गाभा:
मिसळपाव या संकेतस्थळाने अनेक विषयात आघाडी घेतली आहे. तात्काळ आणि तात्काळीक चर्चा म्हणजेच चॅटींग असे एक शिरपेच मिसळपाव वर असावा असे मला वाटते.
खरडवही मध्ये एकास एक अशी चर्चा होते आणि ती इतरांना पाहता / वाचता येते.
व्यक्तिगत निरोप ( पोस्टहापिस) हे दोघातील संवादाचे चांगले रुप आहे.
काथ्याकूट, जनातलं, मनातलं हे संकेतस्थळावरचं दिर्घवेळ आणि स्थायी असणारे रुप आहे.
प्रस्तावित चॅटींग मध्ये एखाद्या वर्तमानपत्राचा दुवा, राजकिय बातम्या, काही शिफारसी इत्यादी चर्चीले जाऊ शकतात आणि दुसर्यादिवशी लगेच पुसलेही जाऊ शकतात.
बाकी माझ्या मांडणीत काही त्रुटी आहेत त्या विश्वकर्म्याशी अथवा सरंपचसाहेबाशी बोलतोच बोलतो.
या शब्दाला मिसळपाववाले काही झणझणीत शब्द सुचवतील अशी अपेक्षा आहे.
प्रतिक्रिया
5 May 2008 - 6:33 pm | नारदाचार्य
कट्टा किंवा चावडी किंवा पार. कसं वाटतंय? कल्पना सुंदर. जमवता आली तर त्याहून सुंदर.
5 May 2008 - 6:43 pm | इनोबा म्हणे
कट्टा किंवा चावडी किंवा पार. कसं वाटतंय? कल्पना सुंदर. जमवता आली तर त्याहून सुंदर.
मिसळपाव हे एक गाव असल्याने,'चावडी' हा शब्दप्रयोग योग्य वाटतोय.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
5 May 2008 - 6:47 pm | नारदाचार्य
कट्टा किंवा पारच उचित वाटतंय. चावडीवर किती नाही म्हटलं तरी कायदेकानून वगैरे प्रकार येतात. त्यामुळं संकोच होतो.
5 May 2008 - 6:46 pm | लिखाळ
काही दिवसांपूर्वी मी याच धर्तीवर 'खरडायचा फळा' असावा यासाठी मिपाकरांचा कौल मागीतला होता. त्याला प्रतिसादसुद्धा होकाराचे आले होते.
http://misalpav.com/node/132
अशी सोय झाली तर थोड्या वेळापुरते ज्याचे महत्त्व असते असे तत्कालिक विषय मांडुन लगेच दोन दिवसात फळा पुसता येईल. वाढदिवस, सण यांच्या शुभेच्छा, प्रासंगिक बातम्या यांसाठी या सोयीचा उपयोग होईल.
--लिखाळ.
5 May 2008 - 7:09 pm | चेतन
गप्पा कसं वाटेल (मिळ्मिळीत तर नाही ना..)
5 May 2008 - 7:19 pm | मन
ही नावं कशी वाटतात?
म्हंजे नावातच,"गोंधळ घालण्याचा पुर्ण अधिकार असलेल्या गप्पा" हे सूचित होइल.
(गो.ग. हे त्याचे लघु रुप्. ,शॉर्ट फॉर्म.)
किंवा
गप्पाष्टक म्हंजे गप्पांचं एक एकक, आणी अशे अनेक कप्पे म्हंजे गप्पाष्टके.
किंवा
गोल गप्पा, किंवा टेबल गप्पा.
(आपण मिसळ खात खात टेबल भोवती घोळका करुन गप्पा मारत आहोत असं चित्र डोळ्यापुढे आणता येइल.)
किंवा अगदि नवीन शब्द आपण मराठी भाषेला देउ शकतो.
गटगप्पा.= गटामध्ये मारलेल्या गप्पा.!
किंवा कट्ट्यावरच्या गप्पा= गट्टा!
हा सामासिक शब्द पहा कसा वटतो ते.(ही दोन्ही नावे दोन तीन दा उच्चारुन बघा, म्हंजे त्यातील सहजता लक्षात येइल.)
गट गप्पा मध्ये मस्त पुनुरुक्ती होते "ग" ची.
बाकी कट्टा वगैरे नावं पण अगदि सुटेबल वाटतात.
