वर्गणी

कळस..'s picture
कळस.. in जनातलं, मनातलं
4 Aug 2010 - 9:45 pm

वर्गणी

घरी आलो तोच शेजारच्या घरात गोंगाट. वर्गणी मागणारी सोसायटी मधील पोर बडबड करीत होती. कमीत कमी ५०१ रुपये नाही तर वर्गणी नको. १०१ वर तडजोड करण्यास तयार नव्हती. आमच्या शेजारी गुप्ते काकी राहतात. २ वर्षांपूर्वीच गुप्ते काका वारले. ते lic मध्ये कामाला होते. त्यांचा नंतर काकी कामाला जाऊ लागल्या त्यांचा पाठी एक मुलगी आणि लहान मुलगा आहे. सध्या घर काकिंवरच आहे. मोठी मुलगी science दुसरे वर्ष चालू आहे. मुलगा १० वी त आहे. काकुंने त्यांना १०१ देऊ केले ते घेण्यास तयार नव्हते. शेवटी रागाने ती पोर तशीच निघून गेली. गणपतीची वर्गणी जो देईल यथाशक्ती यथामती त्यावर देवाच्या नावावर जबरदस्ती करणे योग्य आहे का?

हे ठिकाणअनुभव

प्रतिक्रिया

अहो पण "हे ठिकाण" मधे का आलाय हा लेख?
गुप्ते काका असोत वा नसोत जबरदस्ती ही वाईटच. ...... अशा मुलांना रस्ताच दाखवला पाहीजे .... एक दमडी देता कामा नये, पैसे झाडाला लागत नाहीत

अहो पण "हे ठिकाण" मधे का आलाय हा लेख?
मिसळपाव सदस्यत्वाकरीता कोणी वर्गणी मागितली की काय? ;)

शाहरुख's picture

4 Aug 2010 - 9:53 pm | शाहरुख

आपण गोंगाट ऐकून काय केले ? (लेख टाकण्या व्यतिरिक्त)

कळस..'s picture

4 Aug 2010 - 10:00 pm | कळस..

क्षमा करा पण मी काही केले असते तर आपण हा उतारा वाचत नसता...........

शाहरुख's picture

4 Aug 2010 - 10:11 pm | शाहरुख

क्षमा स्वतःलाच करावी :-)

मृत्युन्जय's picture

6 Aug 2010 - 1:32 pm | मृत्युन्जय

त्याने वर्गणी मागणार्‍यांशी मारामारी किंवा बाचाबाची करायला हवी होती असे वाटते का तुम्हाला?

तो (किंबहुना आपणापैकी बरेच लोक) हे सर्व करु शकत नाहीत म्हणुन तर चिडचिड होउन हा लेख टाकला असेल ना त्याने?

पारुबाई's picture

4 Aug 2010 - 9:55 pm | पारुबाई

१००% सहमत

जबरदस्ती चूक आहे.

शिर्षक चुकीच टाकलत. खंडणी करा.
गणपती येण्याआधीची ही डोकेदुखी असते.
स्वतःहुन दिलेली रक्कम मान्य नसेल तर अश्यांना दारात उभे करु नये.

भारी समर्थ's picture

4 Aug 2010 - 10:07 pm | भारी समर्थ

अशा अतिउत्साही वर्गणीखोरांची शिकवणी घेऊन त्यांना वर्गणी आणि खंडणी यातला फरक समजावून देण्याची गरज आहे. कळस म्हणजे आजही बर्‍याच मंडळांचे ऊत्सव हे विनापरवाना, विनानोंदणी चालू आहेत. कोणाच्यातरी वीजजोडणीतूनच रोषणाई करतात व त्या प्रखर दिव्याखाली रमीचे डाव मांडून आपल्या धार्मिकतेचे दिवे पाजळतात. शेजारशेजारची मंडळे तर 'एरिया' वाटून वगैरे घेतात.
आपण देऊ शकणारी वर्गणी जर त्यांना मान्य नसेल तर, सांगावं की काय असेल ते दानपेटीत टाकू म्हणून. पण असल्या अरेरावीचा अतिरेकच वाढत चाललाय सगळीकडे आजकाल...

भारी समर्थ

पाषाणभेद's picture

5 Aug 2010 - 6:59 am | पाषाणभेद

नाळ नाही रे बा समर्था, नाल ठोकतात घोड्याला अन नाळ म्हणजे बाळाची अन आईची जुळणी करणारा अवयव किंवा नलिका म्हण हवं तर.

