खरडायचा फळा
नमस्कार मंडळी,
मिसळपावावर सारखे चमचमित मिसळीचे चित्र पाहून सारखी भूक लागते आणि काहीबाही चरत रहायल्यामुळे वजन वाढायला लागले आहे:)
हे माझे प्रकटन कोठेतरी करावे असे मला वाटले. पण ते कोठे लिहावे ते समजेनापण. कारण हा तर काही चर्चा विषय नाही, लेख नाही किंवा कवीता. मग सदस्यांच्या मनात आलेले असले स्फुट विचार, काही एक दोन वाक्ये की जी सर्वांनी पहावीत त्यावर थोडे स्मितहास्य करावे कींवा आपले अनुभव सुद्धा लिहावेत असे ठिकाण मला दिसले नाही.
त्यावरुन असे काही ठिकाण या स्थळावर असावे असे वाटले.
तर मंडळी असे लहानसाहान प्रकटन करायचे एक पान, जेथे कोणी काही खरडू शकेल, इतर ते वाचू शकतील आणि चार दोन दिवसांनी ते सर्व नाहिसे होईल, याची गरज इथे आहे असे तुम्हाला वाटते का?
आपल्या कार्यालयात कॉफि पिण्याचा खोलित जसा एखादा फळा असतो, त्यावर कोणी तरी काही लिहून ठेवते लोक, येता जाता ते वाचतात आणि दुसर्या दिवशी ते पुसले जावून पुन्हा लिहायला फळा कोरा असतो ! असे येथे असावे असे तुम्हाला वाटते का?
आपण अश्या पानाचा उपयोग कराल का? त्या पानाला भेट द्याल का?
असे करणे शक्य आहे का? (कोठल्या इतर संकेतस्थळावर अशी सोय आहे क?) 'आपापसात' या प्रकाराशी याचे साधर्म्य असले तरी या मध्ये एक सतत उघडलेले रिकामे पान असावे असे मला वाटते. आणि त्याचा उपयोग लोकांनी तेथे येवून करावा. (घरातल्या दंगा करणार्या मुलाला न्हाणीघरात कोंडतात तसे याचे स्वरुप नसावे.)
मंडळी आपल्या प्रतिसादांची वाट पाहत आहे.
आपलाच,
--लिखाळ.
वाचन
15247
प्रतिक्रिया
0