असा कसा रे तू मर्द गडी..

भारतीय's picture
भारतीय in जनातलं, मनातलं
23 Jul 2010 - 12:22 pm

कालच्या रविवारी भिमाशंकरला फिरायला म्हणून जाताना एका छोट्याश्या गावात द्रुष्टीला पडलेल्या एका फलकावरील ही चारोळी... बहूदा हे गाव निर्मलग्राम योजनेत सहभागी असावं...

"असा कसा रे तू मर्द गडी..
फिरायला ५० हजाराची गाडी..
बायकोला २ हजारची साडी..
राहायला २ मजली माडी..
तरी बायका-पोरांना हगणदारीत धाडी..
असा कसा रे तू मर्द गडी,
शौच्यालय बांध ताबड्तोब घरी..
नाहीतर मिशि कापून ये मागल्या दारी.." =))

वावरप्रकटन

प्रतिक्रिया

विदुषक's picture

23 Jul 2010 - 12:24 pm | विदुषक

व काय प्रतिभा

लय भारी !!!
मजेदार विदुषक

कानडाऊ योगेशु's picture

23 Jul 2010 - 12:26 pm | कानडाऊ योगेशु

धाग्याचे शीर्षक वाचुन क्षणभर पाषाणभेदांची नवीन लावणी असावी असे वाटले.
(पा.भे साहेब एखादी लावणी होऊन जाऊ द्या ह्या शीर्षकावरुन.)

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

पाषाणभेद's picture

23 Jul 2010 - 10:12 pm | पाषाणभेद

कानडाऊ योगेशु, "आसं कसं वो तुमी मर्द गडी" लावणी लिहीली आहे.

निर्मलग्राम योजनेच्याही काही लावण्या बाकी भन्नाट असतात.

The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

जिप्सी's picture

23 Jul 2010 - 12:51 pm | जिप्सी

मी एकदा ट्रेकला एका गावात भिंतीवर लिहिलेलं वाचलं होत...

धोनीन मारली सिक्स,संडासाची आणि आमची म्याच फिक्स !

हसून अक्षरशः लोळलो !!!! =))

धमाल मुलगा's picture

23 Jul 2010 - 5:49 pm | धमाल मुलगा

कडीवर कडी आहे ही!
=)) =)) =)) =)) =))

नावातकायआहे's picture

23 Jul 2010 - 5:10 pm | नावातकायआहे

५० हजाराची गाडि हप्त्यावरी
२ हजाराचि साडि उसनवारि
न्ह्याय परवडत संडास घरि,
तुम्च्या कड हाय ना?
मंग पाठवतो लेकिबाळि तुम्च्या दारि.... :D

वारा's picture

23 Jul 2010 - 5:12 pm | वारा

आता नाही बाहेर जाण्याचा त्रास........
कारण आमच्याही घरी बांधलाय संडास.......
वा..वा....=) =)

विनायक पाचलग's picture

23 Jul 2010 - 5:19 pm | विनायक पाचलग

चेपु वर ही हेच वाक्य असणारा फोटो काल आला होता ..
हा योगायोग म्हणावा का आणखी काही ..
असो..
आवरा...

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

मितभाषी's picture

23 Jul 2010 - 5:20 pm | मितभाषी

एकदा मी एका मित्राकडे त्याच्या गावी मुक्कामाला गेलो होतो. भल्या सकाळी पाहतो तर दारापुढुन बरेचसे लोकं हातात छत्री & डबा घेवुन जात होते. दिवस उन्हाळ्याचे होते. डबा ठिक आहे पण ही छत्रीची काय भानगड ? असा विचार करीतच मीही तिकडे गेलो तर बाजुला डबा आणि पुढे छत्री उघडुन धरलेली अशी भली लांब रांग होती. =)) =)) =))

परिकथेतील राजकुमार's picture

23 Jul 2010 - 5:27 pm | परिकथेतील राजकुमार

अपल्या लेखनाने डोळे दिपले.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

आमोद शिंदे's picture

23 Jul 2010 - 6:02 pm | आमोद शिंदे

काय एंट्री मारली आहे राव तुम्ही. शिल्पा ब ताईंचे पण आभार.

शिल्पा ब's picture

23 Jul 2010 - 10:45 pm | शिल्पा ब

माझे आभार? मी काय केलं?

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

जिप्सी's picture

23 Jul 2010 - 6:44 pm | जिप्सी

कोल्हापूर जिल्ह्यात निर्मलग्राम योजने अंतर्गत एक नवीन उपक्रम सुरु झालाय, गावातच एक पथक तयार करतात, ते सकाळी सकाळी रानात,माळावर जाऊन बसलेल्या(!) लोकांना रंगेहात पकडतात आणि मग त्याच नाव गावातल्या चावडीवर झळकत आणि वर दंड पण होतो.
त्या पथकाच नाव गुड मोर्निंग पथक असंच पडलंय !

अवांतर :- कसला मूड ऑफ होत असेल लोकांचा पकडल्यावर!

