ये रे माझ्या `माग'ल्या!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
14 Aug 2010 - 8:08 pm

युवतीहृदयसम्राट, गालखळीचा बादशहा जॉन अब्राहम तसा नेहमीच चर्चेत असतो, पण या वेळची "पार्श्‍वभूमी' जरा वेगळी होती.
बातमी अशी होती, की जॉननं दहा कोटी रुपयांचा विमा करण्याचा घाट घातलाय...विमा कशाचा माहितेय? त्याच्या पार्श्‍वभागाचा! हो हो...!
`दोस्ताना'मध्ये त्यानं ज्याची झलक दाखवल्यानंतर त्याला त्याची जास्तच काळजी वाटू लागली असावी...
कुणी कुणाच्या कुठल्या अवयवाचा विमा करावा, याविषयी आपला आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही, पण ज्या विशिष्ट अवयवाचा त्यानं विमा करायचं ठरवलं, त्यावरून भुवया उंचावल्या जाणं साहजिक होतं. शिवाय, त्यासाठी दहा कोटी रुपये कुठली कंपनी मोजायला तयार होणार, ते विमा म्हणून नक्की कशाची हमी देणार, याविषयीचं कुतूहल जास्त होतं.

बातमीतून तरी ते काही स्पष्ट झालं नाही. माझ्या मनात मात्र अनेक कल्पना, शंकाकुशंकांनी थैमान घातलं. त्यातल्याच या काही...
1. एखाद्या व्यक्तीनं त्याच्या पार्श्‍वभागाचा विमा करून घेतला आणि कंपनीनं त्याला त्याच ठिकाणी लाथ मारून हाकललं, तर विम्याची संपूर्ण रक्कम मिळते का?
2. बूडही न हलवता तासन्‌ तास एकाच जागी बसून जास्तीत जास्त काम करावं, अशी कंपनीची अपेक्षा असेल तर त्यासाठीच्या विम्याचा हप्ता कंपनीनंच भरायला नको का?
3. पार्श्‍वभागाचं दर्शन घडविणाऱ्या जीन्स घातल्या, तर विम्याच्या हप्त्यात काही सवलत मिळते का?
4. "हिप्स डोन्ट लाय' असं कुणीतरी शकीरा नामक गुरूमाता म्हणून गेलेय, असं ऐकतो. "हिप्स'बाबतची "पॉलिसी' पण डोन्ट लाय, याची हमी कोण देणार?
---

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

असुर's picture

14 Aug 2010 - 11:02 pm | असुर

केवळ नि:शब्द आणि आपल्या निरीक्षणशक्तीला साष्टांग नमस्कार! आपल्या वरीलपैकी एकाही शंकेचे उत्तर मिळाल्यास प्लीज कळवा. आम्हा गरजूंना फार्फ्फार मदत होईल.

>>>1. एखाद्या व्यक्तीनं त्याच्या पार्श्‍वभागाचा विमा करून घेतला आणि कंपनीनं त्याला त्याच ठिकाणी लाथ मारून हाकललं, तर विम्याची संपूर्ण रक्कम मिळते का? <<<
>>>2. बूडही न हलवता तासन्‌ तास एकाच जागी बसून जास्तीत जास्त काम करावं, अशी कंपनीची अपेक्षा असेल तर त्यासाठीच्या विम्याचा हप्ता कंपनीनंच भरायला नको का? <<<

हे दोन्ही मुद्दे वाचून मन भरून आले! अगदीच वर्मी बसला हा घाव!
अशा लाथा खाऊन गेलेल्या सहकाऱ्यांची आठवण होऊन डोळे पाणावले. आणि बूड न हलवता एकाच जागी बसून काम करण्याच्या नुसत्या कल्पनेनेच हातापायाला कंप सुटला.

--(जखमी) असुर

श्रावण मोडक's picture

14 Aug 2010 - 11:21 pm | श्रावण मोडक

हाहाहाहा... या धाग्यावर लक्ष ठेवावं लागणार आता! :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Aug 2010 - 11:22 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा आमचा जॉन, आमचा याच्यावर भारी जीव!

राजेश घासकडवी's picture

15 Aug 2010 - 11:39 am | राजेश घासकडवी

हा आमचा जॉन, आमचा याच्यावर भारी जीव!

हे वाचल्यानंतर काहीतरी अजून रीव्हीलिंग असेल असा समज झाला होता. विशेषतः या धाग्यावर... पण आजकालच्या पुरुषांची प्रतिमा फारच सोज्वळ दिसले आहे.

