मिपाकरांनो,
आपली मदत हवी आहे.
एका व्यावसायिक संस्थेने कॉक्स अॅण्ड किंग्ज च्या प्रायोजनाने मुंबईत नोकरी करणार्या व व्यवसायाने वा नोकरीत प्रकाशचित्रण क्षेत्रात नसलेल्या हौशी प्रकाशचित्रकारांसाठी एक स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत अर्थातच गुणवत्तेवर आधारित अशा मान्यवर परिक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या चित्रांना परितोषिक दिले जाईल व एक पारितोषिक सर्वाधिक मते मिळविणार्या चित्रास दिले जाईल.
काल मतदान सुरू झाले. एकुण मतदान पाहता असे लक्षात आले की केवळ नित्याच्या संपर्कातील परिचितांकडुन शे-पन्नास मते सहज मिळतील मात्र भरघोस मते हवी असतील तर हातपाय हलवावे लागतील. अर्थातच अशा वेळी मिपाचा आधार मोठा!
मिपाकरहो, खालील दुवे उघडा आणि चित्रे आवडली तर मत द्या. १३ ऑगस्ट पर्यंत मतदान चालु असेल व एका संगणकावरुन रोज एकदा मत देता येईल (दोन्ही चित्रांना), तेव्हा सढळ हस्ते मतदान करा ही विनंती
आपला कृपाभिलाषी
सर्वसाअक्षी
प्रतिक्रिया
6 Aug 2010 - 5:53 pm | अवलिया
मिपाचा गैरवापर पाहुन वाईट वाटले.
*मत देत आहे*
7 Aug 2010 - 2:51 am | आमोद शिंदे
सहमत आहे. वाईट वगैरे वाटले नसले तरी मिपाचा गैरवापर नको असे वाटते. ते एसमेसची भीक मागणारे भिकारी टाळायला आपण टिवी बंद करुन इथे येतो. इथेही तेच दिसू नये ही आशा.
7 Aug 2010 - 5:10 am | माया
सहमत.
संपादक आहेत का हजर? थांबवा ओ हे असले प्रकार.
7 Aug 2010 - 5:16 am | Nile
यात काय गैरवापर आहे कोणी सांगेल काय?
7 Aug 2010 - 5:22 am | आमोद शिंदे
मिपाकरहो, खालील दुवे उघडा आणि चित्रे आवडली तर मत द्या. १३ ऑगस्ट पर्यंत मतदान चालु असेल व एका संगणकावरुन रोज एकदा मत देता येईल (दोन्ही चित्रांना), तेव्हा सढळ हस्ते मतदान करा ही विनंती
गैरप्रकार पेक्षा अन इथिकल (म्हणजेच गैरप्रकार ना?) तंत्रज्ञानातल्या कच्च्या दूव्याचा हा गैरवापर नाही का?
7 Aug 2010 - 5:30 am | Nile
मिसळपावला ढोबळ मानाने सोशल नेटवर्कींग साईट असे म्हणुन शकतो. इथे तुमचे आमचे अनुभव लिहायला परवानगी आहे माझ्या प्रवासाच्या गोष्टी लिहायला परवानगी आहे. माजे वैयक्तिक यश मांडायला परवानगी आहे, हे तर मान्य असेलच.
धागाप्रस्तावकाने एका स्पर्धेची माहिती दिली आहे, त्या स्पर्धेत ती व्यक्ती सहभागी आहे याचीही माहिती दिली आहे. त्यात ती व्यक्ती सहभागी आहे आणि त्यांची प्रवेशिका (इंट्री) आवडली तर त्यांना मत द्या असे त्यांनी आवाहन केले आहे. असे करु शकत नाही असे कुठल्या संस्थळाचे इथिक असेल तर मला तरी कल्पना नाही.
फारतर, धागा सुरुवात करताना, मदत हवी च्या ऐवजी स्पर्धेची माहिती ने केली असती आणि शेवटी जर स्पर्धा आवडली तर भाग घ्या, मी घेतला आहे माझे फोटो पहा, आवडले तर मत द्या अश्या स्वरुपाचा धागा असता तर तो धागा काढायचा कदाचित चांगला मार्ग झाला असता.
