गोकुळ आहे!!!

कळस..'s picture
कळस.. in जनातलं, मनातलं
13 Aug 2010 - 2:24 pm

नमस्कार!

विचार करावासा वाटतो कि आपल्यापेक्षा दिग्गज जेव्हा लेखन करीत असतील तर त्यांना प्रतिसाद द्यावा कि नाही. खर तर नवोदितांनी प्रतिक्रिया देणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे. पण कधी कधी एकमेकावर उगवलेले टीकेचे सूड पाहता त्यांचा बद्दल असलेला पगडा थोडा का होईना ढासळतो.
याचे कारण म्हणजे एकमेकांवरील केलेले [विनोदात्मक] शब्दांचे वार. हे सगळे वाचून बरा टाईमपास होतो पण हे होणे थोडे चुकीचे वाटते. कधी कधी दुर्भाग्यपूर्ण वाटते. जर मस्करीत एकमेकांची साले काढीत असतील तर फारच चांगले पण नवोदितांना त्याच्या अशा रेपोबद्दल काही माहिती नसताना असे वाक्य दृष्टीत पडते तर थोडे असंबद्ध वाटते.
मला माहित आहेत सर्व प्रस्थापितांमध्ये फारच चांगले सलोख्याचे संबंध आहेत असे त्यांच्या काही टिप्पणीतून व्यक्त होते. जसे कि आदराने बोलणे, जाहीर निमंत्रण, किंवा कोणत्यातरी एका विशेषणांनी त्यांचा उल्लेख करणे फारच बरे वाटते. गोकुळ आहे!!!! तरी याबद्दल थोडा विचार करणे.........

आपला मित्र बनू पाहणारा

कळस.

वावरप्रकटन

प्रतिक्रिया

हर्षद खुस्पे's picture

13 Aug 2010 - 3:27 pm | हर्षद खुस्पे

आपण मराठी आहोत हे सिद्धच केले पाहिजे का?

जगात सगळ्या तर्‍हेची माणसं भेटणार. फार आदर्शवादी राहून आणि समोरच्याकडून तशा अपेक्षा करून तर मुळीच चालणार नाही.

निशदे's picture

13 Aug 2010 - 10:24 pm | निशदे

जाऊ द्या हो........
सगळी आपलीच माणसं......जरा वेडेवाकडे बोलले म्हणून चिडायचे कशाला?
चेष्टामस्करी मधेच होते सगळे. आणि त्यामुळे मिपा जरा 'जिवंत' राहते