जी. ए. यांचे 'पिंगळावेळ' व काजळमाया' हे दोन कथासंग्रह मी पहिल्यांदा वाचले तेंव्हा मनांत जे घडले त्यातून हे मुक्तक स्फुरले. त्यासाठी त्यांचे शब्द उसने घ्यावे लागले. त्यानंतर त्यांचे संपूर्ण लेखन वाचण्याची एक ओढच लागली.
जीएंच्या कथा वाचून
माझ्याही मनाचे वेटोळे
उलगडू लागले
सप्तपाताळात पुरलेल्या
इच्छास्वामींच्या कवट्यांचे
आकर्ण हास्य दिसू लागले
वेदनागुहांच्या कट्टर अंधारात
दुःखाचे कंगोरे घासू लागले
दैवाने मिळालेले खुशजीभ
जीवनही अळणी वाटू लागले
सत्याच्या शोधात आपणही एक
यात्रिक व्हावेसे वाटू लागले
पिंगळावेळेच्या वाचनाने
काजळमायेचे डोह खुणावु लागले !!
प्रतिक्रिया
26 Apr 2008 - 6:39 pm | अभिज्ञ
कविता आवडलि.
जी ए वाचून मला तर न पिताहि किक बसते.....)
ह्या माणसाला तर मानलेच पाहिजे.
त्यानंतर त्यांचे संपूर्ण लेखन वाचण्याची एक ओढच लागली.
१००% सहमत.माझी हि अशिच अवस्था झाली होती.
(जी एं चा चाहता) अबब
26 Apr 2008 - 8:29 pm | शितल
चढलेली उतरवायची आसेल तर जीए च्या कथा वाचाव्या.
- रमलखुना
28 Apr 2008 - 8:09 am | झंप्या
रमलखुना??? :T ~X(
खून मारामारी चोरी दरोडेखोरी असली ष्टोरी दिसतेय.
27 Apr 2008 - 10:53 am | विसोबा खेचर
कविता अंमळ शब्दबंबाळ वाटते आहे..
असो, पुढील लेखनाकरता शुभेच्छा!
आपला,
(साधंसुधं, सोप्या भाषेत लिहिलेलं लेखन अधिक भावणारा) तात्या.
27 Apr 2008 - 4:53 pm | हेरंब
जीएंचे गद्यातले शब्द पद्यात वापरल्यामुळे तसे झाले आहे, ती कविता नसून मुक्तकच आहे. प्रतिक्रियेबद्दल आभार.
28 Apr 2008 - 10:45 am | विजुभाऊ
जी ए वर शब्द बंबाळ न करता काही लिहिणे म्हणजे रक्तगाभुळल्या सुवर्ण बनातले राघु उलट्या लटकलेल्या वटवाघाळासारखे हलताहेत असे वाटते
अरे बापरे :( हे तर उदास क्षितिजावरच्या विझलेल्या सूर्यावर शुभ्र अभ्रांची म्रुदुलवर्खी लखलखीत चादर अंथरल्या प्रमाणे वाटते.