संस्थळी प्रतिसाद देता

शुचि's picture
शुचि in जे न देखे रवी...
29 Jul 2010 - 7:19 am

वदनी कवल घेता
नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते नाम घेता फुकाचे
जीवन करी जीवीत्वा अन्न हे पूर्णब्रम्ह
उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म
जय जय रघुवीर समर्थ

च्या चालीवर -

संस्थळी प्रतिसाद देता
सौजन्य सांडूनच चाला
महाभारत होते सौजन्य सांडता फुकाचे
शब्दाने शब्द वाढे शब्द हे आगलावे
फक्त उद्दामपणा बास नोहे (धागाकर्त्याच्या) धोतरासच हात घाला
जय जय गेंडाकातडीधारक जनता समर्थ

हास्यकविता

प्रतिक्रिया

शब्दाने शब्द वाढे शब्द हे आगलावे
ही ओळ मस्त.

डोमकावळा's picture

29 Jul 2010 - 7:59 am | डोमकावळा

धन्य...

>> फक्त उद्दामपणा बास नोहे (धागाकर्त्याच्या) धोतरासच हात घाला
हे भारीच ...

>> जय जय गेंडाकातडीधारक जनता समर्थ
_/\_ जय जय....

राजेश घासकडवी's picture

29 Jul 2010 - 8:01 am | राजेश घासकडवी

फक्त उद्दामपणा बास नोहे (धागाकर्त्याच्या) धोतरासच हात घाला
जय जय गेंडाकातडीधारक जनता समर्थ

धोतर नेसलेला गेंडा डोळ्यासमोर आला, आणि फिस् कन हसू आलं...

मीटरचं गणित बरोबर आहे का हो मास्तर??? ;)

क्रेमर's picture

29 Jul 2010 - 8:10 am | क्रेमर

भौ, मीटर काय पाहता म्याटर पहा ना.

राजेश घासकडवी's picture

29 Jul 2010 - 8:15 am | राजेश घासकडवी

मीटर तपासण्यासाठी मुक्तसुनीत व केशवसुमार यांना विनंती करावी.

मुक्तसुनीत's picture

29 Jul 2010 - 8:37 am | मुक्तसुनीत

एरवी मीटरचे गणित करण्यास व्हर्नियर कॅलिपर्स नि स्क्रू-गेज लागतात. येथे मामला मैलामैलाचा आहे. वेSS अबाव्ह माय पेग्रेड ! ;-)

परिकथेतील राजकुमार's picture

29 Jul 2010 - 11:33 am | परिकथेतील राजकुमार

वाह !
गेल्या दहा हजार वर्षात असले काव्य झाले नाही आणि यापुढे दहा हजार वर्षात होणार नाही !

अवलिया's picture

29 Jul 2010 - 1:10 pm | अवलिया

सहमत आहे.

पर्‍याशी ०.१००% सहमत आहे.

उदाहरणच घ्यायचे तर हे वृत्त काय फर्मास जमले आहे पहा की.

उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म
लालालालाला लाला लालाला लाल्लालाल्ला

आणि
फक्त उद्दामपणा बास नोहे (धागाकर्त्याच्या) धोतरासच हात घाला
ब्लाब्ला ब्लाब्ल्लाब्लाब्लाब्ला ब्लाब्ला ब्लाब्ला(ब्लाब्लाब्लाब्लाब्ला)ब्लाब्लाब्लाब्लाब्ला ब्लाब्ला ब्लाब्ला

इतर ओळींतील वृत्त तर इतके सट्ली जमले आहे की ओळखताही येईना.
क्या बात है! क्या बात है!

स्पंदना's picture

29 Jul 2010 - 8:37 pm | स्पंदना

शुची ग शुची!!
काय म्हणु?

पुष्करिणी's picture

29 Jul 2010 - 11:29 pm | पुष्करिणी

गेंड्याचे वस्रहरण..:) कल्पक आहे कविता एकदम!

सुलघु सदनिकेला । नाव द्या भव्यतेचे ।
"महल"-"भवन" होते । नाव देता फुकाचे ।
भिउनि भिउनि सेवी । प्रेम-पक्वान्न -मद्य ।
उदरभरण हो ते । नाही आयुष्य भोग्य ।
लै लै लघुवीर निरर्थ ॥

धनंजय's picture

30 Jul 2010 - 5:39 am | धनंजय

वदन जवळ घेता । नाव घ्या त्या सखीचे ।
सहज समर होते । नाम घेता चुकीचे ।
जिवलगकर हाती । घेइजे सावधान ।
उधळत जर त्रागा । माफि मागे गुमान ॥

राजेश घासकडवी's picture

30 Jul 2010 - 6:09 am | राजेश घासकडवी

शेवटच्या दोन ओळींत बदल सुचवतो...

वदन जवळ घेता । नाव घ्या त्या सखीचे ।
सहज समर होते । नाम घेता चुकीचे ।
जिवलगकर हाती । घे करूनी सराव ।
स्मरण करुनि नामा । जीभ टाळूस लाव॥