अवांतर - डॉनरावांनी आपल्या बटांचा आता विमा काढायला हरकत नाही असा विचार येऊन गेला...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Aug 2010 - 12:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आमचा जॉनवर जीव असल्याने आम्ही त्याचे 'तसले' फोटो गावभर चोप्य पस्ते करत सुटणार नाही!

अवांतर - डॉनरावांनी आपल्या बटांचा आता विमा काढायला हरकत नाही असा विचार येऊन गेला...

बटांचा म्हणजे नक्की कसला? ;-)

(मारतायत आता चोता दोन मला!!)

राजेश घासकडवी's picture

15 Aug 2010 - 12:26 pm | राजेश घासकडवी

माझ्या ओळखीच्या विमा एजंटने सांगितलं की रंगवलेल्या बटांचा विमा उतरवायचा असेल तर डानरावांना नक्कीच जास्त खर्च येईल.

बटांचा म्हणजे नक्की कसला?

चोता दोन, तुम्ही तुमच्या बटांचा एक फोटोच का नाही चोप्य पस्ते करत? हे असले प्रश्न तरी कोणी विचारणार नाही. आणि साधारण किती खर्च येईल याचासुद्धा अंदाज येईल.

परिकथेतील राजकुमार's picture

16 Aug 2010 - 2:25 pm | परिकथेतील राजकुमार

हा हा हा लै भारी रे अभिदा. तुला बर्‍या बसल्याजागी अशा बातम्या मिळतात रे ;)

अवांतर - डॉनरावांनी आपल्या बटांचा आता विमा काढायला हरकत नाही असा विचार येऊन गेला...

गुर्जी 'बटांचा' हा शब्द मराठी अर्थी घ्यायचा का विंग्रजी ??

नितिन थत्ते's picture

16 Aug 2010 - 2:35 pm | नितिन थत्ते

>>गुर्जी 'बटांचा' हा शब्द मराठी अर्थी घ्यायचा का विंग्रजी ?

शि बै अच्रत. :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Aug 2010 - 2:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बटबटीत प्रतिसाद देण्यात पराचा हात कोणीही धरणार नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

16 Aug 2010 - 2:44 pm | परिकथेतील राजकुमार

थत्ते चाचा व जोजो काकु ह्यांच्या प्रतिसादांना ताबडतोब उडवुन लावावे अशी अधिकारी व्यक्तींना विनंती.

हे जुने लोक नविन सदस्यांनी काही शंका विचारली की लगेच टर उडवायला हजर होतात :(

नितिन थत्ते's picture

16 Aug 2010 - 2:50 pm | नितिन थत्ते

सहमत आहे.

त्यातही थत्ते चाचा फारच टवाळखोर आहे.

एक शंका:
नव्या प्रकाशात* 'डाव्या डोळ्यावर बट ढळली' आणि ' जेव्हा तुझ्या बटांना उधळी ...' या ओळींच्या अर्थ काय घ्यावा?

* इन द न्यू लाईट = नव्या प्रकाशात

मृत्युन्जय's picture

16 Aug 2010 - 2:55 pm | मृत्युन्जय

'डाव्या डोळ्यावर बट ढळली'

कोणाची ढळली आहे त्यावर अवलंबुन आहे. स्वतःचीच असेल तर केवळ एकच अर्थ होऊ शकेल.

राजेश घासकडवी's picture

16 Aug 2010 - 3:58 pm | राजेश घासकडवी

>>गुर्जी 'बटांचा' हा शब्द मराठी अर्थी घ्यायचा का विंग्रजी ??

पूज्य भाईकाकांनी सांगितल्याप्रमाणे खाजगी पुणेरी बोलीतल्या अर्थी घ्यायचा.

मृत्युन्जय's picture

15 Aug 2010 - 12:11 am | मृत्युन्जय

"पार्श्वनाथ" इन्शुरन्स कंपनी काढावी म्हणतो आता. पहिली गिर्‍हाइक शकीरा असेल काय? आणि तिला गिर्‍हाइक बनविण्यासाठी काय म्हणायचे ते पण मी ठरवले आहे - "वाका वाका"

नितिन थत्ते's picture

15 Aug 2010 - 12:41 pm | नितिन थत्ते

पार्श्वनाथ हे एका तीर्थंकराचे नाव आहे. आणि त्या तीर्थंकराला मानणार्‍या गटाकडे भरपूर पैसाही असतो. तेव्हा संभाळून. :|

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Aug 2010 - 4:11 pm | llपुण्याचे पेशवेll

अहो वाका वाका असे सांगू नका विमा कंपनी उगा डुबायची. त्यापेक्षा राखा राखा असे सांगा म्हणजे नफ्याची शक्यता आपोआप वाढेल.

