वैभव देशमुख यांच्या चार छोटुल्या हे शीर्षक पाहून आम्हाला ह्या चार छोटुल्यांची आठवण आली.
लुईजा मे अल्कॉट यांची ही सुंदर कादंबरी आहे. वडील सैन्यात आणि मेग, जो, बेथ आणि अॅमी ह्या चार बहिणी आईसमवेत. ह्या सर्वांच्या भावविश्वाची ही कथा. ह्याचाच पुढील भाग गूड वाईव्स ह्या नावाने त्यांनी लिहिला आहे.
शांता शेळके यांनी याचा "चौघीजणी" ह्या नावाने अनुवाददेखिल केला आहे. शिवाय, अमोल पालेकर यांनी यावर आधारीत एक मालीका (कच्ची धूप) ह्या नावाने बनवली होती. पण त्यात चारऐवजी तीनच बहिणी दाखवल्या होत्या (असे वाटते).
प्रतिक्रिया
17 Aug 2010 - 5:08 pm | परिकथेतील राजकुमार
मला तर ते शिर्षक पाहुन स्टार प्रवाह वरच्या (एकदाच्या) नुकत्याच संपलेल्या मालिकेची भयावह आठवण झाली होती.
17 Aug 2010 - 5:12 pm | सुनील
(निदान फोटोवरून तरी) सगळ्या "छोटुल्या" वाटत नाहीत हो!!!
17 Aug 2010 - 5:27 pm | परिकथेतील राजकुमार
त्या चार 'हडळ्या' वाटतात असे आमचे प्रामाणिक मत आहे.
17 Aug 2010 - 5:29 pm | अर्धवट
पराशी बाडिस
>>(एकदाच्या)
वावा..
17 Aug 2010 - 8:04 pm | मनीषा
या कादंबरीवर आधारित "लिट्ल विमेन" नावाचा चित्रपट आहे ... त्यात एलिझाबेथ टेलर ने अॅमी मार्च ची भूमिका केली आहे ..
त्यातील जो मार्च ( जून अॅलीसन) ची ध्येयवादी आणि बंडखोर पण तितकीच आपल्या कुटुंबावर जिवापाड प्रेम करणार्या मुलीची व्यक्तीरेखा अतिशय प्रभावी आहे.
17 Aug 2010 - 8:24 pm | रामदास
शिर्षक वाचले की धागा घाबरतच उघडतो.
कारण : जुळ्या चिंबोर्या
17 Aug 2010 - 8:36 pm | सुनील
हॅ हॅ हॅ
17 Aug 2010 - 11:36 pm | सविता
तो चित्रपट मला अतिशय भंगार वाटला.
पुस्तक अप्रतिम.... माझ्या सर्वात आवडत्या पुस्तकांपैकी एक... अनेकदा पारायणे केली आहेत मी त्याची!!!
एखादे पुस्तक आवडले तर त्यावर बनवलेली मालिका/चित्रपट पाहण्याच्या भानगडीत पडू नये...अपेक्षाभंगच होतो.. हे मत मी हा चित्रपट पाहिल्या वर पक्के केले!!!
18 Aug 2010 - 12:57 am | सुनील
ह्या कादंबरीवर दोन चित्रपट येऊन गेले. पैकी लिझ टेलर असलेला १९४९ साली आणि दुसरा १९९४ साली.
मी त्यापैकी एकही चित्रपट न पाहिल्यामुळे माझी कोणतीही प्रतिक्रिया नाही.
बाकी कादंबरींवरून बनवलेल्या चित्रपटांविषयी -
याबाबत मी गॉन विथ द विन्ड आणि हाउ ग्रीन वॉज माय वॅली ह्याबद्दल मते देऊ शकतो (पण ते वेगळ्या धाग्यात, इथे नको).