(किंवा अधिक स्पष्ट नाव हवं असल्यास "मिसळ कट्टा.")
आपलाच,
"गट गप्पा " ह्या शब्दाचा पुरस्कर्ता,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे))
5 May 2008 - 7:25 pm | मन
हे नाव कसं वाटातय?
म्हण्जे जिथे गप्पा चालतात अशि गुंफा/गुहा ह्या अर्थाने सुद्धा
नाही तर :-
गप्पांच्या माळेत, गप्पा/संवाद गुंफा(माळा ह्या अर्थाने)
दोन्ही अर्थाने यथार्थ असं हे नाव , आत्ता सुचलं.
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
5 May 2008 - 7:50 pm | प्रभाकर पेठकर
नुसतेच त्तर्री.... कसे वाटते?
5 May 2008 - 7:53 pm | चतुरंग
चतुरंग
5 May 2008 - 7:53 pm | नारदाचार्य
हेही चालेल. पण काका, तुम्ही अजून थोडं काही काढा बुवा. हे म्हणजे पाकक्रिया उरकल्यासारखं वाटलं. तुमच्याकडून आणखी मार्मिक असं काही तरी हवंय.
5 May 2008 - 8:01 pm | प्रभाकर पेठकर
ऐक्लस काऽऽऽ कसं वाटतं?
5 May 2008 - 8:17 pm | नारदाचार्य
ही पुढची पायरी. इथं जर काका दिसताहेत. अजून पुढं. पदार्थ आत्ता कुठं शेगडीवर चढतोय.
कुटाणं असा एक शब्द आला डोक्यात.
5 May 2008 - 9:26 pm | अभिता
१)दुनियादारी हे नाव कसे वाटेल.
२)चव्हाटा
३) इंद्रदरबार
5 May 2008 - 9:00 pm | चतुरंग
१ - 'वटवट!'
२ - 'धुळवड!'
३ - 'रामराम पाव्हनं!'
चतुरंग
5 May 2008 - 11:19 pm | शेखर
मला वाटते....
१. चकाट्या पिटा
२. तुंबड्या लावा
6 May 2008 - 12:06 am | विसोबा खेचर
वरील सर्व पर्याय वाचले. त्यातले बरेचसे चांगले आहेत. परंतु त्यातील चव्हाटा हा शब्द मला सर्वाधिक पसंत पडला. हा शब्द अगदी अस्सल वाटतो!
असो, मिपावरील पहिल्याच लेखनाकरता आमचे जुने मनोगतीय मित्र द्वारकानाथ कलंत्री यांचे अभिनंदन. मिपावरील एका लेखात आम्ही त्यांचा उल्लेख मथुरादास जलंत्री असा केला आहे. ते हलके घेतील अशी खात्री आहे! :)
असो...
कलंत्रीसाहेब हे कडवे मराठीप्रेमी व मराठीवादी आहेत. पूर्वी अनेकदा 'रोजच्या सहज वापरात येणार्या साध्या साध्या, आणि अगदी प्रचलित असलेल्या इंग्रजी शब्दांकरता पर्यायी मराठी शब्दांचा अट्टाहास का?' या मुद्द्यावरून आम्ही कलंत्रीसाहेबांशी वाद घातलेला आहे, वेळप्रसंगी त्यांची टवाळीही केली आहे. परंतु त्यामुळे कधीच चिडून न जाता, आमची टवाळीदेखील खिलाडूवृत्तीने घेऊन कलंत्रीसाहेबांनी 'मराठीचा व पर्यायी मराठी शब्दांचा' आग्रह सुरूच ठेवला आणि म्हणूनच आम्हाला कलंत्रीसाहेबंच्या या कडव्या मराठीवादाचं आजही कुठेतरी कौतुकच वाटतं/तेव्हाही वाटत असे, हे या निमित्ताने आम्ही प्रांजळपणे कबूल करत आहोत! :)
सदरच्या चर्चाप्रस्तावातदेखील कलंत्रीसाहेबांनी 'चॅटिंग' या शब्दाकरता खास कलंत्रीस्पेशल असा 'गटवार तात्काळ चर्चा' हा शब्द वापरलेला पाहून अंमळ मौज वाटली! :)
असो, मिपा कलंत्रीसाहेबांचंच आहे व येथे त्यांच्या कडव्या मराठीवादाचं आणि मराठीप्रेमाचं आम्ही मनापासून स्वागतच करत आहोत...
