पुण्यातली स्थळे ( फिरस्ती साठी)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
29 Apr 2008 - 4:48 pm

पुण्यात आपल्याकडे आवडते पाहुणे आल्यावर त्याना कोठेतरी फिरायला नेत असतो.
पुण्यात /पुण्याजवळ तशी खूप स्थळे आहेत( स्थळ = प्रेक्षणीय भौगोलीकठिकाण).
पण बर्‍याचदा अस अनुभव येतो की सारस बाग ,कात्रज उद्यान ,डेक्कन, कॅम्प , शनिवार वाडा ,लाल महाल या पेक्षा जास्त ठिकाने आपल्याला आठवत नाहीत्.आणि उगाच मॉल / मल्टीप्लेक्स धुंडाळत फिरतो.
खरे तर फारशी माहीत नसलेली थोडी वेगळी ठिकाणे आपण जर इथे सर्वाना सांगितली तर एक चांगला कोष तयार होइल.
फक्त ठिकाण सांगताना तिथे कसे जायचे/ काय काय पहायचे हे पण सांगुयात.
मी सुरुवात करतो
१) रजनीश आश्रम/ नाला पार्क : हे कोरेगाव पार्क भागातले नीतान्त सुन्दर ठिकाण्.येथे ओशो आश्रम तसेच त्यांच्या शिष्यानी तयार केलेली बाग खूपच सुन्दर आहे.आपण पुण्यात आहोत की जपान/युरोप मधे अस प्रश्न पडतो.वर्दळ गर्दी धूळ असे इथे काही नसते.पण पाव भाजी वगैरे स्टॉल सिद्धा नाहीत.
२) रेल्वे म्युझीयम : कर्वे रोड वर संगम प्रेस च्या रस्त्यावर. रेल्वे च्या मिनीएचर मॉडेल चे झकास म्युझीअम
३)बनेश्वर : पुणे बेन्गलोर रस्त्यावर साधारण कात्रज सोडल्यावर नसरापुर/भोर जवळ उजव्या हाताला शंकराचे सुन्दर मन्दीर आहे.बाग
पण छान आहे

भूगोलविरंगुळा

प्रतिक्रिया

स्वाती राजेश's picture

29 Apr 2008 - 4:56 pm | स्वाती राजेश

बनेश्वर च्या फाट्याच्या जवळ डाव्याबाजुला बालाजीचे मंदीर आहे.

आनंदयात्री's picture

29 Apr 2008 - 4:59 pm | आनंदयात्री

५-६ किमी तरी नक्कीच असेल. केतकावळाचा बालाजी म्हणुन प्रसिद्ध आहे, एका हॅचरी फर्मचा त्याच्या उभारणीत मोठा सहभाग असल्याचे एकिवात आहे.

टारझन's picture

1 Aug 2008 - 12:23 pm | टारझन

पुण्याच्या मुळा-मुठेच्या नैसर्गिक ठिकाणांस ईसरलात का ? .. झ-पुल ऊतरून खाली गेलं की मुळा(की मुठा?) च्या स्वच्छ पात्रात प्रवेश होतो... समोर ईतके स्वच्छ चॉकलेटी काळसर पाणी पाहून आपल्याला या नदीच नाव ऍक्वाफिना किंवा बिसलेरी का नाही असा प्रश्न पडतो... आजु बाजुला असलेले लोक्स तिथेत तुळस लावत असतात. त्यामुळे आपल्याला सुंदर मनमोहक तुळशीचे शेत दिसते. मग त्या वातावरणातला सुगंध ... आहाहाहा !! मृगाची कस्तुरी काय करता हो ? एकदम बेस !! मग असेच तुळशीच्या शेतातुन सावध पणे वाट काढत पुढे निघावे ... मस्त रमनिय स्थळ आहे पुण्यात... एकदा गेलात की पाय निघत नाही तिथुन./... आणि परत परत जावेसे वाटते ...

टारझन (गेल्या जन्मीचा खविस)
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.


तू भारी ...तर जा घरी...

स्वाती राजेश's picture

29 Apr 2008 - 5:01 pm | स्वाती राजेश

ठोसेघरः साधारण पुण्यापासून सातार्‍याकडे १००/१२५ कि.मी. आहे.

मनस्वी's picture

29 Apr 2008 - 5:04 pm | मनस्वी

पावसाळ्यात ताम्हीणीच्या घाटात काय जबरा मजा येते.. भुरभुर पाऊस.. धुकं.. हिरवा हिरवा घाट.. धबधबे.. गार गार वारा.. झुळझुळ पाण्याचा आवाज.. उन्हाचा लपंडाव.. सारंच छान असतं. आणि जोडीला वडापाव अन् भजी.
चांदणी चौकातून पौड गावाकडून पुढे ६० किमी.

