[ती दोघ] लहान वयातील लग्न चा॑गले कि वाईट? एक अनुभव.

बरखा's picture
बरखा in जनातलं, मनातलं
8 Aug 2010 - 10:52 pm

नमस्कार
ती दोघ हे सदर वाचले.ल्हान वयात लग्न आणि त्याचे परिणाम.आज काल हे सगळी कडे पहायल मिळ्ते.मी अगदी जवव्ळुन अनुभवलेली एक कटु सत्य घटना.आमचे अगदी जवळ्चे नाते समबधातील,त्या॑न्च्या मुलाचे ७वर्षा पुर्वी लग्न झाले.मुलाचे वय अवघे २५.मुलिचे वय अवघे१८ पुर्णला २महिने कमी.तशी घरची आर्थिक परिस्थिती खुप छान.मुलाने लग्नास नकार दिला,पर॑तु घरच्या दबावा मुळे लग्न केले.एक मुलगा झाला,पहिलै ३वर्ष सुखात गेली.मुलगी एकुलती एक असल्या मुळे,आई ने सर्व लाड पुरविले.पहिल्या मुला न॑न्तर पुन्हा दुसर्‍या मुलगा झाला.दोघातील अन्तर ४वर्ष्.बाळा॑त होउन १महिना पण झाला नाई तर भावाच्या लग्न खरेदी साठि बाळाला घेउन बाहेर फिरली,दोन महिने होत नाई तोच तिला त्रास चालु झाला,मोठ मोठे दवाखाने झाले पण कोणाला आजाराचे निदान होईना.गेलि २वर्ष ती घर आणि दवाखाना अशी फिरत होती.त्या तान्ह्या बाळाला आईचे सुख कधि मिळालेच नाई.तिचि परिस्थिति खुप खराब झाली.जेम तेम ६ महिने जगण्याची मुद्त सा॑गण्यात आली.गोळ्या सलाईन द्वारे तिला जगव्ण्याचे प्रयन्त सुरु झाले ,तिला स्म्रुति भ्र॑श झाला कोणाला हि ती ओळ्खेना म्हनुन तिला माहेरी पाठ्व्ण्यात आले,लहान बाळ व आई माहेरी गेले.आजार पणाची २वर्ष तिने माहेरीच काढ्ली,त्या दरम्यान मोठा मुलगा शिकण्यासाठि काकु कडे राहिला.असा तिचा जेमतेम ७ वर्ष सन्सार झाला.मागिल महिन्यात ती सासरी आली.आठ दिवस होत नाई तोच पुन्हा दवाख्यान्यात नेली,पण काळाने घात केला आणि तिच्या जिवाला शा॑त केले . आपल्या मागे दोन लहान मुल सोडुन ती ने या जगाचा निरोप घेतला.
आज तीला जाउन १४ दिवस झाले.
आता तीचा मोठा मुलगा सहा आणि लहान मुलगा दोन वर्षाचा आहे.आजाराचे निदान न झाल्याने वयाच्या अवघ्या २४/२५ वर्षातच तिने आपले जिवनमान पुर्ण केले.तिचा नवरा आता फक्त ३२ वर्षाचा आहे पुढे त्याचे काय? दोन मुला॑च्या वडला॑ना कोण मुलगी देणार? हा परिणाम कशामुळे झाला,त्यच्या आईने त्याला लग्नास भरिस पाड्ले त्याच्या कि लहान वयात लग्न करुन दिलेल्या त्या मुलीच्या आइचा?ती दोन लहन मुले,ज्या॑ना आई म्हणजे काय हे पण अजुन समजत नाई त्या॑चे काय?
घटस्फोट झालेल्या मुला मुली॑ना परत कोणि चा॑गले मिळु शकेल पण ,ज्या॑च्या मागे मुल बाळ असतात अशा॑ना मग ती मुलगी असो वा मुलगा त्यान्च्या आयुष्या॑चे खेळ होतात हा दोश कुणाचा?

हे ठिकाणअनुभव

प्रतिक्रिया

sandeepn's picture

8 Aug 2010 - 11:05 pm | sandeepn

१८ हे सरकारी वय आहे. जर ही दुर्गटना कमी वयामुळे झाली असेल तर फेरविचार करायला पाहिजे. तसे लहान पन योग्य वयात लग्न केल्याचे फायदे पन आहेत.

लग्न कोणत्याही वयात करा हो पण मुलं मात्र साधारण २२ -२३ नंतरच होऊ द्यावीत...मुलांना सांभाळणे अन आपला तोल ठेवणे सोपे काम नाही...तेवढी प्रगल्भता हवी अन तयारी हवी...

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

8 Aug 2010 - 11:47 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

वय आणि शारिरीक + मनसिक सुदृढता हे वेगळे काँपोनंट्स आहेत,
१) लग्नाचे वय बसत नसेल तर तो कायद्याने गुन्हा आहे.
२) लग्नाचे वय जेमतेम असेल (म्हणजे नुकतंच १८ पुर्ण) त्याबरोबर शारीरिक दृष्ट्या सुदृढ असेल.आणि लग्नासाठी तयार असेल तर काही हरकत नसावी.अर्थत मुलगाहि योग्य अनुरुप आणि समजुतदार असेल तर लग्न यशस्वी व्हायला हरकत नाही.
कारण वर उल्लेख केलेली दुर्घटना हि एखाद्या वेळेत किंवा उशिरा लग्न झालेल्या जोडप्याच्या बाबतीत ही होउ शकते.
त्यामुळे हा नशिबाचा भागही असु शकतो.किंवा त्या मुलीची अशक्त तब्येत आणि त्यामुळे न मानवलेली बाळंतपणं हेही असु शकते.
तरिहि लहान वयात एकंदर समजुतदार पणा जर कमी असेल तर त्या जोडप्याच्या बाबतित इतर सामंजस्याअभावी होणार्‍या दुर्घटना हि घडु शकतात.

