाजूक आणि सुंदर लिहिलंय तुम्ही!
विशेषतः तुमच्या आजोळ्-पणजोळचं वर्णन वाचून आम्हांला आमचं आजोळ आठवलं!! एकदम डिट्टो, काही फरक नाही, असलाच तर इतकाच की आमच्या लहानपणी तिथे वीज नव्हती...
मात्र, आ़जोळी आता कोणीच नसतं, वाचून काळजाला घरं पडतात हो!! आमच्याकडेही तेच!
असं का व्हावं !!! तिथल्या माणसांनी ते सोडण्यात जगण्याची धडपड असेल पण बाहेरच्या माणसांनी (त्यात आपले आईबापही आलेच) असं का होऊ द्यावं? बाहेरच्या जगाने ओरखडल्यानंतर तोंड खुपसून रडायलाही शेवटी एक आपली हक्काची जागा लागते ना!! =((
असो. सुंदर लेख!
अश्याच लिहीत रहा!!!
-पिवळा डांबिस
शैलेंद्र, तेच तर ना.... नव्या नव्या इमारती उभारण्याचय नादात पर्यावरणाकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे... :(
मनस्वी, झाडं त्याच्या मुळांसकट अलग करून दुसरीकडे परत रुजवत येतात, त्याचेही शास्र विकसित झालेय, पण मग खाबूगिरी कशी जमेल?? त्यामुळे ते तसलं काही होताना दिसत नाही....
प्रतिक्रिया
5 May 2008 - 12:05 pm | विसोबा खेचर
पण या अजूनही उभ्या असलेल्या अन नसलेल्याही झाडांच्या, बागांच्या आठवणी मात्र अगदी आवर्जून मी मनाशी जपल्या आहेत, जपणार आहे. त्यादिवशी अचानक सगळं प्रकर्षानं आठवलं, लिहावसं वाटलं म्हणून लिहिलं.
वा! अतिशय सुरेख लेखन. वाचून मनाने एकदम कोकणातच गेलो!
यशोधराजी, अजूनही असेच उत्तमोत्तम लेखन, आठवणी येऊ द्या...
आपला,
(वृक्षवल्लींचा प्रेमी) तात्या.
5 May 2008 - 12:06 pm | आनंदयात्री
>>पाऊस संपल्यावर धुतली गेलेली झाडं किती सुंदर दिसायची!!
खरय !
>>मधूनच शांतता भेदणारी कोण्या पक्ष्याची सुरेल साद,
हो मग लगेच पटकन मान वळवुन त्या दिशेला पहायचं, अन त्याच नादात कितीतरी वेळ फांद्यामधे त्याला शोधत रहायचे.
>>कालांतराने स्वतःच्या आयुष्यात गढून गेल्यावर ह्या आठवणींच दु:खही पुसट होत गेलं....
छान ओळ.
अतिशय सुंदर सशक्त लिखाण यशोधरा, खुप आवडले.
5 May 2008 - 12:20 pm | स्वाती दिनेश
सुरेख लेख यशोधरा..
तुमच्या 'वृक्षवेलींच्या आठवणी' फार आवडल्या.बकुळफुलं तर मला नॉस्टेल्जिक करून गेली. बकुळीचा मोठ्ठा वृक्ष आमच्या अंगणात होता.त्या फुलांचा मंद दरवळ पसरत असे.भरपूर फुलं वेचून सरांवर सर गुंफून माळायचे ते आठवून तो सुगंध आत्ता इथे दरवळला असं वाटलं,
स्वाती
5 May 2008 - 2:00 pm | प्रभाकर पेठकर
संवेदनशील मनातून, उत्कटतेने शब्द, मिपावर, धबधब्याप्रमाणे कोसळले आणि कोवळ्या उन्हात एक नयनरम्य इंद्रधनुष्य साकारले - वृक्ष वेलींच्या आठवणी.
5 May 2008 - 2:09 pm | प्रमोद देव
माझ्याही आठवणी दाटून आल्या. बकुळ संबंधीची माझी आठवण इथे वाचा.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
6 May 2008 - 4:08 am | चित्रा
खोल विहिरीत डोकावून आपल्याच आवाजाचा प्रतिध्वनी ऐकणं, झाडांखालून फिरणं, फुलं गोळा करणं हे सगळे लहानपणचे उद्योग, मनातल्या मनातच करते!! नुसत्या आठवणींनी देखील मनाला उभारी मिळते.
असेच. उत्तम लेखन.
5 May 2008 - 2:30 pm | मदनबाण
यशोधराजी खुपच सुंदर लिहता तुम्ही.....
(आमराईचा आनंद घेणारा)
मदनबाण.....
5 May 2008 - 4:35 pm | यशोधरा
तात्या, आनंदयात्री, स्वाती, प्रभाकर, प्रमोदकाका, मदनबाण तुम्हां सार्यांचे खूप आभार.
