माझी मैत्रिण - विभा

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
2 Aug 2010 - 9:37 am

२ स्त्रियांमधे जितकी चांगली मैत्री होऊ शकते तितकी चांगली मैत्री माझ्यात आणि विभावरीत होती असं सेफली म्हणता येईल. टचवुड! याचं मुख्य कारण बहुसंख्य बायकांत आढळ्णारा कॅटीनेस, पेटीनेस, हेवा यांचा आमच्या दोघीतील ढळढळीत अभाव.
विभा जितकी परखड आणि सरळ तोंडवर बोलणारी आहे तितकीच मी मेलो आणि पडेल आहे पण ती मनाने अतिशय चांगली आहे. तिला परखड बनायला कारणदेखील आहे. लहानपणी वडील अचानक वारल्यानंतर आईनी कष्ट करून मोठं केलय. पुढे विभानी कॉलेजपासून लहान्मोठ्या नोकर्‍या करून आईला हात्भार लावलाय. वडील नसल्यावर कसे लांडगे पदोपदी भेटतात ते तिलाच माहीत.
लहान वयात स्वातन्त्र्य चाखलेले लोक लगेच ओळखू येतात. विभाही त्याच कॅटॅगरीतली. स्वातंत्र्याची नशाच तशी असते. अजून हवं, अजून हवं, पुरंच पडत नाही.
विभाचं अजून लग्नं झलेलं नाही - कारण टू चूझी!! मनाजोगा वर मिळत नाही अजून. मागे लोक बोलतात "घोडनवरी झाली आहे". तिलाही एकाकीपण भेडसावतं पण वय वाढलं तसं चॉइस कमी होत गेला आणि आता कोणीच आवडत नाही.
क्वचित पिशवीशी चाळा करत मला बोलते "५ वर्षापूर्वी आलेला आपटे चांगला होता गं. फक्त टक्कल होतं जरासं. तेव्हाच हो म्हणायला पाहीजे होतं. आईनी पण नाही नेटानी सल्ला दिला".
पूर्वी पाय ओढत चालत नसे आताशा पाय ओढत चालते. माझा नवरा रमेश तिला १३ वर्षापूर्वी भेटला तेव्हा साधीसुधीच आली होती भेटायला. आता मात्र येते तेव्हा भडक लिप्स्टीक लावून येते. आज्काल कपडेही विजोड आणि भडक घालते. कधीकधी खूप दया येते.
बोलते तेव्हा वाटतं न बोलेल तर बरं स्वतःबद्दलच बोलते जास्त करून. बाहेरच्या घडामोडीशी नातं तुटल्यासारखी. आई आजारी आहे म्हणते; "हाय खालीये मुलीचं लग्न न झाल्याची. स्वतःला गुन्हेगार समजतेय. नोकरी बरी चालली आहे. " मग मी ही विभाला टाळते विशेषतः रमेश घरी असला की. तो नसताना झेलते, कणवेपोटी.
वेल, मैत्री फारशी टिकेलसं वाटत नाही. वाईट वाटतं पण चॉइस नाही.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

हा लेख तीला वाचायला द्या. जो काही वाटत असेल तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल

ह्म्म. वेळेत लग्न झालं असतं तर कदाचित ती आज आहे तशी नसती.
माणसानं इतकही चूझी असू नये.,,काही वेळेस थोडिशी तडजोड ही आवश्यक आहे.
तुमच्या मैत्रिणीने हा लेख वाचला तर वाईट वाटेल तिला. तेव्हा काळजी घ्या. मैत्रिणीचा सकारात्मक दृष्टीकोन असेल तर मग ठीक आहे.

ज्ञानेश...'s picture

2 Aug 2010 - 11:51 am | ज्ञानेश...

लेख आवडला.
प्रामाणिक कथनाबद्दल अभिनंदन.

मिसळभोक्ता's picture

2 Aug 2010 - 12:03 pm | मिसळभोक्ता

आयटीतल्या मुलींना स्वयंपाक यायला हवा, असे म्हटल्यामुळे आदरणीय सुजय कुलकर्णींना १०० प्रतिसाद ! आणि इथे काहीच नाही ?

इथे तर आणखीच मजा मजा आहे. उदा:

२ स्त्रियांमधे जितकी चांगली मैत्री होऊ शकते तितकी चांगली मैत्री माझ्यात आणि विभावरीत होती असं सेफली म्हणता येईल.

होती ? असो. ह्यापेक्षा चांगली मैत्री सॅनफ्रान्सिस्कोत दिसून येते.

याचं मुख्य कारण बहुसंख्य बायकांत आढळ्णारा कॅटीनेस, पेटीनेस, हेवा

झाड कुठे आहे रे ?

वडील नसल्यावर कसे लांडगे पदोपदी भेटतात ते तिलाच माहीत.

लांडग्यांना फ्यामिली सिचुएशन माहिती असते तर ?

