कालच www.misalpav.com या संकेतस्थळावर लिहिलेला एक लेख वाचला. लेखकाचे शीर्षक होते स्वयंपाक आणि IT wife. (लेखाचा धागा : http://misalpav.com/node/13469 ) शिर्षकावरूनच यामध्ये काहीतरी विनोदी असणार हे मला लक्षात आले. आणि माझे गृहीतक योग्यच ठरले. सद्य परिस्थितीकडे एका विनोदी दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न लेखात सदैव जाणवत होता. पण जेंव्हा मी या लेखांवरील प्रतिक्रिया पाहू लागलो तेंव्हा मात्र आश्चर्यचकित झालो. प्रतिक्रियांच्या माध्यमातून तिथे जणू काही द्वंद्वयुद्धच चालू होते. काहीजण त्या लेखाच्या बाजूने तर काहीजण त्याच्याविरुद्ध.
लेखाचा सर्वसाधारण आशय खालीलप्रमाणे:
‘सध्याच्या काळात लग्न करताना मुलगा आणि मुलगी (दोघेही) नोकरी, सुंदरता, या गोष्टीला महत्व देतात, पण स्वयंपाक हा विषय दुर्लक्षिला जातो. अर्थात पूर्वी मुलीला हमखास विचारला जाणारा हा प्रश्न असायचा पण सद्यस्थितीमध्ये तो काहीसा मागे पडला आहे. किंबहुना विचारला गेलाच तर या प्रश्नाचे उत्तर “थोडाबहुत येतो” हे लग्नामध्ये पुढे जाण्यास योग्य मानले जाते. यामुळे पुढे उद्भवणाऱ्या गोष्टींचे एक विनोद्पूर्ण वर्णन लेखकाने केले आहे. अर्थात हे त्याने स्वतःचे लग्न झाले आहे आणि बायको IT क्षेत्रातील आहे आणि तिला स्वयंपाक येत नाही अशी कल्पना करून लिहिले आहे. आणि आजच्या वेळेला मुलांनाही स्वयंपाक आला पाहिजे हे मत स्पष्ट करून लेखाची सांगता केली आहे.’
प्रथम माझी या लेखावर प्रतिक्रिया विचारता एक विनोदी लेख म्हणून एक चांगले लिखाण आहे. कारण मीमांसकामधील : उपक्रमोपसंहारौ अभ्यासोऽपूर्वता फलम् | अर्थवादोपपत्ती च लिङ्गं तात्पर्यनिर्णये ॥ या सूत्रानुसार खालील लेख गुणवत्तेबाबतीचच्या कसोटीवर खरा उतरतो.
ज्या विरोधी प्रतिक्रिया आहेत त्यामधून काढायचे दोन सरळ निष्कर्ष म्हणजे स्वयंपाक हे काम हल्लीच्या कुटुंबाच्या दृष्टीने दुय्यम आहे आणि त्यांचा स्त्री पुरुष समानतेबद्दल झालेला मानसिक गोंधळ. सर्वप्रथम पहिला मुद्दा विचारात घेतला स्वयंपाक हे दुय्यम दर्जाचे मानणेच पूर्णपणे चुकीचे आहे. कारण अन्न वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मुलभूत गरजांपैकी अन्न ही गरज पूर्ण करणारे काम दुय्यम असूच शकत नाही किंबहुना ते सर्वात महत्वाचे काम आहे. अशारीतीने जर ते महत्वाचे आणि गरजेचे काम आहे हे लक्षात घेतले तर स्वयंपाक न करण्याचा कंटाळा मुली (काही बाबतीत मुले) करणार नाहीत. कारण सद्यस्थितीत प्रत्येक जण आपण किती महत्वाचे आहोत किंवा किती महत्वाची कामे आपण करतो हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो.
दुसरा आणि फारच वादग्रस्त मुद्दा म्हणजे स्त्री पुरुष समानता. या बाबतीत हल्ली सगळेच गल्लत करताना दिसतात. इथे आपल्या पूर्वजांनी अतिशय विचारपूर्वक केलेल्या कामाची विभागणी लक्षात घेत नाहीत. स्त्री पुरुष समानता फार पूर्वी अस्तित्वात होती (मधील काही काळात स्त्रियांवर अत्याचार झाले हे मान्य आहे). पण समानता म्हणजे प्रत्येकाने सर्व कामे केली पाहिजेत असे नाही. पुरुष जे जे करतो ते सगळे स्त्रीला जमले पाहिजे किंवा स्त्री जे जे करते ते पुरुषाला आलेच पाहिजे हे शुद्ध वेडेपणाचे आहे. हे म्हणजे क्रिकेटमध्ये सगळ्या फलंदाजांना गोलंदाजी किंवा सगळ्या गोलंदाजाना फलंदाजी आलीच पाहिजे म्हटल्यासारखे आहे. जे निव्वळ अशक्य आहे. कुणी एका गोष्टीत वाकबगार असतो तर कुणी दुसऱ्या.
आता थोडा श्रेष्ठ कनिष्ठ याचा विचार करू. कुठलीही संस्था चालण्यासाठी विविध प्रकारची कार्य कृतीत आणणे गरजेचे असते आणि त्यासाठी कामाची वर्गवारी करणे आवश्यक असते. जर प्रत्येक जण मीच व्यवस्थापन करतो म्हणू लागला तर प्रत्यक्ष कृती कुणी करावयाची. किंवा सगळेच दिग्दर्शक बनले तर अभिनय कुणी करायचा. आता अभिनेता श्रेष्ठ कि दिग्दर्शक? व्यवस्थापक श्रेष्ठ कि कामगार? माझ्या मते तरी यापैकी कोणीही कमकुवत पडले तर ते संस्थेसाठी धोकादायक आहे. त्यामुळे प्रत्येकाने नेमून दिलेले काम करणे हेच श्रेयस्कर. आता स्वयंपाक मुलीने करायचा कि मुलाने. तर परमेश्वराने (जे देव मनात नाहीत असे म्हणतात त्यांच्यासाठी निसर्गाने) स्त्री आणि पुरुष हा भेदभाव केला आहे. (आता याबाबत निसर्गावर कुणी दावा लावत नाही म्हणू बरे आहे). निसर्गतःच स्त्री आणि पुरुषाची जडणघडण वेगवेगळी आहे. आणि समाजव्यवस्थेमध्ये जसजशी कामे येऊ लागली तसतशी त्याला लागणाऱ्या कुवतीप्रमाणे या कामांची विभागणी होत गेली. पूर्वीच्या काळी शेती हा मुख्य व्यवसाय बनला आणि त्याला लागणाऱ्या कष्टप्रद कामामुळे ते काम साहजिकच पुरुषाकडे आले. तर स्त्रीचा प्रेमळ स्वभाव थोडा स्वार्थीपणा (इथे स्वार्थीपणा चांगल्या अर्थाने घ्यावा) यामुळे घर सांभाळणे स्त्रीकडे आले. कालपरत्वे वेगवेगळी कामे येत गेली आणि त्यांची विभागणी सुद्धा होत गेली. काही गोष्टी जिथे दोघांना शक्य आहेत त्या दोघेही करू लागले. आणि ही अतिरिक्त कामे वाढल्यामुळे जुनी जी विभागणी होती ती कामे कुणी करावयाची हा प्रश्न साहजिकच उद्भवू लागला. सध्यातरी कुठलीही (काही अपवाद असतीलच : अपवादानेच नियम सिद्ध होतो) मुलगी माझा नवरा घरी बसुदे आणि मी १२ तास घराबाहेर राहून काम करते म्हणणे मला तरी अशक्यच वाटते. याला कारण स्त्रीस्वभाव आणि स्त्रीची शारीरिक तसेच मानसिक क्षमता. पण हल्ली माणसाला निसर्गाच्या विरुद्ध जाण्याचा नवा छंद जडला आहे. त्याची फळेही आपण भोगत आहोतच. या बाबतीमध्ये सुद्धा निसर्गाच्या विरुद्ध जाऊन तू का मी हा वाद करत बसलो तर उद्याची पिढी कुपोषित होण्याचीच शक्यता जास्त आहे. बाकी प्रत्येकजण आपल्या बुद्धीनुसार निर्णय घेतोच. यालाच हल्ली आपण स्वातंत्र्य म्हणतो. तेंव्हा सर्वांना त्यांच्या स्वातंत्र्याच्या शुभेच्या देऊन हे खरडणे बंद करतो.
(टिप्पणी: माझ्या लेखाचे वरील मीमांसक सूत्राप्रमाणे व्यवछेदन करू नये ही विनंती)
प्रतिक्रिया
3 Aug 2010 - 11:04 pm | प्रभो
हीच प्रतिक्रिया आपण त्या धाग्यावर देऊ शकला असता.
नवीन धाग्याचे प्रयोजन समजले नाही.
4 Aug 2010 - 9:54 pm | कळस..
जयभीम प्रभो दादा
3 Aug 2010 - 11:08 pm | ऋषिकेश
लेखात बर्याच चुका असल्या तरी विनंतीस मान देतो व या टायमाला "पास" म्हणतो ! :) ;)
मिपावर स्वागत!
