प्रिटी वूमनचे धर्मांतर

सुनील's picture
सुनील in जनातलं, मनातलं
6 Aug 2010 - 7:58 pm

आमच्या लाडक्या प्रिटी वूमनने धर्मांतर केले असून तिला आता यापुढे हिंदू म्हणून ओळखले जावे, अशी अपेक्षा आहे.

बातमीचा दुवा

सदर प्रिटी वूमनचा राजकुमार यापूर्वीच बौद्धधर्मिय झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.

कॅशियस क्लेचा महंमद अली होतो. पाकिस्तानी क्रिकेटपटू युसुफ योहाना मुस्लिमधर्म स्वीकारतो. आमचे लाडके गझलसम्राट सुरेश भटदेखिल आयुष्याच्या अखेरीस बुद्धाला शरण जातात. अश्या ह्या थोरा-मोठ्यांच्या धर्मांतरामागे नक्की काय प्रेरणा असाव्यात? खरोखरच वेगळी जाणीव की केवळ प्रसिद्धीचा शौक?

समाजबातमी

प्रतिक्रिया

निखिल देशपांडे's picture

6 Aug 2010 - 8:13 pm | निखिल देशपांडे

प्रिटी वुमन वाचल्यावर आधी वाचले मर्जिनाने धर्मांतर केले का काय???
आता प्रिटी वुमन पुर्ण झाले नाही ना???

सुनील's picture

7 Aug 2010 - 6:37 am | सुनील

प्रिटी वुमन वाचल्यावर आधी वाचले मर्जिनाने धर्मांतर केले का काय???
नाही निखिलराव, मर्जिनाने धर्मांतर केलेले नाही!

आता प्रिटी वुमन पुर्ण झाले नाही ना???
अद्याप नाही पण होईलच लवकर!

श्रावण मोडक's picture

7 Aug 2010 - 1:28 pm | श्रावण मोडक

हो... आम्ही वाट पाहातो आहोतच. चिंता नसावी. निवांत करा पूर्ण! ;)

मृत्युन्जय's picture

6 Aug 2010 - 8:13 pm | मृत्युन्जय

यात प्रसिद्धीचा शौक असेल असे मला तरी वाटत नाही. तुम्ही दिलेली उदाहरणेच बघा ना कोणाला प्रसिद्धीची गरज होती? आता हे सगळे राखी सावंतने केले असते तर गोष्ट वेगळी होती.

मुक्तसुनीत's picture

6 Aug 2010 - 8:24 pm | मुक्तसुनीत

प्रस्तावलेखकाने दिलेल्या यादीत आंबेडकरांच्या धर्मांतराचा समावेश नसावा याचे आश्चर्य वाटले. माझ्या अंधुक आठवणीप्रमाणे , कवि ग्रेस यांनीही ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. चूभूदेघे.

असो. प्रत्येक धर्मांतराचे संदर्भ वेगवेगळे आहेत असे वाटते. प्रत्येकाची गरज वेगळी, प्रत्येकाचे इंटरप्रिटेशन वेगळे.
इतिहासात बळजबरीने धर्मांतरे घडवून आणण्याची उदाहरणे आहेत. प्रेम-करुणा यांचा संदेश घेऊन धर्मांतरे होतात (या प्रकारच्या धर्मांतरावर प्रचारकी, प्रसंगी कडवेपणाचा आरोपही होतोच. ) कुणी मोठा नेता आपल्या अनुयायाना नव्या धर्माची दिशा दाखवतो. कुणाची कारणे अतिशय वैयक्तिक असतात.

देवाधर्माच्या, श्रद्धाविश्वासांच्या बाबतीत कुणाचा प्रवास कसा होईल सांगता येणे कठीण आहे. माझा "वहाणा" नावाचा लेख लिहिण्याची प्रेरणा अशा स्वरूपाची होती.

असो. प्रत्येक धर्मांतराचे संदर्भ वेगवेगळे आहेत असे वाटते. प्रत्येकाची गरज वेगळी, प्रत्येकाचे इंटरप्रिटेशन वेगळे.
इतिहासात बळजबरीने धर्मांतरे घडवून आणण्याची उदाहरणे आहेत. प्रेम-करुणा यांचा संदेश घेऊन धर्मांतरे होतात (या प्रकारच्या धर्मांतरावर प्रचारकी, प्रसंगी कडवेपणाचा आरोपही होतोच. ) कुणी मोठा नेता आपल्या अनुयायाना नव्या धर्माची दिशा दाखवतो. कुणाची कारणे अतिशय वैयक्तिक असतात.

