सिगरेट सोडायची आहे?

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
29 Jul 2010 - 2:19 pm

काही सदस्यानी विचारणा केली होती त्यांच्या साठी म्हणून हे निवेदन :
सिगरेट किंवा कोणतेही व्यसन हे माणसाच्या मेंदूशी दोन प्रकारे जोडलेले असते. कालांतराने व्यसन ही सवय बनते
कोणतेही व्यसन हे केवळ निर्धार करून सुटत नाही. अथवा व्यसनापासून पळून जाऊनही सुटत नाही.. व्यसन आणि आपली विचारप्रणाली यांच्यात एक अनुबंध ( लिन्क) तयार झालेली असते जेणेकरून व्यसनाचे पदार्थ घेतले की ठरावीक विचार मनात येतात किंवा ठरावीक विचार मनात आले की व्यसनाची तल्लफ येते. व्यसनाची आणि विचारांची ही लिंक तोडता आली तर व्यसन सुटू शकते.
सिगरेट सोडवून देण्यासाठी मी एन एल पी चा ,श्वसनाचे एक्सरसाईज,आणि मेडीटेशनचा वापर करतो. सिगरेट सोडवून देऊ शकतो देतो.
आपल्यापैकी ज्या कोणाला किंवा त्यांच्या मित्रमैत्रीणीना सिगरेट सोडायची असेल तर एका/दीड तासाचे एक असे पाच सेशन चे एक वर्कशॉप आयोजीत करुयात. साधारणतः दहा किंवा अधीक जणांचा गृप असेल तर असे वर्कशॉप फिजीबल होऊ शकते.
जागा वगैरे चा विचार करता एखादा बंदीस्त हॉल किंवा ओपन टेरेस जिथे वाहनांच्या आवाजाचा किंवा लोकांच्या वर्दळीचा त्रास होणार नाही अशी जागा चालू शकेल
योग्य सदस्य संख्या जमल्यास शनीवारी पुण्यात आणि रवीवारी मुम्बैत हे अ‍ॅरेन्ज करता येईल.

वावरविचार

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

29 Jul 2010 - 2:30 pm | इंटरनेटस्नेही

चांगल्या उपक्रमासाठी शुभेच्छा!

(निर्व्यसनी)

प्रकाश घाटपांडे's picture

29 Jul 2010 - 2:39 pm | प्रकाश घाटपांडे

प्रबळ इच्छा असेल तर सिगारेट सुटु शकते.

चिंतामणी's picture

29 Jul 2010 - 3:01 pm | चिंतामणी

प्रबळ इच्छा असेल तर सिगारेट सुटु शकते.

If there is will, there is way.

मी (बारीक) व्यसने करीत नसल्याने कधीच सिगारेट ओढली नाही.

निर्व्यसनी चिंतामणी

चिंतामणी's picture

29 Jul 2010 - 3:01 pm | चिंतामणी

प्रबळ इच्छा असेल तर सिगारेट सुटु शकते.

If there is will, there is way.

मी (बारीक) व्यसने करीत नसल्याने कधीच सिगारेट ओढली नाही.

निर्व्यसनी चिंतामणी

आगाऊ कार्टा's picture

29 Jul 2010 - 3:41 pm | आगाऊ कार्टा

If I cannot smoke in heaven, then I shall not go. (ci)

मितभाषी's picture

29 Jul 2010 - 3:47 pm | मितभाषी

तुम्ही सिगारेट किती वेळा सोडली?/

गाय छाप सोडवुन देता का?

गजुभाउ

परिकथेतील राजकुमार's picture

29 Jul 2010 - 3:57 pm | परिकथेतील राजकुमार

quitting smoking is very easy , i have done it so many times हे प्रसिद्ध वाक्य आठवले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jul 2010 - 4:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांगला उपक्रम....उपक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा....!

अवांतर : मराठी संकेतस्थळाचे व्यसन सुटले पाहिजे यासाठी काही मार्ग आहे का ?

-दिलीप बिरुटे

अवांतर : मराठी संकेतस्थळाचे व्यसन सुटले पाहिजे यासाठी काही मार्ग आहे का ?

हो आहे की...

तुम्ही सदस्य असल्यास... भरपुर इकडचे तिकडचे लेख प्रतिसाद द्या. उडवले जातील. भांडण करा. एक दिवस तुम्हीच उडवले जाल. परत त्या स्थळावर यावेसे वाटणार नाही.