3 Aug 2010 - 11:16 pm | सारंग कुलकर्णी
धन्यवाद ऋषिकेश,
पण चुका निदर्शनास आणून दिल्यास तर सुधारणेस मदत होईल. बऱ्याच वर्षांनी मराठीत लिहीत असल्यामुळे अशी मदत मिळाली तर चांगले आहे.
जास्त असल्यास इमेल केली तरी चालेल पुन्हा एकदा धन्यवाद.
3 Aug 2010 - 11:54 pm | ऋषिकेश
ठिकाय :)
हे केवळ तुमचे चर्चेबद्दलचे मत आहे निष्कर्ष म्हणता येऊ नये.
कोण मानते? म्हणून तर ह्या प्राथमिक दर्जाच्या कामात पुरुषांनीही आघाडी घेतली पाहिजे नाहि का?
ह्या तीन प्राथमिक गरजांपैकी अन्न हीच सर्वात महत्त्वाची गरज हे कसे ते कळले नाहि
इथे मुली कंटाळा आल्याने स्वयंपाक करत नाहित असे गृहितक दिसते जे चुकीचे आहे. त्यांना स्वयंपाकाशिवाय इतरही कामे असल्याने त्या आता रोज स्वयंपाक करू शकत नाहित
अर्थातच तुम्ही सोडून नाहि का?
पूर्वजांनी बरेच काहि बरे-वाईट करून ठेवले आहे त्याचा आज किती वापर करावा हे प्रत्येकाने आपापल्या बुद्धीने ठरवावे.
संदर्भ?
म्हणजे आता होत नाहित असे तुम्हाला वाटते का?
का वेडेपणाचे आहे? स्त्रीयांच्या मानल्या गेलेल्या प्रत्येक क्षेत्रांत पुरुष आघाडीवर दिसताहेत जसे नृत्य, रांगोळ्या, पाककला.
ही तुमना अॅपल आणि ऑरेंजेसची झाली. संसार हा क्रिकेटचा सामना नाही. शिवाय प्रत्येक खेळाडूला फिल्डिंग ही यावीच लागते.
इथे वाकबगारीचा नाहि तर एखादी गोष्टी एकानेच केली पाहिजे ह्या अट्टाहासाचा आहे. एखादी व्यक्ती स्वेच्छेने एखादी गोष्ट करत असेल तर प्रश्नच नाहि मात्र केवळ तु पुरुष आहेस म्हणून तू नोकरी केलीच पाहिजेस किंवा तू स्त्री आहेस म्हणून तुला स्वयंपाक आलाच पाहिजे असा अट्टाहास चुकीचा आहे.
हल्ली प्रचलित असणारी अजाईल मेथडॉलॉजी ऐकून आहात का? यात कोणीही व्य्वस्थापक नसतो. फक्त टिममेंबर्स मिळून प्रोजेक्ट पूर्ण करतात. आणि ती पारंपरीक एक व्यक्तीच्या देखरेखीखाली होणार्या प्रोडक्टसपेक्षा अधिक उत्तम दर्जाची असतात.
ज्याला वेळ /+ इच्छा /+ शक्ती असेल त्याने / तिने
तुमचा समाजशास्त्राचा अभ्यास कमी पडातोय. पूर्वी स्त्रीया शेती करत आणि पुरूष शिकार. म्हणजे अन्न कमावणे हे स्त्रीयांचे आणि पुरूषांचे दोघांचेही काम होते.
यात अशक्य काय? माझ्या माहितीतच चांगली ४ जोडपी मुंबईत आहेत. मुलांच्या पालनासाठी वडिलांनी नोकरी सोडली आहे.
बाकी पुढच्या तर्काला काहि आधार? का तेही हवेत तीर?
4 Aug 2010 - 2:31 pm | गणपा
आ बैल मुझे मार ;)
=)) =)) =))
3 Aug 2010 - 11:26 pm | अडगळ
सख्या चला बागामधी रंग खेळु चला...
3 Aug 2010 - 11:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बाकीच्या दोन गरजा आपल्यापैकी किती लोक स्वत:च्या स्वतः पूर्ण करू शकतात? किती लोकांनी आपल्या हातांनी घरं बांधली आहेत आणि स्वतःचे कपडे विणणं सोडा, हाताने शिवले तरी आहेत?
याचा काय संबंध? आपल्या पूर्वजांच्या काळात आयटी तरी कुठे होतं? आगापिछा नसलेलं वाक्य!!
खरंच त्यामुळेच स्त्रियांकडे घर सांभाळणं आलं का? बरं आता आयटी क्षेत्रात काही बोजे उचलावे लागत नाहीत. तिथे या मुद्द्याचा काय संबंध??
खरंच स्त्रीची शारीरिक आणि मानसिक क्षमता कमी असते का? काही पुरावे? आबाळ झालेल्या मुली मुलांपेक्षा जास्त टिकून रहातात, गर्भपातानंतर मुलीचा गर्भ असेल तर ते 'बायालॉजिकल वेस्ट' ठरायला जास्त वेळ लागतो असं डॉक्टर स्वतः सांगतात.
निसर्गच का 'संस्कृती'? 'नेचर का नर्चर' या बद्दल आपले विचार तपशीलात वाचायला आवडतील.
अनेक श्रीमंत घरांमधेही कुपोषण दिसतं, आई घरी असेल तरीही! त्याचा आणि आयटी, स्त्रियांचं करियर याच्याशी काहीही संबंध दिसत नाही.
स्वतःच्याच मुलांना कुपोषित ठेवण्याची बौद्धिक पातळी असणार्या व्यक्तीशी लग्नं करावे का नाही हा व्यक्तीगत प्रश्नही असावा. पण त्यासाठी एखाद्या ठराविक व्यवसायात असणार्या स्त्रियांनाच "झोडपून" काढणं, वर ते अमान्य करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.
पण हल्ली सरकारी शाळांमधे खिचडी, दूध मिळतं असं ऐकून आहे. सत्यपरिस्थिती आणि कायदा, नियम यांच्यात फरक असेल याचीही मला खात्री आहे.
सदर लेखाला झोडपणारे प्रतिसाद आले ते स्वयंपाकाला दुय्यम ठरवून आले असं आपल्याला वाटत असेल तर आपली अंमळ गल्लत होत आहे. मुलींनी लग्नाच्या आधीच स्वयंपाक करायला शिकलं पाहिजे (यात मुलांनी काय करायला पाहिजे असा काहीएक उल्लेख नाही), अर्थात मुलांना हवं तसं चवीढवीने खायला घालायला मुलींना आलंच पाहिजे असा विचार आहे त्याला विरोध केलेला आहे. थोडक्यात संपूर्ण लेखात स्वयंपाकाला नाही तर जगाच्या अर्ध्या लोकसंख्येला दुय्यम दर्शवणारा विचार आहे त्याला विरोध झाला आहे. (आता यावर, पुन्हा एकदा "असं म्हणायचं नव्हतंच" अशाही प्रतिसादांच्या बुंदी पडतील. पण बहुतांशी लोकांना त्या लेखाचा अर्थ तसाच लागला आहे ...)
वरील मीमांसक सूत्र नक्की कोणतं?
व्यवच्छेदन झालं का नाही हे कोण ठरवणार?
4 Aug 2010 - 12:23 am | दिनेश
साहेब, आपल्याला कसे कळले कि अदिती काकूंना स्वयंपाक येत नाही ? आपला अभ्यास कमी पडत आहे ?
जाता जाता, नवीन आहात म्हणून, एक सल्ला,अजून वेळ गेलेली नाही...पूर्ण तयारी करून आखाड्यात या.
दिनेश
बिल्ला नंबर १६
4 Aug 2010 - 1:10 am | उपास
ते जाउंद्या सुजय.. तुमच्या धाग्यावरच्या माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलचं नाहीत त्याचं बोला..
वैयक्तीक गोष्टी काढायच्या नाहीत हे बरोबरच पण तुमच्या लिखाणात एकवाक्यता नाही आणि म्हणून विश्वासार्हताही नाहीये.. कसलाही आगापिछा नसलेली सनसनाटी विधान करायची आणि स्वतःची पाठ थोपटायची.. कुणी विरोध केला तरी तो समजून घेण्याइतपतही मोठेपणा नाही..
बायकांनी काय करावं हे त्यांना ठरवू द्या की.. तुम्ही का म्हणून त्यांचे निर्णय घेताय.. जो पर्यंत तो विश्वास, स्वातंत्र्य बायकां उपभोगत नाहीत (मी मुद्दाम पुरुष देत नाहीत असं म्हणत नाहीये, कारण देणारे पुरुष कोण?) तोपर्यंत 'स्त्री स्वतंत्र झाली पाहिजे' ह्या नुसत्याच घोषणा.. आणि समजा तुम्हाला कुणी भेटली असेलही आयटी मधली स्वयंपाक न करणारी मुलगी पण असले ताशेरे ओढून तुम्ही फार तर तुमचा कंडू शमवू शकाल, त्या व्यक्तीला स्वयंपाकास प्रवृत्त करु शकणार नाहीच.. त्यामुळे तुमचा हा हुकूमशाहीचा मार्गही चुकीचाच.. त्यामुळे आवरा नाहीतर अनुल्लेख आहेच ;) शुभं भवतु!!