अगदी अगदी. तरीही मला नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे मानवाला धर्मांतर करण्याची प्रबळ ईच्छा का होत असावी? जन्मतः च आपला धर्म कोणता असावा ह्याची निवड आपल्याला करता येत नाही हे मान्य. कोणत्याही धर्माची शिकवण वाईट कधीच नसते (आपण केलेलं इंटरप्रिटेशन वेगवेगळं असू शकतं, किंबहुना ते असतंच). तेव्हा दुसर्‍या धर्माबद्दल निर्माण झालेली आवड, त्या त्या धर्माची शिकवण (व्हॅल्यूज किंवा प्रिन्सीपल्स म्हणूयात) अंगीकारूनही जोपासता येते, त्यासाठी धर्मांतर करण्याची निकड का भासावी?

इकडे बर्‍याचदा ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे भेटतात. त्यांचा मुळ उद्देश तुमचं धर्मांतर व्हावं असाच असतो. मी त्यांना प्रत्येक वेळी तुम्हाला काय प्रिच करायचं ते करा पण कुणालाही धर्मांतर करण्यबद्दल आग्रह करू नका असेच सांगतो.

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Aug 2010 - 9:09 pm | बिपिन कार्यकर्ते

खरंय!!!

- (धर्मांतर न करताही ख्रिस्तभक्त)

सुनील's picture

6 Aug 2010 - 10:05 pm | सुनील

प्रस्तावलेखकाने दिलेल्या यादीत आंबेडकरांच्या धर्मांतराचा समावेश नसावा याचे आश्चर्य वाटले
आंबेडकरांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला कारण त्यांच्या धर्मांतराची जातकुळी वेगळी होती. ते वैयक्तिक नसून सामुहिक होते. त्याला थोडा राजकीय संदर्भ होता आणि मुख्य म्हणजे, ते धर्मांतर हे "अ" धर्म भावला म्हणून स्वीकारला असे असण्यापेक्षा "ब" धर्म नकोसा वाटला म्हणून सोडला, असे होते.

प्रत्येक धर्मांतराचे संदर्भ वेगवेगळे आहेत असे वाटते. प्रत्येकाची गरज वेगळी, प्रत्येकाचे इंटरप्रिटेशन वेगळे.
इतिहासात बळजबरीने धर्मांतरे घडवून आणण्याची उदाहरणे आहेत. प्रेम-करुणा यांचा संदेश घेऊन धर्मांतरे होतात (या प्रकारच्या धर्मांतरावर प्रचारकी, प्रसंगी कडवेपणाचा आरोपही होतोच. ) कुणी मोठा नेता आपल्या अनुयायाना नव्या धर्माची दिशा दाखवतो. कुणाची कारणे अतिशय वैयक्तिक असतात.

सहमत.

क्रेमर's picture

6 Aug 2010 - 8:26 pm | क्रेमर

धर्मांतर का केले असावे हे माहीत नाही. पण या प्रश्नावरून दस्तयवस्कीच्या 'इडियट' कादंबरीतील एक परिच्छेद येथे देण्याचा मोह आवरवत नाही.

Such omniscient gentlemen are to be found pretty often in a certain stratum of society. They know everything. All the restless curiosity and faculties of their mind are irresistibly bent in one direction, no doubt from lack of more important ideas and interests in life, as the critic of to-day would explain. But the words," they know everything, "must be taken in a rather limited sense: in what department so-and-so serves, who are his friends, what his income is, where he was governor, who his v.ife is and what dowry she brought him, who are his first cousins and who are his second cousins, and everything of that sort. For the most part these omniscient gentlemen are out at elbow, and receive a salary of seventeen roubles a month. The people of whose lives they know every detail would be at a loss to imagine their motives. Yet many of them get positive consolation out of this knowledge, which amounts to a complete science, and derive from it self-respect and their highest spiritual gratification. And indeed it is a fascinating science. I have seen learned men, literary men, poets, politicians, who sought and found in that science their loftiest comfort and their ultimate goal, and have indeed made their career only by means of it.

मुक्तसुनीत's picture

6 Aug 2010 - 8:34 pm | मुक्तसुनीत

याचा संदर्भ समजावून सांगितला तर आनंद होईल.

क्रेमर's picture

6 Aug 2010 - 9:07 pm | क्रेमर

प्रस्तावलेखकाला थोर-मोठे (प्रसिद्ध) लोक धर्मांतर का करतात? असा प्रश्न पडला आहे. प्रसिद्ध लोकांच्या जीवनाविषयी जाणून घेण्याची ओढ असण्याची प्रेरणा समजावून घेण्यासाठी व अशा ओढीची वैश्विकता अधोरेखित करण्यासाठी वरील परिच्छेद उद्धृत केला आहे. खाली या परिच्छेदाआधीचा संवाद देत आहे.

(कादंबरीचा दुवा. कादंबरी प्रताधिकार मुक्त आहे. लाभ घ्यावा.)

