या आधी
जपान चित्रसफ़र - १ (असाकुसा मंदिर)
जपान चित्रसफ़र - २ (ओदायबा)
उंच इमारती , गजबजलेल्या मेट्रो आणि माणसांची प्रचंड गर्दी असलेल्या टोकियो पासून दूर गेलं की जपानचं बदलतं रूप पहायला मिळतं. उंच इमारतींच्या जागी पसरट टुमदार छोटी छोटी घरं, घरांच्या आजूबाजूला असलेली झाडे असलेलं कामाकुरा हे एक छोटस पण आकर्षक शहर. आणि टोकियो जवळच्या काही प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक.
टोकियो पासून अंदाजे ५० कि.मी. अंतरावर असणार्या कामाकुराचे मुख्य आकर्षण म्हणजे कोतोकू-इन नावाचे बुद्ध मंदिर आणि इथली भव्य बुद्ध मुर्ती. जपानी भाषेत इथल्या बुद्ध मुर्तीला 'दाइबुत्सु' (大仏 , daibutsu) म्हणतात. दाइ (大) म्हणजे मोठा / महान आणि बुत्सु (仏) म्हणजे बुद्ध. एकूणच 'महान बुद्ध'. या मुर्तीकडे पाहून लक्षात येतेच.
१३.३५ मीटर उंच आणि ९३ टन वजन असलेल्या या मुर्तीची बनावट ब्राँझची असून तिची निर्मिती साधारणपणे १३ व्या शतकाच्या मध्ये झाल्याचे बोलले जाते. मंदिराच्या रेकॉर्ड प्रमाणे त्यापुर्वी तिथे लाकडी मूर्ती होती व आजूबाजूला एक सभामंडप होता. १३व्या शतकाच्या ५व्या दशकात समुद्री वादळांमुळे मंदिराचा सभामंडप जवळ जवळ नष्ट झाला आणि त्यातच लाकडी बुद्ध मुर्तीचे सुद्धा नुकसान झाले. आणि ही मुर्ती तयार करण्यात आली तीच मुर्ती आजतागायत तेथे असल्याचे बोलले जाते. या मुर्तीसभोवतालचा मंडप मात्र फार काही टिकला नाही. तो १४ व्या शतकात दोन वेळा समुद्री वादळांमुळे नष्ट होउन पुन्हा उभारला गेला. पुढे १५ व्या शतकाच्या शेवटी आलेल्या सुनामी लाटां मुळे (जपानीत 'त्सुनामी') तो पूर्णपणे नष्ट झाला पण मुर्ती मात्र तशीच आहे.
या मंदिराचे आणि परिसराचे काही फोटो क्लिकले आहेत ते इथे टाकत आहे...
कामाकुरा शहरात ठिकठिकाणी अशी छोटी छोटी घरे (टोकियो व इतर शहरांच्या मानाने नक्कीच छोटी ) व हिरवीगार झाडे दिसतात.
मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. मंदिराच्या परिसरात अनेक झाडे आहेत.
मंदिराचे दुसरे प्रवेशद्वार. हे द्वार बंद असते. याच्या डाव्या बाजूला एक तिकीट खिडकी असून तिकीट घेतल्यानंतर तिथूनच एक छोट्या दारातून आत जाता येते.
या दुसर्या प्रवेशद्वाराजवळ इंग्रजीत एक सुचना लिहीलेली आहे ती अशी
"Stranger, whosoever thou are and whatsoever be thy creed, when thou enterest this sanctuary remember thou treadest upon ground hallowed by the worship of ages. This is the Temple of Bhudda (sic) and the gate of the eternal, and should therefore be entered with reverence."
दुसर्या प्रवेशद्वाराजवळील द्वारपाल !
शुद्धोदक.... प्राशनं करिष्यां अहम् ... (उजवी कडचा मी नावाप्रमाणे काळ्या पोषाखात ;) )
सभामंडपातील एक खांब. जपानीत काही तरी लिहीलय......
बुद्धमुर्तीच्या आठही बाजूंना व सभामंडपात असणारे बौद्ध भिक्खु (की भिक्षु काय म्हणतात ते)
यांच्या उजव्या हातात जपाची काळसर तपकिरी रंगाची माळ आणि डाव्या हातात चिनी/जपानी पद्धतीचे पात्र (वाटी म्हणावं तर मोठं आहे आणि कुंडा म्हणावं तर लहान)
यांच्या मुखातून सतत नामस्मरण चालले असते. (जपानीतच काहीतरी म्हणत होते, पण ऐकताना मात्र राम राम असं वाटत होतं )
मंदिराच्या परिसरात बागडणारी एक जपानी छोटुकली.... मी तिचं नाव 'मेइ च्यान' ठेवलयं....
'तोनारी नो तोतोरो ' (My Neighbour Totoro) नामक एका जपानी अॅनिमेशन मध्ये असलेल्या मेइ च्यान सारखी ती बागडत होती...
बुद्धमुर्तीसमोर असणारे धूप/उदबत्ती घर...
बुद्धमुर्तीसमोर असणारी एक कलाकृती
भव्य बुद्ध मुर्ती.... पहात रहावसं वाटत. ही मुर्ती आतून पोकळ आहे. ईच्छुकांना आतून पहाता येते. वेळे अभावी आणि रांग असल्या कारणानं राहिलं...
एक जपानी शिलालेख....
एका झाडावर लावलेली पाटी... यातील नावं आणि आपल्याकडची नावं जवळ जवळ सारखीच आहेत...
खरं तर खूप काही पहाण्यासारखं आहे कामाकुरा येथे . पुढे येइलच पुन्हा कधी तरी.....
क्यामेरा : कॅनॉन पॉइंट अॅण्ड शूट
मॉडेल नं : डी एस सी - डब्ल्यू ५५ (१० मेगापिक्सेल आणि ४ ऑप्टीकल झूम)
क्रमश:
प्रतिक्रिया
7 Jul 2010 - 1:41 pm | टारझन
अल्टि रे @@
अवांतर :
मेल्या ... कधी तरी जपाणी सुंदर्यांचीही (सचित्र) माहिती करुन दिलीस तर काय गोरा पडणारेस का कावळ्या ? =))
7 Jul 2010 - 2:00 pm | स्वाती दिनेश
वावावा, चित्रसफर मस्तच आहे,
स्वाती
7 Jul 2010 - 2:16 pm | भाग्यश्री कुलकर्णी
सही आहे.
7 Jul 2010 - 6:29 pm | येडा अण्णा
मन्दार साहेब... फोटू झकास आलेत.
7 Jul 2010 - 6:40 pm | प्रभो
मस्त रे!
7 Jul 2010 - 7:31 pm | अरुंधती
सगळेच फोटो मस्त! आणि ती धिटुकली छोटुली लई ग्वाड! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
8 Jul 2010 - 4:19 pm | खादाड
मस्त!!!