*आता कंपूबाजीची पळवाट शोधली जाण्याची शक्यता आहेच.. चालूंद्या !!
4 Aug 2010 - 9:29 am | अप्पा जोगळेकर
बायकांनी काय करावं हे त्यांना ठरवू द्या की.. तुम्ही का म्हणून त्यांचे निर्णय घेताय..
+१००.
निदान इतरांच्या बायकांनी काय करावं हे तरी सुजय कुलकर्णी यांनी ठरवू नये असे वाटते. असा बाहेरख्यालीपणा बरा नव्हे.
- सुजय कुलकर्णी, प्रविन्भपकर उर्फ पूर्वाश्रमीचे टारझन यांचा फ्यान आणि
एक अविवाहित (वय वर्षे - २५)
4 Aug 2010 - 1:16 am | रेवती
देवाची शप्पथ , तुमच्या नवर्याची मला खरोखर कीव येते.....अगदी खर्र....मनापासून...
कृपया प्रतिसाद देताना सदस्यांच्या नातेवाईकांवर शेरे नकोत. कुलकर्णी साहेब, आपल्या धाग्यावर झालेला दंगा पुरेसा आहे असे वाटते. टोकदार प्रतिसाद देवू नये ही सर्वांना विनंती! अवांतराबाबत भान ठेवणे गरजेचे आहे (सर्वांनीच). खरडवही किंवा व्य. नि. चा वापर व्हावा ही अपेक्षा आहे.
धन्यवाद!
4 Aug 2010 - 1:47 am | मधुशाला
बाकीच्या दोन गरजा आपल्यापैकी किती लोक स्वत:च्या स्वतः पूर्ण करू शकतात? किती लोकांनी आपल्या हातांनी घरं बांधली आहेत आणि स्वतःचे कपडे विणणं सोडा, हाताने शिवले तरी आहेत?
याचा अर्थ असा घ्यायचा का की फक्त गवंडी आणि शिंपी यांनीच घरात स्वयंपाक करून खावा आणि बाकी समस्त जनतेने बाहेर जाऊन खावे?
याचा काय संबंध? आपल्या पूर्वजांच्या काळात आयटी तरी कुठे होतं? आगापिछा नसलेलं वाक्य!!
लेखातील एकच वाक्य उचलले तर त्याचा आगापिछा लागत नाही. पूर्ण लेखाच्या अनुषंगाने हे वाक्य वाचले तर संदर्भ कळायला अडचण येऊ नये.
खरंच त्यामुळेच स्त्रियांकडे घर सांभाळणं आलं का? बरं आता आयटी क्षेत्रात काही बोजे उचलावे लागत नाहीत. तिथे या मुद्द्याचा काय संबंध??
नाही. केवळ याच कारणामुळे नाही तर त्याला मुख्यतः स्त्रीची नैसर्गिक जडणघडण जबाबदार आहे. पूर्वीच्या काळी कुटुंबनियोजनाची खात्रीशीर साधने उपलब्ध नसल्याने कदाचित बाळंतपणे, मुलांचे संगोपन इ. गोष्टीत स्त्रियांचा जास्त वेळ जात असावा. त्याशिवाय स्त्रियां या पुरुषांपेक्षा ताकदीत नक्कीच कमी असतात. त्यामुळे जी जास्त बळाची कामे आहेत ती आपसूकच पुरुषांकडे आली असावीत. आता आयटी क्षेत्रात काही बोजे उचलावे लागत नाहीत असं तुम्हीच म्हणत असाल तर मुलींनी स्वयंपाक करण्यालाच तुमचा एवढा विरोध का? की हा फक्त विरोधासाठी विरोध आहे? मुली पैसे मिळवतात म्हणून त्या स्वयंपाक करणार नाहीत. बस्स्स. असं आहे का? असं असेल तर सांगून टाका मग वाद घालण्यातच अर्थ नाही.
खरंच स्त्रीची शारीरिक आणि मानसिक क्षमता कमी असते का? काही पुरावे? आबाळ झालेल्या मुली मुलांपेक्षा जास्त टिकून रहातात, गर्भपातानंतर मुलीचा गर्भ असेल तर ते 'बायालॉजिकल वेस्ट' ठरायला जास्त वेळ लागतो असं डॉक्टर स्वतः सांगतात.
शारीरिक क्षमता निश्चितच कमी असते. काही कशाला? ढीगभर पुरावे आहेत. एक सोपी गोष्ट करा. कुठल्याही खेळाचे नियम बघा. तिथे पुरुष आणि स्त्रिया यांचे वेगवेगळे गट का असतात, स्त्रियांचे सामने कमी वेळ चालतील असे नियम का असतात याचा अभ्यास करा. मानसिक क्षमता कमी असते असं सरसकट विधान आपण करू शकत नाही. काही ठिकाणी यात स्त्रिया पुढे जातात. उदा. मुलांचे पालनपोषण करताना लागणारा संयम, काही बाबतीतली त्यांची सहनशक्ती, इ. पण बुद्धीबळातही स्त्रिया आणि पुरुषांचे सामने वेगवेगळे असतात हे विशेष. "मुलीचा गर्भ असेल तर ते 'बायालॉजिकल वेस्ट' ठरायला जास्त वेळ लागतो" म्हणून मुली जास्त ताकदवान का?
निसर्गच का 'संस्कृती'? 'नेचर का नर्चर' या बद्दल आपले विचार तपशीलात वाचायला आवडतील.
निश्चितच निसर्ग. संस्कृतीचे पुरावे फक्त काही हजार वर्षांचे आहेत. तर माणूस जमातीचा इतिहास काही लाख वर्षांचा.
अनेक श्रीमंत घरांमधेही कुपोषण दिसतं, आई घरी असेल तरीही!
हे असं कशामुळे होत असेल? तर ज्याचं जे काम आहे ते त्यानं न केल्यामुळे. म्हणजे असं, मुलांचं संगोपन हे निसर्गाने मातेकडे सोपवलेलंच काम आहे. तेच आईनं इथे टाळल्यामुळे हे होत असावं. आता ते का टाळलं गेलं याला अनेक कारणे असू शकतील. (खुळचट स्त्रीमुक्तीच्या कल्पना हेही एक कारण असू शकेल का???)
पण त्यासाठी एखाद्या ठराविक व्यवसायात असणार्या स्त्रियांनाच "झोडपून" काढणं
या व्यवसायात अशी उदाहरणे जास्त बघायला मिळतात त्यामुळे हा लेख अश्या स्त्रीयांना उद्देशून लिहिला असावा किंवा कदाचित सु. कु.,सारंग्,प्रविन्भप्कर याच व्यवसायात सुद्धा असू शकतील.
पण हल्ली सरकारी शाळांमधे खिचडी, दूध मिळतं असं ऐकून आहे. सत्यपरिस्थिती आणि कायदा, नियम यांच्यात फरक असेल याचीही मला खात्री आहे.
याचा संबंध कळला नाही.
जगाच्या अर्ध्या लोकसंख्येला दुय्यम दर्शवणारा विचार आहे
दुय्यम दर्शवणारा विचार कुठे आहे हे दुसर्यादा लेख वाचूनही कळाले नाही. की स्वयंपाक करणे हे काम दुय्यम दर्जाचे आहे असा आपला समज आहे?
वरील मीमांसक सूत्र नक्की कोणतं?
लेखात एक संस्कृत वचन आहे ते असावं. (मला तरी त्याचा अर्थ कळला नाही. लेखकाने कंसात दिला असता तर बरं झालं असतं. :) )
व्यवच्छेदन झालं का नाही हे कोण ठरवणार?
बहुधा लेखक... नक्की माहीत नाही.
4 Aug 2010 - 2:15 am | अनामिक
>>>मुलींनी स्वयंपाक करण्यालाच तुमचा एवढा विरोध का?
मुलींनी स्वयंपाक करावाच असा अट्टहास का? चुल आणि मुल फक्तं स्त्रीनेच सांभाळावे अशी मानसिकता (तुमची आहे असे म्हणत नाहीये) का असावी? त्या लेखात साध्या स्वयंपाक न करता येण्यावरून आयटीतल्या स्त्रीयांची/मुलींची खिल्ली उडवली त्याचं समर्थन कसे करू शकतो आपण?
4 Aug 2010 - 3:54 am | मधुशाला
मुलींनी स्वयंपाक करूच नये असा तरी तुमचा का अट्टाहास?
साध्या स्वयंपाक न करता येण्यावरून
स्वयंपाक न येणं ही तुम्हाला एवढी साधी गोष्ट का वाटते? रोज आपण जे खातो ते बनवायला सुद्धा यावं असं का वाटू नये? कमीतकमी प्रयत्न तरी करता येईल की नाही???