इन्द्र्राज पवार's picture

6 Aug 2010 - 8:56 pm | इन्द्र्राज पवार

धर्मांतराची प्रक्रीया ही आत्मीक शांतीसाठी एखाद्याने (किंवा ज्युलियासारख्या एकीने) केली तर सकृतदर्शनी तर त्यात वावगे मानायचे कारण नसावे कारण तो सर्वस्वी तसा निर्णय घेणार्‍याचा प्रश्न आणि खासगी बाब आहे. हिंदु धर्मातून बौद्ध वा मुस्लिम वा ख्रिश्चन झाले म्हणून आमच्या धर्माला कोणतीही ढाळ लागत नाही तद्वतःच दुसर्‍या धर्मातून येऊन आमचा हिंदू धर्म स्वीकारला म्हणून आम्हाला आनंद होण्याचे पण काही कारण असू नये. बर्‍याच वेळा असा बदल "स्वार्थी" कारणासाठीही असू शकतो.

किशोरकुमारने मधुबालाशी लग्न व्हावे म्हणून "करीम अब्दुल" बनने काय किंवा कायद्याच्या पळवाटा शोधुन काढुन धर्मेन्द्रने "दिलावर खान" होऊन हेमा मालिनीशी लग्न करणे काय, ही उदाहरणे पाहता हे दोन नग हिंदु धर्मातून गेले काय किंवा परत गंगातिरी जाऊन आंघोळ करून हिंदू झाले काय, कोणता आपल्या संस्कृतीत फरक पडला?

विशिष्ट धर्माच्या शिकवणीनं मोहित होऊन तो धर्म मी स्वीकारला असे म्हणणेदेखील एक प्रकारची आत्मवंचना होय. त्याला कारण म्हणजे आज ज्युलियाने हिंदू धर्म स्वीकारला, अन उद्या तिला शंकराचार्यापेक्षा पैगंबराची शिकवण मानवतावादी वाटली तर तिच्यावर कोण दावा दाखल करणार नाही, हेही तितकेच खरे. त्यामुळे अशी वैयक्तिक स्वरूपाची उदाहरणे एक-दोनवेळा वाचून विसरून जाण्याच्या पात्रतेची असतात.

सामुदायिक धर्मान्तर हा सर्वस्वी वेगळा विषय आहे, त्यामुळे ती चर्चा इथे अप्रस्तुत होईल.

चिरोटा's picture

6 Aug 2010 - 10:35 pm | चिरोटा

सामुदायिक धर्मान्तर हा सर्वस्वी वेगळा विषय आहे,

सहमत्.वर उल्लेखलेली धर्मांतराची प्रकरणे प्रसिद्धीच्या झगमगाटात वावरणार्‍या व्यक्तींमध्ये विशेष करुन आढळून येतात.चित्रपट,कला क्षेत्रात बुद्धीपेक्षा भावनेला जास्त महत्व असते.साहजिकच त्यात वावरणार्‍या व्यक्ती बुद्धीवादापेक्षा भावनेला जास्त महत्व देतात. त्यातून मग स्वतःचे इंग्रजी नावाचे स्पेलिंग बदलणे, एका ठराविक अक्षरापासूनच चालु होणारे चित्रपट काढणे अशा गमती जमती होतात. अशा क्षेत्रातील लोकांनी धर्म बदलणे हे ही सहसा ह्याच प्रकारात मोडते.
---

देवदत्त's picture

8 Aug 2010 - 7:47 am | देवदत्त

हिंदु धर्मातून बौद्ध वा मुस्लिम वा ख्रिश्चन झाले म्हणून आमच्या धर्माला कोणतीही ढाळ लागत नाही तद्वतःच दुसर्‍या धर्मातून येऊन आमचा हिंदू धर्म स्वीकारला म्हणून आम्हाला आनंद होण्याचे पण काही कारण असू नये.
पूर्ण सहमत. माझी ही प्रतिक्रिया अशीच लिहिणार होतो. :)

काय केले असता मनुष्य (किंवा बाई) हिंदू होतो ?

(मी धर्माने हिंदू आहे.होय, आधीच सांगितलेले बरे !)

पुष्करिणी's picture

7 Aug 2010 - 5:09 pm | पुष्करिणी

मलाही ह्या प्रश्नाचं उत्तर हवयं, मला बर्‍याच लोकांनी त्यांना हिंदू व्हायचय असं म्हटलय आणि त्याची प्रोसिजर नेहमी विचारतात. मी अळम टळ्म उत्तर देते ..

विकास's picture

8 Aug 2010 - 7:54 pm | विकास

जे हिंदू व्हायचयं असे म्हणतात, त्यांना आधी मराठी शिकवा. मग मराठी संकेतस्थळांवर संचार करायला शिकवा. मग त्यांना हिंदू धर्माबद्दल अधिक माहीती होईल आणि पुढचे सगळे मार्ग स्पष्ट होतील. ;)

असो, थट्टा बाजूस जाउंदेत, माझ्या माहीतीप्रमाणे जगातील दोनच प्रमुख धर्म असे आहेत ज्यांच्यामधे धर्मांतर होत नाही: एक अर्थातच हिंदू आणि दुसरा ज्यू.