5 May 2008 - 5:32 pm | धमाल मुलगा
छान!
किती सहज लिहिल्यासारखं वाटतंय...कोणाच्या तरी मनात उतरुन त्याच्या आठवणींचे पडदे बाजूला सारुन मनात जिवापाड सांभळलेलं एखादं नाजुकसं चित्र पाहिल्यासारखं वाटलं
खरंय...
मलाही आवडतो...ऐन दुपारी पडलेल्या पावसात मनसोक्त भिजलेला गुलमोहोर,पावसानंतरच्या कोवळ्या उन्हात न्हाऊन निघालेला...छान चमकत, झळाळत असतो...
काय नातं आहे त्याचं आणि माझं कोण जाणे...पण कितीही मूड खराब असेल आणि पावसात भिजलेला गुलमोहोर उन्हात चमकताना दिसला की एकदम प्रसन्न वाटतं :)
यशोधराताई, और भी लिख्खो...
5 May 2008 - 9:56 pm | llपुण्याचे पेशवेll
आत्तापर्यंत अनेक वेळा असा हळहळलो आहे मी.
फर्गसन रस्त्यावरील वटवृक्षांची कत्तल झाल्यावर बोडका झालेला फर्गसन रस्ता बघून अजूनही कसनुसे होते.
आपल्या लेखाने सुंदर हिरवाईच्या स्मृती जाग्या केल्या..
पुण्याचे पेशवे
6 May 2008 - 1:10 am | संदीप चित्रे
हाय यशोधरा ...
आज परत एकदा लेख वाचला :)
6 May 2008 - 2:04 am | चतुरंग
कसल्याशा हतबलतेचे बळी होऊन तोडल्या गेलेल्या त्या अनाम वृक्षांबद्दल खूप आत कुठेतरी काहीतरी तुटलं.
आणि त्याच वेळी बकुळ, प्राजक्त आणि चाफ्याच्या फुलांसारखाच झडझडून पडलेला हा आठवणींचा शिडकावा मन अंतर्बाह्य प्रसन्नही करुन गेला!
चतुरंग
6 May 2008 - 9:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कसल्याशा हतबलतेचे बळी होऊन तोडल्या गेलेल्या त्या अनाम वृक्षांबद्दल खूप आत कुठेतरी काहीतरी तुटलं.
आणि त्याच वेळी बकुळ, प्राजक्त आणि चाफ्याच्या फुलांसारखाच झडझडून पडलेला हा आठवणींचा शिडकावा मन अंतर्बाह्य प्रसन्नही करुन गेला!
असेच म्हणतो !!!
7 May 2008 - 12:39 am | यशोधरा
चित्रा, धमु (धमाल मुलगा एवढं लांबलचक नाव लिहायचा कंटाळा, म्हणून) :D, पेशवे सरकार, चतुरंग, डॉक्टरसाहेब, संदीप धन्यवाद.
अरे संदीप, तूही आहेस का इथे? :) मस्तच आख्यान लावलंस!! मागेच सांगितलं तुला!!!
धमु, गुलमोहराबाबत अगदी डिट्टो!! :) आमच्या घरासमोरच आणि अवती भवतीच्या परिसरातही आहेत गुलमोहर नशिबाने आमच्या :) तसच नवी पालवी फुटलेला पिंपळ पाहिलाय का संध्याकाळच्या किंवा सकाळच्या कोवळ्या उन्हांत? निव्वळ सोनेरी दिसतो!
>>> फर्गसन रस्त्यावरील वटवृक्षांची कत्तल झाल्यावर बोडका झालेला फर्गसन रस्ता बघून अजूनही कसनुसे होते.
अगदी, अगदी :( तसेच ते संचेती हॉस्पिटलच्या तिथले, ठुबे पार्कच्या जवळचे वडाचे वृक्ष तोडून टाकले, कसा भकास रस्ता वाटतो आता......
असो. मंडळी, ही साईट तशी उशीराच पाहिली, खूप आवडली म्हणून सदस्यत्व घेतलं, आणि लिहिलेल्या पहिल्याच लेखाचं अस कौतिक केलत त्याबद्दल खरच खूप छान वाटल!! धन्यवाद परत एकदा. :)
7 May 2008 - 11:01 am | धमाल मुलगा
हरकत इल्ले....धमु हे नाव आमचे गुरुदेव श्री प्रमोद्रोणाचार्य ह्यांनी दिलं...तो हक्क खरं तर त्यांचा :)
त्याशिवाय आमची इतर नावं (आणि आवडतीही) धमाल्या, धम्या, (आनंदयात्रीच्या भाषेत - करकोच्या! ) आपल्याला प्रेमाने कोणत्याही नावानं हाक मारलेलं आवडतं...भगवान विष्णूंनंतर बहुधा आमचाच नंबर...एक मित्र डायरेक्ट 'कन्हय्या' अशी हाक मारतो..आणि आम्हीही गोपींच्या मदतीला धावल्यासारखे ओ देऊन जातो :)
आहाहा.....काय आठवण करुन दिली...आम्ही पुर्वी वाड्यात रहायचो तिथलं पिंपळाचं झाड आठवलं...
