विकांताची करमणूक .

रामदास's picture
रामदास in जे न देखे रवी...
17 Jul 2010 - 7:55 am

फार फार दिवसांपूर्वी लिहीलेली ही विनोदी कविता आहे.

वाचा. हसा.विसरा. या क्याटेगरीतली.

जुने जालसंदर्भ शक्य तितके पुसून टाकले आहेत .

अजूनही काही सापडले तर ते हसण्यावारी न्यावेत ही विनंती.

अर्ज-ए-पेश है रफीक जुमाणीची प्रेमकविता.
*********************************************************************************************

मी हलवीत बसतो गल्ल्यामधली पाव-अधेली नाणी

कशी कळावी तुला प्रेमळे दिलकी आणिबाणी.

"हल्का कथ्था छोडबे कुत्ते" सांगू नको गर्जूणी

मी पिंक दिलाचा ग्यासूद्दीन तू खिडकीत्ली पदमीणी.

मी फुटका फानूस कविमनाचा तू माझी रोशणी

इकरार करू मी कसा प्यारचा थुंकून येतो गुळणी.

बचूभाईची कसम घालतो प्रेमी रफीक जुमाणी

मी पतलीगलीचा बादशहा तू डॅन्स बारची राणी.

हास्यकविता

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

17 Jul 2010 - 8:26 am | प्रकाश घाटपांडे

फारच चावट ब्वॊ!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Jul 2010 - 9:33 am | बिपिन कार्यकर्ते

उच्च!!!

=)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते

निखिल देशपांडे's picture

17 Jul 2010 - 11:21 am | निखिल देशपांडे

=)) =)) =))
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

श्रावण मोडक's picture

17 Jul 2010 - 12:29 pm | श्रावण मोडक

छ्या... तुम्ही सगळे संदर्भ पुसण्याचा प्रयत्न केलात खरा; पण ते संदर्भच असे चिवट की या रचनेला ते आपल्या चौकटीतच घेऊन बसले आहेत. जाता जाईनात. मग फक्त =)) =)) =))

नंदन's picture

17 Jul 2010 - 4:17 pm | नंदन

असेच म्हणतो. संदर्भाचे ठसे मिटवणं मुश्किल ;)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Jul 2010 - 3:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ही ही ही ....

अदिती

मस्त कलंदर's picture

17 Jul 2010 - 4:12 pm | मस्त कलंदर

बाकी, खी खी खी आहेच. :)

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

विनायक प्रभू's picture

17 Jul 2010 - 4:21 pm | विनायक प्रभू

>:)

सुनील's picture

17 Jul 2010 - 4:25 pm | सुनील

;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चतुरंग's picture

17 Jul 2010 - 7:25 pm | चतुरंग

<०()8=<

चतुरंग

मी वाचत बसतो जालामधली 'जेसी-पीसी' कहाणी

कशी कळावी तुला लेखका दिलकी आणिबाणी.

'शिंपिण घरटे' कधी वेगळी 'गडबोल्याची कहाणी'

कधी 'दुपारी कवितावाचन' अन 'शॄंगारिक गाणी'

मी एक बावळा अधिरमनाचा 'गाण्याची शिकवणी'

इकरार करू मी कसा, वाचली 'इब्लिसचाचा कहाणी'.

'कोरांटीच्या सुमनांची' मी कसम घालतो झणी

मी पतलीगलीचा विडंबक तू जातिवंत लेखणी!

चतुरंग

भडकमकर मास्तर's picture

18 Jul 2010 - 2:31 am | भडकमकर मास्तर

अहाहा...मी पतलीगलीचा विडंबक तू जातिवंत लेखणी!

लै बेस्ट

सहज's picture

18 Jul 2010 - 5:50 am | सहज

अहाहा...मी पतलीगलीचा विडंबक तू जातिवंत लेखणी!

लै लै बेस्ट

पिंगू's picture

18 Jul 2010 - 9:25 am | पिंगू

मूळ धाग्यातील आणि रंगाशेठचे विडंबन दोन्ही झ्याक.......

- पिंगू