त्यातील हिंदू धर्मापुरतेच बोलतोयः धर्मसत्ता ही या धर्माचे आचरण करण्यासाठी मान्य करावी लागत नाही. डायरेक्ट देवाशी संपर्क साधता येतो. ज्याकाळात अक्षम्य जातीयता होती त्या काळातील सोयराबाईस विठ्ठलाच्या मंदीरात जाऊनही दिले नाही, पण तरी देखील, "पाहता पाहणे गेले दूरी..." असे म्ह्णत, "अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग" असे ती म्हणत संतपदाला पोचू शकली आणि स्वतःचे संतइतिहासात स्थान तयार करू शकली....

या स्वातंत्र्याचे आकर्षण आणि अ‍ॅप्रिसिएशन इतरांना कळत नकळत येते. त्यांना, "कशाला हवे धर्मांतर?", असे विचारून दुर्दैवाने समजत नाही, कारण ते एका धर्माच्या सिस्टीम मधून तयार झालेले असतात. अशांकरता काशीला अथवा इतर तिर्थक्षेत्राला जाऊन कदाचीत हिंदूधर्मप्रवेश करता येत असेलही पण ते एक दार आहे. आत आल्यावर काय आचरायचे ज्यातून सुख-शांती लाभू शकेल हा मुख्य प्रश्न आहे, जो ज्याच्या त्याच्या स्वभावाप्रमाणेच शोधावे लागते. (जसा स्वभाव जो ज्याचा, श्रद्धा त्याची तशी असे, श्रद्धेचा घडला जीव, जशी श्रद्धा तसाची तो).

राजेश घासकडवी's picture

6 Aug 2010 - 10:39 pm | राजेश घासकडवी

अश्या ह्या थोरा-मोठ्यांच्या धर्मांतरामागे नक्की काय प्रेरणा असाव्यात?

त्या प्रेरणा लहान-सामान्य लोकांच्या धर्मांतराच्या प्रेरणेपेक्षा वेगळ्या असतात हे गृहीतक आहे. समजा, जर जगात कायमच सुमारे १ टक्का लोक धर्मांतर करत असतील आणि तेच प्रमाण या थोरा-मोठ्यांच्या मध्ये आढळलं तर हा प्रश्न निरर्थक होईल का? मग मीडियाला या थोरा-मोठ्यांच्या पीआर टीमने जे काही खायला घातलं, ते मीडिआने ओकून बाहेर काढलं व आपण लहान-सामान्य ते खुळ्यासारखं चघळत बसलो, याशिवाय दुसरं काय? कदाचित प्रसिद्धी मिळवणे हा जास्तीचा, वेगळा हेतू असू शकेल - पण म्हणजे तेच नाही का?

Dhananjay Borgaonkar's picture

6 Aug 2010 - 10:46 pm | Dhananjay Borgaonkar

जाउदे ना मरुदे. ज्याला जो धर्म स्विकारायचा आहे त्याने तो स्विकारावा.
कोणावर बळजबरी करुन धर्मांतर केल असेल तर हे मात्र चुकीच आहे.
त्या ज्युलीयाने हिंदुधर्म स्विकाराल्यामुळे आपल्याला काय मोठा फरक पडणारे?

मराठमोळा's picture

6 Aug 2010 - 11:08 pm | मराठमोळा

स्वतःच्या धर्माबद्दल एखाद्याला किती माहिती असते? माझ्या मते स्वतःच्या धर्माबद्दल पुर्ण माहिती असणारे तुरळकच असतील. तथाकथित मध्यम्वर्गीय किंवा गरीब लोकांचे धर्म बदलण्याचे कारण नोकरी/लग्न/बंधन नको असणे इ.इ काहीही असु शकते, ब्रेनवॉशिंग ने सुद्धा धर्म बदलले आहेत लोकांचे.

असो, मोठ्या/प्रसिद्ध लोकांच म्हणावं तर मानसिक शांती शोधण्यासाठी हे प्रकार करत असावेत याची शक्यता जास्त.
मायकल जॅक्सन ने सुद्धा मध्यंतरी मानसिक शाम्तीसाठी मुस्लीम धर्म स्वीकारला होता असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते.

असो, मला तर आजकाल सर्व धर्मांमधे कितीक फरक राहिलाय तेच कळत नाही. असं काय वेगळं करतात सगळे?
बाकी चालु द्या.

हुप्प्या's picture

6 Aug 2010 - 11:26 pm | हुप्प्या

>>
असो, मला तर आजकाल सर्व धर्मांमधे कितीक फरक राहिलाय तेच कळत नाही. असं काय वेगळं करतात सगळे?
<<

वेगळ्या धर्मात अनेक मोठमोठे फरक आहेत.
एक उदाहरणः
हिंदू धर्मात अनेक देव आहेत. त्यामुळे अमक्या देवाशिवाय कुणीही देव नाही आणि अमकाच त्याचा प्रतिनिधी आहे असे ते म्हणत नाहीत.

