माझ्याबाजुला बसलेली ती.

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
23 Jul 2010 - 2:11 pm

दीवस कोणता होता माहीती नाही,मी दुपारी बांद्रयाला जायला निघालो होतो.ट्रेनसाठी प्लॅटफॉर्मवर गेलो.ट्रेनमधे व बाहेर फारशी गर्दी नव्हती.पाउस पडुन छान गार वातवरण तयार झाल होत व सावली पडल्यासारख झाल होत.........असो.
मी अगदीच गबाळा व लोफर दीसत नव्हतो.अनेक वर्षांनंतर 'शर्ट व पँट'(फॉर्मल) अंगाला लागत होत्,म्हणुन जरा अवघडल्यासारखा वागत होतो.जरा इकडे तिकडे नजर फीरवली,नाही म्हणजे आपण कोणाच 'लक्ष' तर नाही ना हे बघायला.अर्थात त्याचा उद्देश हाच की हस होउ नये.काहीजण मला 'चैन उघडी आहे' अस का नाही सांगत हे समजत नाही.
ट्रेन सुटायला आली तेव्हा रीकाम्या जागा परप्रांतिय लोक भरु लागले.मी चौथ्या सीटवर बसुन मस्त सेकंड क्लासचा फायदा घेतला.चारातला एक उठला तस मी आत सरकणार तोच........................................

