वारी

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जे न देखे रवी...
17 Jul 2010 - 6:43 pm

आले माहेरी माहेरी माझ्या विठाईच्या दारी
फारा दिसांनी ग झाली माझी पंढरीची वारी

वाट बदलली तरी काही ओळखीच्या खुणा
नव्या रानराईतही निशिगंध फुले जुना

खुल्या आकाशी चांदणं रात चंद्राने भिजली
नभमाईच्या केसात चंद्रशब्दांच्याही ओळी

काही भेटल्या ग सया सया आठ-आठवाच्या
वारी सरली गुजात जुन्या हास-आसवाच्या

नवे सौंगडी भेटले, जिवाभावाचे मैतर
नव्या आठवांची घेते घेते भरून घागर

आता पाय स्पर्शू किती घेऊ आशीर्वाद किती
किती मातीचे ओघळ ओघळवू मी या हाती

माझी पंढरीची वाट वाट सूर्याची पूर्वीची
आता पश्चिमेची ओढ ओढ लागली प्रियाची

गेलं माहेर माहेर झाला वळसा वळसा
चंद्रभागेच्या पाण्यात माझा बुडला कळसा

शांतरसकविता

प्रतिक्रिया

दत्ता काळे's picture

17 Jul 2010 - 7:03 pm | दत्ता काळे

कविता आवडली.

काही भेटल्या ग सया सया आठ-आठवाच्या
वारी सरली गुजात जुन्या हास-आसवाच्या

- हे कडवं विशेषकरुन आवडलं.

यशोधरा's picture

17 Jul 2010 - 7:09 pm | यशोधरा

वाट बदलली तरी काही ओळखीच्या खुणा
नव्या रानराईतही निशिगंध फुले जुना

हे आवडलं.

पाषाणभेद's picture

17 Jul 2010 - 7:56 pm | पाषाणभेद

मस्त आहे
>>>आता पश्चिमेची ओढ ओढ लागली प्रियाची
हे वाचून डोळे पाणावले.कंठ दाटून आला.

The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

चतुरंग's picture

17 Jul 2010 - 8:02 pm | चतुरंग

मस्तच, छान काव्य!
(म्हटलं तर पंढरीची वारी म्हटलं तर भारतवारीनंतर मनात उठणार काहूर असं दोन्ही साधलं आहेस)

चतुरंग

श्रावण मोडक's picture

17 Jul 2010 - 9:14 pm | श्रावण मोडक

सहमत.

आळश्यांचा राजा's picture

18 Jul 2010 - 11:07 am | आळश्यांचा राजा

म्हटलं तर पंढरीची वारी म्हटलं तर भारतवारीनंतर मनात उठणार काहूर असं दोन्ही साधलं आहेस

छान!

आळश्यांचा राजा

मिसळभोक्ता's picture

19 Jul 2010 - 10:36 pm | मिसळभोक्ता

काही भेटल्या ग सया सया आठ-आठवाच्या
वारी सरली गुजात जुन्या हास-आसवाच्या

संदर्भः शिवाजी-अफझलखान भेट ?

प्राजेश वारीघडवी ?

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jul 2010 - 8:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंढरीची वारी एकदम मस्तच...!
असेच येत जा दिंडीला. :)

-दिलीप बिरुटे

क्रेमर's picture

17 Jul 2010 - 9:50 pm | क्रेमर

नवे सौंगडी भेटले, जिवाभावाचे मैतर
नव्या आठवांची घेते घेते भरून घागर

मस्त!

_________________
बाकी चालू द्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Jul 2010 - 10:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी ... गुर्जी, तुमची कविता आवडलीच!

अदिती

सहज's picture

17 Jul 2010 - 9:54 pm | सहज

मस्त!!!

मीनल's picture

17 Jul 2010 - 10:21 pm | मीनल

हाय क्लास. खूप खूप आवडली वारी.
=D>
मीनल.
http://myurmee.blogspot.com/

क्रान्ति's picture

17 Jul 2010 - 10:28 pm | क्रान्ति

सुरेख वारी!

क्रान्ति
अग्निसखा

लिखाळ's picture

17 Jul 2010 - 11:41 pm | लिखाळ

वा !! छान कविता.. आवडली.

-- लिखाळ.
देवाने विचारले अक्कल हवी की टू-व्हिलर? अनेक पुणेकरांनी टू-व्हिलरची निवड केली.

नंदन's picture

18 Jul 2010 - 1:46 am | नंदन

सुरेख कविता. शब्दांच्या द्विरुक्तीतून साधलेली नादमयताही मस्तच.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

भडकमकर मास्तर's picture

18 Jul 2010 - 2:29 am | भडकमकर मास्तर

चांगली जमलीय...
अवांतर : हम्म्म.. आता पल्याड जायची वेळ जवळ आलेली दिसते...

वाट बदलली तरी काही ओळखीच्या खुणा
नव्या रानराईतही निशिगंध फुले जुना

खुल्या आकाशी चांदणं रात चंद्राने भिजली
नभमाईच्या केसात चंद्रशब्दांच्याही ओळी

खूपच छान ..

सुरेख आहे वारी !

घाटावरचे भट's picture

19 Jul 2010 - 12:53 am | घाटावरचे भट

छान!!

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Jul 2010 - 4:13 pm | llपुण्याचे पेशवेll

हम्म छान कविता. वारी संपताना मेंदूतला केमिकल लोचा बरोब्बर उतरला आहे कवितेतून.
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

jaypal's picture

19 Jul 2010 - 8:06 pm | jaypal

कविता आवडली .
"वाट बदलली तरी काही ओळखीच्या खुणा
नव्या रानराईतही निशिगंध फुले जुना

खुल्या आकाशी चांदणं रात चंद्राने भिजली
नभमाईच्या केसात चंद्रशब्दांच्याही ओळी" =D> =D> =D>
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/