आणि जर स्वयंपाकासारखी साधी गोष्ट येत नसेल तर खिल्ली उडवण्यात काही चूक आहे असं वाटत नाही. हां आता जर असं असेल की एखादी अवघड गोष्ट येत नाही, उदा. पुरणपोळी, गुळपोळी तर समजू शकतो. पण कुकर सुद्धा लावता येत नाही आणि कधी लावणार सुद्धा नाही या मानसिकतेचं समर्थन कसं करणार???
4 Aug 2010 - 11:49 am | अमरेन्द्र कुलकर्नी
अहो काका तुम्हाला विनोद कळतो का ?
तुमच्या हिशोबाने पु. ल. देशपांडेनी बटाट्याची चाळ लिहिली ते चालीत राहणाऱ्या लोकांना टार्गेट करून त्यांची खिल्ली उडवण्यासाठी का?
( कहर झाला आता )
4 Aug 2010 - 2:53 am | उपास
मधुशाला,
>>मुली स्वयंपाक करण्यासाठी विरोध का?
कुठेतरी गल्लत होतेय... स्वयंपाक किंवा कुठलंही काम हे कोणी करावं हे थोपवणं चुकीचं आहे इतकच म्हणण आहे. त्या जोडप्याला निर्णय घेऊन द्या कुणि काय करायचं त्याचा.. स्त्रीची नैसर्गिक घडण आहे असं म्हणणारी मुलं तू नोकरी करुन पैसे आणू नकोस मी मिळवतोय त्यातच राहू कसेबसे असं म्हणताना दिसत नाहीत. त्यांना स्त्रियांनी कमवलेले पैसे हवे असतात आणि हातात ऐते चमचमित पदार्थही. ह्या विचारांना, ह्या मानसिकतेला विरोध आहे. जर बायको नोकरी (आयटी किंवा इतर कुठेही) पैसे कमवण्यासाठी घाम गाळत असेल तर तिला घरकामात मद्त हवीच हवी, ज्या प्रकारची मदत ती मागेल त्या प्रकारची. याउप्पर तिने नाही केला एकदिवस स्वयंपाक किंवा वाटलं काम आउटसोर्स करावं तर तो त्या दोघांचा (किंवा घरातील सगळ्यांचा) निर्णय.. कुणाकडूनही त्यात जबरदस्ती असणे योग्य नाहीच.
जाता जाता, मी आयटी असून निगुतीने आणि एकत्रितपणे स्वयंपाक करणारी जोडपी पाहिली आहेत, काळा चष्मा लावलात तर काळेच दिसते आणि चांगले पाहायचे ठरवले तर चांगलेच दिसते.
4 Aug 2010 - 3:44 am | मधुशाला
पहिली गोष्ट थोपवणं हा शब्द तुम्ही ज्या अर्थानं इथे वापरला आहे त्या अर्थाने तो मराठीत वापरत नाहीत. मराठीत थोपवणे चा अर्थ होतो थांबवणे. हल्ली असे शब्दप्रयोग मराठी वर्तमानपत्रात सुद्धा बघायला मिळतात आणि एक तिडीक डोक्यात जाते. खरंतर त्यामुळे प्रतिसाद देणारच नव्हतो पण पुढच्या काही विचारांवर मत व्यक्त करणे आवश्यक वाटले.
याउप्पर तिने नाही केला एकदिवस स्वयंपाक किंवा वाटलं काम आउटसोर्स करावं तर तो त्या दोघांचा (किंवा घरातील सगळ्यांचा) निर्णय.. कुणाकडूनही त्यात जबरदस्ती असणे योग्य नाहीच.
इथे तुम्ही परत परत जबरदस्तीचा मुद्दा मांडला आहे. इथे कुणी कुणावर जबरदस्ती केलेली नाही. एका सुजय कुलकर्णीचा लेख वाचून उद्द्यापासून सगळ्या बायका स्वयंपाक घरात जुंपल्या गेल्या आहेत असं शक्य नाही.
उपरोक्त लेखात हा मुद्दा आहे कि मुलींनी स्वेच्छेने लग्नाआधी स्वयंपाक का शिकू नये. लेखावर आलेल्या धक्कादायक प्रतिक्रिया बघितल्या तर लक्षात येईल कि काही मुलींना/बायकांना स्वयंपाक करणे म्हणजे आपल्या स्वातंत्र्यावर घाला आल्यासारखा वाटतो आहे. माझा विरोध याला आहे. तुम्ही असं म्हणा की आपण दोघे मिळून काम करू. मी हे करीन तू ते कर. पण इथे वेगळेच चित्र दिसते आहे. मला मोदक येत नाहीत कारण तुला नानकटाई येत नाही. याला काय अर्थ आहे? यालाच संसार म्हणतात का? पटतंय का बघा. ही जबरदस्ती नाही. पण मागच्या लेखात आक्रस्ताळ्या प्रतिसादांना तसेच प्रतिसाद मिळाले एवढं खरं. अजूनही काही मुली/बायकांचे मुद्दा समजून न घेता तसले प्रतिसाद सुरुच आहेत. असो...
4 Aug 2010 - 4:23 am | शिल्पा ब
तेच ते तेच ते...
किती टक्के मुली म्हणतात कि स्वयपाक करणारच नाही आणि शिकणारच नाही....आणि तुम्हलातरी येत का? आणि समजा म्हणाल्या कि नाही येत आणि शिकणार पण नाही कारण मी पैसे कमावते तेव्हा बाहेरून आणून खाईन तर त्याला विरोध करणारे तुम्ही कोण टिकोजीराव ? तुम्हाला जर स्वयपाक येत असेल तर करा घरी नाहीतर बाहेर जा...
लग्नाच्या आधी मुले म्हणतात का कि नोकरी नको करूस गृहिणीच राहा....मुलींचे पैसे तर पाहिजेत वर तिनेच घरकामाला पण जुंपून घेतले पाहिजे या तुमच्या विचारसरणीला विरोध...पण ते तुम्हाला समजत नाही...किंवा समजून घ्यायचच नाही...
आणि काय सारखं सारखं जबरदस्तीचा नाही सांगताय.... एकीकडे स्वयपाक आलाच पाहिजे...घरीच जेवण बनवलेच पाहिजे म्हणताय आणि मग नंतर काय तर जबरदस्ती नाही...
काय बोलणार.... आनंद वाटला आजच्या काळात अशी विचारसरणी असलेले लोकं पाहून..
असो.
4 Aug 2010 - 4:55 am | उपास
मधुशाला,
थोपवणं ह्या शब्दाने तुम्हाला त्रास झाल्याब्द्दल दिलगीर आहे, तरीही तुम्ही लादणे हा अभिप्रेत अर्थ घेतल्याने बरे वाटले. प्रतिसाद संपादित करता येत नसल्याने तो शब्द बदलता येत नाहीये, पण भावना पोहोचल्या. असो!
तुम्ही तुमचा आणि सुजय यांचे प्रतिसाद/ लेख वाचून तेथे जबरद्स्ती अभिप्रेत नाही असे म्हणत असाल तर माझीच लेख वाचण्या/ समजण्यात चूक झाली असावी, पुन्हा दिलगीरी.
आणि लग्नाआधीच कशाला, लग्नानंतरही शिकता येतो की स्वयंपाक.. गरज पडेल तेव्हा कुणीही शिकू शकतोच, शिकतोच.. लग्नाआधी करिअर सारख्या महत्त्वाच्या गोष्टींना बरेच जण आणि बर्याच जणी मह्त्त्व देतातच आणि त्यात काही चूक वाटत नाहीच.
असो, तर मग तुम्ही आणि मी एकच बोलतोय - जबरद्स्ती नको, ज्याचं त्याचं स्वातंत्र्य, ज्याचा त्याचा निर्णय नांदा सौख्य भरे, वगैरे वगैरे!! :) धन्यवाद!
4 Aug 2010 - 5:06 am | मधुशाला
समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. वर्तमानपत्रात तर काहीही शब्द वापरतात. सकाळ मध्ये पहिल्या पानावर प्रीती झिंटाचा फोटो आणि मथळा "प्रीती झिंटा बाथरूम मध्ये फसली" :) :) :) :) :) :)
आणि लग्नाआधीच कशाला, लग्नानंतरही शिकता येतो की स्वयंपाक.. गरज पडेल तेव्हा कुणीही शिकू शकतोच, शिकतोच..
हे जरा "तहान लागली की खणूच की विहीर" असे नाही वाटत??? :) असो...
4 Aug 2010 - 5:11 am | Nile
हाय कंबंख्त तुने...
आपण तर लगिन झाल्यावर बायकोला संपुर्ण सैपाक साग्रसंगित शिकवायला तयार आहोत ब्वॉ. मग हात दुखुदे, पाय दुखुदे नाय तर अजुन काहीतरी होउदे.
4 Aug 2010 - 7:05 am | उपास
वाटत नाही..