कवितानागेश's picture

15 Aug 2010 - 12:27 am | कवितानागेश

अय्या, इतके छान छान कुठून सुचते हो?

जेनिफर लोपेझ पार्श्वभागाचा विमा काढला आहे !!
मराय केरीने माड्यांचा(थाईज) काढला आहे !!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Aug 2010 - 12:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चिल माडी, तुला मांडी म्हणायचं आहे! ;-)

सुहास..'s picture

15 Aug 2010 - 12:36 pm | सुहास..

आयतु !! आयतु !!

हियर शी ईज

zzz

ह्या बरा न्हाय हा , विमा कसला काड्लाय नी तुम्ही फोटु कस्ले टाक्ताय ;)

लेख वाचुन झाल्यावर परत एकदा 'शिर्षक' वाचल!
हसुन हसुन फुटले!

आपला अभिजित's picture

16 Aug 2010 - 12:52 pm | आपला अभिजित

केवळ नि:शब्द आणि आपल्या निरीक्षणशक्तीला साष्टांग नमस्कार!
हसुन हसुन फुटले
हाहाहाहा...

आम्ही एवढे प्रतिभावंत, निरीक्षणक्षम, लोकांना `फुटण्या'स कारणीभूत ठरणारे आहोत, हे आजच कळले नि मन भरून आले.
घरी असा एखादा विनोद, कोटी, कॉमेंट केली की `पुरे झालं आता', `बोअर मारू नकोस,' `कॅसेट बदल आता' यापलीकडे काही प्रतिक्रिया ऐकायला मिळत नाही.

सवयीचा परिणाम!

असो.

सर्वांना साष्टांग धन्यवाद!

``चोप्य पस्त````
`चोता'

हे
काय आहे?
मला अडाण्याला कुणी समजावेल का?

असुर's picture

16 Aug 2010 - 2:26 pm | असुर

>>>``चोप्य पस्त````
`चोता'
हे
काय आहे?
मला अडाण्याला कुणी समजावेल का?<<<

चोप्य पस्ते: भेटा अथवा लिहा "३_१४ तै"!!!
चोता दोन : भेटा अथवा लिहा "छोटा डॉन"!!!

--असुर

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Aug 2010 - 2:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> चोप्य पस्त````<<
हे खरंतर चोप्य पस्ते असं वाचावं. कॉपी-पेस्टचं इंग्लिश स्पेलिंग गमभन-मधे देवनागरीतून लिहीलं तर त्याचं चिप्य पस्ते होईल. चुकून(?) झालेली चूक, पण शब्द अलिकडे फारच पापुलर होतो आहे.

>> `चोता' <<
डॉन्याला कोणी (आता बॅन झालेला आयडी) चोता दोन म्हणाला तेव्हापासून हा शब्द डॉन्याच्या म्हणण्यानुसार लवकरच मिपावरून बॅन होणार आहे. म्हणून लोकं वापरून घेत आहेत.
तू मिपावर पडीक नसतोस त्यामुळे सहाजिकच तुझा अभ्यास थोडा कमी पडत असणार, म्हणून हे गाईड!

('फुटीर'तावादी) अदिती

असुर's picture

16 Aug 2010 - 2:21 pm | असुर

प्र का टा आ

सहज's picture

16 Aug 2010 - 2:20 pm | सहज

. एखाद्या व्यक्तीनं त्याच्या पार्श्‍वभागाचा विमा करून घेतला आणि कंपनीनं त्याला त्याच ठिकाणी लाथ मारून हाकललं, तर विम्याची संपूर्ण रक्कम मिळते का?

लाथ मारल्याने पार्श्वभागाचे न भरुन येणारे नुकसान झाल्यास नक्कीच मिळेल. बाकी सिरीयसली प्रायव्हेट अनएम्प्लॉयमेंट इन्शुरन्स आहे. रिट्रेंचमेंट इन्शुरन्स आहे. लॉस ऑफ इन्कम असाही एक इन्शुरन्स आहे. स्पोर्ट्स इन्शुरन्स आहे. (धोकादायक खेळात उपयुक्त)

2. बूडही न हलवता तासन्‌ तास एकाच जागी बसून जास्तीत जास्त काम करावं, अशी कंपनीची अपेक्षा असेल तर त्यासाठीच्या विम्याचा हप्ता कंपनीनंच भरायला नको का?

