सहमत. नविन रुप छानच आहे.
परंतु मिसळपावच्या चित्राशिवाय मिपा म्हणजे काही तरी चुकल्या सारखं वाटतयं [सारखं वाटतयं की आपण चुकुन दुसर्याच्या घरात तर नाही ना आलो :) ]
संपादक मंडळाने नवीन रुपड्यांबद्दल येत असलेल्या विविध सुचनांचा विचार करू असे आश्वासन अन्य ठिकाणी दिलेले आहेच, त्यामुळे अपेक्षीत असे अनेक सुंदर रूप मिसळपावला येईल हे नक्कीच.
वैयक्तीकरित्या मला सर्वात आवडलेली सुविधा म्हणजे "बॅक टू टॉप". अपस्क्रोलिंगची कटकट कायमची गेली.
प्रतिक्रिया
26 Jul 2010 - 11:14 am | llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे. मिपाच्या विश्वकर्मांचेही अभिनंदन. :)
26 Jul 2010 - 11:24 am | मराठमोळा
+२
खुप खुप अभिनंदन आणी शुभेच्छा!!!!
पण मिसळपावचं चित्र ठेवायला हवं होतं असं मनोमन वाटतय. :)
आपला,
मराठमोळा
26 Jul 2010 - 11:30 am | Dhananjay Borgaonkar
मिपाच नविनरुप सुंदर आहे. पण मिपाचं लोगो मिसळ्पावचे चित्र असायला हव.ते चित्र नाही बघितल की मिपावर आलोच नाही अस वाटतय.
धनंजय बोरगांवकर
26 Jul 2010 - 5:56 pm | समंजस
सहमत. नविन रुप छानच आहे.
परंतु मिसळपावच्या चित्राशिवाय मिपा म्हणजे काही तरी चुकल्या सारखं वाटतयं [सारखं वाटतयं की आपण चुकुन दुसर्याच्या घरात तर नाही ना आलो :) ]
26 Jul 2010 - 11:43 am | स्वाती फडणीस
मिपाचे नवे रुपडे आवडले :)
अभिनंदन आणि शुभेच्छा..!
26 Jul 2010 - 11:45 am | अविनाशकुलकर्णी
मस्त..लाजवाब
26 Jul 2010 - 11:46 am | अविनाशकुलकर्णी
मस्त..लाजवाब
26 Jul 2010 - 11:52 am | युयुत्सु
अगोदरच्या व्हर्जन मध्ये नव्या प्रतिक्रिया किती हे सहज समजत होते. ते सुविधा कायम असावी...
26 Jul 2010 - 11:54 am | निखिल देशपांडे
ते आताही सहजच दिसतेय ना...
तुम्ही उजव्या हाताच्या साइडबार मधे "नवे लेखन" नावाचा दुवा पाहिलात का????
26 Jul 2010 - 12:14 pm | नावातकायआहे
मिपाचं लोगो मिसळ्पावचे चित्र असायलाच हव..
26 Jul 2010 - 12:43 pm | मृत्युन्जय
नवीन रुपडे एकुण खुपच तजेलदार आहे. खुप कष्ट घेउन बनवले आहे हे नक्की. मिसळीचे चित्र मात्र हवेच. त्याशिवाय मजा नाही.
पुर्वी कलादालन मुखपृष्ठावरच दिसायचे. आता त्यासाठी फक्त वरती एक दुवा येतो. अजुन एक अपडेट कलादालन साठी सुरु केले तर बरे होइल.
26 Jul 2010 - 12:56 pm | दत्ता काळे
हे नवीन रंगरंगोटी केलेलं रुप अत्यंत प्रसन्न आणि मनोवेधक आहे. - सहमत.
ह्या नवीन रुपाच्या निमित्ताने मिपाचे अभिनंदन आणि मिपाला अनेकानेक शुभेच्छा.
26 Jul 2010 - 1:04 pm | गणपा
मिपावर मिसळीच चित्रंनाही त्यामुळे चुक चुकल्या सारख वाटतय.
अन्य सुविधा अजुन पाहिल्या नाहीय पण हे नवरुपड अंगवळणी पडायला थोडा वेळ द्यावा लागेलस वाटतय.
डावी कडे असणर्या सगळे दुवे उजवी कडे आले असले तरी माऊस अजुन डावी कडेच झेपावतोय :)
मिपाच्या आगामी वाढीस भरगोस शुभेच्छा!
स्मायली गायवलेल्या दिसतायत :)
26 Jul 2010 - 1:09 pm | इन्द्र्राज पवार
संपादक मंडळाने नवीन रुपड्यांबद्दल येत असलेल्या विविध सुचनांचा विचार करू असे आश्वासन अन्य ठिकाणी दिलेले आहेच, त्यामुळे अपेक्षीत असे अनेक सुंदर रूप मिसळपावला येईल हे नक्कीच.
वैयक्तीकरित्या मला सर्वात आवडलेली सुविधा म्हणजे "बॅक टू टॉप". अपस्क्रोलिंगची कटकट कायमची गेली.
26 Jul 2010 - 1:29 pm | यशोधरा
छान आहे नवीन रुपडे, पण स्मायल्या कुठायत?
26 Jul 2010 - 2:47 pm | चिंतामणी
नविन रूप चांगले आहे.
26 Jul 2010 - 3:15 pm | अन्जलि
आता सगळिकडे जास्त चोउकोन दिस्तायत हेडिन्ग्सचि वगेरे.असे का? कि माझ्या पिसिमधे प्रोब्लेम आहे म्हणुन असे दिस्तेय?
26 Jul 2010 - 3:54 pm | स्वाती२
नवे रुप छान आहे. पण तो मिसळपावचा फोटू हवा होता. आणि स्माईली टाकायची सुविधा द्या ना.
27 Jul 2010 - 12:44 pm | क्रान्ति
नवं रूप छानच आहे,पण मिसळपावचं चित्र आणि स्माइली यांच्याशिवाय मिपा सुनंसुनं वाटतं!