प्रभाकर पेठकर's picture

29 Apr 2008 - 6:29 pm | प्रभाकर पेठकर

पावसाळ्यात ताम्हीणीच्या घाटात काय जबरा मजा येते.. भुरभुर पाऊस.. धुकं.. हिरवा हिरवा घाट.. धबधबे.. गार गार वारा.. झुळझुळ पाण्याचा आवाज.. उन्हाचा लपंडाव.. सारंच छान असतं. आणि जोडीला वडापाव अन् भजी.
अरेरे! इतके नितांत सुंदर वातावरण आणि जोडीला नुसती वडापाव आणि भजी? जोडीला असावा/असावी तितकाच रसिक जोडीदार किंवा जोडीदारीण (अगदी कारभारी आणि कारभारीणही चालेल).

विजुभाऊ's picture

29 Apr 2008 - 6:38 pm | विजुभाऊ

ओ पेठकर काका मी सुरुवातीलाच स्थळे याची व्याख्या प्रेक्षणीय भौगोलीक ठिकाण अशी दिली आहे. :))

मनस्वी's picture

29 Apr 2008 - 6:45 pm | मनस्वी

जोडीला असावा/असावी तितकाच रसिक जोडीदार किंवा जोडीदारीण (अगदी कारभारी आणि कारभारीणही चालेल).

अहो काका.. ते तर बाय डिफॉल्ट असणारच.. त्यांच्याच तर मागे बसून जाणार ना :)

प्रभाकर पेठकर's picture

29 Apr 2008 - 6:54 pm | प्रभाकर पेठकर

अहो काका.. ते तर बाय डिफॉल्ट असणारच.. त्यांच्याच तर मागे बसून जाणार ना

पटले, पण त्यांना अनुल्लेखाने मारलेत म्हणून जरा हृदयात कळ उमटली. माझ्या बायकोला कधी कधी सांगावे लागते, 'मॅडम, मैं आपका पती हूं। ड्रायव्हर नही।'

मनस्वी's picture

29 Apr 2008 - 6:58 pm | मनस्वी

:D

मनस्वी's picture

30 Apr 2008 - 11:47 am | मनस्वी

ताम्हीणी लांब वाटत असेल तर त्याच रस्त्यावर पौडपासून पुढे १०-१५ किमी वर मुळशी लागते. पावसाळ्यातच जाण्यात मजा आहे. तलाव, झरे आणि वृक्षवल्ली आणि हादडायला भरपूर ढाबे.

धमाल मुलगा's picture

30 Apr 2008 - 11:57 am | धमाल मुलगा

आणि हे सगळं बोअर झालं तर जाऊ आमच्या मित्राच्या फार्महाऊसवर...
निस्ता धूमाकूळ !!!
आणि पाण्यात होडी नेऊन होडीत बसुन जेवू :)

मनस्वी's picture

30 Apr 2008 - 12:01 pm | मनस्वी

आणि पाण्यात होडी नेऊन होडीत बसुन जेवू

ही कल्पना मस्त.. मस्त होडीत बसून मी गरम गरम मटण-भाकरी-रस्सा-कांदा चोपतीये!

धमाल मुलगा's picture

30 Apr 2008 - 12:12 pm | धमाल मुलगा

ही कल्पना मस्त.. मस्त होडीत बसून मी गरम गरम मटण-भाकरी-रस्सा-कांदा चोपतीये!

हवं असल्यास त्याचा कुक तांबडा-पांढरा रस्सा पण बनवून देतो...
आता बोल!
मस्त स्पिरिटच्या दिव्यावर मंद आगीवर सगळं अन्न गरमागरम राहतं आणि .....
आयचा घो रे.....भाकरी कुस्करुन त्यावर रस्सा घालून हादडायचं....सोबतीला दहीकांदा, आणि बुक्कीनं फोडलेला कांदापण..जोडीला तोंडी लावायला खीमा.....
=P~ =P~ =P~

मनस्वी's picture

30 Apr 2008 - 12:18 pm | मनस्वी

B) बेष्ट

मुळशीला कोणत्याही ऋतूत जाऊ शकतो.प्रत्येक ऋतूत मुळशी बेस्टच वाटते.मी उन्हाळ्यात गेलीये,पावसाळ्यात गेलीये, थंडीत तर आह्हां ....सगळीकडे धुक...गरम चहा आणि भाजी.लय भारी.मला प्रत्येक ऋतूत मुळशी बेस्टच वाटल.उन्हाळ्यात चमचमणार पाणी बघितल्यावर भारी वाटल.
आणखीन एक पर्याय आहे.खडकवासला.खडकवासल्याला पाठीमागच्या बाजूने गेल्यावर पिकोक बेची पती दिसल्यावर आणखीन थोडे पुढे जायचे तिथे एक सोलिड ढाबा आहे.इथे जाताना तुम्ही आधीच शीतपेय किवा खायला घेऊन जा कारण इथे सगळ प्रचंड महाग मिळत.पण जागा छान आहे.इथे काही टेन्ट उभारलेत.तिथे बसून एकांताचा आनंद घ्या, किवा बदमिन्तन खेळायची सोय आहे.एकदा जाऊन जा.छान आहे.