आयटीचंच उदाहरण दिलय तिथे म्हणून सांगतो.. मी गेलोय ह्यातून.. एकेका सीट साठी कट थ्रोट काँपिटीशन आहे हे कोणीही मान्य करेल.. असं असताना उद्या माझ्या बहिणीला, मुलीला मी तरी, तू स्वयंपाकावर लक्ष दे, अभ्यास दुय्यम आहे असं सांगू शकत नाही.. उलट सगळ्याच क्षेत्रात तिने चौफेर संचार केलेला आवडेल. नैसर्गिक रीत्या ज्या जबाबदार्या पेलाव्या लागतील त्यासाठी ती समर्थ, तयार होईल पण म्हणून सुरुवातीलाच आपलं लक्ष्य दुय्यम गोष्टींवर जाणार नाही हे मी तिला शिकवेन. म्हणूनच दुसर्या बीबीवर मी म्हटलय की, इंजिनिअरींग, सी ए सारख्या ठिकाणी मेहनत घेऊन किंवा आयटी मध्ये शिरकाव करुन तिथे टिकाव धरणार्या मुलींबद्दल, त्यांच्या पालकांबद्दल आदराची भावना असायला हवी.. अभ्यास तेव्हा अभ्यास, स्वयंपाक तसेच इतर संसारोपयोगी गोष्टी त्या त्या काळात शिकता येतीलच, तुमची शिकण्याची, नवीन गोष्ट समजून घेण्याची वृत्ती असली की झालं. केवळ म्हणुनच लग्ना आधी स्वयंपाक शिकच नाहीतर सासरी पंचाईत होईल ह्या विचारसरणीला विरोध आहे. तुला स्वतःपुरत आलं तर ठीकच नाहीतर तू तुझी आबाळ होऊ न देण्या इतपत हुशार असायला हवीस असं फारतर मी सुचवेन इतकच. हे जसं लग्न न झालेल्या मुलीला तसंच मुलालाही लागू, म्हणजे शिक्षणासाठी, नोकरीसाठी परदेशी जावे लागले तर स्वतःचे खाणे स्वतः सांभाळण्या इतपत यायला काहीच हरकत नाही. असो.. :)
4 Aug 2010 - 9:36 am | सोम्यागोम्या
>>आयटी मध्ये शिरकाव करुन तिथे टिकाव धरणार्या मुलींबद्दल, त्यांच्या पालकांबद्दल आदराची भावना असायला हवी..
स्त्री पुरुष समानता तुम्ही मानत असाल अस गृहित धरून विचारतो. मुलांचं कौतुक का नाही करावं वाटलं तुम्हाला. मुलींनी आयटीत जागा मिळवली म्हणजे फार काही विशेष आहे का?
मुद्दा क्र. २ आयटीच का? इतर क्षेत्रात उच्च स्थान मिळवणे तुमच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही का?
तसे असावे फक्त उल्लेखात आयटी आले असावे असे गृहित धरतो. धन्यवाद.
4 Aug 2010 - 11:53 am | अमरेन्द्र कुलकर्नी
अहो ह्यान्चिच उपासमार झालि आहे.
एक राइस प्लेट आण रे !!
4 Aug 2010 - 9:27 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
>>याचा अर्थ असा घ्यायचा का की फक्त गवंडी आणि शिंपी यांनीच घरात स्वयंपाक करून खावा आणि बाकी समस्त जनतेने बाहेर जाऊन खावे? <<
हा प्रश्न या धाग्याच्या प्रवर्तकाला विचारा, मला नाही. हे त्यांचं लॉजिक आहे, माझं नाही. आणि शिंपी हा शब्द चुकीचा वापरलात, गवंडी आणि विणकर म्हणायला पाहिजे.
मी स्वतः शेती करत नाही, गवंडीकाम करत नाही आणि विणकामही नाही. माझ्या मूलभूत काय, कोणत्याच गरजांसाठी मी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या काम करून अर्थव्यवस्थेत भर टाकत नाही.
>> पूर्वीच्या काळी कुटुंबनियोजनाची खात्रीशीर साधने उपलब्ध नसल्याने कदाचित बाळंतपणे, मुलांचे संगोपन इ. गोष्टीत स्त्रियांचा जास्त वेळ जात असावा. <<
खरंच त्यामुळेच्च असं झालं का मातृसत्ताक पद्धती जेव्हा (शेतीमुळे) पुरूषसत्ताक झाली तेव्हा पुरूषांना वारसापद्धती सोपी असावी म्हणून?
>> मुलींनी स्वयंपाक करण्यालाच तुमचा एवढा विरोध का? की हा फक्त विरोधासाठी विरोध आहे? मुली पैसे मिळवतात म्हणून त्या स्वयंपाक करणार नाहीत. <<
ही वाक्य तुम्ही माझ्या तोंडी घालता आहात. चष्मा काढलात तर कदाचित माझे विचार समजतील, पटावेच असा आग्रह अजिबात नाही.
कोणी काय काम करावं हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे, माझा नाही. मी पहिल्या प्रतिसादातच म्हटल्याप्रमाणे लग्नाआधीच मुलींनी स्वयंपाक शिकून घ्यावा आणि नवर्यांना चवीढवीने खायला घालावं, मात्र पोरांनी काही शिकावं नाही याचा मात्र उल्लेख अतिशय ओझरता, तो ही शिकलात तर बायकोवर उपकार अशा पद्धतीचा झाल्यामुळे मूळ लेखाला विरोध होता.
>> मानसिक क्षमता कमी असते असं सरसकट विधान आपण करू शकत नाही. <<
सदर धागाप्रवर्तकाने केलं आहे, जाब त्यांना विचारला आहे, त्यांच्याकडून खुलाश्याची अपेक्षा आहे.
>> "मुलीचा गर्भ असेल तर ते 'बायालॉजिकल वेस्ट' ठरायला जास्त वेळ लागतो" म्हणून मुली जास्त ताकदवान का? <<
नाहीत का? कुपोषणाच्या बळी ठरूनही स्त्रियांचं आयुष्य सांख्यिकीदृष्ट्या पुरूषांपेक्षा दीर्घ असतं. कोणत्याही प्रगत देशांची (जिथे युद्ध झालं असेल तर फक्त पुरूषच मारले गेलेले नाहीत) लोकसंख्या पाहिलीत तर म्हातार्या स्त्रिया जास्त दिसतात. का?
ताकद फक्त शरीरातील स्नायूंच्या संख्येवरूनच मोजायची का?
>> निश्चितच निसर्ग. संस्कृतीचे पुरावे फक्त काही हजार वर्षांचे आहेत. तर माणूस जमातीचा इतिहास काही लाख वर्षांचा. <<
फक्त काही हजार वर्षांमधेही स्त्रियांनीच अमुक एक कामं करायला पाहिजेत हे ठसवता आलं आहे एवढंच या वाक्यातून 'सिद्ध' होऊ शकतं. तुम्ही म्हणता "निश्चितच निसर्ग" म्हणून पुरावा म्हणून, वादातला मुद्दा म्हणून ते ग्राह्य धरता येणार नाही.
प्रतिसादाचा इतर भाग अवांतर वाटल्यामुळे दुर्लक्षित केला आहे.
4 Aug 2010 - 10:38 am | मधुशाला
हा प्रश्न या धाग्याच्या प्रवर्तकाला विचारा, मला नाही. हे त्यांचं लॉजिक आहे, माझं नाही
त्यांचं लॉजिक वेगळं आहे. तुम्ही त्यातून स्वतःचं वेगळं लॉजिक काढलंत म्हणून हा प्रश्न तुम्हालाच विचारला.
शिंपी हा शब्द चुकीचा वापरलात, गवंडी आणि विणकर म्हणायला पाहिजे.
"हाताने शिवले तरी आहेत?" हे तुमच्याच प्रतिसादातलं एक वाक्य आहे. आमच्या कोल्हापुरात कपडे शिवणार्याला शिंपीच म्हणतात विणकर नाही. पुण्यात म्हणत असतील तर माहीत नाही.
ही वाक्य तुम्ही माझ्या तोंडी घालता आहात. चष्मा काढलात तर कदाचित माझे विचार समजतील, पटावेच असा आग्रह अजिबात नाही.
तुमच्या एकंदर प्रतिसादांतून असा निष्कर्ष येतो कि मुलींनी स्वयंपाक शिकण/करण यालाच तुमचा विरोध आहे. माझे विचार कोणाला पटावेत असा माझा सुद्धा आग्रह नाही.
नाहीत का? कुपोषणाच्या बळी ठरूनही स्त्रियांचं आयुष्य सांख्यिकीदृष्ट्या पुरूषांपेक्षा दीर्घ असतं. कोणत्याही प्रगत देशांची (जिथे युद्ध झालं असेल तर फक्त पुरूषच मारले गेलेले नाहीत) लोकसंख्या पाहिलीत तर म्हातार्या स्त्रिया जास्त दिसतात. का?
नाहीत. याचं उत्तर मी मागेच दिलं आहे. एकतर ते तुम्ही वाचलं नाहीत किंवा त्याला तुमच्याकडे समर्पक उत्तर नाही.