भारी समर्थ's picture

5 Aug 2010 - 4:07 pm | भारी समर्थ

चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद! आवश्यक तो बदल केला.

चू.भू.दे.घे.

भारी समर्थ

कार्लोस's picture

4 Aug 2010 - 11:53 pm | कार्लोस

मानुस वाय फल खर्च कर्ताना १०० रुपये बघ्त नाहि मग देवाला देमुग्र्च?

इंटरनेटस्नेही's picture

5 Aug 2010 - 1:04 am | इंटरनेटस्नेही

अशुद्ध मराठी

१०० नाही ५०० साठी अडून बसले होते.
आणि त्यांनी त्यांच्या पैशाचे काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे.

इंटरनेटस्नेही's picture

5 Aug 2010 - 1:07 am | इंटरनेटस्नेही

शुचि आणी गणपा यांच्याशी सहमत.

शिल्पा ब's picture

5 Aug 2010 - 5:06 am | शिल्पा ब

१०१ काय ११ काय आम्ही देऊ ते घेणार असाल तर ठीक नाहीतर दमडी सुद्धा मिळणार नाही असं सांगायचं... मी असं केलेलं आहे... वर्गणी आहे खंडणी नाही असं सुनवायच सरळ.

आम्ही गणपती बसवायचो त्याची आठवण झाली.

आमच्या गल्लीत चिकटे मास्तर म्हणुन होते, आडनावापेक्षा पन्नास पट चिकट. आम्ही वर्गणी मागायला गेलो की तासभर लेक्चर देत, हे करा ते करु नका वगैरे वगैरे. अन मग रुपया दोन रुपये टेकवत हातावर. (वर्गणी मागायला गेलो नाही तर येता जाता विचारीत अरे येउन वर्गणी घेउन जा म्हणुन). लेक्चर संपल्यावर रोज प्रसाद देउन जात जा हे मात्र न विसरता सांगत. आम्ही मग नंतर भर दुपारी ढोल ताशे बडवत असु त्यांच्या घरासमोर, मिरवणुकीची तालिम म्हणुन. मजा होती राव. असो.

प्रसन्न केसकर's picture

5 Aug 2010 - 12:53 pm | प्रसन्न केसकर

इथे मतप्रदर्शन केलेल्या लोकांपैकी किती जणांचा गणपती मंडळांशी कार्यकर्ता म्हणुन संबंध आलेला आहे?

डिस्क्लेमरः- १) हा प्रतिसाद अवांतर/ चिथावणीखोर वाटल्यास काढुन टाकण्याचे पुर्ण स्वातंत्र्य मालक, चालक, संपादकांना आहे. २) हा प्रतिसाद खंडणीखोर गणपती मंडळांना अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनमानीला पाठिंबा देण्यासाठी दिलेला नाही.

>>इथे मतप्रदर्शन केलेल्या लोकांपैकी किती जणांचा गणपती मंडळांशी कार्यकर्ता म्हणुन संबंध आलेला आहे?

आला आहे..का?

समंजस's picture

5 Aug 2010 - 1:33 pm | समंजस

वर्गणी देणे हा त्रास आहे जर आपण स्वेच्छेने देत असलेली रक्कम मंडळाच्या कार्यकर्त्यांना मान्य नसेल तर. अशा परिस्थीत आपण आपल्या भुमिकेवर ठाम राहावे.

परंतु जर मंडळाचे कार्यकर्ते समजुतदार असतील आणि विशिष्ट रकमेचा हटट करत नसतील तर मलाच ठरवल्या पेक्षा थोडी जास्त रक्कम द्यायला आवडतं :)

[अवांतरः काही ठिकाणी गैरप्रकार होत असतील, काही ठिकाणी वर्गणीच्या पैंशाचा गैरवापर होत असेल पण म्हणुन या मुळे सरसकट सगळ्यानांच वाईट समजू नये. मला स्वतः ला तरी हा सार्वजनीक उत्सव खुप आवडतो आणि हा उत्सव चालू राहो या करीता शक्य होईल तेव्हढी मदत करायला माझी तयारी असते]

मृण्मयी दीक्षित's picture

5 Aug 2010 - 8:01 pm | मृण्मयी दीक्षित

आमच्या घरी सुद्धा आले होते वडलांचा आदर (दरारा) असल्यामुळे दिले ते त्यांनी खुशीने स्वीकारले.