<पिकोक बेची पती>
"ची" पती की "चा" पती?
<बदमिन्तन खेळायची सोय आह>...... अय्या मलापण खेळायचे बदमिन्तन....... पण कसे खेळतात हे?

परिकथेतील राजकुमार's picture

12 Jan 2012 - 6:53 pm | परिकथेतील राजकुमार

किचेन मावशी अहो हा प्रतिसाद आहे का विनोद ?

मुळशीला कोणत्याही ऋतूत जाऊ शकतो.प्रत्येक ऋतूत मुळशी बेस्टच वाटते.मी उन्हाळ्यात गेलीये,पावसाळ्यात गेलीये, थंडीत तर आह्हां ....सगळीकडे धुक...गरम चहा आणि भाजी.लय भारी.मला प्रत्येक ऋतूत मुळशी बेस्टच वाटल.उन्हाळ्यात चमचमणार पाणी बघितल्यावर भारी वाटल.

चहा आणि भाजी ? हा कुठला पर्याय आहे ?

आणखीन एक पर्याय आहे.खडकवासला.खडकवासल्याला पाठीमागच्या बाजूने गेल्यावर पिकोक बेची पती दिसल्यावर आणखीन थोडे पुढे जायचे तिथे एक सोलिड ढाबा आहे.इथे जाताना तुम्ही आधीच शीतपेय किवा खायला घेऊन जा कारण इथे सगळ प्रचंड महाग मिळत.पण जागा छान आहे.इथे काही टेन्ट उभारलेत.तिथे बसून एकांताचा आनंद घ्या, किवा बदमिन्तन खेळायची सोय आहे.एकदा जाऊन जा.छान आहे.

पिकोक बेची पती ? आणि ढाब्यावरती सगळे महाग मिळते म्हणूण बाहेरुन शीतपेय आणि खायला घेउन जायचे ? =)) =)) हाणेल की धरुन धाबेवाला.

बदमिन्तन ? 'बदनाम झालेले चिंतन' ह्या अर्थाचा शब्द वाटला हा.

मनस्वी's picture

29 Apr 2008 - 5:10 pm | मनस्वी

वरंधा घाटात जायचं.. आणि पायवाटेने झाडाझुडपातून, झर्‍यांमधून, खाचाखळग्यांतून सरळ खाली शिवथरघळीपर्यंत चालत यायचं.. सही वाटतं.

कसे ?कोठे जायचे ? तेथे काय पहायचे ते लिहा

ध्रुव's picture

29 Apr 2008 - 6:16 pm | ध्रुव

वरंधा घाट जवळ जवळ निम्म उतरुन गेल्यावर उजवीकडे घाट उतरायच्या रस्त्यातच एक छोटा रस्ता जातो. येथे माझ्या आठवणीप्रमाणे एक पाटी आहे शिवथरघळकडे. पाटी निट दिसेल अशी नाहीये त्यामुळे चुकायची शक्यता आहे. हा कच्चा रस्ता आपल्याला थेट शिवथरघळीकडे घेउन जातो.
मोठी गाडी जाणार नाही पण छोट्या गाड्या अथवा मोटारसायकल नक्की जाते. पावसाळ्यात हा रस्ता पकडुन शिवथरघळ गाठणे म्हणजे एक मस्त अनुभव आहे.
--
ध्रुव

प्रभाकर पेठकर's picture

3 May 2008 - 9:23 am | प्रभाकर पेठकर

मोठ्या गाड्याही जाऊ शकतात/जातात.

शनीवार वाड्याजवळच , दक्षीणाभिमुखी मारुतीजवळ केतकर आणि जोशी यांनी उभारलेले ' संधिपाद प्राणि संग्रहालय' आहे. तिथे फक्त संधिपाद वर्गातीलच प्राणि पहायला मिळतील.

धमाल मुलगा's picture

29 Apr 2008 - 5:33 pm | धमाल मुलगा

आयला,
नक्की कुठे हो केशवराव?