(खाली त्यांनी 'अशी मते घेणे वाईट' असे मतही व्यक्त केलेच आहे, या अर्थी त्यांना मिपावरील ओळखीचा 'गैर'फायदा घ्यायचा होता असे वाटत नाही)
7 Aug 2010 - 5:45 am | आमोद शिंदे
मते मागणे हा गैरप्रकार नाही. एका संगणकावरुन रोज नविन मत देता येते ह्या कच्च्या दुव्याचा फायदा घेउन (सढळ हस्ते?) मतसंख्या वाढवणे हा गैरप्रकार.
7 Aug 2010 - 5:49 am | Nile
अच्छा. तसे तुम्ही लिहले असतेत तर हा संवाद वाचला असता. :-)
पण तो प्रकार वैयक्तीक इथिकचा आहे, इथे मिपाच्या गैरवापराचा काही संबंध मला तरी दिसत नाही.
तुम्ही ज्याला (अन मी ज्या प्रतिसादाला विचारणा केली होतीत) ते प्रतिसाद मात्र वेगळेच काहीतरी म्हणत आहेत. असो.
7 Aug 2010 - 5:56 am | आमोद शिंदे
मी तसेच लिहिले होते.
माझ्याच वरील प्रतिसादातून :
<<मिपाकरहो, खालील दुवे उघडा आणि चित्रे आवडली तर मत द्या. १३ ऑगस्ट पर्यंत मतदान चालु असेल व एका संगणकावरुन रोज एकदा मत देता येईल (दोन्ही चित्रांना), तेव्हा सढळ हस्ते मतदान करा ही विनंती>>
"गैरप्रकार पेक्षा अन इथिकल (म्हणजेच गैरप्रकार ना?) तंत्रज्ञानातल्या कच्च्या दूव्याचा हा गैरवापर नाही का?">>>>>>
असो.
अनइथिकल ते अनइथिकल. त्यासाठी जे माध्यम वापरले तो त्या माध्यमाचा गैरवापर. आता तरीही लोकांनी सांगितलेले करावे की नाही हे ज्याचे त्याचे वैयक्तिक मत.
7 Aug 2010 - 5:44 am | संकेत
दिले मत. मत देणार्याला डोके नाही असे वाटत असेल शिंद्यांना.
काहीही अन-इथिकल नाही. मत द्यायलाच पाहिजे अशी सक्ती नाही.
6 Aug 2010 - 5:58 pm | मीनल
मिपाकरहो, खालील दुवे उघडा आणि चित्रे आवडली तर मत द्या.
किडा आवडला. मत दिले.
6 Aug 2010 - 6:00 pm | मेघवेडा
चित्रे आवडली नाहीत मत नाही देत आहे. यापेक्षा कित्येक सुंदर सुंदर चित्रे पलीकडे चालू असलेल्या 'ऑनलाईन फोटो स्पर्धे'त आलेली आहेत.
6 Aug 2010 - 7:48 pm | गणपा
एकदम सहमत.
पण दोन क्लिक करायला जोर नाही लागला आणि खर्च ही नाही आला.
मदत केली आहे.
6 Aug 2010 - 8:01 pm | मेघवेडा
हायला, मला वाटलं यापैकी एकाची निवड करायची आहे.. :P
अर्रं. मदत म्हणूनच द्यायचं असेल तर मत नक्कीच देईन. देतो देतो.
स्वगत : मेव्या मेल्या शहाणपणा करायला सांगितला होता कुणी? निदान वाचायचंस तरी धाग्यावर काय लिहिलंय ते.. :P
6 Aug 2010 - 6:05 pm | रेवती
मत दिले आहे.
6 Aug 2010 - 6:11 pm | सुनील
घरच्या संगणकावरून आत्ताच दिले. आता थोड्याच वेळात कचेरीतील संगणकवरूनदेखिल!
(मिपाकर) सुनील
6 Aug 2010 - 6:20 pm | अर्चि
चित्रे आवडली नाहि. मत दिले आहे.
6 Aug 2010 - 7:38 pm | सहज
दोन्ही चित्रे छान आहेत. मत नोंदवले आहे.
जिंकल्यावर पार्टी हवी! :-)
6 Aug 2010 - 7:45 pm | फुस्स
चित्रं एवढीही आउटस्टँडिंग नाहीत , परंतु मत नोंदवतो. इंडियन आयडॉल किंवा डान्स इंडिया डान्स मधील कंटेस्टंट्स सुद्धा अशाच प्रकारे आवाहन करतात.
शुभेच्छा सर्वसाक्षी जी.
-( आवाज आला क्का ?) फुस्स
6 Aug 2010 - 7:45 pm | गणपा
मदत केली आहे.