आपला,
(मथुरादासांचा जुना भांडखोर मित्र!) तात्या.
:)
6 May 2008 - 10:19 am | मदनबाण
चव्हाटा हा शब्द मला सर्वाधिक पसंत पडला. हा शब्द अगदी अस्सल वाटतो!
हेच म्हणतो..... (मला चावडी हे सुद्दा फार आवडल..)
मदनबाण.....
6 May 2008 - 10:28 am | विसोबा खेचर
"तात्याला चव्हाट्यावर येऊन तमाशा करायची जुनी सवय आहे!"
असं माझे हितशत्रूही नेहमीच म्हणत असतात! आणि मलाही तो शब्द अधिक आवडतो! :)
चार भिंतीत कुढत कुढत भांडून जगापुढे आपली खोटी प्रतिष्ठा जपण्यापेक्षा चव्हाट्यावरची भांडणं केव्हाही अधिक दिलखुलास असतात, मन मोकळं करणारी असतात असं माझं मत आहे... :)
आपला,
(हितशत्रूंना पुरून उरणारा चव्हाट्यावरचा निर्ल्लज्ज तमासगीर!) तात्या. :)
6 May 2008 - 10:30 am | चतुरंग
'चव्हाटा' हा शब्द मला फारसा आवडला नाही कारण ह्या शब्दात एकप्रकारचा निगेटिव्ह सेन्स आहे.
आपण सर्वसाधारणपणे हा शब्द 'ही गोष्ट चव्हाट्यावर आली हे काही चांगलं झालं नाही बरं का', अशा अर्थाने वापरतो.
त्यामुळे अजून वेगळ्या शब्दाचा शोध जारी ठेवावा.
चतुरंग
6 May 2008 - 10:35 am | विसोबा खेचर
'चव्हाटा' हा शब्द मला फारसा आवडला नाही कारण ह्या शब्दात एकप्रकारचा निगेटिव्ह सेन्स आहे.
आपण सर्वसाधारणपणे हा शब्द 'ही गोष्ट चव्हाट्यावर आली हे काही चांगलं झालं नाही बरं का', अशा अर्थाने वापरतो.
रंगा, तुझ्या मताचा मी आदर करतो. परंतु एखादी गोष्ट चव्हाट्यावर आली म्हणून फारसं काही बिघडत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे..
असो..
तात्या.
6 May 2008 - 9:38 am | ऋचा
हे नाव कस आहे?
सगळे जमा व्हा आणि गप्पा हणा..........
6 May 2008 - 9:50 am | मधु मलुष्टे
http://www.misalpav.com/node/1304
असं काहीस मागे पण लिहिल होत.............
6 May 2008 - 10:04 am | धमाल मुलगा
दुनियादारी छानच...सु.शि.ची आठवण झाली :)
चव्हाटा ही उत्तम! तसच पार देखील सुटेबल वाटतंय पण 'अपील' नाय झालं....चव्हाटा म्हणलं की कसं ठणाणा बोंबलायला हक्काची जागा वाटते ;)
मनोबा, आयला शब्द भारी शोधलेस, पण लेका ते लै च 'पांढरी व्हाईट्ट कालर' वाले वाटताहेत... शर्टाचं पहिलं बटन लावून बाररुममध्ये बसलेल्या वकिली न चालणार्या वयस्कर वकिलांच्या ऐकिव केसेसच्या पोस्टमार्टेमची चर्चा ऐकत बसल्यासारखं वाटलं....(दिल पे मत ले यार....आपण हैच साला तिरक्या डोस्क्याचा...गंमत करतोय मी)
ओ अना ताई/दादा/काका/काकू/आजी/आजोबा (ऍज ऍप्लिकेबल :) ) ,
ते इंद्रदरबार नको हो.....
आम्ही तिच्यामारी जन्मजात चंद्रसेन, त्यात आमचे तात्याबा इंद्रदेव....काय रंभा, उर्वश्या (आणि अनुष्का ;) ) नाचवायच्यात काय?
उगाच एखाद्या टैमाला धरायचो अनुष्काचा हात आणि तात्या इंद्र द्यायचे शाप.."जा...भूलोकात जाऊन गाढव होशील (! परत आणखी? ) आणि सावळ्या कुंभाराला मदत केल्यासच तुला शिक्षेतुन मुक्ती मिळेल....."