सफेद त्वचा असलेला दंड....हो सफेदच पांढरा नाही.......त्यावर काळा टी शर्ट.........सर्वच मस्त!
मी चेहरा पहायचा मोह आवरला नाही म्हणुन मान वर करुन पाहणार तोच बाजुचा भैया जागा करायला म्हणून इतका जलद गतीने हलला की माझे लक्ष त्याकडे गेल.तो कुत्रासारखा जीभ काढुन तोंड उघडायचा बाकी राहीला होता.बाकी पुरा 'आउट' झाला होता.ह्या साल्या असल्या प्राण्यामुळे मुली/तरुणी/बाया(?) भाव खातात.
मी बाजुला सरलो,आता तिला दोघांच्या मधे बसाव लागणार म्हणुन ती तशीच उभी होती.अखेर भैयाचा पोपट झाला व तिने मला 'आप अंदर हो जाईये ना' अस सांगितल तेव्हा मी आत शिरलो व ती माझ्या बाजुला बसली...........नाही हो मी अजुन तिचा चेहरा बघितला नव्हता,ती बाजुला बसली तेव्हा मी 'तिला पाहताच भैया पागल' कसा झाला ते बघत होतो.
आणि मी मान तिला बघण्यासाठी वळवली.तर एक छोटासा चेहरा माझ्याकडे बघुन हसला,तो तिच्या खाद्यांवर तडमडणारा मुलगा होता.तिचा स्वःताचा नसावा अस मनापासुन वाटल व "इस के बाद मम्मी के पास जायेंगे" हे एकल्यावर तसच होत कळल्यावर का माहीती नाही पण बर वाटल.
मुलग्याने पुढे आणलेली मान बाजुला काढली व तिचा चेहरा दीसला.आता वर्णन नाही करत बसत पण खुप सुंदर दीसत होती.मी १०-१५ सेकदांत डोळे लहानमोठे करुन करुन तिला बघुन घेतल.तिच्या डोळ्यात डोळे मिळाले तेव्हा मी नजर खिडकीला(ती बसलेल्या त्या बाजुची नाही विरुद्ध बाजुची) चिटकवली ती आता परत तिला पहायच नाही हे ठरवुनच.
गाडी बोरीवलीला आली तेव्हा ट्रेन खुपशी रीकामी झाली.तिने मुलाला बाकड्यावर उभ केल.मी मुला बघण्यासाठी म्हणून बाजुला मान वळवली तर तिच्याशी पुन्हा नजर मिळाली."काय पाहतोस रे लबाडा' असे भाव दीसले.मी 'काही नाही,काही नाही' अस मनात येउनही बोललो नाही.
आहाहा..............काय ते रुप!!!पावडर नाही की क्रीम नाही..........अस्सल पेठा!
हसरा चेहरा,केस पण मस्त फीरवलेले,डोळे बोलके..........भाव खाण्यासाठी लागणार सर्व अगदी भरभरुन होत तिच्याकडे.पण मी इच्छा नसताना तिच्याकडे का बघत होतो माहीती नाही.मला खरच मुलाला पहायच होत :) .'मी अगदीच खडुस नाही' हे दाखवायला मुद्दाम मुलाच्या गालावर हात फीरवला.मुलगा पण छान गोरा होता.आम्ही मस्त 'छोटा परीवार' वाटत होतो.बाजुचे भैये पण 'साईड व्हीलन' सारखे निसटले होते.
"आप कहां जाओगे?" तिचा प्रश्न.
माझ डोक हलल......हो तिच बोलली होती.
"बॅन्ड्रा"....."और आप?"
"मालाड"
"अच्छा"
"आपको सदाशिव एन्क्लेव' पता है?"
आता दुसरा कोणी असता तर "कहा पे है वो?","मालाड मे है या?","अरे वो अंधेरी का तो नही?","आपको वहा जाना है?","मुझे सदाशिव मार्केट मालुम है,एन्क्लेव पता नही" असे पुढे बोलायला कारण शोधणारे प्रश्न विचारत बसला असता.
मी सरळ "जी नही" अस उत्तर दील.formality म्हणुन थोडं हसुन वेगळीकडे बघायला लागलो.
ट्रेन पुढे निघाली.
ती कधी खिडकीकडे व कधी मुलाकडे पहात होती व मी मान सरळ ठेउन भ्रमात पहात होतो.
पुढच्या स्टेशनला ट्रेन अजुनच रीकामी झाली.
आता मालाड येणार म्हणुन मी का माहीती नाही पण परत तिच्याकडे बघितल.मधल्या वेळात मी व ती
एकमेंकांकडे बघण्याचा एकही चान्स सोडत नव्हतो.मी मनातल्या मनात त्या छोट्या मुलावर खुश झालो होतो.
आता ह्यावेळेस मी तिच्याकडे अगदीच रोखुन बघितल तिने पण डोळ्यात डोळे भरले.मी अवघडलो व बाजुला बघितल.खुपच अवघडल्यासारख झाल म्हणुन ताठ बसुन 'इन' नीट केल.बेल्ट नीट केला,कमरेच्या इथे हात लावुन पँट सारखी केली तोच..........
.
.
.
.
"चड्डी नही पहना क्या?" ती बोलली.
मी जागेवरुन खाली पडुन नये म्हणून स्वःताला सावरण्यासाठी यशस्वी खटाटोप केला व तिच्याकडे पाहील.तिच बोलली होती.........तिने लहान मुलाच्या कॉलरला हलकेच पकडल होत,मुलगा हाताने पँट वर खेचत होता.

हुश्श!..................मला काय भलतच वाटल.

मालाड स्टेशनवर गाडी वेग कमी करु लागली.माझ्या छातीत खुप हलचाली होउ लागल्या.ती उभी राहली.मी तिला न्याहाळुन घेतल.ती मला पहातेय हे लक्षात असुनही अगदी हक्काने तिच्या डोळ्यात डोळे टाकले.तिने लाजुन दाखवल.
ती उतरली.वळुन बघतेय का हे पहायला नाही मिळाल.कारण माझ्या डोक्यात तिच वाक्य आल............."चड्डी नही पहना क्या?"