माझ्या अगदी ढुं**जवळ आहे हे ठिकाण...पण जळ्ळं माहितीच नाही.

लिखाळ's picture

29 Apr 2008 - 5:56 pm | लिखाळ

दक्षिणाभिमुखी मारुतीचे दर्शन घेवून झाले की डावीकडे पाहावे. तेथेच तो वाडा आहे.
--(द्विपाद) लिखाळ.

धमाल मुलगा's picture

29 Apr 2008 - 6:20 pm | धमाल मुलगा

धन्यवाद लिखाळशेठ!

आता भेट देऊनच बघतो.

-(मी सुध्दा द्विपाद) ध मा ल.

आंबोळी's picture

29 Apr 2008 - 10:05 pm | आंबोळी

धमु,
भेट देउन झाल्यावर भेटवर्णन जरूर लिहा. बाकिच्याना उपयोगी पडेल.

तसेच बाकिच्यानी नुसती नावे सुचवण्याऐवजी तेथे जाउन आल्याचे अनुभव सांगितल्यास हा जास्त मदत होइल.

भडकमकर मास्तर's picture

30 Apr 2008 - 4:20 pm | भडकमकर मास्तर

संधिपाद हा शब्द शाळेनंतर बर्‍याच वर्षांनी उच्चारला.....
परत परत म्हणून काय मज्जा वाटते... :SS
अहाहा, काय ते शब्द.....
सन्धिपाद, डिंभक, ग्रसनीमध्यकर्णनलिका,आंत्रपुच्छ...

( शाळेत मराठीत जीवशास्त्र शिकलेला) भडकमकर..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Aug 2008 - 12:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला अळंबी हा शब्द उच्चारायला आणि प्रत्यक्षात खायलाही आवडतो ... कधीमधी मोठ्ठ्या मॉलमधे जाऊन मी अळंबी (मश्रूम) मागते ... लई धम्माल येते.

आर्य's picture

29 Apr 2008 - 5:26 pm | आर्य

अ ) कार्ला - भाज्या च्या लेण्या हा पण ऐक चांगला पर्याय आहे.
रेल्वेने कार्ल्या पर्यंत जाता येतं किंवा जुना मुंबई रस्त्याने ही जाता येते. फक्त ५० कि.मी
पावसात जायला ऐक वेगळीच मजा आहे.
ब) शिवथर धळ - सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं निरव शांत, डोगर, गर्द दाट झाडी आणी धबधब्यांनी वेढ्लेलं ठिकाण. (रामदास स्वामींनी दासबोध ऐथेच लिहीला होता) अंदाजे ९० कि. मी.

भटकंती प्रिय (आर्य)

धमाल मुलगा's picture

29 Apr 2008 - 5:29 pm | धमाल मुलगा

थोडंसं दूर जायची तयारी असेल तर
पुण्याहून सासवडला जावं (३०किमी) तिथून साधारणतः १३ कि.मी.वर पुरंदर गड आहे...केवळ अप्रतिम!!!
चढायला अतिशय सोपा, आणि एकदम हिरवाकंच....
परताना, पुरंदर पायथ्यापासून साधारण ६ कि.मी.वर असलेले नारायणपूरचं मंदीरही छान.

सिंहगड रस्त्यावर पु.ल.देशपांडे उद्यान देखील अगदी जाऊन येण्यासारखं.

ध्रुव's picture

29 Apr 2008 - 5:45 pm | ध्रुव

पुरंदर मस्तच. पायथ्याचे एक मुखी दत्तच्या मंदिराबरोबरच त्याशेजारचे स्वयंभू शकराचे मंदिरही छान आहे.
पुरंदरला गेलाच तर वज्रगड, केदारेश्वर न विसरता बघायलाच हवे :)
--
ध्रुव

मालोजीराव's picture

12 Jan 2012 - 6:02 pm | मालोजीराव

पुरंदर अप्रतिमच....शंभूराजाचं जन्मस्थान...किल्ल्यावरची पुरंदरेश्वर,केदारेश्वर मंदिरे पाहण्यासारखी...
पायथ्याजवळ असलेल्या नारायणपूर येथील प्राचीन नारायणेश्वराचे आणि एकमुखी दत्ताचे मंदिर हि सुंदर !
- मालोजीराव (पुरंदरकर)

ध्रुव's picture

29 Apr 2008 - 5:42 pm | ध्रुव

बेडसे
भुलेश्वर
त्रिशुन्ड्या मंदिर - मंगळवार पेठ
शिरवळची लेणी - ५५ किमी
मस्तानी तलाव - २५ किमी
भिगवण - पक्षी अभयारण्य - ९० किमी
कवडी - पक्षी निरीक्षणासाठी
कर्नाळा - पक्षी अभयारण्य - अंदाजे ११०
चाकणचा किल्ला
चाकणजवळचे वराह मंदिर
पाषाण तलाव - - पक्षी निरीक्षणासाठी ;)
सोनोरीचा वाडा व भुयार
सोनोरीचा किल्ला - मल्हारगड
वाईजवळचा घाट - मेणवली
निघोजची रांजणखळगी
वाईजवळ पांडवगड व गडाच्या पोटातील लेणी

सध्यातरी इतकीच आठवत आहेत आत्ता...

