प्रारब्ध

पल्लवी's picture
पल्लवी in जे न देखे रवी...
28 Apr 2008 - 9:27 am

वेचले जे क्षण सुखाचे, ते मुळी नव्हतेच माझे
पाहिले स्वप्नात माझ्या सौख्य ते नव्हतेच माझे !

आजही डोळयांत माझ्या, स्फुंदते हासू तुझे रे
पण तुझ्या डोळ्यांत होते, चित्र ते नव्हतेच माझे !

राहिले लाख प्रश्न मागे, लाख आली उत्तरे
उत्तरे आली जयांची, प्रश्न ते नव्हतेच माझे !

हाय ! अता जाऊ कुठे रे फाटक्या ह्रुदयासवे ?
गुंतले मम प्राण जेथे-तव ह्रुदय-नव्हतेच माझे !

एवढी रडले सख्या मी, आसूही रक्ताळले
गाली लाल-रक्तिमेचे प्रारब्धही नव्हतेच माझे !

~पल्लवी~

गझल

प्रतिक्रिया

चेतन's picture

28 Apr 2008 - 2:27 pm | चेतन

राहिले लाख प्रश्न मागे, लाख आली उत्तरे
उत्तरे आली जयांची, प्रश्न ते नव्हतेच माझे !

मस्त आहे

(रडक्या कविता न आवडणारा) चेतन :''(

आनंदयात्री's picture

28 Apr 2008 - 4:24 pm | आनंदयात्री

गाली लाल-रक्तिमेचे प्रारब्धही नव्हतेच माझे !

ही ओळ एकदम छान. कवितापण चांगली.

-(रडक्या कविता वाचु न शकणारा) आनंदयात्री

विसोबा खेचर's picture

29 Apr 2008 - 10:10 am | विसोबा खेचर

गझल छान आहे परंतु,

एवढी रडले सख्या मी, आसूही रक्ताळले

ही ओळ बाकी कैच्या कैच आहे! छ्या...! :)

तात्या.

फक्त संदीप's picture

6 May 2008 - 9:03 pm | फक्त संदीप

मी संदीप,एक वाचक

धमाल मुलगा's picture

7 May 2008 - 10:38 am | धमाल मुलगा

आजही डोळयांत माझ्या, स्फुंदते हासू तुझे रे
पण तुझ्या डोळ्यांत होते, चित्र ते नव्हतेच माझे !

छान ! स्फुंदणारं हसु...क्या बात है!

हाय ! अता जाऊ कुठे रे फाटक्या ह्रुदयासवे ?
गुंतले मम प्राण जेथे-तव ह्रुदय-नव्हतेच माझे !

आईग्ग!
नका हो असलं काही लिहू....काळजाच्या कोपर्‍यात दडवलेली दु:खं उसळ्या मारुन डोळ्यात तरंगायला लागतात..

च्छ्या: पार काळीज पिळवटून काढलंय बॉ....

- (हळवा) ध मा ल.

मदनबाण's picture

7 May 2008 - 10:46 am | मदनबाण

राहिले लाख प्रश्न मागे, लाख आली उत्तरे
उत्तरे आली जयांची, प्रश्न ते नव्हतेच माझे !

व्वा !!!!!

(योग्य उत्तराच्या शोधात)
मदनबाण.....

पक्या's picture

7 May 2008 - 12:10 pm | पक्या

एवढी रडले सख्या मी, आसूही रक्ताळले

आईशप्पथ , एवढे दु:ख !!! डोळ्यातून रक्त येईपर्यत ? :?
एवढी रडले सख्या मी, आसूही वाळून गेले किन्वा तत्सम .. लिहीले असते तर.. जरा हलके वाटले असते.
-- पक्या