अरे नसेल घातली कार्ट्याने चड्डी म्हणुन काय इतक्या जोरात अस विचारायच?
आणि तु एवढी लाजरी वाटत होतीस्,का बोललीस हे वाक्य?
माझ्या मनातली तिच्याबद्दलची सर्व मते मलिन झाली.
साधे बोलायचे मॅनर्स नव्हते तिला!!
हे असे विचार करुन वाकड झालेल तोंड मी सरळ केल व घड्याळाकडे बघुन मान नकारार्थी हलवली.
एखादी स्त्री आपल्या सोज्वळतेने कीती सुंदर दीसते आणि 'हे' असे 'अविचारी' बोलणे कसे रुपाला बिघडवत,अशाच काहीश्या गोष्टींचा विचार करत मी बांद्र्याला एक सिगरेट ओढली. :)

संस्कृतीप्रतिसाद

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

23 Jul 2010 - 2:23 pm | स्पंदना

8} 8} 8} :))

रागावणार नसाल तर चो. च्या मनात चां. म्हणु?

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

आनंद's picture

23 Jul 2010 - 5:28 pm | आनंद

=)) =)) =))
लै भारी लिहीता तुम्ही!!!
तुमच्या लिखाणात " पांडुरंग सांगवीकर" दिसले.

योगी९००'s picture

23 Jul 2010 - 3:31 pm | योगी९००

प्रकाशाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त असतो हे पटले..

म्हणूनच काही लोकं त्यांचे तोंड उघडण्याआधी bright वाटतात.

खादाडमाऊ

इंटरनेटस्नेही's picture

23 Jul 2010 - 3:33 pm | इंटरनेटस्नेही

ही ही ही ही! सुंदर! :))
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

23 Jul 2010 - 3:41 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

........माझ्याही पाह्ण्यात अश्या काही व्यक्ति आहेत.
म्हणजे....रूप्...उंची.....देखणेपण्.....कपडे....अगदि फँटास्टिक्.....अगदी बूट आणि परफ्यूम ब्रँडेड....
....मात्र तोंड उघडलं की......घाण.....
.....म्हणजे भाषा....व्याकरण्....बाद...
....म्हनून्.....णको.....थिते.......आमन्ला....
...देवा....
...का असं वागतात माणसं

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

23 Jul 2010 - 3:41 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

........माझ्याही पाह्ण्यात अश्या काही व्यक्ति आहेत.
म्हणजे....रूप्...उंची.....देखणेपण्.....कपडे....अगदि फँटास्टिक्.....अगदी बूट आणि परफ्यूम ब्रँडेड....
....मात्र तोंड उघडलं की......घाण.....
.....म्हणजे भाषा....व्याकरण्....बाद...
....म्हनून्.....णको.....थिते.......आमन्ला....
...देवा....
...का असं वागतात माणसं

मी ऋचा's picture

23 Jul 2010 - 3:59 pm | मी ऋचा

=)) =)) =)) =)) =)) :)) :)) =)) =)) =)) =)) =))

मी ॠचा

र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

टुकुल's picture

23 Jul 2010 - 4:01 pm | टुकुल

चड्डी घातली असती तर एव्हढा झटका नसता लागला =)) =)) =))

--टुकुल

कानडाऊ योगेशु's picture

23 Jul 2010 - 4:32 pm | कानडाऊ योगेशु

ट्रेन सुटायला आली तेव्हा रीकाम्या जागा परप्रांतिय लोक भरु लागले.
:))

मी चेहरा पहायचा मोह आवरला नाही म्हणुन मान वर करुन पाहणार तोच बाजुचा भैया जागा करायला म्हणून इतका जलद गतीने हलला की माझे लक्ष त्याकडे गेल.
:)) :))

"चड्डी नही पहना क्या?" ती बोलली.
=)) =)) =)) =)) =))

आधी प्रतिक्रिया वाचल्या आणि मग लेख वाचला.
विशेषत: शुक्रवारी असे काही वाचले कि अजुनच आनंदी (= हर्षद आनंदी )वाटते.