तुम्ही संपादक असल्यास... उगाचच चांगले असलेले लेख प्रतिसाद उडवा. लोक भांडण करतील. तुमचे पद जाईल किंवा तुम्हीच सोडाल. परत स्थळावर येणार नाही.

दोन्ही मार्गाने व्यसन सुटते असा अनेकांचा अनुभव आहे. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jul 2010 - 4:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तसं नै हो नाना. आपण सांगितलेले उपाय हे त्यातले घटक आहेत. त्या घटकाचे जाऊ द्या...!
[ज्या विषयाला जाऊ द्या म्हटले की तुम्हाला लैच जोर येतो. बाकी गोष्टी खरडवहीत]

आज मिपाला क्लिक करायचेच नाही. उपक्रमवर तर जायचेच नाही. मिमवर डोकवायचेच नाही. मायबोलीवर हुंगायला जायचे नाही आणि प्रिय नमोगतावर तर नाहीच नाही. मराठी संस्थळावर नाही डोकावले तर काय होईल. हे व्यसन सुटले पाहिजे, जाऊ दे, मीच माझा काही तरी मार्ग शोधेन. :)

-दिलीप बिरुटे

दिलीपसर,
जालजोडणी तोडुन टाका.
(बिलाचे पैसेच भरु नका. आपोआप जालाशी संपर्क तुटेल.) ;)

धमाल मुलगा's picture

29 Jul 2010 - 4:20 pm | धमाल मुलगा

ओ भाऊ,
पैलं माझं नाव नोंदवुन घ्या राव. च्यामारी ह्या शिग्रेटीच्या..सुटता सुटंना, आन गड येंगायला गेलो तर पार काळिज घशापत्तुर आणतिया...

कधी करताय हे वर्कशॉप? मी आहेच तयार.

अवलिया's picture

29 Jul 2010 - 4:23 pm | अवलिया

त्या रॉडवाल्या बाबाला बी संगती घिवुन जा...

हा हा हा ईजुभौना हक्काच मेंबार घावल बगा
=)) =))
आम्ही सवताच या धम्याच नाव घालणार होतो या कार्यशालेत ;)

वर्कशॉप नंतर काय ? प्रत्येकी २५० रु. काढा. मस्त येंजोय करू

संजा

छोटा डॉन's picture

29 Jul 2010 - 4:31 pm | छोटा डॉन

विजुभौ, चांगला उपक्रम आहे, आमच्या मनापासुन शुभेच्छा !!!

सिगारेट फारच वाईट हो, सोडायलाच हवी.

आंबोळी's picture

29 Jul 2010 - 4:51 pm | आंबोळी

विजुभौ चांगला उपक्रम आहे...
शुभेछा!
अवांतर : त्या धम्याला घेउ नका... ते बेणं त्या वर्कशॉपमधे न पिणार्‍याला पण सवय लावल....

(शीग्रेट सोडून १ वर्ष झालेला) आंबोळी

ओंकार's picture

29 Jul 2010 - 5:52 pm | ओंकार

चांगल्या उपक्रमासाठी शुभेच्छा!

सिगरेट सुटु शकते, मी १२ वर्ष सिगरेट चे व्यसन केले आणि आता गेले ३ वर्ष सिगरेट मुक्त आहे, आणि आता बरेच आरोग्य विशयक त्रास कमी झाले आहेत.
मेंटोस खाण पण सुटालय आता.... :)

भाऊ पाटील's picture

29 Jul 2010 - 6:15 pm | भाऊ पाटील

चांगल्या उपक्रमासाठी शुभेच्छा!
विजुभौ, वर्कशॉप ठिक आहे हो..पण जमत असेल तर उपायांची एक लेखमाला पण लिहा. बर्‍याच लोकांना उपयोगी पडेल. आणि मिपावर आणखी एका चांगल्या लेखमालेची भर पडेल.

ओंकार --येऊ द्या तुमचाही अनुभव लेखणीतून बाहेर.

बोटे फाकवा. सिगरेट सुटेल :D

पिवळा डांबिस's picture

29 Jul 2010 - 11:04 pm | पिवळा डांबिस

विजुभाऊ, एन एल पी म्हणजे काय?
प्लीज जरा स्पष्ट कराल का?

असं इथे शोध घेतल्यावर आढळलं.

