एक पाहुणी पोरगी
फॉर्म भरायला येते
आणि भलत्या अपेक्षेने
स्टुल कापसाचं होते
कसे न्याहाळती डोळे
कसे चिकटती हात
जणू अंधार राहतो
सौंदर्याच्या फुफाट्यात
ब्राउझरची खिडकी
उगा राईट क्लिकते
आणि पाहुण्या पोरीच्या
हाती स्पेलिंग चुकते
..सारा दिस कॅफेवर तरी भरे ना फारम
एक पाहुणी पोरगी गेली विसरून घर..
प्रतिक्रिया
31 Jul 2010 - 4:28 pm | केशवसुमार
अवलियाशेठ,
एकदम मस्त विडंबन..हा हा हा..
(वाचक)केशवसुमार
आम्हाला हरिकथेतील कीर्तनकुमारांचे किस्से कॅफेतले हे प्रवचन आठवले
(स्मरणशील)केशवसुमार
2 Aug 2010 - 2:18 pm | स्वाती दिनेश
आम्हालाही कॅफेकुमारांचे किस्सेच आठवले.
नाना,विडंबन झकास!
स्वाती
31 Jul 2010 - 4:46 pm | चतुरंग
पोरीकथेतील किस्सकुमारचे किस्से कॅफेतले आठवले! ;)
31 Jul 2010 - 5:34 pm | मी-सौरभ
थोडे अजुन किस्से टाका ना जमेल तेव्हा :)
31 Jul 2010 - 6:01 pm | रामदास
एक पाहुणी पोरगी गेली विसरून घर..
या ओळींनी मात्र घर करून गेलेल्या मैत्रींणींची नावं आठवली.
2 Aug 2010 - 12:27 pm | मिसळभोक्ता
फक्त नावंच आठवली ? कथा बनण्यास वाव आहे असे दिसते.. येऊ द्या.
31 Jul 2010 - 7:02 pm | क्रान्ति
काय खरं नाय आता! नाना चांगलेच फॉर्म घेऊन मागे लागलेत तुमच्या!
नाना, लै भारी विडंबन! "सारा दिस कॅफेवर" ही ओळ तर भारीच भारी!
31 Jul 2010 - 7:07 pm | राज१५८
अरे व्वा अवलिया,
छान कवीता केलीस. अशाच कवीता करीत जा.
प्रेषक
राजाभाऊ
31 Jul 2010 - 8:24 pm | कळस..
जाम भारी......
31 Jul 2010 - 9:00 pm | Nile
परीकथेतील फॉर्मकुमांराना ही कविता तर त्यांची कहाणीच वाटेल. ;)
31 Jul 2010 - 10:10 pm | प्रभो
भारी रे नान्या.
31 Jul 2010 - 11:07 pm | बिपिन कार्यकर्ते
जय हो... पराची मज्जाच मज्जा आहे ब्वॉ!!!
- (सौंदर्य फुफाटा या शब्दाचा जनक)
1 Aug 2010 - 8:26 am | स्पंदना
अगदी अगदी प.रा. च्या पर्या आठवल्या.
1 Aug 2010 - 11:04 am | ऋषिकेश
कॅफेकथेतील फॉर्मकुमारांची व फॉर्म भरायला आलेल्या कुमारीकेची कहाणी लै आवडली
1 Aug 2010 - 11:19 am | Pain
छान आहे. मॄत्युंजयचा लेख आठवला.
2 Aug 2010 - 12:18 pm | अवलिया
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
2 Aug 2010 - 12:23 pm | परिकथेतील राजकुमार
उठवलात आमचा बाजार ?