6 Aug 2010 - 7:50 pm | सोम्यागोम्या
दोन्ही चित्रे आवडली नाहीत व मतही दिले नाही. स्पष्टता नाही दोन्ही चित्रांमध्ये. असो.स्वतःच्या चित्रांचा दुवा देण्यापेक्षा सर्व चित्रांचा द्यायला हवा होता. हातपाय हलवून स्पर्धा जिंकणा-या पेक्षा उत्कृष्ट छायाचित्रे काढून स्पर्धा हरणा-याला सुद्धा जास्त मान देईन मी.
6 Aug 2010 - 7:57 pm | मराठमोळा
दोन्ही फोटुंना मदत केली आहे,
पण मदतीपेक्षा मिपाकरांना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी का नाही बोलावले?
6 Aug 2010 - 8:05 pm | विकास
मत दिले आहे. किडा आवडला. वर सोम्यागोम्याने म्हणल्या प्रमाणे चित्रे स्पष्ट दिसत नाही आहेत. मात्र इतर चित्रे पाहील्यावर ती देखील तशीच दिसत असल्याने कदाचीत तो त्या संकेतस्थळाचा प्रॉब्लेम आहे का असे वाटले.
6 Aug 2010 - 8:12 pm | चतुरंग
(सचित्रमतदार)चतुरंग
6 Aug 2010 - 9:10 pm | नावातकायआहे
मदत केली आहे.
6 Aug 2010 - 9:17 pm | शानबा५१२
कीडा बिल्कुल नाही आवडला,छायाचित्र पुसट दीसतय.
दोन मत दीलीत्,आपण हा धागा नेहमी वर ठेवा,मी रोज मत देईन.
आणि सर्वांनी द्यावं,अस वाटत्,पण 'लायक' चित्राचाच विजय व्हावा.
6 Aug 2010 - 9:28 pm | आगाऊ कार्टा
मला चित्रकलेतले काही कळत नाही. पण मते दिली आहेत.
प्रथम Firefox वापरुन दोन्ही चित्रांना मते दिली.
नंतर Safari वापरुन मते दिली.
त्यानंतर Internet Explorer वापरुन अजुन दोन मते दिली.
सोमवारी मी Chrome टाकणार आहे (मते देण्यासाठी नव्हे. माझ्या प्रोजेक्ट साठी).
आज रात्री घरी गेल्यावर लॅपटॉप वरुन अजुन प्रत्येकी २ मते देइन.
6 Aug 2010 - 9:35 pm | शानबा५१२
वेगळा browser वापरला तरी ip add.तोच राहतो ना?(????)
मग दोनपेक्षा जास्त मतं कशी देणार?
माझी शंका सोडवा.
कशा आहेत त्या कथा?
6 Aug 2010 - 9:40 pm | आगाऊ कार्टा
मला असे वाटते की त्या script मध्ये फक्त browser चेक केलेला असावा...
IP Address किंवा MAC Address जर चेक केला तर browser बदलून काही फरक पडत नाही.
मी मते देण्यापुर्वी एकूण मते १०७ होती. तिन्ही browser मधून मते दिल्यावर ११० झाली.
6 Aug 2010 - 9:43 pm | शानबा५१२
तुम्ही संगणकतज्ञ आहात म्हणुन विचारल.
माहीतीपर प्रतिसादाबद्दल धन्यवाद्,पण हे असले मतदान काय कामाचे?
6 Aug 2010 - 10:52 pm | भिरभिरा
चित्र दर्जेदार नाही वाटले.. किडा आणखी चांगला यायला हवा होता..
पण मत दिले.
अवांतर:मीपावरील छायाचित्रकारांना या स्पर्धेची माहीतीही दिली असती तर आनंद वाटला असता..
6 Aug 2010 - 11:52 pm | शानबा५१२
बरोबर भिरभिरलास!
6 Aug 2010 - 10:57 pm | ऋषिकेश
चित्रे मोबाईलवरून घेतल्यासारखी आली आहे.. काहिशी धुसर
असो. तुमच्या अनेक उत्तमोत्तम लेखांना स्मरून घरून, हापिसातून माझ्या क्युबमधल्या सगळ्यांच्या डेस्क्टॉपवरून) अशी एकूण १० मते दिली आहेत :)
6 Aug 2010 - 11:58 pm | सुनील
हापिसातून माझ्या क्युबमधल्या सगळ्यांच्या डेस्क्टॉपवरून...
