तोत्तोचानः तेत्सुको कुरोयानगी ( अनु: चेतना गोसावी सरदेसाई) प्रकाशकः इंडिया बुक हाऊस
एक लहान मुलगी वय वर्षे कदाचित पाच. शाळेत अत्यंत अस्थीर . वर्गात येणार्या चिमण्याशीच बोलणे, वारंवार डेस्क उघडणे, वर्गाच्या खीडकीतून रस्त्यावरून जाणार्या बॅन्डवाल्यांशी बोलणे वगैरे वगैरे.... हे तिचे सततचे उद्योग. तिच्या या उद्योगाना कंटाळून शाळेतून मुलीचे नाव काढून टाकले. या छोटीला त्याची कल्पनाच नाही.
ती आणि तिची आई तोमोई नावाच्या एका शाळेत जातात .ही शाळा रेल्वेच्या डब्यात भरत असते.
मुख्याध्यापक या मुलीला काहीतरी बोल असे सांगतात. आणि ती तब्बल तीन तास मुख्याध्यापकाना निरनिराळ्या गोष्टी सांगत असते.
मुख्याध्यापक कोयाबाशी तीला म्हणतात तू खरोखरच एक छान मुलगी आहेस. ( हे वाक्य तोत्तोचानच्या आयुष्यात खूप काही देऊन जाते)
तोमोई शाळेचे वर्ग रेल्वेच्या डब्यात भरत असतात. अमूक तुकडी वगैरे असे काही नाही. ज्याला जे शिकायचे ते त्याने हव्या त्या वेळी शिकायचे. फक्त दिलेला अभ्यास दिवसाअखेरीस संपवायचा. हा एकमात्र नियम
तेत्सुको... तोत्तोचान त्यानन्तर शाळेतील काही अनुभव लिहिते. ते तिने तिच्या भाषेतच लिहिले आहेत.
पाच वर्षाच्या मुलीच्या डोळ्यातून जग पहाणे हा एक वेगळाच अनुभव आपण घेत असतो.
शाळेतले जग सुरुवातीचे जग फुलपंखी अनुभवांचे आहे. लहानगी तोत्तोचान तिच्या आईकडे रोलमॉडेल म्हणून पहात असते. शाळेला काहीतरी गाणे हवे असा तिचा आग्रह. इतर शाळांतल्या मुलाना त्यांच्या शालेतली गाणी पाठ आहेत. आपल्या शाळेला गाणेच नाही. मग तीच एक गाणे रचते
खूप छान शाळा
आतून बाहेरून खूप मोठी शाळा.
ते गाणे गाता गाता इतर मुलेही एकमेकांचे हात धरून गाणे गाऊ लागतात आणि सर्वजण एका बंधाने बांधले गेल्याचा अनुभव तोत्तोचानबरोबर आपल्यालाही येतो.
जेवणात काय आणायचे तर काहीतरी जमिनीवरचे आणि काहीतरी समुद्रातले आणायचे इतक्या सोप्या शब्दात चौरस आहाराची व्याख्या.
ट्रीपला गेल्यावर समुद्रातल्या गरमपाण्याच्या प्रवाहाची गम्मत.
तोमोई शाळेतली काही मुले शारीरीक व्यंग असलेली. स्पास्टीक अशी होती
पोहोण्याच्या तलावात मुलांना आपल्या शरीराची लाज वाटू नये म्हणून पोहोण्याचा पोषाख न घालता पोहोण्याचा अनुभव....
कोणी वरून पाहिले असते तर पोहोण्याचा तलाव बोरानी भरून गेलाय असेच दृष्य दिसले असते.
त्यामुलांच्यात काही व्यंग आहे हे कोणाच्या खिजगणतीतही नसायचे.
पोलीओ मुळे पायातले त्रान गेलेल्या एका मुलाला तोत्तोचान त्यालासुद्धा झाडावर चढण्याची मजा अनुभवायला मिळावी म्हणून झाडावर चढवते तो अनुभव.... आपल्यातच बदल घडवत असतो.
शाळेतला शिपाई युद्धावर जायला निघतो त्यावेलेस शाळेतली मुले त्याचा निरोपसमारंभ करतात. आणि त्यानन्तरही कित्येक दिवस खोटखोटा निरोपसमारंभ करत असतात.