ताकद फक्त शरीरातील स्नायूंच्या संख्येवरूनच मोजायची का?
नाही. कोणत्या प्रकारच्या ताकदीबद्दल आपण बोलत आहोत त्यावर ते अवलंबून आहे. याचही उत्तर मी मागच्या प्रतिसादात द्यायचा प्रयत्न केला होता. पण तो तुम्ही अवांतर म्हणून पास केलात. पुन्हा एकदा ( एकतर ते तुम्ही वाचलं नाहीत किंवा त्याला तुमच्याकडे समर्पक उत्तर नाही)
निश्चितच निसर्ग. संस्कृतीचे पुरावे फक्त काही हजार वर्षांचे आहेत. तर माणूस जमातीचा इतिहास काही लाख वर्षांचा.
माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की जरी पुरूषानी संस्कॄतीच्या आडून जर स्त्रियांना ही सक्ती केली असेल तर ती फक्त काही हजार वर्षेच जुनी आहेत. पण निसर्गाने ही कामे स्त्रियांकडे सोपवून काही लाख वर्षे लोटली आहेत. वरील विधानाचा अर्थ तुम्ही नक्की कसा घेतला माहीत नाही.
अनेक श्रीमंत घरांमधेही कुपोषण दिसतं, आई घरी असेल तरीही!
हे असं कशामुळे होत असेल? तर ज्याचं जे काम आहे ते त्यानं न केल्यामुळे. म्हणजे असं, मुलांचं संगोपन हे निसर्गाने मातेकडे सोपवलेलंच काम आहे. तेच आईनं इथे टाळल्यामुळे हे होत असावं. आता ते का टाळलं गेलं याला अनेक कारणे असू शकतील. (खुळचट स्त्रीमुक्तीच्या कल्पना हेही एक कारण असू शकेल का???)
पण त्यासाठी एखाद्या ठराविक व्यवसायात असणार्या स्त्रियांनाच "झोडपून" काढणं
या व्यवसायात अशी उदाहरणे जास्त बघायला मिळतात त्यामुळे हा लेख अश्या स्त्रीयांना उद्देशून लिहिला असावा किंवा कदाचित सु. कु.,सारंग्,प्रविन्भप्कर याच व्यवसायात सुद्धा असू शकतील.
पण हल्ली सरकारी शाळांमधे खिचडी, दूध मिळतं असं ऐकून आहे. सत्यपरिस्थिती आणि कायदा, नियम यांच्यात फरक असेल याचीही मला खात्री आहे.
याचा संबंध कळला नाही.
जगाच्या अर्ध्या लोकसंख्येला दुय्यम दर्शवणारा विचार आहे
दुय्यम दर्शवणारा विचार कुठे आहे हे दुसर्यादा लेख वाचूनही कळाले नाही. की स्वयंपाक करणे हे काम दुय्यम दर्जाचे आहे असा आपला समज आहे?
यात अवांतर काय होतं हे अनाकलनीय. तुमच्याच आधीच्या प्रतिसादातील वाक्ये उघॄत करून त्यावर माझे विचार मांडले आहेत. तेव्हा अवांतर असतील तर ती मूळ वाक्ये.
4 Aug 2010 - 11:12 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
या प्रतिसादावरून मला मूलभूत प्रश्न पडला आहे तो असा:
"सारंग कुलकर्णी" आणि "मधुशाला" हे आयडी एकाच व्यक्तीचे आहेत का? "सारंग कुलकर्णी" या आयडीला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं "मधुशाला" यांना काय वाटतात हे समजून घेण्यात मला काडीचा रस नाही.
"मधुशाला", मला काय म्हणायचं आहे हे (काही इतरांपर्यंत पोहोचलेलं असलं तरी) तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचलेलं नाही; पोहोचण्याची शक्यता मला नजीकच्या भविष्याततरी दिसत नाही. तेव्हा माझा पास! चालू द्यात तुमचं...
4 Aug 2010 - 8:55 pm | मधुशाला
मलाही तुमच्याशी वाद घालण्यात काडीचा रस नाही. मी फक्त "माझे मत" व्यक्त केले होते. आता तुम्ही त्याला प्रतिसाद दिलात तर मलाही उत्तर देणे भाग आहे.
राहता राहीला "मूलभूत प्रश्न". त्यावर कोणीही वाटेल ते तर्क कुतर्क लढवू शकतो. माझी ना नाही. मी तिकडे दुर्लक्षच करेन, जसे इथल्या आणि मागच्या वाह्यात प्रतिसादांकडे केले आहे. दोन दोन आयडी काढून त्यांना उत्तरे देण्याइतका माझ्याकडे वेळ नाही.
तर "३_१४ विक्षिप्त अदिती ", मला काय म्हणायचं आहे हे (काही इतरांपर्यंत पोहोचलेलं असलं तरी) तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचलेलं नाही; पोहोचण्याची शक्यता मला नजीकच्या भविष्याततरी दिसत नाही.
असो.. सारंग कुलकर्णी.. लोकांना तुम्हाला फलंदाजी करताना बघायचं आहे. तेव्हा मैदानात उतरा.
स्वगतः माझ्याजवळ दुसर्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नसती आणि ते मान्य करण्याइतका मनाचा मोठेपणाही नसता तर मी काय केलं असतं??? कदाचित पास दिला असता आणि सोयिस्कर दुर्लक्ष केलं असतं. :) :)
4 Aug 2010 - 9:04 pm | अर्धवट
असं.. मग केव्हाच द्यायला हवा होता पास तुम्ही.
असो चालुद्या
3 Aug 2010 - 11:51 pm | पुष्करिणी
जातीं विषयी आपली काय मतं आहेत? म्हणजे कोणत्याही जातीत जन्म घेतलेल्या व्यक्तिला त्याच्या जातीशी पारंपारिक रित्या जोडलेल्या व्यवसायाचं ज्ञान असलच पाहिजे का?
4 Aug 2010 - 9:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
हा एक वेगळाच पण चांगला मुद्दा आहे, असा विचार मी आधी केला नव्हता. धन्यवाद पुष्करिणी.
4 Aug 2010 - 12:09 pm | आंबोळी
जातीं विषयी आपली काय मतं आहेत? म्हणजे कोणत्याही जातीत जन्म घेतलेल्या व्यक्तिला त्याच्या जातीशी पारंपारिक रित्या जोडलेल्या व्यवसायाचं ज्ञान असलच पाहिजे का?
आयला.... आता टीआरपी वाढवायला नविन विषय.....
झाडं कमी पडायला लागलीत हो.... आधी झाडे लावा आणि मग पुढचे विषय हाताळा....
आणि पॉपकॉर्नचे दर पण वाढायला लागलेत.....
अवांतर : तरी बर ही अदिती सारखी खाली उतरून मैदानात धावतीय.. त्यामुळे जरा ऐसपैस बसता येतय या फांदी वर...
अतिअवांतर : वर कोणीतरी प्रविन्भप्कर हा टार्या आहे असा आरोप / खुलासा/ भांडाफोड केलाय... त्यावर अधिक माहीती कोणी देऊ शकेल काय?
4 Aug 2010 - 2:03 pm | गणपा
>>अवांतर : तरी बर ही अदिती सारखी खाली उतरून मैदानात धावतीय.. त्यामुळे जरा ऐसपैस बसता येतय या फांदी वर...
आंबोळ्या एकदम हुच्च. =)) =)) =))
>>अतिअवांतर : वर कोणीतरी प्रविन्भप्कर हा टार्या आहे असा आरोप / खुलासा/ भांडाफोड केलाय... त्यावर अधिक माहीती कोणी देऊ शकेल काय?
मी पण वाट पहातोय ;)
4 Aug 2010 - 2:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ए गप रे! एकतर सारखे सगळेजण माझ्या नवर्याची कीव करतात त्याचा आनंद आणि त्याबद्दल आभार व्यक्त केल्यावर लगेच हा आंबोळ्या माझी जागा चोरतो.
नवीनतम (प्रभाकरी) प्रतिसाद पहाता आंबोळीच्या अतिअवांतरातलं तथ्य लगेच समजलं!
3 Aug 2010 - 11:59 pm | गणपा
पहिल्या वहिल्या लेखा बद्दल अभिनंदन.
विषयही छान निवडलाय सेंच्युरी नक्की.
बरेच लावलेत. :)
4 Aug 2010 - 12:05 am | पक्या
>>अशारीतीने जर ते महत्वाचे आणि गरजेचे काम आहे हे लक्षात घेतले तर स्वयंपाक न करण्याचा कंटाळा मुली (काही बाबतीत मुले) करणार नाहीत.
गल्लत होते आहे साहेब. अशा किती मुली स्वयपाकाचा कंटाळा करतात? उलट स्वयंपाक न करण्याचा कंटाळा करणारे मुलेच जास्त असावेत.
नवरा बायको दोघेही नोकरी करित असले तर स्वयंपाक हे दोघांचेही काम आहे हे का नाही लक्षात घेत?