झाली का आमची पंचाईत?
बाकी वाढदिवसांच्या शुभेच्छांसाठी पुसता येणार्या फळ्याची कल्पना उ...त्त..म! जागा वाया नाही जायची!!!
आमचीही भरः
१.चकाट्या
२.चकाट्यांचा माळ
३.(जरा भारदस्त, जुन्या काळचं हवं असेल तर) सदर (म्हणजे ती हो...आम्च्या वाड्यात असते ती...)
४.फड
पघा काय चालतंय का ते!
6 May 2008 - 2:14 pm | मन
शर्टाचं पहिलं बटन लावून बाररुममध्ये बसलेल्या वकिली न चालणार्या वयस्कर वकिलांच्या ऐकिव केसेसच्या पोस्टमार्टेमची चर्चा ऐकत बसल्यासारखं वाटलं
भारी रे!
दिल पे काय को लुं? मस्त चाललय......
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
6 May 2008 - 10:25 am | ऋचा
राग कोणा ला येतो माहीतेय का?
जो करतो ना त्याला :D
स्वगतः जंगल मे मोर नाचा, किसी ने ना देखा,
हम जो थोडीसी पी के जरा झूमे...सब ने देखा
मग कोणी पहाणार नाही अशा ठीकाणी नाच >:D<
6 May 2008 - 10:32 am | विसोबा खेचर
मग कोणी पहाणार नाही अशा ठीकाणी नाच ><
हा हा हा, हे मस्त! :))
6 May 2008 - 10:36 am | धमाल मुलगा
:)) सह्ही! नगच दिसतेयस तू पण....वेलकम टू जंगल !!!
चल गं...मला कुठं आला राग? आपल्याला तर बॉ मज्जा वाटते. अशीच एकमेकांची खेचायची...हसायचं खिदळायचं..बाकी रडारडी करायला प्रत्येकाला आहेच की आपापली खोली! इथं सगळ्यांबरोबर यायचं ते काय चिडायला आणि रुसायला?
तू काहीही बोल...आपलं एक तत्व आहे...'निर्लज्जं सदा सुखी' त्यामुळे...नो पर्सनली घेइंग बिझनेस...क्या समझे?
मिपावरच्या मोकळ्याढोकळ्या वातावरणाचा मूळ विषय साफ बाजूलाच पडेल अश्या रितीने कुणी गैरफायदा घेऊ नये असे वाटते! सभसदांना गप्पा मारण्यास मिपाची कधीच मनाई नव्हती/नसेल, परंतु सभासदांनीही ही मोकळीक तेवढीच तारतम्याने घ्यावी असे वाटते! मूळ विषय साफ बाजूला पडेल व फक्त दोघांच्याच गप्पांना कंटाळून इतर मंडळी ह्या चर्चेत भाग घ्यायचे थांबवतील असे वर्तन कुणा सभासदांकडून होऊ नये असे वाटते! आणि म्हणूनच वानगीदाखल हा प्रतिसाद ठेऊन ऋचा यांचे विषयांतर करणारे व प्रत्येक वेळेस धमाल मुलावर वैयक्तिक शेरेबाजी करणारे अन्य सर्व प्रतिसाद येथून काढून टाकले आहेत याची नोंद घ्यावी!
-- जनरल डायर.
6 May 2008 - 10:31 am | केशवसुमार
कांगाळ्या
कुजबुज
टवाळक्या
कसे वाटते?
6 May 2008 - 10:37 am | ऋचा
कांगाळ्या म्हणजे काहीतरीच वाट्ट्
कुजबुज कानगोष्ट :)]
चर्चापीठ कस वाट्ट ????
6 May 2008 - 12:56 pm | परेश
तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे | तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे
6 May 2008 - 1:04 pm | अभिता
चकाट्या मस्तच
6 May 2008 - 1:33 pm | अन्जलि
chakatya ha shabda mast ani yogya vatato karan nahitari apan mipavale sagale keval vel ghalvatasato ani jatajata kahi mahiti gola karat asato tevha mala vatate ki chakatya pitne (nikhal manoranjan) barobar ahe. he suru honyachi aturtene vat bhaghat ahe.