--
ध्रुव

धमाल मुलगा's picture

29 Apr 2008 - 5:47 pm | धमाल मुलगा

जबराट रे!!!

ध्रुव भौ!!! अरे काय कधी घरी असतोस की नाही? डायरेक्ट पायाला भिंगरी?
एका वट्टात भास्सकन्न इतकी ठिकाणं सांगून मोकळा, वर आणि

सध्यातरी इतकीच आठवत आहेत आत्ता...

हे?

लय भारी...भेटायलाच पाहिजे तुला...आपल्यासारखाच भटक्या दिसतोयस.

-(भटकमल्हारी) ध मा ल.

डिस्क्लेमरः भटक'भवानी' ला पुल्लिंगी शब्द सापडला नाही म्हणून मल्हारी वापरला. हेतू भावना दुखावणे नाही. आमच्याही भावना मल्हारीमार्तंडाच्या पायाशी रुजु आहेत.

आनंदयात्री's picture

29 Apr 2008 - 5:51 pm | आनंदयात्री

आमच्या ध्रुवाला झाडावरच्या पक्षिनिरिक्षणाचा छंद आहे हे माहितीये, पण हे पाषाण प्रकरण छानच, धम्या ध्रुवाला घेउन पहिल्यांदा तिकडेच जाउ !

मनस्वी's picture

29 Apr 2008 - 5:49 pm | मनस्वी

शुक्रवार पेठ.

लिखाळ's picture

29 Apr 2008 - 5:58 pm | लिखाळ

विश्रामबागवाड्यामध्ये कायमस्वरुपी 'पुनवडी ते पुणे`' हे प्रदर्शन असते. (कोणी पाहिले आहे का? माझे राहून गेले :( )
वाडा आणि प्रदर्शन असा दुहेरी हेतू साध्य होईल.
-- लिखाळ.

ब्रिटिश टिंग्या's picture

29 Apr 2008 - 6:14 pm | ब्रिटिश टिंग्या

विसरलात बरे!

ध्रुव's picture

29 Apr 2008 - 6:18 pm | ध्रुव

सिंहगड विसरणे केवळ अशक्य आहे :)
पण हल्ली जरा जास्तच गर्दी असते. त्यामुळे कधी कधी गड बघण्याचा विचका होतो.
--
ध्रुव

प्रमोद देव's picture

29 Apr 2008 - 9:04 pm | प्रमोद देव

पुण्याजवळच आहे. हे त्यांचे संकेतस्थळ पाहा. सकाळी जाऊन संध्याकाळी परतता येते. तिथे राहण्याची आणि जेवणाचीही व्यवस्था आहे.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

ब्रिटिश टिंग्या's picture

29 Apr 2008 - 9:48 pm | ब्रिटिश टिंग्या

चांगलचं महाग आहे.... #o

कळकट , मळकट भिंती, उखडलेल्या फरशा, कोळीष्टकं आणि कुबट वास. बघण्यासारखे काहि नाही , माडेल ट्रेन बद्द्ल काहीच माहीती मिळत नाही. विक्री साठी ठेवलेल्या ट्रेन तद्द न चीनी बनावटीच्या व अवाच्यासवा महाग.

त्या पेक्षा राजा केळकर संग्रहालय उत्तम आहे.

इनोबा म्हणे's picture

30 Apr 2008 - 12:13 pm | इनोबा म्हणे

पुण्यातील प्रेक्षणिय स्थळे(फि'रस्त्यांसाठी)

नळस्टॉप चौकः आजूबाजूला जे दिसेल ते बघा.बाजूलाच अप्पाचे हाटील असल्याने खाण्यापिण्याची उत्तम सोय.
गुडलक चौकः शक्यतो संध्याकाळी जा,बघण्यासारख्या भरपूर प्रेक्षणिय गोष्टी ;) मरेस्तोवर खाता येईल एवढी हाटीलं आहेत.चिंता नको.
अलका चौकः पुण्याच्या रहदारीचे तीन तेरा वाजलेले दूपारी बारा ते रात्री नऊ कधीही येऊन पहा, हे पाहून बोर झालं तर शेजारीच अलका टाकीत जाऊन तीला पहा....स्वारी....पिच्चर पहा.इंटरवलला खायची सोय होईल,वांधा नाय.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

