गुत्त्यात मी प्यायलो कितीदा
सस्त्यात मी पटलो कितीदा!
तिचे दुर्लक्ष, तिचे नकार
इष्कात मी हरलो कितीदा!
मागितली मी नभाची मालकी
सूर्यास मी भेटलो कितीदा!
दिले धडे मी धर्मरक्षणाचे
विहिरीत मी बाटलो कितीदा!
तिचे ओठ, तिची स्तनाग्रे
स्वप्नात मी रंगलो कितीदा!
-- तात्या अभ्यंकर,
३० जून, २०१० - ख्रिस्तपश्चात.
प्रतिक्रिया
30 Jun 2010 - 9:37 pm | रेवती
दुसर्या ओळीत दुरुस्ती आवश्यक आहे का?
कि मलाच चुकीचे दिसते आहे.
सध्या, "चष्मा मी विसरले कितीदा!" असे झालेय माझे.
रेवती
30 Jun 2010 - 9:41 pm | विसोबा खेचर
कुठल्या दुरुस्तीबद्दल म्हणतेस तू रेवतीभाभी?
अवश्य सुचव.. मी नवकवी आहे, सुधारणा-सुचवण्यांचे स्वागत आहे! :)
'चष्मा मी विसरले कितीदा!' च्यायवजी 'चष्मा मी विसरते कितीदा!' हे अधिक योग्य वाटते.. :)
तात्या.
![](http://lh3.ggpht.com/_CuWvXTEA884/S9F1gbNMC0I/AAAAAAAAD8o/72Jl74gzSkI/Wiki.jpg)
30 Jun 2010 - 9:43 pm | रेवती
अहो तात्या,
रस्त्यात च्या ऐवजी सस्त्यात दिसते आहे.
पडलो ऐवजी पटलो दिसते आहे.
आणि ते जे चष्म्याचं म्हणतीये ते माझ्या चष्म्याबद्दल बोलतीये.:)
रेवती
30 Jun 2010 - 9:46 pm | विसोबा खेचर
तुला जे दिसतं आहे तेच बरोबर आहे..मला 'सस्त्यात' आणि 'पटलो' असंच म्हणायचं आहे.. तुझे नयन ठीकठाक आहेत! :)
तात्या.
30 Jun 2010 - 9:46 pm | रेवती
अच्छा! आत्ता समजले.
सॉरी बरं का!
आधीच्या ओळीत गुत्त्याचा उल्लेख आहे म्हणून .....
जाऊ द्या हो तात्या. मला खरच काहीही कळत नाही कवितेतलं.....पुन्हा एकवार सिद्ध झालं.
रेवती
30 Jun 2010 - 9:47 pm | विसोबा खेचर
हे हे हे, मला तरी कुठे कळतंय! :)
30 Jun 2010 - 9:56 pm | पंगा
Not failure, but low aim is a crime.
- पंडित गागाभट्ट.
30 Jun 2010 - 9:55 pm | शुचि
मागितली मी नभाची मालकी
सूर्यास मी भेटलो कितीदा!
मस्त!!!!
संपूर्ण कविताच मस्त!
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
30 Jun 2010 - 10:26 pm | टारझन
चालु द्या !!! अजुन "आतल्या" कविता येऊ द्या !! तुमच्या कविता/लेख काय उडायचे नाय ... लिवा हात सोडुन =))
शेवटच्या कडच्या स्वप्नदोष आहे वाट्टं =))
1 Jul 2010 - 10:34 am | विसोबा खेचर
'दोष' नाही म्हणता येणार..
कारण स्वप्नं दोन प्रकारची असतात.. झोपलो असतानाची आणि जागे असतानाची..!
माझं शेवटचं कडवं ही माझी (आणि बहुधा सर्वांचीच!) जागेपणीची किंवा बसल्याबसल्या चाळा किंवा विरंगुळा (किंवा आवश्यकता!) म्हणून मुद्दाम पाडून घेतलेली स्वप्न असतात! काही लोक याला फँटसी असे संबोधतात तेही योग्यच आहे!:)
तेव्हा झोपेतला तो स्वप्नदोष, आणि जागेपणीचे ते स्वप्नरंजन..! जे एकाकी पुरुषांच्या सेक्स लाईफ करता हेल्दी व सुरक्षित मानले जाते..! ;)
टारझनराव, स्वत:चं कौतुक नाही करून घेत परंतु शेवटचं कडवं प्रखर वास्तववादी आहे हे मान्य व्हावं! :)
आपला,
डॉ तात्या अभ्यंकर,
सेक्स स्पेशालिष्ट आणि गुप्तरोग तज्ञ!