परिकथेतील राजकुमार's picture

23 Jul 2010 - 7:46 pm | परिकथेतील राजकुमार

कोल्हापूर जिल्ह्यात निर्मलग्राम योजने अंतर्गत एक नवीन उपक्रम सुरु झालाय, गावातच एक पथक तयार करतात, ते सकाळी सकाळी रानात,माळावर जाऊन बसलेल्या(!) लोकांना रंगेहात पकडतात आणि मग त्याच नाव गावातल्या चावडीवर झळकत आणि वर दंड पण होतो.

मी छत्तीसगडला असताना ह्या पथकाचा एक जबर्‍या किस्सा ऐकला होता. ह्या पथकाची एका गावात स्थापना झाली आणि त्या पथकाने पहिल्याच पहाटे पकडलेला पहिला मनुष्य गावचा सरपंच निघाला.

=)) =))

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

जिप्सी's picture

23 Jul 2010 - 7:51 pm | जिप्सी

=)) ~X( =D>

शानबा५१२'s picture

23 Jul 2010 - 8:45 pm | शानबा५१२

एका शीग्रुहाला कीतीसा खर्च येतो?
फारच कमी...........मग बांधा ना.
पैसे नाहीत की जागा नाही?
मग ही अशी वाक्य बोर्डावर लिहायला बर जमत!

काहीजणांना जुनच सोनं वाटत,हा त्यातला प्रकार असावा.

---------------------------------------------------------------------
ब्लॉग असावा तर असा 'पाषाणभेद'सारखा!!

अरुंधती's picture

23 Jul 2010 - 9:01 pm | अरुंधती

फेसबुकावर आवरा वर कालच पाहिलं हे ब्यॅनर! ;-)

"

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

Pain's picture

23 Jul 2010 - 11:34 pm | Pain

कालच आवरावर हा फोटो पाहिला.

डॉ.प्रसाद दाढे's picture

24 Jul 2010 - 9:53 am | डॉ.प्रसाद दाढे

मागे एकदा ह्या संदर्भात एक विचित्र बातमी वाचलेली आठवते आहे.
असेच एक 'गुड मॉर्निंग' पथक उघड्यावर परसाकडे बसलेल्याच्या
मागे लागले.. तो पुढे डबा घेऊन धोतर सावरत पळतोय आणि पथक
मागे काठ्या घेऊन धावतंय असा फिल्मी स्टाईल रोमहर्षक पाठलाग
चालू असतांनाच त्या बिचार्‍या धावपटूला हार्ट अ‍ॅटॅक आला आणि तो
कोसळून जागीच गतप्राण झाला!
मग उलटा पाठलाग सुरू झाला.. संतप्त गावकरी मागे आणि गुड मॉर्निंग
पथक पुढे! पथकाची तुफान धुलाई करण्यात आली, सरकारकडून त्या
मृत माणसाच्या वारसांनी भरभक्कम वसुलीही केली; वर पथक बरखास्त
करण्यात आले!
आता त्या गावातले सानथोर मृतात्म्यास दुवे देत कॉल ऑफ
नेचर विथ नेचर घेत असतील !!

शानबा५१२'s picture

24 Jul 2010 - 6:27 pm | शानबा५१२

तो पळणारा महान व ते त्याच्या मागे पळणारे पण महान!!

_________________________________________________
ब्लॉग असावा तर असा 'पाषाणभेद'सारखा!!

भारतीय's picture

24 Jul 2010 - 11:58 am | भारतीय

अरुंधती बाइंन्नी प्रतिक्रियेत जो फलक दाखवला आहे अगदी तसाच (की तोच??) फलक प्रत्यक्ष बघावयाचा असल्यास भिमाशंकरला राजगुरूनगर मार्गे जाताना वाडा ते भोरगिरी दरम्यान वाखाळे कि वाखळे नावाचे एक गांव आहे तिथे हा फलक बघावयास भेटेल.. तरी ईच्छुकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.. (नियम व अटी लागू)

नियम..-
१) फलक बघण्याची वेळ स. ७:०० ते संध्या. ५:०० राहील.. ( ईतर वेळेसही फलक दिसतो, पण रस्ता आडमार्गाचा व निर्मनुष्य तसेच जंगलाचा असल्याने धोका संभवतो.)
२)कुटुंबासह फलक बघितल्यास एक्स्ट्रा चार्ज पडणार नाही..
३)संधी मर्यादीत कालावधीसाठीच लागू असण्याची शक्यता आहे, उशीरा जाउन भ्रमनिरास झाल्यास जबाबदारी तुमचीच राहील..
४)फक्त फलक बघण्यासाठी जात असाल तरचं या मार्गे जावे.. अथवा भिमाशंकरचा बेत असल्यास मंचर मार्गे जाणे उत्तम.. त्यामार्गे निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण अनुभवता येईल याची खात्रीशीर ग्यारंटी.. B)
http://anildaily.blogspot.com