धमाल मुलगा's picture

30 Apr 2008 - 12:19 pm | धमाल मुलगा

फर्ग्युसन रोड राहिलं की...
ऐन विकांताला भर संध्याकाळी....बाब्बोय...लै मजा येते :))

अरे पण विजुभाऊ विचारताहेत ते पाहूण्यांना घेऊन जायला...दोस्तांना नाय..तेच जर असतं तर तिच्याआयला त्याला प्रेक्षणिय स्थळं कशाला हवीत? मोप ठिकाणं पडलीयेत दोस्तांना घेऊन जायला...आन् ती सगळ्यांना ठाऊक आहेतच की ;)

इनोबा म्हणे's picture

30 Apr 2008 - 12:27 pm | इनोबा म्हणे

फर्ग्युसन रोड राहिलं की...
ऐन विकांताला भर संध्याकाळी....बाब्बोय...लै मजा येते

अरे म्हणून तर गुडलक चौक म्हटलो ना!

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

"अपाची" कसं वाटत मग?
जमायचं का तिह्ते?
पुर्वि गेलो होतो,पण साला मिस्रुडही फुट्लं नसल्याने(आणि चेहर्‍यावग्राहक""संभाव्य ग्राहक" अजिबात वाटत नसल्यानं हाकलुन दिलं
होतं त्यांनी.)

धमाल मुलगा's picture

30 Apr 2008 - 5:21 pm | धमाल मुलगा

:)
भौ...आपाची है आपल्याच बापाची !!!!
कधी पण चालेल रे......

चेहर्‍यावग्राहक""संभाव्य ग्राहक" अजिबात वाटत नसल्यानं हाकलुन दिलं होतं त्यांनी.

आरारारा....लै च पोपट झाला म्हण की :)
आता नाय देणार...तिच्याआयला, आपण कशाला हौत? मिसरुडच काय, येड्या मलापण असे अनुभव यायला लागले म्हणून हनुवटीवर कुंचा राखलाय :))
आता कोण नाय अडवणार....

तू येच

च्यायला धम्या तू तिकड यायचा का ?
मग मी तुला नक्की बघितलं असलं राव, कारण मागचे ८ महिने सोडले तर गेली"२ वर्षे" आम्ही आठवड्यातन कमीत कमी २ वेळा तिकड पडीक होतो ...

अजून त्यांचा मॅनेजर व वेटर ओळखतात आपल्याला ...
मी आणि माझा एक मित्र, पर हेड एक "अपाची टोरंटो" संपवल्याशेवाय उठत नव्हतो ...
त्यानंतर "चैतन्यचा" पराठा ...

मी तुला नक्की पाहिलं आहे मग राव ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

धमाल मुलगा's picture

30 Apr 2008 - 5:43 pm | धमाल मुलगा

आयला,
असु शकेल यार!

आम्ही आपले गपचीप स्मिरनॉफ विथ कोक हाणायचो...आणि वर एक-एक सनराईज टकीला :)

च्यायला, तू कुठं रे बसायचास? ग्राउंड फ्लोअर का फर्स्ट? आमी फर्स्टला आतल्याबाजूला असायचो :)

घ्या...ह्यालाच म्हणत असावेत...
"समान व्यसनेषु खलु सौख्यं "

छोटा डॉन's picture

30 Apr 2008 - 5:57 pm | छोटा डॉन

साधरणता खालच्या मजल्यावर आतले "डीजे" जवळचे टेबल, कारण डीजे आपला दोस्त ...
किंवा,
वरच्या मजल्यावर आतल्या खोलीत जाण्यासाठी असलेल्या दरूजाजवळेचे बाहेरच्या जागेतले टेबल ...

>>""समान व्यसनेषु खलु सौख्यं "
हे बाकी खरे ...

अवांतर : नविन आपाची म्हणजे "आपाची - नेक्स्ट" ट्राय मारले आहे का ?
लै भारी, एकदम मोकळचाकळ ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Aug 2008 - 12:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
विसुनाना's picture

30 Apr 2008 - 12:29 pm | विसुनाना

पुण्यात - सिंहगड रोड, आनंदनगर, सनसिटी करत पुढे गेल्यावर एक सुंदर आमराई आहे. कधी गेलात का?
वनभोजन, गप्पाटप्पा करायला मस्त ठिकाण आहे.