आरोग्य पहाण्यासाठी झाडाची साल तोत्तोचान सर्वाना चाखायला लावते. तिच्या कुत्र्याला देखील
खेळताखेळता कुत्रे चुकून तीला चावते स्वतःला झालेल्या जखमेपेक्षाही तोत्तोचानला कुत्र्याला आईवडील रागवतील हीच चिंता असते.
जेवताना म्हणायचे तिचे साधेसे गाणे
बत्तीस वेळा चावून खावा
प्रत्येक घास जेवताना
हे गाणे तिला घरीसुद्धा म्हणावेसे वाटते
घराजवळ दिसणार्या तिच्याच वयाचाअ एक मुलगा तीला अडवून "कोरीयन" ( कोरीयन युद्धामुळे जपानमध्ये आलेले निर्वासीत) अशी शिवी देतो. तोत्तोचान सुरुवातीला घाबरते पण कोरीयन म्हणजे काय हे कळाल्यानन्तर तीला त्या मुलाबद्दल वाईट वाटू लागते.
आइस स्कीईंग करणारा माणूस जेंव्हा तोत्तोचानला आदराने वागवतो तेंव्हा ते तीला काहीतरी ग्रेट वाटते.
तीच्या वेण्या ओढल्या म्हणून वर्गातील मुलाना "मुलींशी असे वागायचे असते का?" असे विचारतात तेंव्हा ते त्या मुलाला आणि तोत्तोचानला सुद्धा काहीतरी वेगळेच वाटते
युद्धाच्या काळात खाऊच्या गोळ्या देणार्या मशीनमध्ये उगाचाच नाणे टाकून त्यातून कधीतरी गोळ्या येतील म्हणून वाट पहाणारी तोत्तोचान.
शाळेत नवा वर्ग अर्था नवा रेल्वेचा डबा येणार असतो त्यावेळेस रेल्वेचा डबा शाळेत कसा आनतात ते तिला पहायचे असते . सर्वच मुलाना ते कुतुहल असते. मुख्याध्यापक त्यासाठी सर्वाना शाळेत रहायची परवानगी देतात. आणि मुले मध्यरात्री ते पहातात.
शाळेत अपंग मुलाना भाग घेता यावा म्हणून तशा स्पर्धा घेतल्या जातात.
स्पर्धेत बक्षीसे म्हणुन मुलांनी शाळेच्या बागेत लावलेली भाजी देतात. मुले अभिमानाने बक्षीस मिळालेली भाजी घरी घेऊन जातात.
असे अनेक अनुभव तेत्सुकोने पुस्तकात लिहिले आहेत.
तोत्तोचान पुस्तकाबद्दल खूपकाही लिहावेसे वाटते. हे पुस्तक केवळ वाचन अनुभव नाही तर छोट्या मुलांच्या नजरेतून जग पहाण्याचा अनुभव आहे
तू खरोखरच एक छान मुलगी आहेस हे वाक्य आपल्यालासुद्धा खूप काही शिकवून जाते.
आपण मुलाशी बोलताना त्याना रागवताना मुलांना नकळत तू मठ्ठ्च आहेस ढ आहेस किंवा तू असा वेंधळाच आहेस.
धांधरट आहेस अशी लेबले लावत असतो. मुलेही त्यांच्या नकळत त्या ती दूषणे स्वीकारत असतात. त्यांचा आत्मविष्वास खच्ची होत असतो.
तोत्तोचान हे पुस्तक जगातल्या बहुतेक सगळ्या भाषेत अनुवादीत झाले आहे. तेत्सुकोला अनेक वाचकांची पत्रे येतात.
" मला तुझ्या सारखी आई असते आणि कोयाबाशीं सारखे शिक्षक असते तर मी अशी जेलमध्ये गुन्हेगार म्हणून आले नसते" ही तिच्या एका वाचकाची प्रतिक्रीया बोलकी आहे.
सहज म्हणून कोणीतरी हे पुस्तक मला भेट दिले.
पुस्तकातली चित्रे पाहुन हे पुस्तक लहान मुलांसाठी असेल असे वाटले.पण प्रत्यक्षात काही वेगळेच होते. ज्वलंत चित्रण. समस्या, विदारक अनुभव थरारक. बुद्धीला सतत आव्हान देणारे रहस्य ...असे काहिही नसताना तोत्तोचान आपल्याला भारून टाकते. साध्या सोप्या शब्दात कोणतीही बौद्धीके न पाजता प्रगल्भ करून जाते.
"तारे जमीन पर" चित्रपट पहाताना हे पुस्तक वारंवार आठवते.