५ वर्षापूर्वी आलेला आपटे चांगला होता गं. फक्त टक्कल होतं जरासं.

म्हणजे ? टक्कल वाईट ? काय हे विझूभाऊ ? आम्ही नसतं बॉ ऐकून घेतलं !

पूर्वी पाय ओढत चालत नसे आताशा पाय ओढत चालते.

हॅ हॅ हॅ.. "पाय ओढत चालण्याची एकशे एक कारणे" ह्या ग्रंथाचे लेखक आदरणीय विनायक प्रभूंना भेटा, अथवा कळवा.

मिपाच्या स्त्रीमुक्ती आणि पुरुषमुक्ती मंडळसदस्यांना विनंती, की संपादनाची विनंती करावी. (नाहीतरी आणखी तुम्ही काय करू शकता ?)

परिकथेतील राजकुमार's picture

2 Aug 2010 - 4:48 pm | परिकथेतील राजकुमार

लांडग्यांना फ्यामिली सिचुएशन माहिती असते तर ?

निवासी लांडग्यांना असते म्हणे. ;)

फार थोड्या लोकांना आपल्या चुकांची फळे भोगावी लागतात...दुर्दैवाने त्यातील ही एक.

शुचि's picture

2 Aug 2010 - 3:59 pm | शुचि

मला आजच एक व्य नि आला भावाच्या स्थळाच्या चौकशी करता त्याला उत्तर- विभा हे संपूर्ण काल्पनिक पात्र आहे. पण अशा मुली असतात.

@मिभो - मला टक्कल असलेले पुरुष कोणत्याही दृष्टीने दुय्यम वाटत नाहीत पण वेड्या विभाला वाटतात. तिच्या या मूर्खपणापायीच ती आज आहे तिथे आहे.
http://www.misalpav.com/node/13366#comment-216929

शैलेन्द्र's picture

2 Aug 2010 - 4:58 pm | शैलेन्द्र

बापरे....

लोक कुठे काय लिंका लावतील... सांगता येत नाही...

भारी समर्थ's picture

5 Aug 2010 - 6:48 pm | भारी समर्थ

वैयक्तिक प्रतिक्रिया प्रातिनिधिक समजून घेतल्यामूळे सगळीकडेच विसंवादी चित्र निर्माण होते.

(र्‍हास पावणार्‍या जंगलाच्या समस्येचा बळी) भारी समर्थ

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

2 Aug 2010 - 5:00 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

.... <<< बहुसंख्य बायकांत आढळ्णारा कॅटीनेस, पेटीनेस, हेवा यांचा आमच्या दोघीतील ढळढळीत अभाव.>>>
: हे मात्र अगदी खरं ...हे 'स्त्री' सुलभ गुण (?) नसतील तर मैत्री हि बाकी काही न होउ देता फक्त निखळ मैत्रीच राह्ते.

even i am blessed with a friend (f) ... तिच्यामध्येही असाच याच गुणांचा अभाव आहे...माझ्यासारखाच! टच वूड!

आता मला एक सांग.... तुझ्याच बोलण्यतुन मला हे जाणवलं की पुर्वीची विभा इमोशनली खुप स्ट्राँग...परखड...स्वतंत्र विचारांची होती. त्यात तीइतर बहुसंख्य बायकांसारखी कॅटीनेस, पेटीनेस हेवा नसणारी आहे. which is really a rare combination. she seems to be a clear soul.
ती जॉब करते म्हणजे स्वतःच्या पायावर उभी आहे..
हं...काही करणांमुळे तिच्यामध्ये जो काहे काँप्लेक्स आलेला आहे त्यामुळे तिच्यामध्ये हा बदल झाला असेल.
मला असं वाटतं शुचि कि तुला तिला टाळण्या आणि सहन करण्यापेक्षा किंवा तिची कणव करण्यापेक्षा बरच काही करता येण्यासारखं आहे.
....तिचे हे सारे प्लस पॉइंट्स जर ती विसरली असेल तर त्याची जाणिव करुन देऊन्...तिला परत तिच्यातली विभा मिळवायचा प्रयत्न कर...
....आपलं आयुष्य स्विकारायची आणि ते सुंदर करुन जगायची तयारी तिच्यामध्ये जागवु शकतेस ना तु!
आणि आप्ल्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणिची आपणच कणव करतो आहे....तिला टाळतो आहे...तिला असं विचित्र फेज मध्ये जाताना पाह्तो आहे. हे तुझ्यासाठी पण त्रास्दायकच होत असेल ना..
...जर तु हे करु शकलीस तर विभा ला 'स्व" सापडेल्..तुला तुझी जुनी मैत्रिण मिळेल्...आणि तुम्हा दोघींच्या मैत्रीतला हरवलेला चार्म परत मिळुन जाईल...
so think about it..!

sandeepn's picture

2 Aug 2010 - 5:11 pm | sandeepn

टक्कल पडले म्हणुन नाही म्हटले ? अरे टक्कल लग्नानंतर पन पडु शकते ना !