काही धर्म एक पुस्तक, एक प्रेषित हेच प्रमाण मानतात तर काही धर्मात तितकी बंधने नसतात. काही धर्मात मूर्तीपूजा हे महापाप मानतात तर काही धर्मात ती सर्रास चालते.

व्याज देणे/घेणे, स्त्री पुरुष यांचे समाजातील स्थान, मिळकतीची वाटणी, कर, प्रार्थना किती वेळा कशी करायची, काय खावे व काय खाऊ नये ह्या व्यावहारिक गोष्टी आणि पुनर्जन्म असतो का, पुण्य कुठले? पाप कुठले? तीर्थक्षेत्रे कुठली? ह्या आध्यात्मिक गोष्टी, ह्याबाबत वेगवेगळे धर्म अत्यंत वेगळ्या गोष्टी सांगतात.
थोडा अभ्यास केल्यास ह्या गोष्टी सहज कळू शकतील. आणि हे फरक किरकोळ नाहीत. लोक त्याकरता मरण्याची आणि मारण्याची तयारी ठेवतात.

कॉस्मोपॉलीटन युगात सर्वांची लाईफस्टाईल जवळपास सारखीच आहे, पुजापाठ्/प्रार्थना/तीर्थक्षेत्रांना जाण्याचे प्रमाण कमी होत आहे (सद्ध्या जाणारे मागच्या पिढीचेच जास्त) किवा पुढच्या काही पिढ्यांमधे नाहीसे पण होईल. पहिलं वाक्य माझं हेच होतं की किती लोकांना खरा धर्म समजतो? किंवा किती जण धर्माचे पालन पुर्णपणे करतात?

>>लोक त्याकरता मरण्याची आणि मारण्याची तयारी ठेवतात.

त्यामुळंच मी म्हणालो होतो की असं काय वेगळं वागतात लोकं वेगवेगळ्या धर्मात राहुन? :)

हुप्प्या's picture

7 Aug 2010 - 1:39 am | हुप्प्या

पूजापाठ, प्रार्थना, तीर्थक्षेत्रे ह्यांचे महात्म्य कमी होत आह? खरे वाटत नाही. उलट काही वर्षापूर्वी लहानशी देवळे असणारी देवस्थाने भक्तांनी ओसंडून वहात असतात. सिद्धी विनायक एक उदाहरण. शिर्डी, शेगाव, तिरुपती, वैष्णोदेवी इथे जाणार्‍या लोकांशी संख्या उत्तरोत्तर वाढत आहे. नवे नवे बुवा, साधू, फकीर लोकप्रिय होत आहेत. अगदी शहरात मी लहानपणी अगदी लहानशी रम्य देवळे पाहिली आहेत ज्यांची आज चकाचक लखलखलेली, भक्तांनी, दुकानांनी गजबजलेली क्षेत्रे बनलेली आहेत.

मुस्लिम लोकात स्त्रिया जास्तीत जास्त संख्येने हिजाब, नकाब वगैरे नेसताना दिसतात. अनेक उदाहरणे अशी आहेत की आई साध्या पोषाखात असे पण मुलगी बुरख्यात. बाप सफाचट पण मुलगा अस्सल मुस्लिम दाढी वाढवतो.
मला वाटते की धर्माचे प्रस्थ बदलत असलेच तर ते वाढते आहे. घटते नाही. युरोपात ख्रिस्ती धर्माचे वर्चस्व कमी होत आहे पण मुस्लिम धर्माचे अनुयायी आणि त्यांची धर्मनिष्टा ही उत्तरोत्तर वाढती आहे.

आयान हिर्सी अली ही एक सोमालियात जन्मलेली स्त्री. सोमालिया, सौदी अरेबिया आणि केनियामधे लहानपण गेले. मुस्लिम महिलांवरील अत्याचार, शोषण, अन्याय आणि त्यांना दिलेला दुय्यम दर्जा यामुळे ती अस्वस्थ होती. १९९२ मधे ती केनियातून हॉलंडला गेली. तिथे खासदार बनली. मुस्लिम स्त्रियांवरील होणार्‍या अत्याचाराला वाचा फोडण्याकरता सबमिशन नावाची एक डॉक्युमेंटरी बनवण्यात तिचा मोठा वाटा होता. त्यामुळे तिला ठार मारण्याच्या धमक्याही येतात. त्या डॉक्युमेंटरीच्या दिग्दर्शकाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली गेली.
११ सप्टेंबर २००१ च्या अतिरेकी हल्ल्यानंतर तिने अधिकृतरित्या मुस्लिम धर्माचा त्याग केला. ती आता निरिश्वरवादी आहे. हॉलंडमधे तिच्या नागरिकत्वावरून काही वाद निर्माण झाला होता. त्यामुळे ती हॉलंड सोडून अमेरिकेत आली आहे.