बाई नोकरी करत नसेल म्हणजे गृहिणी असेल तर घर सांभाळणे हे ती करतेच (घर सांभाळणे ह्यात स्वयंपाक धरुन असंख्य कामे आली आहेत.) पण नोकरी करत असेल तर का नाही दोघांनी स्वयंपाकाची जबाबदारी उचलायची - ह्याचे स्पष्टीकरण
कुठेही लेखात नाहीये.
परत परत एकाच विषयावर दळ्ण दळले जात आहे.
नवरा बायको दोघेही कामावरून दमून घरी आल्यावर बायकोने गरमागरम नवर्याला चहा करून देणे हे अगदी जवळच्या मित्राच्या घरात पाहिले आहे. त्या घरातील बायको नवर्या इतकीच दमून आलेली असते पण तरीही तिलाच चहा करावा लागतो आणि नंतर संध्याकाळचा स्वयंपाक . शिवाय सकाळी कामाला दोघेही बरोबरच निघतात तर त्यावेळी दोघांचा जेवणाचा डबा सकाळी लवकर उठून तिलाच करावा लागतो. कारण नवर्याला स्वयंपाकातले काही ही येत नाही .
(शिकण्याची त्याची इच्च्छा ही नाही कारण स्वयंपाक हे बायकांचेच काम अशी मानसिकता तयार झालेली .)
ही मानसिकता बर्याच पुरषांची आहे. ती बदलून स्वयंपाक लग्नाआधी / लग्नानंतर (आपापल्या सोयीनुसार) मुलगा आणि मुलगी दोघांनीही शिकलाच पाहिजे..जर खाण्याची अन्य सोय होणार नसेल तर.
स्वयंपाक कोणी करायचा ह्याचे कोणतेही नियम निसर्गाने घालून दिलेले नाहित. आणी आदिम मानवाच्या काळातील परिस्थिती ही आता राहिलेली नाही..उदा. पुरषाने शिकार करून आणणे आणि बाईने रांधणे.
जमाना बदलला आहे. पूर्वीच्या पुरषाची कित्येक कामे आताचा पुरूष करत नाही. आताच्या मुलांना नोकरी करणारी बायको तर हवी असते शिवाय तिने चांगलंचुंगलं खायला घालावं ही अपेक्षा ही असते. आयतं गिळायला काय कोंणालाही आवडतंच ना.
आपला लेख पूर्णतः चुकीच्या गृहीत़कांवर आधारित आहे. त्यामुळे त्यातून कुठलाही प्रतिवाद होत नाहिये , कुठलेही मुद्दे खोडून काढले जात नाहियेत. सबब लेख अत्यंत निरुपयोगी वाटत आहे.
4 Aug 2010 - 12:34 am | गणपा
पक्या भाव मराठी काही म्हणी आहेत....
पालथ्या घड्यावर पाणी ...
गाढवापुढे वाचली गीता ...
घोड्याला पाण्यापर्यंत नेता येते ...
झोपलेल्याला उठवता येते, पण झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही ...
बाकी तुम्ही शहाणे आहात :)
4 Aug 2010 - 12:56 am | पक्या
बरोबर आहे, गणपा .
त्यामुळेच अशा लेखांवर माझा हा शेवटचा प्रतिसाद.
4 Aug 2010 - 12:58 am | दिनेश
नुसतेच शहाणे नाही..फार हुशार आहात असे म्हण गणपाभौ.. ;)
4 Aug 2010 - 1:18 am | शिल्पा ब
वाह वा!!! इतके दर्जेदार आणि उच्च प्रतीचे विचार असणारे लोक मिपावर येऊन आपले विश्व समृद्ध करत असताना काय हो तुम्हाला हे असले खुळचट सुचते ?
तुमचा निषेध ..अगदी मनापासून हो...
4 Aug 2010 - 12:59 am | चिरोटा
सारंग, हे ऑनसाइट की भारतात?
नवरा बायको दोघेही मोठ्या कालावधीसाठी ऑनसाईट असतील तर दोघेही आनंदाने स्वयंपाक करतात असे माझे निरीक्षण आहे.भारतात कधीही न खाल्लेल्या पाकृ भारताबाहेर खायला मिळतात.
---
4 Aug 2010 - 12:59 am | Dhananjay Borgaonkar
सध्या ऐटीतील बायको सीझन चालु आहे वाटतं.
चालुदे चालुदे.
4 Aug 2010 - 2:03 am | Pain
@ संपादक
चित्र कसे अपलोड करतात ?
4 Aug 2010 - 1:19 am | रेवती
सारंग कुलकर्णी,
आपले लेखन मुद्देसूद वाटते आहे.
(चांगल्या वाईटाबद्दल बोलत नाहिये.);)
4 Aug 2010 - 3:43 am | निशिगंध
बायकोबी पायजे
सुंदरबी पायजे
भल्ली गोडबी पायजे
आयटीबी पायजे
कमावणारीबी पायजे
आन
सैपाक करणारीबी पायजे
जरा जास्तच ना भौ...
4 Aug 2010 - 4:03 am | प्रियाली
खरे आहे. शारीरीक श्रमाच्या गोष्टी ज्या पुरुषांना जमतात त्या सरसकट स्त्रियांना जमतील असे नाही आणि जमत असतील तर त्यांनी कराव्या अशी सक्ती कोणी करणार नाही आणि करू नये. परंतु ही कामे कराविशी वाटणे हा ऐच्छिक भाग असू शकतो म्हणूनच स्त्रिया वेटलिफ्टींगपासून इंजिन ड्रायव्हरचे काम खुशीने करतात तर कधीकधी नाईलाजानेही करतात.
राहीला प्रश्न स्वयंपाकाचा. तर ते पुरुषांना आणि स्त्रियांना आता शारिरीक कष्टाचे काम राहीलेले नाही. स्वयंपाक करणे ही आनंदाची गोष्ट आहे आणि ती प्रत्येकाने खुशीनेच करावी. कौटुंबिक आणि पुरातन काळापासून पुरुष उत्तम स्वयंपाक करत आले आहेत. (म्हणूनच भटारखाना, आचारी, खानसामा, बल्लवाचार्य वगैरे शब्द भाषेत प्रचलित आहेत. भीमासारखा उत्तम बल्लवाचार्य दुसरा नव्हता असे म्हणतात.) तेव्हा, स्वयंपाक हे बायकांचे काम आहे हा प्रवाद चुकीचा आहे. बायका घराबाहेर पडत नसत म्हणून घरगुती कामे त्यांच्याकडे येऊन कामाची विभागणी झाली आणि स्वयंपाकाची जबाबदारी स्त्रियांकडे आली. आता परिस्थिती तशी राहीली नाही तेव्हा स्वयंपाकाची विभागणी झाली आणि स्त्रियांनी तशी अपेक्षा केली तर गैर नाही. "नोकरी करणारी बायको हवी." अशी अपेक्षा पुरूष करतातच ना!
पूर्वजांनी कामाची जी विभागणी केली ती तत्कालीन संस्कृतीप्रमाणे होती. संस्कृती सतत बदलत असते. पूर्वजांनी कामाच्या विभागणीबरोबरच इतर अनेक गोष्टीही समाजात लागू केल्या होत्या. त्यातल्या अनेक आपण सोडल्याच ना! बदलत्या संस्कृतीनुसार आपणही बदलायला हवे.
स्वयंपाक या शब्दातच "स्व" आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वयंपाक येणे गरजेचे आहे. यात बायका आणि पुरुष असा भेदभाव नाही आणि निसर्गाचाही संबंध नाही. निसर्गाने स्त्रीने स्वयंपाक करावा असे सांगितलेले नाही आणि देवानेही सांगितलेले नाही. शेती करण्याप्रमाणेच कपडे धुणे, जमीन सारवणे, विहिरीतून पाणी काढणे, केरवारा करणे, लावणी-पेरणी करणे ही अतिशय कष्टाची कामे स्त्रिया करत आल्या आहेत. स्त्री फक्त स्वयंपाक करते कारण तिला इतर कष्टदायक कामे करता येत नाहीत असे म्हणणे म्हणजे त्यांचे इतर कष्ट नजरअंदाज करण्याजोगे आहे.
अन्न ही माणसाची मूलभूत गरज असली तरी स्वयंपाक ही दुय्यम गरज ठरू शकते. म्हणूनच खाद्यपदार्थांची दुकाने इंस्टंट खाद्यपदार्थांनी भरलेली असतात. गेल्या शतकातले अनेक पदार्थ आता आपल्या स्वैपाकातून बाद होत चालले आहेत. सकाळी धावतपळत ऑफिस गाठणार्या, संध्याकाळी उशीरापर्यंत मिटींगमध्ये अडकून राहणार्या आणि घरी आल्यावर पुन्हा लॅपटॉपमध्ये किंवा ऑनकॉल किंवा ऑफसाईटबरोबर कामे करणार्यांना घरात उकडीचे मोदक, नानकटाया, अनरसे, पुरणपोळ्या करायला वेळ आणि शक्ती असेलच असे नाही. पुन्हा येथे बाई किंवा पुरुष दोघांची परिस्थिती सारखीच आहे. जे बाजारात सहज आणि स्वस्त मिळतं ते खपून घरात करण्याची गरज नाही असे अनेकांना वाटणे रास्त आहे. (बाजारच्या अन्नाला घरच्या अन्नाची चव नाही म्हणून घरातही करून पाहणारे भेटतातच. हा सर्व स्वेच्छेचा मामला आहे.)
