लोकहो,
या महिन्यातील दोन्ही प्रदोष हे सोमप्रदोष आहेत.
शिवभक्तांसाठी या दिवसाचे महत्व फार असल्याने मुद्दाम येथे देत आहोत.
भाद्रपद शुक्ल पक्ष प्रदोष - दिनांक २४ सप्टेंबर २००७ , सूर्यास्त १८.४७ , सूर्योदय २५ सप्टेंबर -०६.२९
भाद्रपद कृष्ण पक्ष प्रदोष - दिनांक ८ ऑक्टोबर २००७, सूर्यास्त १८.२१, सूर्योदय ९ ऑक्टोबर - ०६.३२
मुंबईचे सूर्योदय सूर्यास्त दिले आहेत. त्यानुसार निषिथकाल काढून घ्यावा.
आपला,
(शैव) धोंडोपंत
{ धोंडोपंत कुणाशीही कोणत्याही विषयावर वाद घालत नाहीत. त्याचप्रमाणे ज्योतिष विषय वगळता कोणत्याही विषयावर भाष्य करीत नाहीत. या व इतर कोणत्याही संकेतस्थळांवरील कोणत्याही वादांशी धोंडोपंतांचा संबंध नाही.}
प्रतिक्रिया
18 Sep 2007 - 8:42 pm | आजानुकर्ण
प्रदोष आणि निषिथकाल म्हणजे काय?
19 Sep 2007 - 1:26 pm | दिगम्भा
कृपया स्पष्ट करावे.
- दिगम्भा
19 Sep 2007 - 4:17 pm | टीकाकार-१
सहमत
22 Jul 2010 - 8:35 pm | क्रेमर
कोणी स्पष्ट करेल काय?
-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
22 Jul 2010 - 10:15 pm | आमोद शिंदे
प्रदोषव्रत :
अत्यंत प्रंशसनीय व सर्वांनी करावे असे हे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीस हे करतात. या व्रताचे एक वैषिष्ट्य असे की, संततिप्राप्तीसाठी 'शनिप्रदोष' ऋणमुक्तीसाठी 'भौमप्रदोष' आणि शांतिरक्षणासाठी 'सोमप्रदोष' अशी व्रते अधिक फलदायी म्हणून प्रख्यात आहेत. याशिवाय आयुरारोग्यवृद्धीसाठी 'अर्कप्रदोष' अधिक उत्तम होय. हे व्रत करणाराने त्या दिवशी सूर्यास्ताच्या समयी पुन्हा स्नान करावे. नंतर शंकराची पूजा करावी आणि
'भवाय भवनाशाय महादेवाय धीमते ।
रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥
उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे ।
ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥'
अशी प्रार्थना करुन भोजन करावे.
--
स्रोतः माहितीजाल
22 Jul 2010 - 10:19 pm | क्रेमर
माहितीबद्दल धन्यवाद.
आणि काय करावे?
हे काय असते?
-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
22 Jul 2010 - 10:22 pm | आमोद शिंदे
'भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥ उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे ।ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥'
अशी प्रार्थना करुन भोजन करावे.
निषीथकाल म्हणजे काय हे आपले धोंडोपंतच जाणोत..त्यांनी खुलासा करावा.
23 Jul 2010 - 2:01 am | हर्षद आनंदी
या महिन्यातील दोन्ही प्रदोष?????
आमच्याकडुन चुकुनही दिनदर्शिका बघितली जात नाही, कधी गरजच पडत नाही.
कृपया तारखा, विधी आणि महती सकट माहिती द्यावी.
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
23 Jul 2010 - 3:09 am | मीनल
ज्योतिष वाचतोच आहोत.
पण छंदशास्त्राची शिकवणी सुरू करा.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
23 Jul 2010 - 3:11 am | शिल्पा ब
सोम म्हणजे काय? प्रदोष म्हणजे काय? आणि त्याचा शिवभक्तांशी काय संबंध?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
23 Jul 2010 - 3:23 am | सुनील
अती सोमरस प्याल्यामुळे जो दोष निर्माण होतो त्याला सोमप्रदोष असे म्हणतात! ;)
(शिवभक्त) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.