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

महेश हतोळकर's picture

23 Jul 2010 - 4:36 pm | महेश हतोळकर

>>ट्रेन सुटायला आली तेव्हा रीकाम्या जागा परप्रांतिय लोक भरु लागले.
ते परप्रांतीय तुझ्या डोळ्यात खुपले पण ती परप्रांतीय तुझ्या डोळ्यात भरली होय रे लब्बाडा!

परिकथेतील राजकुमार's picture

23 Jul 2010 - 4:44 pm | परिकथेतील राजकुमार

ते परप्रांतीय तुझ्या डोळ्यात खुपले पण ती परप्रांतीय तुझ्या डोळ्यात भरली होय रे लब्बाडा!

शेवटी कार्यकर्त्यांनी प्रोत्साहित केलेले महामानव आहेत ते ;)

लेखन छान छान लिहिले आहे एकदम. काही काही 'पंच' दाद देण्याजोगे आहेत.
असेच लिहिते रहा. पुलेशु.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Jul 2010 - 4:43 pm | बिपिन कार्यकर्ते

=)) =)) =))

चड्डी पहनके फूल खिला है आठवलं...

बिपिन कार्यकर्ते

गणपा's picture

23 Jul 2010 - 4:46 pm | गणपा

=)) =)) =))
एकंदर किस्सा छान रंगवला आहे.

दिपक's picture

23 Jul 2010 - 5:06 pm | दिपक

=))
भारी किस्सा रे शानबा.

एकदा असच भांडुप स्टेशनला ब्रिजच्या पायर्‍यावरुन खाली उतरत असताना एक नवविवाहीत जोडपे वर चढत येत होते. मस्त हसत बडबड चालु असताना ती मध्येच मोठ्याने त्याला म्हणाली. ‘काल किती लेट झाले ना झोपायला’. असे बोलताच बाजुला असणार्‍या सगळ्यांच्या माना त्यांच्याकडे वळल्या.

मेघवेडा's picture

23 Jul 2010 - 9:22 pm | मेघवेडा

>> अनेक वर्षांनंतर 'शर्ट व पँट'(फॉर्मल) अंगाला लागत होत्

मी कंसातल्या शब्दाशिवायसुद्धा हे वाक्य वाचून पाहिलं! मग म्हटलं नशीब कंसातला शब्द आहे जागेवर! ;)

=)) =))

शानबा, जोरात चाललीये गाडी! :D

शिल्पा ब's picture

23 Jul 2010 - 11:09 pm | शिल्पा ब

इतक्या पेठ्यासारख्या छान छान सुंदऱ्या तुमच्या डोळ्यात डोळे घालतात म्हणजे तुम्हीसुद्धा अगदीच छान, सुंदर वगैरे असणार...एखादा फोटो टाका...
म्हणजे तुमच्या लेखाचे शब्द आणि तुमचे रूप यांची जरा सांगड घालता येईल...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

शानबा५१२'s picture

24 Jul 2010 - 12:49 am | शानबा५१२

सर्वप्रथम :एखाद्याच्या दीसण्यावरुन त्याबद्दल मत बनवायची विचारसरणी म्हणजे क्षुद्र विचार होत्,तसा विचार कोणीच करु नये अस मनापासुन वाटत!
तुमच्या कल्पनाशक्तीला अगदी हात वर करुन प्रणाम!
एकदमच अनपेक्षित आव्हान आहे.

आता मी लिहला त्यावर तुमचा विश्वास नाही त्याला मी काय करु?