मी आत्तापर्यंत लहान वयात झालेली यशस्वी लग्नंही पाहिलेली आहेत.
त्यामुळे वर लिहिलेले १) आणि २) लक्षात घेता ७५% मत होकारार्थी आहे.

यशस्वी होउ शकतात***

* **please reffer clause 1) and 2)

भारी समर्थ's picture

9 Aug 2010 - 12:15 am | भारी समर्थ

शारीरिक वाढ तर नक्कीच महत्वाची आहे. लवकर लग्न झालेल्या तर सोडाच, पण पहिल्या बाळंतपणानंतर अशा अशक्त झालेल्या कितीतरी माता-भगिनी आज समाजात आपल्या आजूबाजूला दिसतील. अशा घटना टाळायच्या असतील तर सर्वप्रथम मानसिक प्रगल्भतेची आवश्यकता आहे. कौटुंबिक, सामाजिक दबाव झुगारून नवरा-बायकोने एकमेकांची काळजी घेणं गरजेचं आहे.

भारी समर्थ

नितिन थत्ते's picture

9 Aug 2010 - 8:34 am | नितिन थत्ते

कथेतला विवाह फार लवकर झाला आहे असे वाटत नाही. १८ वर्षांना दोन महिने कमी.
टेक्निकली बेकायदेशीर आहे हे खरे. पण १८ वर्षे हे विवाहाचे मान्य वय म्हटले तर फार चुकीचा नाही. म्हणजे तिचा २४-२५ वर्षाच्या वयात मृत्यू हा लवकर विवाह झाल्याने झाला असे प्रथमदर्शनी वाटत नाही. निदान न होऊन मृत्यू होण्याच्या अनेक घटना घडत असतात.

त्यामुळे ३२ वर्षांचा दोन मुले असलेला नवरा हा काही बालविवाहाचा परिणाम नसावा.

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Aug 2010 - 12:10 pm | llपुण्याचे पेशवेll

सदर उदाहरणात मानसिकदॄष्ट्या अविकसित दोहोंपैकी कोणी आहे असे म्हटलेले नाही. त्यामुळे तो मुद्दा बाद. रोग निदान न झाल्यामुळे शारीरीक दृष्ट्या अविकसित होते असंही म्हणता येत नाही . मग लहान वयात लग्नं झालं म्हणून हे झालं असं कसं म्हणता ? पटले नाही.

बरखा's picture

10 Aug 2010 - 9:56 pm | बरखा

मी १००% दोष लहान वयातिल लग्नाला देत नाही.पण अजुनही काही ठिकाणी लवकर लग्न करतात आणि लवकर नातव॑ड हव आहे अस म्हनतात्,अशावेळी सगळ्याच मुली १८ व्या वर्षी आई होण्यास समर्थ असतात असे नाही.आज मुली २८ते ३० हे वय लग्न व मुल होण्यास मानतात्.अस असताना वयाच्या २३व्या वर्षिच दोन मुल ?केवळ अधुर्‍या माहिती अभावी तिने दोन मुला॑त तीन वर्षाचे अ॑तर ठेवले,पण विचार करता,दुसरे मुल अजुन उशिरा झाले असते तरी चालले असते.त्यात हवी ती योग्य काळजी तिने घेतली नाही.पहिले मुल सुध्द्दा लग्ना न॑तर लगेच दोन महिन्यात गोळ्या घेउन लवकर ठेवले.गरज नसताना केवळ योग्य मार्गदर्शना अभवी तिने थोडी घाई केली.असो हा ज्याच्या त्याच्या निर्णय असतो.पण हेच जर वय जरा २३च्या पुढे असते तर कदाचीत त्या मुलीने कोणाच्या ही दबावाला बळी न पड्ता योग्य तो निर्णय घेतला असता.लहान वयात आपले निर्णय स्वताला घेता येतातच असे नाही.म्हणुण लग्नच जर २२/२३च्या न॑न्तर झालि तर कदाचीत लहान वयातिल काही घटना ट्ळु शकतिल एवढेच.

मधुशाला's picture

11 Aug 2010 - 3:33 am | मधुशाला

या घटनेचा आणि लहान वयात लग्न होण्याचा संबंध लक्षात आला नाही... काही विशिष्ट जातीत बहुसंख्यांची याच वयात लग्ने होतात.

आणि ते सुद्धा हिंदू विवाहकायद्याच्या चौकटीत राहून किंवा असं म्हणू की त्याचा भंग न होता! हे वाचा.
(दुवादार)बेसनलाडू

नितिन थत्ते's picture

12 Aug 2010 - 8:44 am | नितिन थत्ते

लग्नाचे किमान वय १८ हे १९७७ च्या आसपास केव्हातरी ठरले. त्यापूर्वी बहुधा किमान वय १५ होते. मधल्या काळात १६-१८ च्या दरम्यान बहुसंख्य लग्ने होत असावीत.

लग्नाचे वय वाढवण्यात शारीरिक कारणांपेक्षा सामाजिक-एम्पॉवरमेंट (मुलगी मानसिक दृष्ट्या सक्षम असणे, काही किमान शैक्षणिक पात्रता येण्याची अपेक्षा) कारणांचाही विचार आहे. १२-१३ व्या वर्षी वयात आल्यावर १८ व्या वर्षी मूल होण्यात शारीरिक अक्षमता असण्याची शक्यता खूपच कमी आहे.