अरेच्चा! हे आधी का नाही सुचले? आत्ता देऊन येतो ८-१० जादा मते!
6 Aug 2010 - 11:07 pm | शिल्पा ब
चित्र आवडली नाहीत म्हणून मत (मदत ) पण नाही...
इतर मिपाकारांचा मदतीशील स्वभाव पाहून पुढच्या वेळेस मीसुद्धा अशा स्पर्धेत भाग घेईन म्हणते.
6 Aug 2010 - 11:55 pm | शानबा५१२
सॉरी राग मानु नका,पण कीती खडुस लिहलत हो!!
6 Aug 2010 - 11:43 pm | विपा
मत दिले. परंतू रेनवॉक चित्रात पाऊस दिसत नाही.
6 Aug 2010 - 11:55 pm | शानबा५१२
चालु द्या!
(माझा प्रतिसाद द्यायचा उद्देश सार्थ करा)
7 Aug 2010 - 12:35 am | सर्वसाक्षी
प्रथम सर्वांचे अभार.
चित्रे अस्पष्ट आहेत कारण स्पर्धेत दिलेल्या प्रतिमा आकाराने बर्याच मोठ्या असल्या तरी अनेक चित्रे चढवायची असल्याने संयोजकांनी लघुप्रतिमा उतरविल्या आहेत. प्रतिमांविषयी विचारणा केली असता आयोजकांकडुन ही माहिती मिळाली.
स्पर्धा केवळ मुंबईत नोकरी करणार्या व नोकरदारांसाठी होती, मुळात सर्वांसाठी होती की आणखी अटी होत्या याची कल्पना नाही. आम्हाला ही सुचना मनुष्यबळ विकास विभागाद्वारे आली कारण प्रवेश वैयक्तिक नसुन अस्थापनांसाठी होता व २८ तारिख चित्रे देण्याची अखेरची तारिख होती. शिवाय मतदान हा प्रकार काल आयोजकांची मेल आस्थापनेला आल्यावरच समजला. अर्थात सर्व माहिती बरीच आधी असती तर सर्व मिपाकरांना दिली असतीच.
पुन्हा एकदा सर्वांचे आभार. चित्र आवडले नसताही मत देणार्यांचेही आभार, मात्र असे मत अपेक्षित नव्हते. केवळ मते छापायचीच असती तर सहज सोपा उपाय एकाने सुचविला होता, ज्यायोगे कुठेही वाच्यता न करता स्वतःच बसल्या बसल्या अनेक मते देता आली असती. अर्थात कुणाचाही अनादर करायचा हेतू नाही पण अशी मते घेणे बरे वाटत नाही. चित्रांची निवड गुणवत्तेवरच होणार असुन सर्वाधिक मतांसाठी वेगळा क्रम आहे हे मी लिहिले होते.
7 Aug 2010 - 2:53 am | आमोद शिंदे
>>अर्थात कुणाचाही अनादर करायचा हेतू नाही पण अशी मते घेणे बरे वाटत नाही
ये हुई ना बात! बीत गयी सो बात गयी.
7 Aug 2010 - 5:01 am | चित्रा
मते दिली आहेत.
7 Aug 2010 - 3:30 pm | नि३
मते दिली आहेत( एक मिपाकर म्हणुन) अथवा तुमच्या चित्रापेक्शा ईतर खुप छान चित्रे आहेत तिथे ..त्यांना पण मते दिली (आवडली म्हणुन)
स्पष्ट बोलण्याचा राग नसावा
7 Aug 2010 - 5:23 pm | दिपक
डन !
7 Aug 2010 - 5:22 pm | माया
उद्या आम्ही असे धागे काढले तर चालतील असे समजुन घेतले.
चालु द्या.
7 Aug 2010 - 5:48 pm | संजय अभ्यंकर
किडा आघाडिवर आहे!
7 Aug 2010 - 11:26 pm | स्वाती दिनेश
दोन्ही चित्रांना मत दिले आहे,
स्वाती व दिनेश
8 Aug 2010 - 1:08 am | प्रभाकर पेठकर
सर्वसाक्षी,
दोन्ही चित्रांना मत दिले आहे.
पहिल्या चित्रात रंग जास्त भडक वाटले.
दुसर्या चित्रातील अनावश्यक भाग 'क्रॉप' करून किड्याला उठाव आणला असता तर जास्त चांगले वाटले असते.
16 Nov 2010 - 11:39 pm | राजेश घासकडवी
प्रकाटाआ