नोनी दरविश ही महिला इजिप्तमधे जन्मली. तिलाही मुस्लिम समाजातील स्त्री म्हणून अनेक वाईट अनुभव आले आणि तिनेही इस्लाम धर्म सोडला. मात्र ती आता ख्रिस्ती बनली आहे. ह्या स्त्रीची दोन तीन पुस्तके आहेत. त्यात तिने असे का केले हे सांगितले आहे.

ह्या त्यांच्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती. परंतु ह्यांचे धर्मांतर हे खूळ किंवा निरर्थक म्हणता येत नाही.

कमला दास ही एक साहित्यिका. तिने ६५ व्या वर्षी मुस्लिम धर्म स्वीकारला. पण मरण्यापूर्वी तिने असे विधान केले की त्या निर्णयाविषयी ती फार समाधानी नव्हती (इट वॉज नॉट वर्थ इट).
ह्या स्त्रीने एक प्रयोग म्हणून असे करून बघितले असावे असे वाटते.

हॅट साला, थोडी तरुण असायला हवी होती, तिला धर्माचे चार धडे व्यवस्थित देता आले असते.

नाही म्हणजे वय झालं की अवघड होतं हो... मतं बदलणं.

सुनील's picture

6 Aug 2010 - 11:53 pm | सुनील

रेवरंड टिळक आणि पंडिता रमाबाई यांनीदेखिल ख्रिस्ती धर्म स्वीकारला पण त्याची जातकुळीदेखिल थोडी वेगळी होती.

सहज's picture

7 Aug 2010 - 6:44 am | सहज

बाकी सुनीलराव आता ज्युलीयाबाईंना शोभेसे एखादे हिंदू नाव सुचवा. आणि मुख्य मुद्दा (दंगा / पंगा) बाई हिंदू झाल्या ठीकच पण पुढे नेमक्या कोणत्या उपसमुहात गणल्या जाव्या? प्रत्येक हिंदूला माहीत आहे फक्त हिंदू ओळख पुरेशी नाही. :-(

सुनील's picture

7 Aug 2010 - 7:04 am | सुनील

आता ज्युलीयाबाईंना शोभेसे एखादे हिंदू नाव सुचवा
"पल्याड"हून जुईली हे नाव सुचवले गेले असल्याच्या बातम्या आहेत! ठीक आहे तेच नाव.

परंतु, धर्म बदलला म्हणजे नाव बदलेच पाहिजे का? ख्रिस्ती धर्म स्वीकारूनही नारायण वामन टिळक यांना आपले नाव बदलावेसे वाटले नाही ना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांना!

बाई हिंदू झाल्या ठीकच पण पुढे नेमक्या कोणत्या उपसमुहात गणल्या जाव्या?
भगिनी निवेदिता ह्या कदाचित हिंदू झालेल्या पहिल्या गौरवर्णी. काय जात होती त्यांची हिंदू झाल्यानंतर? बालीतील हिंदूंमध्ये जाती आहेत काय? बहुधा नसाव्यात.

प्रत्येक हिंदूला माहीत आहे फक्त हिंदू ओळख पुरेशी नाही
जातीव्यवस्था हे हिंदू धर्माचे नव्हे तर, भारतीय समाजाचे लक्षण आहे. मुस्लिमांत जाती आहेत आणि गोव्याच्या किरिस्तावांतदेखिल! बाई हिंदू झाल्या तरी भारतीय नाहीत. त्यांना जातीची गरज नसावी!!

प्रियाली's picture

7 Aug 2010 - 5:03 pm | प्रियाली

पलिकडे नाव सुचवले आहे. त्यांच्या आडनावावरून त्यांना देशस्थ ही जातही कोणीतरी देऊ केली आहे. जे काही असेल ते. ज्युलियाताई आम्हाला खूप आवडतात. स्लिपिंग विथ द एनेमीमध्ये त्यांनी आपला मराठा लढाऊ बाणा दाखवला आहे. प्रत्यक्ष जीवनातही आपल्या भावाच्या गर्लफ्रेंडची बाजू घेऊन आपण मराठी माणसांप्रमाणे एकमेकांचे पाय ओढण्यास समर्थ अर्रर्र! सत्याची कास सोडत नाही हे दाखवून दिले आहे.

जुईलीताई राबटेकर यांचे हिंदू धर्मात स्वागत!

