अंतरंग

jaypal's picture
jaypal in जे न देखे रवी...
7 Jul 2010 - 8:40 pm

अंतरंग

पावसाच गाणं
मातीच न्हाणं
माझ समुद्र होण
अंतरंगी

ओला पक्षी
हिरवी नक्षी
मी एक साक्षी
अंतरंगी

चींब सर
ओली थरथर
अधिर हे अधर
अंतरंगी

उठे उधाण
नुरे देहभान
मन हे तुफान
अंतरंगी

झाकल्या खुणा
उघड्या पुन्हा
घडे काय गुन्हा?
अंतरंगी

जयपाल ७/७/२०१०

शृंगारकविता

प्रतिक्रिया

प्रभो's picture

7 Jul 2010 - 9:08 pm | प्रभो

दाद्या, भारी रे!!!

श्रावण मोडक's picture

7 Jul 2010 - 9:28 pm | श्रावण मोडक

काय हो? बरे आहात ना?
कविता आवडली.

धमाल मुलगा's picture

7 Jul 2010 - 9:33 pm | धमाल मुलगा

पावसाच गाणं
मातीच न्हाणं
माझ समुद्र होण
अंतरंगी

पहिल्या चार ओळींतच चिंब होऊन गेलो! :)

बढिया दाद्या! आता काव्यप्रांतात मुसंडी मारलीस की.

टारझन's picture

7 Jul 2010 - 10:32 pm | टारझन

ओ हो ! जेवण झालं का ?
कवीता आवडली

- घावण कडक

राघव's picture

8 Jul 2010 - 2:17 am | राघव

सर्वच कडवी आवडलीत! मस्त जमलीये कविता!

पावसाची सर बघून मन जुन्या आठवणींत रमतं अन् काही खास जखमा त्रास देऊ लागतात.. छानच मांडलीये!

झाकल्या खुणा
उघड्या पुन्हा
घडे काय गुन्हा?
अंतरंगी

क्लास क्लास!!

बाकी, जयपाल शेठ, तुमच्या कडच्या फोटू आणि आयकॉन्स च्या संग्रहानं वेड लावलंय! कुठून मिळतात देव जाणे.. :)

(ओलाचिंब) राघव

निरन्जन वहालेकर's picture

8 Jul 2010 - 8:12 am | निरन्जन वहालेकर

क्या बात है ! अतिशय सुंदर ! ! जबरा ! ! !

सहज's picture

8 Jul 2010 - 9:35 am | सहज

पावसाच्या पाण्याने आग लावली की तुमच्या अंतरंगी!

अगदी रवीनातैं व तुमचे विचार जुळाले की!

:-)

प्रमोद देव's picture

8 Jul 2010 - 10:41 am | प्रमोद देव
परिकथेतील राजकुमार's picture

8 Jul 2010 - 1:08 pm | परिकथेतील राजकुमार

जयपा शिर्षक वाचून घाईघाईने कविता उघडली पण निराशा झाली.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

jaypal's picture

8 Jul 2010 - 1:26 pm | jaypal

पराभाऊ चालायच हो सगळ्यांना एकाच वेळी कस खुश ठेवता येइल?

नाना कळा
प-याचा चाळा
अंगी हा उमाळा
अतरंगी
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

jaypal's picture

8 Jul 2010 - 1:26 pm | jaypal

पराभाऊ चालायच हो सगळ्यांना एकाच वेळी कस खुश ठेवता येइल?

नाना कळा
प-याचा चाळा
अंगी हा उमाळा
अतरंगी
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

संजा's picture

8 Jul 2010 - 6:00 pm | संजा

जबरा ! ! !

संजा

क्रान्ति's picture

8 Jul 2010 - 9:05 pm | क्रान्ति

धमुच्या म्हणण्याप्रमाणे पहिल्या चार ओळींनीच गुंतवून टाकलं! खूप खूप आवडली कविता. :)

क्रान्ति
अग्निसखा

jaypal's picture

8 Jul 2010 - 9:41 pm | jaypal

प्रतिसाद कर्त्यांचे आणि वाचकांचे आभार
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/