चांगला वकील घेउन बसायला नियमीत बसायच्या वेळेपेक्षा जास्त कसे बसायला लावले, जेथे बसायला लावले तेथे अनुकूल वातावरण, पृष्ठभाग नसल्याने बुडाचे अपरीमित नुकसान कसे झाले हे दाखवले तर हप्ताचं नव्हे तर विम्याच्या रकेमेइतका दंड वसुल करता येइल.

3. पार्श्‍वभागाचं दर्शन घडविणाऱ्या जीन्स घातल्या, तर विम्याच्या हप्त्यात काही सवलत मिळते का?
नसावे. उलट पार्श्वभागाची काळजी न घेतल्याबद्दल हप्ता वाढायची किंवा प्रसंगी विमा न मिळायचा, कमी मिळायचा संभव आहे.

4. "हिप्स डोन्ट लाय' असं कुणीतरी शकीरा नामक गुरूमाता म्हणून गेलेय, असं ऐकतो. "हिप्स'बाबतची "पॉलिसी' पण डोन्ट लाय, याची हमी कोण देणार?
हॅ हॅ हॅ पहेले इस्तेमाल करे फिर विश्वास करे!

बाकी दुवा १ - २५ सेलेब्रीटी व त्यांचे विमा उतरवलेले अंग

दुवा २ बॉडी पार्ट इन्शुरन्सबद्दल जरासे

---

सुनील's picture

16 Aug 2010 - 2:49 pm | सुनील

खुशखुशीत लेख. सहजरावांचा प्रतिसाद "माहितीपूर्ण"!

असा धम्याच्या बोटांचा बिमा ऊतरवला पाहिजे ..पार माऊस सिंड्रोम होईपत्तुर कळफळक बडवत बसतय ते !!

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Aug 2010 - 4:14 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत आणि सुहाशाच्या डोक्याचा... कुठंही डोकं लावत असतंय आजकाल.

धमाल मुलगा's picture

16 Aug 2010 - 4:18 pm | धमाल मुलगा

हां...
आम्ही सापडलो का? आता कसं गारगार वाटलं ना? असो.

>>कुठंही डोकं लावत असतंय आजकाल.
फारतर लाईसिल द्या त्याला..विमा कशाला काढायचा?

असो,
भो अभिजित बंधो,
बर्‍याच कालक्रमणानंतर आपले पुनर्दर्शन जाहले. अत्यंत संतोष जाहला.
बाकी, जॉनरावांच्या विम्याच्या इच्छेबद्दल खरी माहिती नक्की काय आहे? हल्ली तो फार वेळ 'बसु'न नसतो का?

परिकथेतील राजकुमार's picture

16 Aug 2010 - 4:19 pm | परिकथेतील राजकुमार

बाकी, जॉनरावांच्या विम्याच्या इच्छेबद्दल खरी माहिती नक्की काय आहे? हल्ली तो फार वेळ 'बसु'न नसतो का?

ते आता खिडकीलाच माहिती.

चिंतामणी's picture

16 Aug 2010 - 3:06 pm | चिंतामणी

सदर विषय स्फोटक (खरे तर विंग्रजीतील HOTला हा मराठी शब्द जास्त योग्य वाटला) असल्याने काळजी पुर्वक हाताळावा.

हाताळताना अपघात झाल्यास संपादक मंडळ जबाबदार नाही.

(संपादक मंडळाने असा इशारा टाकायचा गंभीरपणे विचार करावा)

दिपक's picture

16 Aug 2010 - 3:06 pm | दिपक

सुनील's picture

16 Aug 2010 - 3:32 pm | सुनील

बिचारा बहुधा आता रावणी पिठले खाऊ शकणार नाही! हलगर्जीपणाचा आरोप होऊन, विम्याची रक्कम न मिळण्याची शक्यता अधिक वाटते!

चिन्मना's picture

16 Aug 2010 - 4:21 pm | चिन्मना

अगदी अगदी.
घासकडवी गुर्जींनी काढलेल्या माहितीप्रमणे 'रंगवलेल्या बटांना' जास्त प्रिमियम पडेल तो वेगळाच ;-)