6 May 2008 - 1:56 pm | प्रभाकर पेठकर
anjali,
tumhI marathit lihinyaachaa kadhich prayatna karIta naahI. ase ka? Maazyaasaarakhaa maThThamaaNUs maraaThIt lagech type karaayalaa shikU shakato tar tumhaalaa kaa jamu naye?
raaj Thakarenchaa upadesh paTat naahI kI dokyat shiratach naahI? problem kay aahe.
tumachyaa jaagI mI asato tar maraathI typing shikaNe evaDhI saadhI goShTa suddhaa aapalyaalaa yeta naahI hyaachI mlaa bhayaMkar laaj vaaTalI asatI.
prayatna karaa......prayatna karaa.....prayatnaa karaa.....!
6 May 2008 - 1:41 pm | ऋचा
चकाट्या मस्तच
हे नाव छान वाट्टय =D>
6 May 2008 - 1:48 pm | स्वयंभू (not verified)
"बैठक" ह शब्द कसा वाटतो?
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
6 May 2008 - 1:55 pm | मनस्वी
गुळमुळीत.
6 May 2008 - 1:59 pm | धमाल मुलगा
कोणत्या अर्थाने घेऊ त्यावर अवलंबून आहे....;)
बैठक = गुळमुळीत
बैठक = भारदस्त
बैठक = शौकिन
बैठक = रंगेल
6 May 2008 - 2:59 pm | आंबोळी
बैठक म्हटले की सगळे जमुन तात्याबा महाराजांचे प्रवचन तोंडी लावत घुटका घुटका सिंगलमाल्ट घेतायत असे वाटते.
(तात्याबाभक्त सिंगलमाल्टी) आंबोळी
6 May 2008 - 2:15 pm | प्रभाकर पेठकर
गझाली... हेही एक मस्त समर्पक नाव होऊ शकेल.
गझाली - द- गप्पा..
7 May 2008 - 11:48 pm | पक्या
--- गझाली... हेही एक मस्त समर्पक नाव होऊ शकेल.
गझाली - द- गप्पा..
काहीतरीच अगदी - गझाली , तर्री, ऐक्लस का...
माझे मतः कट्टा
पक्या
6 May 2008 - 2:17 pm | मन
हा "अड्डा" शब्द कसा वाटतो हो?
किंवा गप्पांचा अड्डा = गड्डा!
हे कसय?
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
6 May 2008 - 2:19 pm | मन
"दंगल "हा शब्द कसा वाटतो?
कुस्तीची दंगल होते ना, तश्शीच""गप्पांची दंगल" घडवायला काय हरकत आहे?
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
6 May 2008 - 2:21 pm | मन
"टपल्या " हा शब्द कसा वाटतो?
तसेही बर्याचदा इथे गप्पात टपली मारतोच की एखाद्याला....
तेच नाव ठेवलं "ऑफिषियली" तरं कसं वाटेल?
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
6 May 2008 - 2:46 pm | कलंत्री
इतक्या सर्व लोकांनी मनापासून भाग घेतला आहे त्याबद्दल सर्वांचे आभार.
परंतु अश्या गप्पा शक्य आहे काय ते मात्र अजूनही स्पष्ट झाले नाही, आपले विश्वकर्मा यांच्या अनूमोदनाशिवाय सर्व व्यर्थ आहे.
चिंतातुर ( मथुरादास)
6 May 2008 - 3:04 pm | धमाल मुलगा
:)
एक 'थर्ड पार्टी जावा बेस्ड चॅट क्लायंट' जोडला की हे शक्य होईल असं मला वाटतं
अर्थात, पुसण्याजोग्या फळ्याची उत्तम कल्पना कशी अंमलात आणता येइल हे मात्र नाही सांगता येणार.
6 May 2008 - 3:10 pm | आनंदयात्री
'थर्ड पार्टी जावा बेस्ड चॅट क्लायंट'
लै लै भारी ;)
6 May 2008 - 3:16 pm | धमाल मुलगा
अरे बाबा, मिळतात असे चॅट क्लाएंट्स...
फक्त त्यांच्या जाहिराती सहन कराव्या लागतात...जनरली पॉप-अप्स मध्ये येतात त्या....जर क्लाएंटचं 'फ्री' व्हर्जन घेतलं तर!
6 May 2008 - 3:26 pm | आनंदयात्री
मी आपली अशीच गंमत केली !