इनोबा म्हणे's picture

30 Apr 2008 - 12:40 pm | इनोबा म्हणे

पुण्यात - सिंहगड रोड, आनंदनगर, सनसिटी करत पुढे गेल्यावर एक सुंदर आमराई आहे. कधी गेलात का?
नाही.

वनभोजन, गप्पाटप्पा करायला मस्त ठिकाण आहे.
आणि 'घ्यायला'?

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

छोटा डॉन's picture

30 Apr 2008 - 5:20 pm | छोटा डॉन

लेका ते सिंहगड एरिया सांगतायत, नांगरे पाटील नाव ऐकल आहेस ना ?
तेच्या नको नादी लागू,
त्याच्याऐवजी सुमडीत दुसरीकडं बस, कसं

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

इनोबा म्हणे's picture

1 May 2008 - 2:35 am | इनोबा म्हणे

लेका ते सिंहगड एरिया सांगतायत, नांगरे पाटील नाव ऐकल आहेस ना ?
आपण सिंहगड एरीयात दारुचे नावपण काढत नाय भौ :S

त्याच्याऐवजी सुमडीत दुसरीकडं बस, कसं
मुळशी बरं हाय त्याच्यापरीस. :B

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

१. नीळकंठेश्वर : पुण्यापासून पानशेतच्या दिशेने जाताना रुळे गावाजवळ नीळकंठेश्वर एका टेकडीवर वसले आहे. टेकडीवर शंकराचे स्वयंभू लिंग असणारे एक मंदीर आहे. मंदीराभोवतालच्या परिसरात मानवी आकाराच्या अनेक मूर्ती वापरून साकारलेले पुराणातील प्रसंगांचे देखावे हे नीळकंठेश्वरचे वैशिष्ट्य आहे. पावसाळ्यात तर नीळकंठेश्वरची टेकडी अप्रतीम सौंदर्याने नटते. टेकडीवरुन पानशेत आणि वरसगाव ह्या दोन मुख्य धरणांचे मोठे विहंगम दृश्य दिसते.

२. भेडसे लेणी : पौड गावाच्या बस थांब्यापुढून लोणावळ्याच्या दिशेने जाणार्.या वाटेने वाटचाल करुन भेडसे गावातील लेणी देखिल पाहण्यासारखी आहेत. भेडसे गावाच्या मार्गावर पवना नदीवरील धरण (फागणे) तुंग, तिकोन्यासारखे किल्ले ह्यांचे दर्शन होऊ शकते.

अजून काही नवी ठीकाणे असतील तर लिहा

प्रचेतस's picture

10 Jan 2012 - 6:37 pm | प्रचेतस

भेडसे नव्हे हो, बेडसे.

लिखाळ's picture

30 Apr 2008 - 3:57 pm | लिखाळ

भल्या पहाटे तळजाईवर वातावरण सुंदर असते. तेथे पळण्यासाठी एक पट्टा सुद्धा केलेला आहे. त्यावरुन फिरताना मोर दिसू शकतात. फार मजा येते.
--लिखाळ.

आनंदयात्री's picture

30 Apr 2008 - 5:25 pm | आनंदयात्री

पण लोकं असतील अशाच ठिकाणी फिरावे, लुटालुटीची भिती असते.

कुंदन's picture

30 Apr 2008 - 7:07 pm | कुंदन

लोणावळ्याला उतरून पायी जायचे. ....

(लोणावळ्याचा)कुंदन

Punyat Jangali Maharaj road varil pataleshwar mandir pan khoop chhan ahe. Ani shejaracha jangali maharajancha math (मठ) hi chhan ahe. Pataleshwar mandirat Tripuri pournimela sandhyakali tel vaatichya panatyanchi aras kartat. hajaro pantya lavtat. te baghanyasarkhe asate. Khoop gardi asate tya veli tithe.

Dusre ek thikan mhanje Bhuleshwar Mandir : He punyapasun tase javalach ahe. pan nemke kuthe ahe he atta athavat nahi. Konala mahit asalyas tyanni tya baddal mahiti dyavi. He mandir di dagadache ahe. Bhar unhat jari tithe gele tari aat mandirat masta gaar vatate. Mandirache bandhkam ani koriv kam hi baghanyasarkhe. Ardhya divsachya trip sathi chhan ahe thikan.

- Ishwari

प्रभाकर पेठकर's picture

2 May 2008 - 8:41 am | प्रभाकर पेठकर

ईश्वरी madam (or Sir?),

Aapan khupacha chhaan maahitI dilI aahe. Jangali Maharaj road varil pataleshwar mandiralaa ajun bheT dilelI naahI. pan aataa jarUr bheT dein. jangali maharajancha math (मठ) suddhaa pahaavaa mhanato.
TumhI suchavilele dusare Thikaan, Bhuleshwar Mandir, sudhaa paahile paahije. malaa vaaTate hyaachI chhaayaachitre mipaavar prakashit zaalelI aahet. tevhaapaasunach Bhuleshwar Mandiraalaa (Mandiralaa mhanaje Devalaalaa hnnn! Nahitar tumhaalaa bhalatecha vaaTaayache.) bheT dyaayachI ichchhaa aahe. paahuyaa kadhI jamatay te.