आणि हो,तिने मला डोळ्यात डोळे घालुन बघितल म्हणजे मी पण दीसायला तिच्याच तोडीचा असायला हवा अस आहे का?
तिला काहीतरी वेगळ आवडल असेल,personality वगैरे.
आणि आम्ही प्रेम 'बघुन' करत नाही वा कधी(च) केल नाही.
तरी हे कधी नव्हे ते एवढ प्रदर्शन करतो.
00011" alt="" />

___________________________________________________
ब्लॉग असावा तर असा 'पाषाणभेद'सारखा!!

शिल्पा ब's picture

24 Jul 2010 - 1:01 am | शिल्पा ब

अरे बापरे!!! तुम्ही तर अगदी क्षुद्र वगैरे भाषा वापरायला लागलात...आता त्या पेठ्यासारख्या मुलीने त्या छोटूला चड्डी का नाही घातली म्हणून विचारले तर तुमचे तिच्याबद्दलचे मत मलीन वगैरे वगैरे झाले....आश्चर्य आहे ..आता अगदी वीज, ध्वनी वगैरे वाचून म्हंटल बघूया ध्वनी ऐकला आता वीज बघावी...
आता आम्ही विचारलं म्हणून तुम्ही डायरेक्ट फोटोच टाकायला निघालात त्यात आमची काय चूक?
बाकी तुमचे आधीचे लेख आणि प्रतिक्रिया वगैरे वाचून personality विषयी उत्सुकता मात्र निर्माण झाली...

<<आणि आम्ही प्रेम 'बघुन' करत नाही वा कधी(च) केल नाही.
तरी हे कधी नव्हे ते एवढ प्रदर्शन करतो.

आता तुम्हीच तुमचा फोटोचं प्रदर्शन करून कोणावर प्रेम करणार? म्हणजे कसं? आपलं उत्सुकता म्हणून विचारलं हो...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

शानबा५१२'s picture

24 Jul 2010 - 1:17 am | शानबा५१२

मला एवढच बोलायच होत की दीसण्याला महत्व दील जाउ नये.ते कीती व कस दीला जात हे मी बघतो तेव्हा फार खराब वाटत.
ती बोलली त्यात 'चुकीचा शब्द' नव्हता,पण ज्या तालासुरात बोलली त्यावरुन 'उद्देशा'बद्दल शंका निर्माण झाली.
काही विशिष्ट शब्दांवर दीला गेलेला जोर मुद्दामच दीला गेला होता म्हणुन ऐकताना 'भलताच' समज झाला.आणि दीसण्यावरुन 'फारच सभ्य' वाटत होती म्हणुन हे वाक्य खुपच अनपेक्षित होत.
मी आरश्यात असा दीसतो...........
bo" alt="" />

ब्लॉग असावा तर असा 'पाषाणभेद'सारखा!!

शिल्पा ब's picture

24 Jul 2010 - 1:29 am | शिल्पा ब

<<<दीसण्याला महत्व दील जाउ नये.ते कीती व कस दीला जात हे मी बघतो तेव्हा फार खराब वाटत.
<<दीसण्यावरुन 'फारच सभ्य' वाटत होती

याला काय म्हणायचं? म्हणजे paradox का स्वतःच स्वतःचं मत खोडून काढणं ?

(जिज्ञासू) जिलबी

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

शानबा५१२'s picture

24 Jul 2010 - 1:38 am | शानबा५१२

नाही मला स्पष्टीकरण नाही देता येणार.
मी शब्दांत अडकलोय आणि त्यातुन सुटायला लागणारे शब्द माझ्याकडे नाहीत.पण
'फारच सभ्य' हे प्राथमिक मत व मी 'वागणुकीत बदल' नाही केला.

पुढच्यावेळी अश्या प्रश्नांपासुन सावधान राहीन!
___________________________________________________
ब्लॉग असावा तर असा 'पाषाणभेद'सारखा!!

मी ऋचा's picture

31 Jul 2010 - 2:41 pm | मी ऋचा

फोटो असावा तर असा 'शानबा'सारखा!!

आप्पा's picture

24 Jul 2010 - 11:29 am | आप्पा

:H 8} =D>
आप्पा
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |

पाषाणभेद's picture

24 Jul 2010 - 8:03 pm | पाषाणभेद

मस्त किस्सा आहे.
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही