खरडायचा फळा

लिखाळ's picture
लिखाळ in काथ्याकूट
27 Sep 2007 - 7:15 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,

मिसळपावावर सारखे चमचमित मिसळीचे चित्र पाहून सारखी भूक लागते आणि काहीबाही चरत रहायल्यामुळे वजन वाढायला लागले आहे:)

हे माझे प्रकटन कोठेतरी करावे असे मला वाटले. पण ते कोठे लिहावे ते समजेनापण. कारण हा तर काही चर्चा विषय नाही, लेख नाही किंवा कवीता. मग सदस्यांच्या मनात आलेले असले स्फुट विचार, काही एक दोन वाक्ये की जी सर्वांनी पहावीत त्यावर थोडे स्मितहास्य करावे कींवा आपले अनुभव सुद्धा लिहावेत असे ठिकाण मला दिसले नाही.
त्यावरुन असे काही ठिकाण या स्थळावर असावे असे वाटले.

तर मंडळी असे लहानसाहान प्रकटन करायचे एक पान, जेथे कोणी काही खरडू शकेल, इतर ते वाचू शकतील आणि चार दोन दिवसांनी ते सर्व नाहिसे होईल, याची गरज इथे आहे असे तुम्हाला वाटते का?

आपल्या कार्यालयात कॉफि पिण्याचा खोलित जसा एखादा फळा असतो, त्यावर कोणी तरी काही लिहून ठेवते लोक, येता जाता ते वाचतात आणि दुसर्‍या दिवशी ते पुसले जावून पुन्हा लिहायला फळा कोरा असतो ! असे येथे असावे असे तुम्हाला वाटते का?

आपण अश्या पानाचा उपयोग कराल का? त्या पानाला भेट द्याल का?

असे करणे शक्य आहे का? (कोठल्या इतर संकेतस्थळावर अशी सोय आहे क?) 'आपापसात' या प्रकाराशी याचे साधर्म्य असले तरी या मध्ये एक सतत उघडलेले रिकामे पान असावे असे मला वाटते. आणि त्याचा उपयोग लोकांनी तेथे येवून करावा. (घरातल्या दंगा करणार्या मुलाला न्हाणीघरात कोंडतात तसे याचे स्वरुप नसावे.)

मंडळी आपल्या प्रतिसादांची वाट पाहत आहे.

आपलाच,
--लिखाळ.

प्रतिक्रिया

स्वाती दिनेश's picture

27 Sep 2007 - 7:25 pm | स्वाती दिनेश

घरातल्या दंगा करणार्या मुलाला न्हाणीघरात कोंडतात तसे याचे स्वरुप नसावे.
हे आवडले.
स्वाती

सर्किट's picture

27 Sep 2007 - 10:39 pm | सर्किट (not verified)

चांगली कल्पना आहे. हे तर मिसळपावाचे मुखपृष्ठच असावे.

- (सदोदित न्हाणीघरात) सर्किट

लिखाळ's picture

27 Sep 2007 - 10:53 pm | लिखाळ

प्रतिसादाबद्द्ल आभार.
अश्या मुखपृष्ठाला स्वागतपृष्ठ म्हणणे मला जास्त आवडेल.

'स्वागतपृष्ठ' हा शब्द कसा वाटतो?
'स्वगृह' या शब्दापेक्षा मला तरी तो जास्त स्वागतशील वाटतो.
-- (न्हाणीघराच्या दरवाज्यात) लिखाळ.

तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

बेसनलाडू's picture

27 Sep 2007 - 11:23 pm | बेसनलाडू

स्वागतपृष्ठापेक्षा 'न्हाणीघर'च ठेऊया का नाव? ;) पाहुणे/सदस्य आले की पाटपाणी किंवा चहापोहे (नि तोंडसुख) घ्यायच्या आधी हातापायावर पाणी घ्यायला न्हाणीघरातच जातील सिध्धा! बाहेर कधी येतील (की नाही ;) ) हा भाग वेगळा :)
पण कल्पना छान. एकूणच बाजारगप्पा/ट्रॅशटॉक/गॉसिप्स मराठी संकेतस्थळांचे एक ठळक वैशिष्ट्य ठरल्या पाहिजेत, असे माझे मत आहे :))
(शुचिर्भूत)बेसनलाडू

सर्किट's picture

27 Sep 2007 - 11:41 pm | सर्किट (not verified)

+१ !!

- (सहमत) सर्किट

तो's picture

28 Sep 2007 - 12:55 pm | तो

टेबलावर न जाणार्‍या येता जाता मारलेल्या गप्पा मिसळपावावर 'काउंटर' वर व्हाव्ह्यात असे वाटते.