Tumachyaa sadarahu maahitI baddala punahshchya manhapUrvak Dhanyavaad.

कलंत्री's picture

2 May 2008 - 1:22 pm | कलंत्री

पुण्यात इतकी प्रेक्षणीय स्थळे असु शकतात यावर विश्वास बसला नसता!!!.

चला सुट्टीमध्ये मुलांबरोबर आखणी करायला बरे झाले.

महेश हतोळकर's picture

2 May 2008 - 2:10 pm | महेश हतोळकर

पुण्याजवळची विवीध ठिकाणे ही घ्या.

कलंत्री's picture

2 May 2008 - 5:20 pm | कलंत्री

कुतुहल हे दुकान गांजवे चौकाजवळ आहे. यात लहानमुलांसाठी बरीच शाश्त्रीय खेळणी मिळतात.

सेनापती बापट मार्गाजवळ एक हॉबी क्लास नावचे दुकान आहेत, तेथे छंद जोपासण्यासाठी बरीच खेळणी / पुस्तके / मार्गदर्शन मिळते असे ऐकले आहे.

फनकी नावाचे एक खेळगृह हे सातारा रस्त्यावर आहे. चांदणीचौका जवळ २/३ किमी वर असावे. कुटुंबीयासह ३/४ तास मनोरंजनाची हमी.

मानस रेस्टॉरंट हे पौडरस्त्यावर आहे. तेथे गोकार्ट असा खेळ प्रकार आहे.

ईश्वरी's picture

3 May 2008 - 12:17 am | ईश्वरी

Ajun 2 thikane athavali :
Katraj chya pudhe Pune-Satara rode ne Nasrapur chya dishene jayche. Tya road var davikade ek fata lagto..bahutek ketkavle ase nav ahe...faatyache. Tithun saral aat mandir yeiparyant jayche. (pune satara rasta chhan ahe pan ha gavatil rasta ajibat khachkhalgyancha ahe tyamule vel lagto.)
He balaji mandir mhanje south madhil Tirupati balaji mandirachi pratikruti ahe. Khoop chhan bandhlele ahe. Sarv vyavastha atyant chokh ahe ani agadi tirupati mandirasarkhich ahe. Sakal sandhyakal arati prasad asato. vaadya vadan asate. Mandiravar ani itar vyavasthanvar khoop kharcha kelela disun yeto. Vishesh mhanje Mandir v ajubajucha parisar khoop swachha ahe. Rahanyachi soy hi ahe bahutek (hyabaddal khatrishir mahiti nahi.)

Abhiruchi Baag: Pune sinhagad rastyavar ahe. Purvi Bhide bag hi mhanat asat. sakali 10-11 chya sumaras jaun parat dupari 3-4 chya sumaras ghari yeu asha picnic sathi changale thikan ahe. Aat baryach soyi ahet. khas maharshtriyan paddhatiche jevan milte. ..agadi pithala bhakri , taak suddha. zopdi madhe chourang patavar basnyachi soy keleli ahe. Vadhayala mavla veshatil vadhpi asatat. Jyanna maandi ghalun basayala tras hoto tyancyasathi table khurchyanchi hi soy ahe. Aat madhe mothi amrai ahe...tarin ride, camel ride ahe..play park ahe...zoka , ghasargundi vagaire over night rahanyachi pan soy ahe. khedegavat kinva shetat bhataknyacha anubhav agadi alpa ka hoina pan milu shakto

शरुबाबा's picture

1 Aug 2008 - 12:29 pm | शरुबाबा

विजुभाउ धन्यवाद

मैत्र's picture

1 Aug 2008 - 2:57 pm | मैत्र

मी एके काळी तिथे राहात होतो... जेव्हा सन सिटी नव्हती तेव्हा..
अतिशय दाट झाडी आणी एक मोठी न बांधलेली विहीर .. एक गुर्‍हाळ ही होते...
बघायला गेलं तर तांब्याभर उसाचा रस द्यायचे...
असंख्य झाडं होती आंब्याची... अजिबात उन आत पोचायचं नाही..

अजून आमराई अस्तित्वात आहे हे माहीत नव्हतं... तिथल्या बेसुमार बांधकामात तोडली गेली असं वाटलं..