यासारखेच उदाहरण रेडीमेड कपड्यांचे आहे. पूर्वी टेलरकडून मापे देऊन लोक कपडे शिवून घेत असत. आता मॉलमध्ये जाऊन रेडिमेड खरेदी करतात कारण ते झटपट आहे. शेवटी पोट भरण्यासाठी/ डाएट करून उपाशी ठेवण्यासाठी काय किंवा पोट झाकण्यासाठी/ उघडे टाकण्यासाठी काय ज्याला त्याला आपली आवड ठरवण्याचा हक्क आहे.
भलताच गैरसमज आहे.
4 Aug 2010 - 4:34 am | Nile
आत्ताच जेवण करुन आलो, पुन्हा भुक लागली की येतो पॉपकॉर्न खायला.
जेविन पत्भर.
4 Aug 2010 - 7:55 am | विनायक प्रभू
मुद्दा नेमका काय आहे?
लग्न करताना मग ती आय टी वाली असु दे किंवा नसु दे,
स्वयंपाक करता येतो का? हा प्रश्न नीट विचारुन करा की लग्न.
आणि नंतर मनाप्रमाणे नाही झाले तर
नशिब .. तर काय करणार पांडु म्हणायचे आणि गप्प गुमान बसायचे.
4 Aug 2010 - 10:12 am | मृत्युन्जय
आयला आणि या विषयाची फॅशनच झाली आहे राव. एका विषयावर किती धागे? आता बंद करा ना. की अजुन काहे असेच विषय देऊ?
१. पुरुष आणि स्वयंपाक
२. आयटीतल्या मुलींच्या नवर्यांनी स्वयंपाक शिकुन घ्यावा यासाठी नवीन कायदा हवा का?
३. स्वयंपाक न येणे हा नवर्याचा मानसिक आणि शारिरिक छळ असु शकतो का आणि त्या धर्तीवर कलम ४९८आ असले पाहिजे क?
४. आयटी शिकणार्या मुलिंना स्वयंपाक हा विषय महाविद्यालयात सक्तीने शिकवला जावा का?
५. लग्नापुर्वी स्वयंपाकाची परिक्षा मुलिंना सक्तीची करावी का?
अजुनहि काही विषय आठवुन ठेवतो. येऊ द्यात नवनवीन धागे
4 Aug 2010 - 10:22 am | अर्धवट
आपला पास..
अदिती.. शिल्पाला तो इनोद पाठव.. काही समजतय का बघ... :)
4 Aug 2010 - 11:07 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
श्री. अर्धवट, आपला तर बुवा पास आहे या लोकांना! "आंजावर अनोळखी आयडींशी वाद घालण्याची चूक मी पुन्हा करणार नाही" हे वाक्य १०० वेळा लिहायला (आणि पुन्हा विसरायला) मी जाते आहे. वेळ झाल्यावर सैपाकाच्या पथ्यांचा विचार करता येईल.
व्हीडीओ हुडकण्याचं सौजन्यः नंदन
4 Aug 2010 - 11:02 am | अनिल २७
माझे आता असे मत झाले आहे कि 'आय टी वाली बायको' या विषयावर धागे सुरू करणारे सर्व जण 'मनुष्य' या कॅटॅगरीत येत नाहीत.. ते सर्व लोक एक तर परग्रहावरुन आले असावेत अथवा 'जनावरे'.. (अर्थात माकडे..) याच कॅटॅगरीत आहेत.. लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी 'आय टी तली बाई' या विषयावर मर्कट्चाळे सुरू करून यांना असे वाटते कि आपण ईथे फार मोठे वैचारिक घोडे मारीत आहोत.. सनसनाटी निर्माण करण्यासाठी हि (जनावरांची) जमात प्रसंगी वैयक्तिक चिखलफेक (तीही अगदी खालच्या पातळीवर) करण्यासही मागेपुढे बघत नाही.. याच प्रतिसादांत शिल्पा ब. व आदीती यांच्यावर तर अगदी हिन पातळीची टिपण्णी करुन या (जनावरांच्याच) जमातीने लक्ष वेधून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.. संपादक मंडळाने आतातरी हस्तक्षेप करुन या मर्कटचाळ्यांवर लगाम घालावा,, केवळ टी आर पी वाढविण्यासाठी हे धागे सुरू केले गेले आहेत हे अगदी स्पष्ट आहे.... ही 'मिसळपावातील अडगळ' आता दूर करावी ही संपादक मंडळाला विनंती...
4 Aug 2010 - 12:50 pm | मन
तिच्यायला....
हे स्वयंपाकाचं दळण....
वाचवतही नाही आणि सोडवतही नाही.
बॉस बोंबलुन र्हायलिये काम कर म्हणुन आणि च्यायला हे वाचुन डोक्याची मंडइ व्हायलिय.
अरे ह्या ऑनलाइन डोकेदुखीवर ऑनलाइन अॅनासिन मिळेल का कुठं?
(आता बोंबला .... तुला वाचायची कुणी सक्ती केलिये का म्हणुन...
अहो पण मी ही एक वाचक आहे, हे असलं माझ्या मिपाचं चाललेलं वाट्टोळं बघवेना.....)
शेवटी तुकोबा म्हणुनच गेलेत "बुडती हे जन , देखवेना डोळा..."
महिला/स्त्री/मुली उणे स्वयंपाक = ०
हे गणित २१ व्या शतकात वाचुन धन्य झालो....
4 Aug 2010 - 2:14 pm | मेघवेडा
अदिती, कामं नाहीत वाटतं?
बाकी गणपाशी बाडिस आहे. :)
4 Aug 2010 - 2:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
गप रे, मी गेले दोन तास या धाग्यांवर काहीही वैचारीक लिहीलेलं नाही. आत्ता फक्त 'झाडावरची जागा माझीच आहे' असं लिहून गेले तर लगेच मला कामं नाहीत! हृदयाला घरं पडली हे वाचून!!
4 Aug 2010 - 9:46 pm | अमरेन्द्र कुलकर्नी
अदिति काकु,
गेले दोन दिवस मी तुमचे विचारच ऐकले नाहित.
आता तरि वैचारिक लिहा.
आम्हि वाट पाहतोय.
4 Aug 2010 - 9:57 pm | अर्धवट
अदिती,
हा काय आरोप तुझ्यावर... तुझी गणना विचारजंतात...
4 Aug 2010 - 9:58 pm | गणपा
झाल यांच परत सुरु.
अरे त्या संपादक मंडळाने मेहनीतीने इतकी साफ सफाई केली आहे, का परत घाण करताय?
मग आयडी ब्लॉक केले की रडत बसता नाही तर कंपुबाजीच्या नावाने गळे काढत बसता.
4 Aug 2010 - 2:28 pm | दिपक
4 Aug 2010 - 2:35 pm | Nile
अरे लबाड!
तरीच म्हणलं अदितीला लगेच झाडावरुन उतरुन यायला कसं जमतं ते. साला आम्ही शेंड्यावरुन उतरुन येईपर्यंत इंटर्व्हल होते इथे.
4 Aug 2010 - 2:31 pm | मेघवेडा
प्रति,
नवनिर्माण समिती/ज्यांचा संबंध असेल ते.
मीमराठी संस्थळावर 'दुर्लक्ष करा' अशी एक सोय मागे सुरू करण्यात आली होती. तिथे ती तितकीशी हिट झाली नाही. पण मिपाला या सुविधेची सध्या फार फार गरज आहे असे वाटते, हे माझे प्रामाणिक मत.
कळावे,
4 Aug 2010 - 2:47 pm | अस्मी
सहमत
4 Aug 2010 - 9:08 pm | गणपा
माताय, संपादकांच्या नजरेतुन हा धागा सटकला की काय?
4 Aug 2010 - 9:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
नाही! आधी धागा अदृश्य झाला, संपादकांनी सगळा कचरा साफ केला आणि आता पुन्हा पहिले पाढे पंचावन्न सुरू झाले आहेत. पण मी नाही पाढे म्हणत, मी कॅलक्यूलेटर वापरते! ;-)
4 Aug 2010 - 10:05 pm | मराठमोळा
लोकहो...
अवं आवरा की आता... ह्या स्वैपाकाच्या धाग्यामुळं किती जणांच्या स्वैपाकाचा खोळंबा झाला असन.
कुनी सैपाक करायचा अन कुनी नाय त्ये ज्याच तेलाच ठरवूंदे, जेच्या तेच्या चार भित्ताडाच्या आत. हितं कितीबी गिरणी दळली तरी दुनियेला काय बी फरक पडायचा नाय बगा.