हे बघ .. मराठीत चॅट .. बहुदा आपल्या ओंकारचे आहे हे संस्थळ .. चु.भु.द्या घ्या
6 May 2008 - 3:29 pm | धमाल मुलगा
शाब्बास रे पठ्ठे,
आव आणायचा काही कळत नसल्याचा आणि एकदम मराठी चॅट साईटचा दुवा टाकून समोरच्याला धोबीपछाड ?
छान! मराठी चॅट साईट/क्लायंट मिळाला तर काय बहार येइल नै?
6 May 2008 - 2:50 pm | धमाल मुलगा
च्यामारी,मनोबा,
काय माणूस आहेस का समानार्थी शब्दकोश?
अरे किती शब्द? धडाधड...धडाधड...धडाधड !!!
धन्य आहेस बाबा!
कळ्ळं हो कळ्ळं दादा!!! :))
गप्पांचा अड्डा = गप्पाड्डा कसं वाटतं?
पेठकर काकांचा 'गजाली' तर बेष्टच !!! गजाल्या करण्यात आपण सगळेच (!) पटाईत आहोतच :)
6 May 2008 - 2:54 pm | ध्रुव
:)
--
ध्रुव
6 May 2008 - 2:56 pm | धमाल मुलगा
खलबत !!!
खलबत...खलबत...नको रे भाऊ...
च्यायला काहीतरी झोल करणार असं वाटतय...उगाच घाशीराम कोतवाल आठवलं
अजुन काहीतरी सांग ना.
6 May 2008 - 3:29 pm | मनस्वी
मंडई..??
भाजीमंडईत जसा आरडाओरडा, देवाणघेवाण, चढाओढ, बार्गेनिंग, बाचाबाची, सुसंवाद चालू असतात.. तसे.
7 May 2008 - 1:20 pm | अन्जलि
होय हो पेथ्कर्सहेब मल पन खुप वैत वातते मरथि त्य्पिन्ग येत नहि म्हनुन पन कय कर्नर बघा असे कहितरि कसेतरि लिहिले जते अनि मग त्य लिहिन्यत्लि मजा निघुन जाते म्हनुन मे प्रयतन कर्ते आहे थोद्य दिवसनि जमेल तोपर्यन्त ..... क्शमस्व.
7 May 2008 - 5:10 pm | प्रभाकर पेठकर
वा...वा.. मराठी (?) प्रतिसाद आवडला. मराठी टंकलेखन इतकेही कठीण नाही. मिपाच्या १००% सदस्यांना मराठी टंकलेखन उत्तम जमते. फक्त तुम्हालाच इतकेऽऽऽऽ कठीण जाते.
कदाचित स्वतःची ओळख लपविण्यासाठी तुमचा हा सर्व अट्टाहास चालला असावा. मर्जी तुमची.
7 May 2008 - 1:56 pm | काळा_पहाड
अंजलीताईंचा प्रयत्न आवडला. तुम्ही प्रयत्न करीत राहा अंजलीताईं. जे तुम्ही लिहिलंय ते आम्हाला समजले. शुभेच्छा.
मूळ विषय : गुह्राळ कसे वाटते ?
नाहीतर मग चह्राट, दळ्ण
सदासर्वदा तो मी नव्हेच
7 May 2008 - 3:19 pm | अभिता
बंगलोरची मिसल्-पाव ओसरी वाचुन सापडला शब्द
ओसरी कसा वाटतो.
8 May 2008 - 12:01 am | झकासराव
आवडेल अशी सुविधा असेल तर.
चावडी,गजाली हे दोन शब्द विशेष आवडले.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
8 May 2008 - 12:10 am | पक्या
सुचलेला अजुन एक शब्दः टपरी
8 May 2008 - 3:56 pm | अन्जलि
ओलख लप्वन्यआचा प्रश्नच नहि पन जर प्रयत्न करुन्हि येत नसेल तर काय कर्नर? आता थोदे थोदे जमेल असे वातते चुक्भुल्द्यवि घ्यवि. मुल विश् यचे कय झले? चतिन्ग कधि सुरु होतेय ह्यचि वात बघ्तेय.
12 May 2008 - 4:13 pm | फक्त संदीप
L) मी संदीप,एक वाचक
दरबार हा शब्द कसा वाटतो