-(निसर्गवेडा) ध मा ल.
7 May 2008 - 6:58 pm | शैलेन्द्र
सिह्गड रोडवर पूर्वी फार डेरेदार वडाची झाड होति....... गेले ते दिवस
7 May 2008 - 7:47 pm | मनस्वी
कर्वेरोडवरपण.
वाड्यांमध्येही भरपूर असायची. बिल्डिंग बांधताना सगळी पाडतात.
रस्ता रुंदीकरणात तर हमखास पाडली जातात आणि रस्ता आहे त्याच्या दुप्पट वाढवतात. मग मला एक प्रश्ण पडतो की आहे ती झाडे डिव्हाडर म्हणून येतील असे पाहून ती न पाडताच का नाही रुंदीकरण करत.
7 May 2008 - 8:19 pm | अभिज्ञ
लेख छान झालाय.
ओघवति शैली,दर्जेदार लेखन...
लेख फारच आवडला.
असेच लेख येउ द्यात.
अभिनंदन
=D>
अबब
अवांतर-प्रथम मला तर प्राजुताईंनी नाव बदलले कि काय असे वाटले होते. :SS
नंतर हा तुमचा लेख आहे हे कळले.
मि.पा. वर आणिक एक प्राजुताई आलेल्या दिसतात. :)
7 May 2008 - 11:20 pm | शितल
सु॑दर लिखाण, डोळ्यासमोर चित्र उभा राहते,आणि लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात.
8 May 2008 - 2:29 am | भाग्यश्री
खूपच मस्त झालाय लेख! आमच्या कॉलनीतली झाडं आठवली.. गुलमोहोर्,कॅशिया तर माझी खूप आवडती झाडं!!
इथे सुद्धा आसपास इतकी सुंदर झाडं असतात, फुलं तर एक से बढकर एक.. पण नावंच माहीत नाहीत.. :| फोटो काढणार आहे १-२ दिवसात.. इथे टाकीन मग.. सुंदर फुलं पाहून काय छान वाटतं नं !
अजून लिही! तू छान लिहीतेस...
8 May 2008 - 7:50 am | पिवळा डांबिस
यशोधराजी,
एकदम बकुळीच्या फुलांसारखं नाजूक आणि सुंदर लिहिलंय तुम्ही!
विशेषतः तुमच्या आजोळ्-पणजोळचं वर्णन वाचून आम्हांला आमचं आजोळ आठवलं!! एकदम डिट्टो, काही फरक नाही, असलाच तर इतकाच की आमच्या लहानपणी तिथे वीज नव्हती...
मात्र,
आ़जोळी आता कोणीच नसतं,
वाचून काळजाला घरं पडतात हो!! आमच्याकडेही तेच!
असं का व्हावं !!! तिथल्या माणसांनी ते सोडण्यात जगण्याची धडपड असेल पण बाहेरच्या माणसांनी (त्यात आपले आईबापही आलेच) असं का होऊ द्यावं? बाहेरच्या जगाने ओरखडल्यानंतर तोंड खुपसून रडायलाही शेवटी एक आपली हक्काची जागा लागते ना!! =((
असो. सुंदर लेख!
अश्याच लिहीत रहा!!!
-पिवळा डांबिस
8 May 2008 - 2:15 pm | यशोधरा
शैलेंद्र, तेच तर ना.... नव्या नव्या इमारती उभारण्याचय नादात पर्यावरणाकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे... :(
मनस्वी, झाडं त्याच्या मुळांसकट अलग करून दुसरीकडे परत रुजवत येतात, त्याचेही शास्र विकसित झालेय, पण मग खाबूगिरी कशी जमेल?? त्यामुळे ते तसलं काही होताना दिसत नाही....
अबब, शितल, भाग्यश्री, धन्यवाद. भाग्यश्री, लवकर टाक फोटो! :)
डांबिस, धन्यवाद.
>>> बाहेरच्या जगाने ओरखडल्यानंतर तोंड खुपसून रडायलाही शेवटी एक आपली हक्काची जागा लागते ना!!
हो खरय, आणि आजी आजोबांपेक्षा अधिक आश्वासक जागा कोणती?? दुर्दैवाने, आता हे आधारवड फक्त स्मृतीत राहिलेत....
8 May 2008 - 10:47 pm | सुवर्णमयी
लेख आवडला.