विकास's picture

7 Aug 2010 - 6:48 pm | विकास

वरील दोन्ही प्रतिक्रीयांशी ज्युलीयाजींचे नवीन "नाव-गाव-फळ-फूल" यांच्याशी सहमत. त्या आमच्या देखील आवडणार्‍या कलाकारांपैकी एक आहेत. स्लिपिंग विथ एनिमि मध्ये त्यांनी मराठी बाणा दाखवला असला तरी त्यांचा नवरा ज्या पद्धतीने स्वयंपाकघर नीट ठेवत असे त्यावरून मराठी नसावा असे वाटते. ;)

मात्र त्यांनी "व्हॅलेंटाईन्स डे" मध्ये काम केल्याने, त्यांचे हिंदू धर्मात स्वागत करावे का नाही या संदर्भात अजून विचार चालू आहे. :? ;)

विकास's picture

8 Aug 2010 - 7:40 pm | विकास

(माझ्यासाठी) आत्ताच हाती आलेल्या ताज्या बातमी नुसार तिने मुलांची नावे लक्ष्मी, गणेश आणि कृष्णबलराम अशी ठेवली आहेत.

मुळात धर्माची आयुष्यात गरजच काय हा मला पडलेला प्रश्न आहे.

कवितानागेश's picture

7 Aug 2010 - 9:00 am | कवितानागेश

...अशाच पद्धतीने जाहीररित्या 'धर्म' सोडून द्या!
..कदाचित 'गरज' कळेल!

मी ऋचा's picture

7 Aug 2010 - 12:16 pm | मी ऋचा

+१

पॅपिलॉन's picture

7 Aug 2010 - 11:35 am | पॅपिलॉन

धर्म म्हणजे काय?

पॅपिलॉन's picture

8 Aug 2010 - 6:21 pm | पॅपिलॉन

विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर कुणी देईल?

सर्व धर्मांचे अंतिम तत्त्व तसेच हेतु हा शांती व प्रेम हाच आहे.. त्यामुळे धर्म काय आहे हे महत्त्वाचे नसून तो मनुष्य आचरण काय करतो हे महत्त्वाचे.. नुसतीच धर्माची झालर लावून उपयोग नाही.. प्रत्येक धर्मात देव वेगळा.. पण एक गोष्ट मात्र सारखीच.. श्रद्धा!.. माझ्यामते देवापेक्षा श्रद्धा जास्त महत्त्वाची आहे.. देव आहे कि नाही यावर मत्-मतांतरे असतीलही, पण श्रद्धेचे महत्त्व कुणीच नाकारु शकत नाही.. मनुष्याला खरे बळ त्याची श्रद्धाच देते .. प्रसिद्धिच्या झगमगाटात वावरणार्‍या लोकांना मानसिक शांती हा प्रकार काय असतो ह्याची माहीतीच नसते, म्हणून मग ती मिळविण्यासाठी ते अनेकविध उपाय करतात.. धर्म बदलणे हाही त्यांचा एक उपायच . ज्युलियाने हिंदू धर्म स्वीकारला असावा, तो केवळ एक उपाय करून पहावा म्हणून.. पण ज्यांची श्रद्धाच अशी डळमळीत असते त्यांना मानसीक शांती भेटूच शकत नाही..

धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर !!!--- स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर.

हिंदुस्थानात हे कार्य जोरात चालु आहे...असो चालु द्या.

पंगा's picture

8 Aug 2010 - 8:22 am | पंगा

धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर !!!--- स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर.

म्हणजे??? 'आमची' ( = देऋब्रा) जुइलीताई भारतीय नागरिक झाली की क्कॉय???

सोप्पय आहे बॉ नागरिकीकरण, 'तुमच्या' भारतात.

- (अमेरिकन देशी देशस्थ) पंडित गागाभट्ट.

हिंदुस्थानात हे कार्य जोरात चालु आहे...असो चालु द्या.

म्हणजे? आणखी किती जणांना बाटवून हिंदू बनवण्याचा घाट घातलाय?

- (हिंदू) पंडित गागाभट्ट.

मदनबाण's picture

8 Aug 2010 - 8:33 am | मदनबाण

म्हणजे? आणखी किती जणांना बाटवून हिंदू बनवण्याचा घाट घातलाय?
अवं पावन हिंदुंचे ख्रिस्ती करण चालू आहे !!!

(दंगा)

पंगा's picture

9 Aug 2010 - 8:13 am | पंगा

अवं पावन हिंदुंचे ख्रिस्ती करण चालू आहे !!!

हम्म्म्म्म्... असे ऐकत आलेलो आहे खरे.

पण हे खरे आहे असे जरी मानले, तरीही हे राष्ट्रांतर कसे? ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यावर भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होते काय? आणि मग कोठल्या राष्ट्राचे नागरिकत्व आपोआप मिळते?

ते सोडा. जुइलीताई हिंदू झाल्या. त्याने त्यांचे अमेरिकन नागरिकत्व (पक्षी: राष्ट्रीयत्व) रद्द झाले, की त्यांना भारतीय नागरिकत्व (पक्षी: राष्ट्रीयत्व) बहाल झाले?