Every Child is a special child" आणि "तू खरोखरच एक छान मुलगी आहेस" हे फार काही वेगळे वाटत नाही.
प्रतिक्रिया
24 Jul 2010 - 12:29 pm | अभिज्ञ
पुस्तकाची सुंदर ओळख.
अभिज्ञ.
24 Jul 2010 - 12:31 pm | अवलिया
--अवलिया
24 Jul 2010 - 12:38 pm | मितभाषी
असेच म्हणतो.
भावश्या.
25 Jul 2010 - 9:23 am | शुचि
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
24 Jul 2010 - 12:37 pm | आळश्यांचा राजा
चांगली ओळख. हेच पुस्तक नॅशनल बुक ट्रस्टनेदेखील प्रकाशित केले आहे.
(आमचा पोरगा तोत्तोचानचं मेल व्हर्जन आहे. त्याला कुठनं निकुंभ मास्तर भेटवावा या विवंचनेत असणारा- आळश्यांचा राजा)
24 Jul 2010 - 12:39 pm | sneharani
मस्त ओळख.
:)
24 Jul 2010 - 12:44 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
.......तोत्तचान वाचलेले आहे.....मला तिच्या शाळेतला आवड्लेला भाग म्हणजे...एक तर शाळेचे वर्ग ...कि जे ट्रेन कल्पना.....आणि त्यांची ती ड्ब्याची (टिफिन) कल्पना...!,...मस्त आहे...
24 Jul 2010 - 12:53 pm | विजुभाऊ
शाळेतून काढून टाकलेल्या तोत्तोचान बद्दल तिच्या आईची ही मते होती Her mother realizes that what Totto-chan needs is a school where more freedom of expression is permitted:
24 Jul 2010 - 1:51 pm | वाहीदा
तू खरोखरच एक छान मुलगी आहेस हे वाक्य आपल्यालासुद्धा खूप काही शिकवून जाते. आपण मुलाशी बोलताना त्याना रागवताना मुलांना नकळत तू मठ्ठ्च आहेस ढ आहेस किंवा तू असा वेंधळाच आहेस. धांधरट आहेस अशी लेबले लावत असतो. मुलेही त्यांच्या नकळत त्या ती दूषणे स्वीकारत असतात. त्यांचा आत्मविष्वास खच्ची होत असतो.
" मला तुझ्या सारखी आई असते आणि कोयाबाशीं सारखे शिक्षक असते तर मी अशी जेलमध्ये गुन्हेगार म्हणून आले नसते"
वाक्या वाक्यांशी सहमत ! माझ्या ताईची मुलगी (वय वर्षे ८ ), वर्गात सगळ्या मुलांना बदडायची . वर्गातल्या कोणत्याही मैत्रिणी ने तिच्या कडे कोणा मुलाची तक्रार केली रे केली ,की आमची रुहनाझ गेलीच त्याला बदडायला .. :S
रोज शाळेतून कंप्लेंट 'तुमची मुलगी वर्गातल्या मुलांना बदडते' :-( ताई ही वैतागली होती.. मग, तिच्या नविन टिचर ने एक युक्ती काढली तिला रोज 'यू आर गुड गर्ल 'असे सारख म्हणून म्हणून ती आता इतकी 'शांत - गुड गर्ल' झाली की आम्ही पण आवाक होतो, 'हिच का ती आमची (मारकुटी) रुहनाझ ?' . तिच्या फेंड्स ग्रुप मध्ये आता मुले ही आहेत, हे नशिब आमचे ! :-)
तोत्तोचानची शाळा खुप आवडली ! विजूभाऊ, हे पुस्तक नक्कीच विकत घेऊन वाचणार .
~ वाहीदा
24 Jul 2010 - 1:43 pm | स्वाती फडणीस
तोत्तचान वाचलेले आहे.....मस्त आहे..!
24 Jul 2010 - 1:48 pm | विनायक पाचलग
मस्त आहे हे पुस्तक
६ वर्षे झाली वाचुन ..पण अजुनही आठवते ..
आणि ओळखही मस्तच
विनायक पाचलग
वाँट टु टॉक
24 Jul 2010 - 2:24 pm | परिकथेतील राजकुमार
मस्त ओळख करुन दिली आहेत विजुभौ :)
पुस्तक वाचले आहे, छानच आहे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
24 Jul 2010 - 3:38 pm | अरुंधती
मस्त ओळख करुन दिलीत विजूभाऊ! माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी हे एक पुस्तक! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
24 Jul 2010 - 7:16 pm | यशोधरा
किती सुरेख लिहिलेत विजूभाऊ..
