अरूपाचे रूप

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
21 Jul 2010 - 3:55 pm

अरूपाचे रूप | श्रीहरी स्वरूप
पाहता तद्रूप | जीव होई

भक्तांचियासाठी | चंद्रभागेकाठी
उभा जगजेठी | पंढरीत

दीनांचा कैवारी | सावळा मुरारी
संकटात तारी | पांडुरंग

भाव तेथे देव | नांदतो सदैव
कैवल्याची ठेव | अंतरात

मायबाप, भ्राता | तूच सखा, त्राता
रुक्मिणीच्या कांता | दे दर्शन

शांतरसकविता

प्रतिक्रिया

सहज's picture

21 Jul 2010 - 4:42 pm | सहज

कविता छानच आहे

अवलिया's picture

21 Jul 2010 - 4:44 pm | अवलिया

मस्त अभंग.. :)

--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Jul 2010 - 4:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सुंदर आणि समयोचित.

अदिती

केशवसुमार's picture

22 Jul 2010 - 4:34 am | केशवसुमार

क्रान्तितै,
कविता सुंदर आणि समयोचित.
(वाचक)केशवसुमार

परिकथेतील राजकुमार's picture

22 Jul 2010 - 12:31 pm | परिकथेतील राजकुमार

हेच म्हणतो.
कविता सुंदर आणि समयोचित.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

प्रभो's picture

21 Jul 2010 - 6:47 pm | प्रभो

अभंग आवडला..

श्रावण मोडक's picture

21 Jul 2010 - 7:17 pm | श्रावण मोडक

चांगला अभंग!

डॉ.श्रीराम दिवटे's picture

22 Jul 2010 - 7:20 am | डॉ.श्रीराम दिवटे

अभंग चालीत गातांना तन्मयता प्राप्त होतेय. गाऊन तर पहा.

*************************************
माझं पुस्तक, माझा ब्लॉग.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jul 2010 - 7:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर अभंग...!

क्रांती यांच्या सुंदर कवितांचा काव्यसंग्रह पुढल्या आषाढी एकादशी पर्यंत प्रसिद्ध व्हावा असे वाटते.
[ की यापूर्वी प्रकाशित झाली आहेत आपल्या कवितेची पुस्तके]

-दिलीप बिरुटे

क्रान्ति's picture

22 Jul 2010 - 9:31 am | क्रान्ति

[ की यापूर्वी प्रकाशित झाली आहेत आपल्या कवितेची पुस्तके]
नाही सर. अजून तरी तो योग आला नाही. पाहू, विठूरायाची इच्छा असेल, तर नक्कीच पुढच्या आषाढीपर्यंत प्रकाशन होईल काव्यसंग्रहाचं. सध्या तरी माझा ब्लॉग हाच माझा काव्यसंग्रह आहे! :)
आपल्या सगळ्या मिपाकर मंडळींच्या आणि जालावरील इतरही मित्रमैत्रिणींच्या सदिच्छा आहेतच पाठीशी. :)

क्रान्ति
अग्निसखा

मी ऋचा's picture

22 Jul 2010 - 11:23 am | मी ऋचा

खूप सुन्दर!!!

मी ॠचा

र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

टुकुल's picture

22 Jul 2010 - 1:27 pm | टुकुल

खुपच सुरेख...
कवितांच्या नादी नाही लागत मि, पण तुमच नाव पाहिल कि नक्की वाचतो.

--टुकुल

शुचि's picture

22 Jul 2010 - 5:57 pm | शुचि

अप्रतिम!!!

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

क्रेमर's picture

22 Jul 2010 - 6:58 pm | क्रेमर

सुंदर कविता.

-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.