सावरकरांनी "धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर" असे म्हटले असेलही. ते त्यांनी का आणि कोणत्या परिस्थितीत म्हटले, मला कल्पना नाही. पण त्यांचे विधान आज लागू करताना ती परिस्थिती, त्या विधानामागील राष्ट्राची कल्पना आजही लागू आहे का, याचा विचार करावयास नको का? भारताची घटना मला वाटते आपणास बहुधा मान्य असावी. त्या घटनेने आपल्या राष्ट्रीयत्वाची जी व्याख्या केलेली आहे ती आज लागू आहे. सावरकरांची राष्ट्रीयत्वाची कल्पना काहीही असो, आणि ती कदाचित त्यांच्या जागी, त्यांच्या काळात आणि त्यांच्या परीने योग्य वाटण्यासारखी असेलही. परंतु ती घटनेने केलेल्या आणि आज लागू असलेल्या सर्वमान्य व्याख्येशी विसंगत आहे, सबब आज लागू नाही. आजच्या घटनामान्य व्याख्येने भारतीय मुसलमान अथवा भारतीय ख्रिस्ती हा भारतीय हिंदूचा सहराष्ट्रिक आहे; नेपाळी हिंदू अथवा इतर राष्ट्राचे राष्ट्रीयत्व स्वीकारलेला एके काळचा भारतीय हिंदू नव्हे. त्यामुळे, एखाद्या भारतीय हिंदू व्यक्तीने आपला धर्म बदलल्यास केवळ त्या बाबीतून (म्हणजे अशा व्यक्तीने दुसर्‍या स्वतंत्र कृतीतून इतर राष्ट्राचे राष्ट्रीयत्व स्वीकारल्याखेरीज) ते राष्ट्रांतर होऊ शकत नाही. (उलटपक्षी, दुसर्‍या एखाद्या राष्ट्राचे राष्ट्रीयत्व स्वीकारल्यास त्याबरोबर धर्म न बदलताही ते राष्ट्रांतर होते.)

सबब, "धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर" हे विधान आजच्या परिस्थितीत आणि राष्ट्रीयत्वाच्या भारतात आज लागू असलेल्या व्याख्येस अनुसरून साफ अमान्य.

अर्धवटराव's picture

10 Aug 2010 - 10:39 pm | अर्धवटराव

जे काहि थोडफार वाचलं, त्यावरुन "धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर" असं सावरकर का म्हणाले याचा कयास लावायचा हा प्रयत्न...
वेगळ्या राष्ट्राची मागणी करताना धर्म नावाची संज्ञा किती परिणामकारक असते याचा अनुभव पाकिस्तानच्या निर्मितीत आपल्याला आलाच आहे. सुभाषबाबुंसोबत आझादहिंद सेनेत प्राणाची बाजी लावणारे अनेक मुसलमान देखील नंतर पाकिस्तानला गेले. (तिथे त्यांना उच्च पदं मिळालि असं वाचुन आहे, खरे खोटे देव जाणे). तेंव्हा (इतर अनेक मुद्यांव्यतिरीक्त) परधर्माची भावना वेगळ्या राष्ट्र निर्मितीच्या मागणीच्या (निर्णायक ??) भुमीका घेते, असं सावरकरांना वाटलं असावं (वैयक्तीकरित्या मला हे पटतं देखील).
एक धर्म -> एक संस्कृती-> एक राष्ट्र आणि वेगळे धर्म -> भिन्न संस्कृती-> वेगवेगळे राष्ट्र असं काहिसं समीकरण (ढोबळमानाने) मांडता येईल. इस्रायल निर्मीतीत हे तत्व परिणामकारकरित्या वापरले गेले (अर्थात, आपला फायदा बघुनच पाश्चिमात्य राष्ट्रांनी आणि अमेरिकेने इस्रायल अस्तित्वात आणला. पण तेथील संघर्षाला ज्यु वि. मुस्लीम हे परिमाण आहेच). स्पेनने देखील सक्तीने धर्मांतर करवुन आपल्या राष्ट्रात एक धर्म राखला. आज चीन देखील हि काळजी घेताना दिसतोय.
जरी धर्मांतराने एकदम राष्ट्रांतर होत नसेल तरी एकगट्ठा मत फिरवुन सत्तांतर करता येणे भारतात अशक्य नाहि. वैयक्तीकरित्या धर्म माना अथवा मानु नका, पण त्याचे सामाजीक आणि राजकीय परिणाम हे आहेतच.

(निधर्मी) अर्धवटराव

चावटमेला's picture

8 Aug 2010 - 4:26 pm | चावटमेला

हम्म, ते धर्मांतराचे महित नाही, पण ज्युलिया मनःशांतीसाठी कुठल्याशा मंदिरात जात असते म्हणे,
त्या मंदिरात एखाद्या पुजार्याची vacancy आहे का ते पाहावे म्हणतो ;-)