धूम्रपान थांबवण्यासाठी NLP चे २-१० सेशन्स लागतात असं आंतर्जालावर दिसतं, आणि यश मिळण्याची खात्री किती आहे याचे दावे वेग-वेगळे आहेत.

विजूभाऊ हीच मेथड वापरतात की अन्य काही ते वाचायला आवडेल.

हे सत्कार्य करावंसं वाटल्याबद्दल विजूभाऊंचे अभिनंदन, आणि भाग घेणार्‍यांना मनःपूर्वक शुभेच्छा!

पिवळा डांबिस's picture

30 Jul 2010 - 10:27 pm | पिवळा डांबिस

माहितीबद्दल धन्यवाद, बहुगुणी.
-पिडां

विकि's picture

30 Jul 2010 - 12:25 am | विकि

खरं आहे .सिगारेट सोडल्याने श्वसन व्यवस्था नीट राहते,डोक दुखतं नाही,कफ होत नाही,कर्करोग,क्षय रोग होण्यापासून वाचले जातो,जिवनमान सुधारतं.
नक्की भरवा हे शिबिर.चांगला उपक्रम (संकेस्थळ नव्हे हा) आहे हा.छान,
आपला
पुर्वीचा चेन स्मोकर(अनुभवी)
विकि

क्रेमर's picture

30 Jul 2010 - 1:11 am | क्रेमर

चांगल्या प्रकल्पाबद्दल धन्यवाद, विजुभौ.

वर्कशॉप विनामूल्य आहे किंवा कसे हे कळवावे.

अहो एवढ्या चांगल्या कामासाठी आणि स्वतःच्याच भल्यासाठी करा कि दोन पैसे खर्च...कंजूस कुठचे..

Nile's picture

30 Jul 2010 - 1:59 am | Nile

श्री क्रेमर हे धुम्रपान-व्यसनाधीन आहे असा शोध लावल्याबद्दल शिल्पा ब काकुंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

शिल्पा ब's picture

30 Jul 2010 - 2:03 am | शिल्पा ब

आमचा वाढदिवस आज आहे असा शोध लावल्याबद्दल नील का नाईल पणजोबांचे अभिनंदन.

शेखर काळे's picture

30 Jul 2010 - 2:29 am | शेखर काळे

ते नीळे आहेत

Nile's picture

30 Jul 2010 - 2:39 am | Nile

धन्यवाद काळे. :)

क्रेमर's picture

30 Jul 2010 - 4:27 am | क्रेमर

अहो एवढ्या चांगल्या कामासाठी आणि स्वतःच्याच भल्यासाठी करा कि दोन पैसे खर्च...कंजूस कुठचे..

शिल्पातै, गरज असती तर खर्च केलाच असता. माहिती असणे चांगले म्हणून विचारले.

वर्कशॉप विनामूल्य आहे किंवा कसे हे कळवावे.

या वर्कशॉप मधून मला काही आर्थीक प्राप्ती व्हावी हा उद्देश नाहिय्ये. मी फी घेत नाही. पण काही फुकटही देणार नाही.... हॉल वगैरे चे जे काही खर्च होतील ते वाटून येतील तेवढेच.

अप्पा जोगळेकर's picture

30 Jul 2010 - 9:50 am | अप्पा जोगळेकर

छान उपक्रम आहे, शुभेच्छा.
मला स्वतःला मात्र सिगरेट सोडून द्यावी असे अजिबात वाटत नाही. ज्यादिवशी तसे वाटेल त्यादिवशी नक्की सोडू शकेन. अजून तरी व्यसनाच्या मुठीत सापडलेलो नाही.

टिउ's picture

31 Jul 2010 - 12:49 am | टिउ

यावर काय बोलणार?
जोपर्यंत सिगरेट सोडावी असं वाटत नाही तोपर्यंत व्यसन आहे की नाही हे कसं काय कळणार बॉ?

गुड जॉब विजुभौ,
वर्गासाठी शुभेच्छा.
निदान एकाची जरी सिग्रेट सुटली तरी कार्यशाळा यशश्वी झाली अस म्हणता येईल.
सर्व भाग घेणार्यांना मनावर ताबा मिळो व हे व्यसन सुटो हीच सदिच्छा :)

ऋषिकेश's picture

30 Jul 2010 - 6:59 pm | ऋषिकेश

सगळ्यांना शुभेच्छा!