जुना अभिजित's picture

28 Sep 2007 - 1:54 pm | जुना अभिजित

काउंटर शब्दाशी सहमत.

पण 'हाटेलात कामाशिवाय बसू नये' किंवा 'येथे गप्पा मारत बसण्याचे वेगळे पैसे आकारले जातात ' अशा पाट्या तर नाहियेत ना??

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

बेसनलाडू's picture

28 Sep 2007 - 1:55 pm | बेसनलाडू

मालक पुण्याचे नाही तर ठाण्याचे असल्याने पाट्या लागायच्या नाहीत, असे वाटते ;)
बाकी 'काउन्टर' बद्दल +१!!! मस्त!

राजे's picture

29 Sep 2007 - 1:24 am | राजे (not verified)

असा प्रयोग होणे आवश्यक आहे असे वाटते मला.

राजे
(*हेच राज जैन आहेत)

विसोबा खेचर's picture

29 Sep 2007 - 9:37 am | विसोबा खेचर

तर मंडळी असे लहानसाहान प्रकटन करायचे एक पान, जेथे कोणी काही खरडू शकेल, इतर ते वाचू शकतील आणि चार दोन दिवसांनी ते सर्व नाहिसे होईल, याची गरज इथे आहे असे तुम्हाला वाटते का?

हो वाटते! लिखाळराव आपली कल्पना उत्तमच आहे..

नीलकांता,

लेखनप्रकारात काथ्याकुट, जे न देखे, मनातलं/जनातलं या सोबतच इथे 'खरडायचा फळा' या नावाने एक विभाग सुरू कर अशी तुला विनंती! :)

लिखाळराव,

आमच्या नीलकांतशेठला सवड मिळाली की आपल्या प्रस्तावावर अवश्य अंमलबजावणी करू आणि मिसळपाववरही एक 'खरडायचा फळा' सुरू करू तिचायला! :)

तात्या.

विसोबा खेचर's picture

29 Sep 2007 - 12:37 pm | विसोबा खेचर

'सार्वजनिक खरडवही' हा प्रकार मला रंजक वाटतो आहे व ती येथे सुरू करण्याचे मी व्यक्तिशः स्वागतच करीन. परंतु त्याबाबत पंचायत समितीचं म्हणणं काय आहे हेही ध्यानात घेतलं पाहिजे आणि या बाबतीत पंचायत समितीचाच निर्णय अंतिम राहील..

तात्या.

लिखाळ's picture

3 Oct 2007 - 8:26 pm | लिखाळ

आपल्या सर्वांचे प्रतिसादाबद्दल अनेक आभार.

तात्यांनी या कल्पनेला हिरवा कंदिल दाखवल्याने फार आनंद झाला. पंचायतसमितीला योग्य वाटत असेल तर त्यांनी लवकरच असा फळा बनवावा अशी विनंती.
-- (आभारी) लिखाळ.

तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

चंद्रप्रभा's picture

3 Oct 2007 - 9:18 pm | चंद्रप्रभा

छान कल्पना
-चंद्रप्रभा

जेनी...'s picture

12 Mar 2016 - 2:34 am | जेनी...

खरडफळाप्रेमी
१) जेनी
२) रंगा काका ( श्रीरंग जोशी )
३) सासुबै ( पैसाबै )
४) अ‍ॅश ( यशोधरा )
५) कुंजुस काका ( कंजुस )
६) विटु काका ( विटेकर )
७) गुर्जी ( आत्मबंध )
८) पर्चेतस ( प्रचेतस )
९) ...........

अत्रुप्त आत्मा's picture

12 Mar 2016 - 9:14 am | अत्रुप्त आत्मा

धन्यवाद बालिके. चांगले उत्खनन केलेस.

श्रीरंग_जोशी's picture

12 Mar 2016 - 2:44 am | श्रीरंग_जोशी

खरडफळ्याच्या जन्माची कथा प्रथमच कळली :-) .

धन्यवाद जेनी.

अन्नू's picture

12 Mar 2016 - 6:16 am | अन्नू

इतका जुना धागा वर?? तोही अडीच वाजता!

जेनीला रातची झोप लागत नै वाटतं! ;)

श्रीरंग_जोशी's picture

12 Mar 2016 - 7:11 am | श्रीरंग_जोशी

माझ्या माहितीप्रमाणे ती अमेरिकेत असते.

अन्नू's picture

12 Mar 2016 - 7:14 am | अन्नू

तर्रीच बोललं इतक्या उशीरा कशा काय आल्या? :))