कामाठीपुरा, १२ वी गल्ली, मुंबई! :)
1 Jul 2010 - 1:38 pm | शेखर
आपला,
डॉ तात्या अभ्यंकर,
सेक्स स्पेशालिष्ट आणि गुप्तरोग तज्ञ!
कामाठीपुरा, १२ वी गल्ली, मुंबई
ह्या ऐवजी खालील सही वास्तव वादी झाली असती तात्या ....
मिले या लिखे,
गुप्तरोग, बवसीर, कमजोरी का अक्सीर इलाज,
डॉ तात्या अभ्यंकर,
कामाठीपुरा, १२ वी गल्ली, मुंबई
:) ह. घ्या.
1 Jul 2010 - 9:46 pm | विसोबा खेचर
चालेल.. :)
1 Jul 2010 - 10:02 pm | टारझन
एवढ्याश्या उपायांनी काय पेशंट भेट्णार नाय ... ह्या पाहिलेले अजुन काही ...
"बचपन की गलतिया , धातु का पतला होना , स्वप्नदोष , नामर्दानगी , मुळव्याधी , जुलाबां , इत्यादीवर रामबाण विनाचिरफाड मरेपर्यंत इलाज केला जाईल"
तसेच मोबाईल रिपेर करतो.
- अजुन पर्यायसुचवी
1 Jul 2010 - 5:35 pm | पंगा
"आणि बहुधा सर्वांचीच" हे तितकेसे बरोबर नसावे. त्याचे काय आहे, इथल्या वाचकवर्गात स्त्रीवर्गाचे प्रमाण नाही म्हटले तरी बर्यापैकी आहे, आणि त्यांच्यापैकी कितीजणींना अशी दिवास्वप्ने पडत असावीत (किंवा 'आवश्यक' वाटत असावीत) याबद्दल साशंक आहे.
शिवाय, समलिंगी पुरुष वाचकांना अशा फँटसीज़ची कितपत आवश्यकता भासत असावी, याबद्दलही कुतूहल वाटते. याबद्दल समलिंगी पुरुष वाचकच काय ते सांगू शकतील. (सांगावेच, असा आग्रह नाही. किंवा सांगितलेच, तर "आवश्यकता भासते" किंवा "आवश्यकता भासत नाही" किंवा "वेगळ्या प्रकारच्या फँटशा असतात/त्यांची आवश्यकता भासते/त्यांची आवश्यकता भासत नाही" एवढी उत्तरे पुरेशी आहेत. आपापल्या फँटशांचे रसभरित तपशील देणे आवश्यक नाही. किंबहुना देऊही नयेत. समलिंगी पुरुषांनी, स्त्रियांनी किंवा कोणीही. याकरिता वेगळा कौल घेतला जाणार नाही. निदान मी तरी घेणार नाही. इतरांवर माझे नियंत्रण नाही.)
अर्थात, स्त्रीवाचकांस आणि समलिंगी पुरुषवाचकांस दिवास्वप्ने पडतच नसावीत, किंवा फँटसीज़ची आवश्यकता भासतच नसावी, असा कोणताही दावा यातून करावयाचा नाही. परंतु कदाचित (आवश्यकता भासत असल्यास) त्यांची दिवास्वप्ने, त्यांच्या फँटसीज़ किंचित वेगळ्या प्रकारच्या असू शकतील, एवढेच दाखवून द्यावयाचे आहे.
लिखाणात सर्वसमावेशकतेची उणीव भासते, तिच्याबद्दल तातडीने काहीतरी करणे गरजेचे आहे, एवढेच दाखवून देऊन मी माझा हा स्वल्प प्रतिसाद आता आवरता घेतो, आणि विनम्रपणे खाली बसतो.
- पंडित गागाभट्ट.
30 Jun 2010 - 11:08 pm | चतुरंग
हे मी कसा विसरलो? :?
चतुरंग