24 Jul 2010 - 7:22 pm | मुक्तसुनीत
पुस्तकाची उत्तम ओळख. असेच लेख वाचायला उत्सुक आहे.
24 Jul 2010 - 7:30 pm | स्वाती दिनेश
छान ओळख, पुस्तक संग्रही ठेवावे असेच आहे.
स्वाती
24 Jul 2010 - 7:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विजुभौ, पुस्तकाची मस्त ओळख. धन्यु......!
-दिलीप बिरुटे
24 Jul 2010 - 8:14 pm | ऋषिकेश
पुस्तक खूप आधी वाचले होते पण अजूनही मनात ताजे आहे. शाळा, तोत्तोचान, पुस्तक आणि भाषांतर सगळंच बेष्ट आहे!
परिचयही सुरेख झाला आहे. आपल्या पुस्तकविश्ववरही येऊ द्या की हा परिचय
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
24 Jul 2010 - 8:33 pm | चतुरंग
तोत्तोचान मोठ्यांनाही आवडेल असेच आहे.
आमचे चिरंजीव एकेक प्रकरण रोज रात्री आईकडून वाचून घेत. त्याला ते फार आवडले पुस्तक.
पुन्हा एकदा पुस्तक काढायला हवे बाहेर नवीन पारायण सुरु करायला.
चतुरंग
24 Jul 2010 - 9:27 pm | डावखुरा
मी हे पुस्तक अनेकदा वाचलंय...
खरंच वाचनीय पुस्तक...
मनोरंजन म्हणुन तर वाचावेच पण त्यापेक्षा लहान मुलांच्या कलेने कसे घ्यावे...किंवा त्यांच्याशी संवाद कसा साधावा.....
मलाही काहीशी तोमोईशी साधर्म्य असणारी शाळा मिळाली होती..
शाळेचा कायमचा ऋणी...
Every Child is a special child
हे पट्वुन घ्यायलाच हवे..
विजुभौ धन्यु आता परत वाचायला बसतो..
----------------------------------------------------------------------
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
25 Jul 2010 - 3:59 am | दिपाली पाटिल
छान परिचय...आत्ताच पुस्तक वाचावंसं वाटतंय...
दिपाली :)
25 Jul 2010 - 11:53 am | Pain
मी ६ वी मधे असताना वाचले होते. खूप छान आहे. आजही हा लेख वाचून त्यातले प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले-
१) चित्रे काढताना तिचे कागदाबाहेर, बाकावर जाउन रंगकाम करणे
२) पौष्टीक आहारासाठी डब्यात काहीतरी समुद्रातल आणि काहीतरी डोंगरावरच अशी शिक्षकांची मागणी
३) अपंग मुलासाठी (बहुदा ताकाहाशी) खास बनवलेली शर्यत
४) प्रत्येकाला वाटून दिलेले झाड आणि काही तास प्रयत्न करून शेवटी ती त्याला तिच्याबरोबर फांदीवर चढवून घेते तो प्रसंग
५) शाळेतल्या कोणाला तरी (बहुदा सिक्युरीटी गार्ड ) सक्तीने सैन्यात बोलाविले जाते (२ रे महायुद्ध) त्याची आठवण म्हणून सगळी मुले साके पिण्याचा खेळ खेळत असत ( ती पाणी प्यायची)
६) तिचा कुत्रा
७) श्राद्धाचे लाडू
शेवट तर फारच करुण, दुर्दैवी आहे*. ( हा प्रसंग त्या मुलांनी हमसून हमसून रडण्यासारखा आहे, खर्या वाईट गोष्टींचे एक योग्य उदाहरण)
अवांतरः पुण्यातही गुरुकुल म्हणून एक शाळा आहे जिथे काही वर्ग रेल्वेच्या डब्यात भरतात.
26 Jul 2010 - 10:10 am | विजुभाऊ
माझ्या घरात एका खोलीची भिंत मुलांसाठी राखून ठेवली होती. त्या भिं़तीवर माझ्या मुलीने वेगवेगळ्या वयात काढलेले पेन्सीलीच्या फरकाट्यांपासून स्केचेस चित्रांपर्यन्त अजून आम्ही पुसलेले नाहीत.
ती भिंत आमच्या साठी एक जिवन्त पुस्तक आहे :)